राजश्री संताजी घोरपडे (ममलकतमदार) यास देशमुख⛳⛳श १६१४श्रावण व १११ता २९जुलै १६९२ श्री

⛳⛳राजश्री संताजी घोरपडे (ममलकतमदार) यास देशमुख⛳⛳
श १६१४श्रावण व १११
ता २९जुलै १६९२
              श्री
अखंडित लक्ष्मा अलंकृत राजमान्य स्नेहांकित रामचंद्र अमात्य आशीर्वाद सुरुसन अल्लास तिस्सैन मेय्या व अल्लफ राजश्री छत्रपती स्वामी कर्नाटकात जातेसमयी तुम्हास या प्रांतात ठेऊन गेले  त्यासमयी इक्डे गलिमाची  धामधूम बहुत होऊन कुल देशदुर्ग हस्तगत केली होती ता गेला राज्यामध्ये काही अर्थ उरला नाही कुल मराठे याणी इमान खत्ता करुन गलिमाकडे गेले परतु तुम्ही इमान खत्ता न करिता राजश्रीच्या पायाशी बहुतच एकनिष्ठ धरून जमाव करुन शेख  निजाम व सर्जाखान व रणमस्तखान व जानसरखान असे उमदे वजीर बुडविले जागोजाग गलीमास कोट घालून नेस्तनाबूद केले आणि देश साडविला राज्य संरक्षणाच्या  प्रसगांस असाधारण श्रम केले,  अवरगजेबास दहशत लाविली पुढेही कित्येक स्वामिकार्याच्या ठाया हिम्मत धारिता या करिता तुम्हारविर राजश्री स्वामी संतोष होऊन मामले मिरज कर्याती २२ बेवीस एथील देशमुख होत ते नस्तनाबृद झाले त्याचे मुतालक होते ते बळावून देशमुखी वतन खात होते तेही दुर्बुद्धी धरून गलिमाशा मिळून फिसालत केली,  एकनिष्ठ धरून इकडे येऊन भेटले नाहीत, म्हणून त्यासि देशमुखी दूर करून तुम्हास अजरामरामत देशमुखा मामले मजकूरची अवलाद अफलाद वतन करून  दिली असे दिली असे पुत्रपौत्री चालवून देशमुखीचा हक्क लाजिमा व इनामत व इसाफतीचे गांव सालाबाद पाहिले देशमुखास चालले असतील  तेणेंप्रमाण  खाऊन वतनाचा मामला चालवून  सुखरूप रहाणे, तुम्हास  देशमुखी नूतन अजराममत दिली म्हणून शेरणी तुमच्या माथा होन पातशाही ५०००० पाच हजार करार केले असत याचा वसूल हुजुर घेतला 

       जिलहाद मोर्तब हुजूर

⚔️⚔️सरसेनापती संताजीबाबा घोरपडे म्हणजे  स्वामीनिष्ठा  सेनानी 
तत्कालीन कालखंडात  गलीमाकडे  वतन  मिळाले म्हणून अनेक वतनदार जात होते तसेच धनसिंग जाधवराव,  घोरपडे बंधू,  विठोजी चव्हाण,  अमात्य,  आदी  मंडळी कुलदेश रक्षणासाठी  पराक्रमाची शर्थ केलेली आहे हे येथे स्पष्टपणे दिसून येत स्वाकार्यावर  एकनिष्ठ असलेला सरदारांची  दखल छत्रपती राजाराम महाराजांनी घेऊन या ठिकाणांवर  सरसेनापती संताजीबाबा  घोरपडे(ममलकत मदार) यांनी देशुमखाची वतन दिले आहे  तर दुसरीकडे फितूर करणार वतनदारीची वतन काढुन घेऊन  शासन केला आहे हे स्पष्टपणे दिसून येत⚔️⚔️
   🏹🏹मुफसदाने दखन 🏹🏹
💐💐औरंगजेब बादशहा च्या दरबारात मिर्झा मुहंमद हा मुस्लिम इतिहास कार होते याला औरंगजेब बादशहा कडुन 150ची मनसब होते. त्याने "तारीख मुहंमदी "ग्रंथात सरसेनापती संताजीराव घोरपडे याचा उल्लेख "मुफसदाने दखन" फार्सो भाषेत  लिहिले आहे  यांची मराठीत अर्थ " मराठे सरदार लढवय्ये यापैकी एक श्रेष्ठ कोण व्यक्ती,"असे होते।। 
हिच मिर्झा मुहंमद  आपले" तारीख मुहंमदी " मधून संताजीचा उल्लेख "'अजकबार रऊसाय मरहट्टा"' असे करून सरसेनापती संताजीराव घोरपडे याचा श्रेष्ठत्व मान्य करतात।। 
साकी मुस्तैदखान, खाफीखान,  भीमसेन सक्सेना, मिर्झा मुहंमद असे औरंगजेबाची सेवा करणार लेखकाने  केलेल्या  नोंदी म्हणजे मुघलच्या पुढे सरसेनापती संताजी घोरपडे यांना किती मोठा लढा उभी केली असेल याचा कल्पना येते 💐💐
🌙🌙छत्रपती राजाराम महाराज यांच्या दूरदृष्टी व आक्रमक भूमिका व सरसेनापती संताजीबाबा घोरपडे (ममलकतमदार) यांच्या पराक्रमाशी  राष्ट्रमाता राजमाता
जिजाऊ इतिहास परिषद पुणे महाराष्ट्र राज्य तर्फे मानचा मुजरा🌙🌙
संतोष झिपरे 90444597600.

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...