आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*९ एप्रिल १६३३*
मोघल बादशहा शाहजहानच्या फौजांनी निजामशाही विरुद्ध त्यांच्या देवगिरी किल्ल्यावर हल्ला चढवला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*९ एप्रिल १६६०*
पुण्यावर नेमलेला मोगल सरदार इह्तेशामखान हा वारला; त्यावेळी त्याच्या जागी मिर्झाराजांनी कुबादखानाची नेमणूक केली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*९ एप्रिल १६६९*
उत्तर हिंदूस्थानातील देवालये तोडण्यासाठी औरंगजेबाकडून विशेष फौज तैनात.
सूर्य ग्रहण आले, या सूर्यग्रहणाच्या मुहूर्तावर काशी विश्वेश्वराचे देवालय जमीन दोस्त करण्याच्या हुकुम बादशहाने सोडला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*९ एप्रिल १६७०*
औरंगजेबास एकंदर ५ मुली होत्या. त्यापैकी तिसरी कन्या बदरुन्नीसा ही ९ एप्रिल १६७० ला वारली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*९ एप्रिल १६७४*
इंग्रजांच्या नुकसान भरपाई मागणीस यश
ब्रिटिश सल्लागार मंडळाच्या सभेंत ठरले की, हेन्री ऑक्झेंडनने रायगडावर जाण्याची तयारी करावी. ऑक्झेंडन व उष्टीक यांनी विचार करून तहनाम्यांवर अधिक काही गोष्टी घालावयाच्या असल्यास सुचवाव्यात. ता. ९ एप्रिल रोजी मुंबईहून सुरतेस पत्र रवाना झाले; त्यात ३/४ हजार रुपयांची रत्ने खरेदी करण्याची जबाबदार अधिकाऱ्यांस विनंती करण्यात आली.
मुंबईकरांचे पत्र सुरतेस पोहोचल्यावर तेथील कौन्सिलच्या सभासदांचे मत झालें की नारायण शेणवी यास अपेक्षेबाहेर यश आलें आहे; तेव्हा शिवाजीस प्रसन्न करण्यासाठी राज्याभिषेकाच्यावेळी भरीव नजराणा द्यावा, म्हणून ६ मोत्ये, ३ अंगठ्या, १ शिरपेच, २ सलकडी अशा सुमारे ३३१४ रुपये किंमतीच्या वस्तु खरेदी करून मुंबईस धाडण्यात आल्या.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*९ एप्रिल १६८२*
मुघल सरदार शहाबुद्दीनचा 'किल्ले रामशेज'ला पुन्हा वेढा टाकण्याचा प्रयत्न. पण किल्लेदार व इतर मावळ्यांचा त्यांच्यावर जोरदार हल्ला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...