गायकवाड घराण्याचा कुळाचार - - आडनाव - गायकवाड

गायकवाड घराण्याचा कुळाचार - - 

आडनाव  - गायकवाड 

कुळ - यदुवंशी 

गोत्र - गौतम


आपले पूर्वज उत्तरेत वास्तव्यास असताना कुलदेवी  - चामुंडेश्वरी

 कुलदेवता  - भैरवनाथ 

आराध्य देव  - शंकर-पार्वती

आपले पूर्वज दक्षिणेमध्ये आल्यानंतर कुलदेवी  - रेणुकादेवी ( माहुरगड )

 कुलदैवत - निमगाव चा खंडोबा 

छत्र सिंहासन झेंडा  - गडद लाल जरीचा चमकदार कपडा

 ध्वजस्तंभ  - गरुड , शंख , चक्र  - सोनेरी रंगाचे 

प्रवर  - तीन पदरी जाणवे आपल्या  अंगावर असलेच पाहिजे  , प्रत्येक क्षत्रियाच्या डोक्यावर शेंडी असलीच पाहिजे , हातात कोणत्याही बोटात अंगठी असलीच पाहिजे.

 विजय शस्त्र   - सोन्याच्या मुठीची तलवार 

शाखा  - माध्यमिक

 वेद  - यजुर्वेद

 आराध्य नदी - यमुना 

आराध्य वृक्ष - कळंब 

आराध्यपक्षी - गरुड

 आराध्य पशु - गाय

 आराध्य देव - भगवान श्रीकृष्ण

 प्रत्येकाच्या घरात श्रीकृष्णाचा फोटो असलाच पाहिजे . 

आराध्यशास्त्र - श्रीमद् भागवत पुराण 

कुलदेवी पूजा  - नवरात्रीची नवमी, अश्विन नवरात्री , चैत्र नवरात्री . 

कुलदेवता पूजा  - भैरव पूजा षष्ठी  • नवरात्रीचा सहावा दिवस 

शस्त्र पूजा  - विजयादशमीच्या दिवशी करावी 

सती पूजा  - अमावस्येला करावी

 सतीचे पाच नैवेद्य -

 १ - अग्नीला अर्पण
२ - गाईला चारणे
३ - कुत्र्याला खाऊ घालणे 
 ४  - पक्षांना  खाऊ घालणे 
५  - शुद्ध वाहत्या पाण्यात सोडून द्यावा . 
प्रत्येक नैवेद्याला पाणी हातावर घेऊन न सांडता तीन वेळा फिरवून अंगठा दुमडून चार बोटे समोर करून अर्पण करावे . 
पितृ नैवेद्याला पाणी हातावर घेऊन न सांडता तीन वेळा फिरवून हाताची चार ही बोटे दुमडून अंगठा सरळ ठेवून अंगठ्यावरून सोडावे . 
सध्याच्या प्रचलित पद्धतीनुसार तीन ते पाच वेळा पाणी फिरवून सोडतो , ही नैवेद्याला संरक्षण भिंत करण्यासारखे आहे ज्यामुळे नैवेद्यास भगवान परमात्मा शिवत सुद्धा नाही.

 नैवेद्याला पाणी फिरवत असताना हे पाच मंत्र उच्चारावेत - - 

१ - ओम पितृ देवाय नमः 

२- ओम कुलदेवी , कुलदेवताय नमः

३ - ओम सती देवाय नमः 

४ - ओम वास्तु देवाय नमः 

५ - ओम ग्रामदैवताय नमः 

हे मंत्र बोलून मगच पाचही नैवेद्य अर्पण करावे . 
नैवेद्य अर्पण करण्याची वेळ सकाळी दहा ते अकरा च्या मधेच असावी .

👆👆👆👆👆
🚩🚩🚩🚩🚩
🌻🌻🌻🌻🌻
👑👑👑👑👑
👏👏👏👏👏

लेखन - -
श्री. चंद्रकांत उर्फ आप्पासाहेब लक्ष्मणराव गायकवाड 
(इतिहास अभ्यासक) 

मार्गदर्शन - -

श्री. रामचरण ब्रह्मभाट
( गायकवाड घराण्याचे राजभाट )

श्री. प्रविणभैय्या दत्ताजी गायकवाड
( इतिहास अभ्यासक आणि वंशवेलकार )

श्री. अमितदादा सुरेशशेठ गायकवाड
( श्रीमंत गायकवाड सरकार प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष , विश्वातील सर्वात मोठ्या भव्य दिव्य शिवजयंती रथसोहळा महोत्सव समिती पुणे चे संस्थापक अध्यक्ष )

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...