५)महादजी शिंदे सरकार यांचे मराठा साम्राज्या साठीचे योगदान
शिंदेशाही इतिहासाची साधने या पुस्तकाच्या सुरुवातीला देण्यात आलेलं महादजी शिंदेंच्या खासगी दरबाराचं चित्र इंग्रजांकडून 'द ग्रेट मराठा' अशी उपाधी मिळालेल्या सरदार महादजी शिंदे यांनी दिल्लीपर्यंत मुसंडी मारून आपला दबदबा निर्माण केला होता. महादजींनी 18व्या शतकाचा उत्तरार्ध गाजवला. त्यांच्या कारकीर्दीतली सर्वात महत्त्वाची समजली जाणारी ही दिल्ली मोहीम महादजींच्या या दिल्ली मोहिमेविषयी बोलताना इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे सांगतात, "त्यावेळी राजस्थानमध्ये रजपूतांनी उठाव केला होता. मथुरा - भरतपूर भागात जाटांनी बंडखोरी केलेली होती. ती या सगळ्यांनी मोडून काढली. मग त्यांनी झाबेता खानवर (नजीबखान रोहिल्याचा मुलगा) हल्ला करायला दिल्लीकडे मोर्चा वळवला. दिल्लीचा बादशाह असणाऱ्या शाह आलम याने 1770च्या सुमारास दिल्लीतून पळ काढून बिहारमध्ये इंग्रजांचा आश्रय घेतला होता. रोहिल्ल्यांनी आपलं राज्य बळकावलं असून मराठ्यांनी आपल्याला मदत करावी, तख्तावर पुन्हा स्थापना करावी अशी विनंती बादशाह शाह आलमने मराठ्यांना केली होती. महादजींनी इंग्रजांवर मोठं दडपण आणलं आणि त्यांच्या ताब्यात असणाऱ्या शाह आलमला स