फलटण प्रांत येथील मराठा सरदार मानकोजी गाढवे याना बजाजी नाईक निंबाळकर यांनी दिलेल्या जमिनी बाबत ताम्रपट
फलटण प्रांत येथील मराठा सरदार मानकोजी गाढवे याना बजाजी नाईक निंबाळकर यांनी दिलेल्या जमिनी बाबत ताम्रपट
शिक्का - बजाजी म्हाहादाजी नाईक
१) माहाराज राजे
२) श्री बजाजी नाईक देशमुष(ख)पा।(परगणे) फळेटणा (फलटण ) माणीकोजी बीनजाउजी गाढवे मोकदम मैज(मौजे) कालजाये पा। ( काळज ) (परगणा) मा।(मजकूर)सुरसन अर्बामया आळफ सन हजार १११३
पट क्र १:
श्री
(चौरसाकृती शिक्का: बजाजी महादाजी नईक)
१) माहाराज राजे
२) श्री बजाजी न
३) ईक देशमुख
४) प|| फळटण म||
५) तुकोजी बीन
६) जाऊजी गाढवे
७) मोकदम मैजे काल
८) जाये प|| म|| ×
९) सुर सन अर्बा
१०) मया आळफ स
११) न हजार १११३
पट क्र २:
१) ले तरी येणेप्र
२) माणे खाऊन
३) दीवान दीवा
४) ण नफरी कर
५) णे इनामपै
६) की समाई
७) क बिघे 6१०
८) दाहा बिघे
९) तुज दिळ्हे ब
१०) की कुळवा
टीप: दोन्ही ताम्रपट कदाचित एकाच मोठ्या ताम्रपटाचा भाग आहेत पण मधले भाग गायब आहेत. पहिल्यानंतर थेट पाचवा आहे. वर्ष आहे सुहुर सन अर्बा मया व अलफ. म्हणजे इ.स. १७०३-१७०४. यात एक घोळ आहे तो म्हणजे या वर्षी हिजरी हा १११४-१५ आणि फसली १११३ सुरू होता. हिजरी सन चुकला आहे इथे (According to Khare Jantri). ताम्रपट महादजीराजे बजाजी नाईक देशमुख म्हणजे फलटणच्या नाईक निंबाळकर यांचा दिसतो. महादजी म्हणजे शिवरायांचे थोरले जावई. ताम्रपटात ते 'नईक' असंच केलं आहे.
भाषांतर कौतुक कस्तुरे जी
पोस्ट साभार
पृथ्वीराज
Comments
Post a Comment