हंसाजी_ऊर्फ_हंबिरराव_सरसेनापती_पदी_विराजमान ८ एप्रिल १६७४, पूर्वीचे नाव हंसाजी मोहिते यांना हंबीरराव किताब देऊन सेनापती ची तलवार दिली.

#हंसाजी_ऊर्फ_हंबिरराव_सरसेनापती_पदी_विराजमान 
    ८ एप्रिल १६७४, पूर्वीचे नाव हंसाजी मोहिते यांना हंबीरराव किताब देऊन सेनापती ची तलवार दिली.
त्यांना लहानपणा पासुन हंसाजी च म्हटले जायचे जसे कुडतोजी गुजर यांना सेनापती करताना प्रतापराव किताब दिला तसाच हंसाजी यांना ८ एप्रिल १६७४ रोजी #हंबीरराव हा किताब दिला.
...स्वराज्याच #सरसेनापती पद मिळणं हे पद मिळणे हि गोष्ट साधी नाही,हा  हे सर्वोच्च पद हंबीरराव यांना तलवार गाजऊन मिळाले.हंबिररावांनी त्यांच्या बुद्धी,तलवार, गनिमी कावा आणि भारदस्त ताकदीने दाखवून दिल.
 का . ना . साने लिखित सभासद बखरीत  प्रतापराव गुजरांच्या बरोबर हंसाजी मोहिते पंचहजारी सरदार होता .
प्रतापराव गुजर व हबीरराव मोहिते यांनी १६७३ मध्ये सुरते वर स्वारी केली होती त्या वेळेस एक तुकडी प्रताप राव व एक तुकडी हंबीरराव अश्या दोन तुकड्या केल्या एक तुकडी बुऱ्हाणपूर कडे जाळपोळ करत गेली तर  दुसरी तुकडी घेऊन हंबीरराव स्वत  भडोच पर्यंत लूट करित गेले होते.
   #प्रतापराव_गुजर_पडले त्यावेळेस हंसाजी मोहिते यांच्या नेतृत्वाखाली संताजी व धनाजी हो मोजकी काही सैन्याची तुकडी यांना सोबत घेऊन लढाई केली. सेनापती प्रतापराव यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी हंसाजी सैनिक घेऊन बहलोलखानावर चालून गेले त्यावेळेच्या संघर्षाचे वर्णन "#ग्रँड_डफ " ने" मराठ्यांची बखर" मध्ये पान क्रमांक ७७ वर केले आहे.
हंसाजी मोहिते च्या सैन्याने अतुलनीय पराक्रम गाजवल्या ने मोठी फौज घेऊन आलेला बहलोलखान सैन्याला घेऊन पळ काढून निघून गेला. हंसाजी यांनी त्याला विजापूर पर्यंत पिटाळले व बहलोलखानाच्या जहागीरीची नासधूस केली कित्येक आदिलशाही सरदारांना व त्यांच्या सैनिकांना यमसदनी धाडले ,फार मोठी लूट करून हंसाजी स्वराज्यात आले. असा हा अतुलनीय पराक्रम पाहुन शिवरायांनी त्यांना "हंबीरराव " किताब दिला मानाची वस्त्रे देऊन अनेक प्रकारची भूषणे देऊन गौरव केला येथून पुढे हंसाजी "हंबीराव" झाले
     उंबराणी ची लढाई १५.०४.१६७३, नेसरीची लढाई २४.०४.१६७४, अफजल खान लढाई, १६६६ नंतर पुरंदर च्या तहात मध्ये गेलेले २३ किल्ले जिंकून आणण्यात केलेल्या मोहिमा आणि अशा अनेक रणांगणात शत्रूला पाणी पाजून हंबीरराव आपल्या सहकार्या सोबत या स्वराज्याला एकेक विजय मिळवत होते या मुळेच त्यांना सरसेनापती पद मिळालं आहे ..

#सरनौबत_हंबीरराव मोहिते...!!
    बरा शहाणा,मर्दाना,सबुरीचा,चौकस
शिपाई मोठा धारकरी गडी...!!
 " सरनौबत कोण करावा.प्रतापराव पडले ही खबर
    राजियांनी एकूण बहुत कष्टी झाले.आता लष्कराचा     
    बंद  कैसा होतो ? सरनौबत कोण करावा ? अयसा      
    रणमार्तंड .आता आपण खासा-लष्करात
    येऊन लष्कर घेऊन कोकणात चिपळूण जागा
   परशुरामाचे क्षेत्र येथे आणि सरनौबतीस माणूस
   पाहता हंसाजी मोहिते म्हणून पागेमध्ये जुमला होता.
   बरा शहाणा,मर्दना,सबुरीचा,चौकस शिपाई मोठा 
   धारकरी पाहून त्यास "#हंबीरराव " नाव किताबती देऊन
   सरनौबती सांगितली.कुल लष्करचा गाहा करून    
   हंबीरराव यांचे ताबीज दिधले आणि फौज वरघटी 
   रवाना केला....!!"

  #संदर्भ :- #९१ कलमी बखर
  
 #टीम_सरसेनापती_हंबीरराव
 #सरसेनापती_हंबिरराव
#उरवीता_प्रोडक्शन
#हंबिर_शुभेच्छा💐

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४