२)महादजी शिंदे सरकार यांचे आध्यात्मिक कार्य

२)महादजी शिंदे सरकार यांचे आध्यात्मिक
 कार्य


..
वडील राणोजींसोबत मोहिमांमध्येच त्यांना लष्करी प्रशिक्षण मिळालं. राणोजींसोबत माळवा आणि उत्तरेतल्या मोहिमांमध्ये महादजी सहभागी झाले होते.

निजामासोबतच तळेगाव - उंबरीच्या लढाईनंतर महादजी नावारूपाला आले.

औरंगाबाद (1751), साखरखेडले (1756), पंजाब (1759) या मोहीमांमध्ये महादजींचा सहभाग होता.

पानिपतच्या तिसऱ्या लढाईत सहभागी झालेले महादजी जायबंदी झाले. पायाला झालेल्या जखमेने त्यांना काहीसं अधूपण आलं. हा काळ होता 1761 चा.


नंतरच्या काळात महाराष्ट्रात पेशवे होते थोरले माधवराव. पेशवे थोरले माधवरावांनीच महादजींना 1768मध्ये सरदारकी दिली.

1771मध्ये महादजी दिल्लीला रवाना झाले.

महादजी शिंदेंची दिल्ली मोहीम
पानिपताच्या युद्धाने मराठ्यांची अतोनात हानी झाली होती. माणसं मारली गेली, पराभव तर झालाच पण तिजोरीलाही प्रचंड मोठा फटका बसला. पानिपताच्या या युद्धानंतर मराठ्यांच्या एकछत्री वर्चस्वाला कळा लागली. या पराभवाच्या आणि आप्तांना गमावण्याच्या धक्क्याने नानासाहेब पेशव्यांचा मृत्यू झाला.

नानासाहेबांनंतर गादीवर आलेल्या थोरल्या माधवरावांनी पानिपताचं हे अपयश धुवून काढण्यासाठी महादजी शिंदेंना दिल्लीला पाठवल्याचं इतिहासकार सांगतात.

महादजींसोबत या मोहिमेत कारभारी म्हणून होते विसाजीपंत बिनीवाले आणि रामचंद्र कानडे. सरदार तुकोजी होळकरही या मोहिमेत महादजींसोबत होते.

..
शिंदे छत्री जवळ माऊलींची पालखी का थांबते ? 

मराठ्यांच्या राज्याचे अखिल भारतीय साम्राज्य उभे करण्यात महादजी शिंदे यांचे मोठे योगदान आहे हे कोणीच नकारू शकत नाही.

 दिल्ली दिग्विजय वीर महादजी हे माळकरी होते?

महादजी यांच्या गळ्यात तुळशीची माळ होती. ते वारकरी होते. नाकापासुन वारकरी गंध लावायचे.

महादजी स्वतः अभंगाची रचना करत.

रणागंणावर तलवार गाजवणारे, दि ग्रेट मराठा म्हणुन नावलौकीक मिळवणारे महादजी उत्तम अभंगाची रचना करायचे.

 महादजी उत्तम आधत्मिक लेखक होते.

त्यांनी गितेवर भाष्य करणारा माधवदासी हा ग्रंथही लिहला होता.

महादजी भजन करत??

रोज भजन करण्याचा त्यांचा रिवाज होता.


आज दिसणारे आळंदिचे माऊली च्या समाधच मंदीराचे महाद्वार, विणामंडप व ओवरी चिरेबंदी दगडात बांधुन दिली होती.


श्री माऊली ज्ञानोबारायांवरील आंत्यतिक श्रद्धेपोटी त्यांनी आळंदीच्या समाधी मंदीराचे महाद्वार, विणामंडप व ओवरी चिरेबंदी दगडात बांधुन दिली.

आळंदी व नान्नज ही गांवे माउलींच्या दिवाबत्तीसाठी इनाम म्हणुन दिले. पालखी सोहळ्याचे जनक वै. हैबतबाबा व वारीला राजाश्रय देणारे शितोळे सरकार हे ही शिंदे सरकारांशी संबधीत होते. 

या विषयीची कृतज्ञता म्हणुन संतश्रेष्ठ ज्ञानोबारायांचा पालखी सोहळा पुण्यातील महादजी शिंदे यांच्या समाधीस्थळ (शिंदे छत्री) च्या जवळ थांबतो व आरती करून वंदन करतात.



.महादजी शिंदे यांनी केलेल्या धर्मकार्याची सर्व माहिती
डॉ.पी एन शिंदे लिखित "अलिजाह बहाद्दर महादजी शिंदे" या ग्रंथात पहावयास मिळतील,यवनी आक्रमणात अनेक हिंदू तीर्थ क्षेत्रांची हानी झाली,अश्या पावित्र्य स्थळांचा जीर्णोद्धार महादजी शिंदे यांनी केला,

महाकलेश्वर मंदिर, उज्जैन - हे मंदिर एक तिर्थस्थल मानले जाते. मुस्लिम काळात हे मंदिर उध्वस्त केले होते. 1732 साली श्रीमंत रानोजींनी मंदिर पुन्हा बांधले. महादजी शिंदे या मंदिरात पूजा करीत असत. गजनीच्या महंमदाने सातशे वरश्या पूर्वी सोर्टी सोमनाथ मंदिरचे चांदी चे दोन दरवाजे लुटून नेले होते. महादजीनी ते दरवाजे लाहोर मोहीम जिंकून ते दरवाजे परत आणले. त्यातील एक दरवाजा या मंदिरा ला बसविलेला आहे. हे त्यांचे फार मोठे कार्य होये. 
उज्जैन चे दत्त मंदिर - हे मंदिर फार प्राचीन असून महादाजीना मिळालेली चारशे वर्ष्या पूर्वीची दत्त मूर्ती तेथे आहे. 
कालभैरव मंदिर- उज्जैन मधील हे मंदिर 'पगडी अर्पण' विधी साठी प्रसिद्ध आहे. युद्धात विजय मिळाल्या नंतर, मूर्तीला पगडी अर्पण करील आशु प्रतिज्ञा महादजीनी केली होती. त्या नुसार तो विधी आज ही केला जातो.
*द्वारकाधीश गोपाल मंदीर*- उज्जैन मधील हे मंदिर देखील प्रसिद्ध आहे. महादजीनी लाहोर मधून आणलेल्या दोनचांदीच्या दरवाज्यांपैकी एक दरवाजा, या मंदिराला बसबिलेला आहे.
पुष्कर तीर्थ येथील मंदिर- राजस्थान मधील पुष्कर तीर्थ हे अतिशय प्रसिद्ध तीर्थ स्थळ आहे. महादजींचे तिथे वर्चस्व होते. त्यानी लाखो रुपये खर्च करून तेथे एक मोठे मंदिर बांधले. फार दुर्मिळ मानले जाणारे, ब्रह्मदेवाचे मंदिर तेथे आहे. 
ग्वाल्हेरचे कोटेश्वर मंदिर- औरंगजेब बादशाहने हे मंदिर उध्वस्त केले होते. महादजीनी हे मंदिर पुन्हा बांधले. 1 मार्च 1783 रोजी काशीचा राजा चेत सिंग व इतर पुरोहित काढून मंदिरातील मूर्तीची प्राणप्रतिष्टा केली. 
महडचे वरद विनायक मंदिर- अष्टविनायका पैकी हे एक मंदिर असून महादजीनी ते बांधण्याचा आदेश दिला.
उदयेश्वर मंदिर- उदयपूर येथील हे मंदिर सुलतानाने उद्धवस्त केले होते. महादजीनी 1775 हे मंदिर पुन्हा बांधले.
गंगाधरेश्वर मंदिर, अकोले- महादजींच्या आज्ञेनुसार 1782 हे मंदिर श्री. पोतनीस यानी बांधले.
द्वारकाधीश मंदिर, पंढरपूर- हे मंदिर शिंदे सरकार वाड्यात असून बाईजबाई राणीसाहेब, महादजींच्या सुनबाई यानी बांधले आहे.
श्रीकृष्ण देवस्थान, नाथद्वारा- राजस्थान मधील हे प्रसिद्ध देवस्थान आहे. महादजी दर्शनास जात असत.

महादजीनी खालील प्रमाणे अनेक देवस्थानांना देणग्या दिल्या होत्या
1. कुलदैवत जोतिबा - 7001 रुपये
2. तुळजाभवानी मंदिर - 5001 रुपये
3. भीमाशंकर ज्योतिर्लिंग - 1111 रुपये
4. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग - 1111 रुपये
5. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग - 1111 रुपये
6. जेजुरी खंडोबा - 1001 रुपये


भाविक महादजी शिंदे
महादजी शिंदे वारकरी संप्रदायाचे होते. 18व्या शतकात, पेशवे काळात वारकरी संप्रदायातले संत मल्लप्पा वास्कर (ज्यांच्या नावे वास्कर दिंडी काढली जाते) यांच्याकडून महादजींनी भागवत धर्माची दीक्षा घेतली होती. महादजींच्या गळ्यात तुळशीची माळ असे. त्यांनी ज्ञानेश्वरीवर निरूपण करणारा एक टीकाग्रंथही लिहीला होता. हिंदी, ऊर्दू, संस्कृत, फारसी या भाषांवर महादजींचं प्रभुत्वं होतं. महादजी मराठी व हिंदी भाषांत कविता करत असत

इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे सांगतात, "महादजींनी भागवत पुराणही लिहीलं होतं. पंढरपूर आणि पांडुरंगावर त्यांनी अनेक अभंग रचले. महादजींनी दत्त संप्रदायाची दीक्षा घेतली होती. तर बीडमध्ये शाह मन्सूर बाबा म्हणून फकीर होते. ते कृष्णभक्त होते. कबीरी संत होते. त्यांच्याकडून महादजींनी कृष्ण संप्रदायाची दीक्षा घेतली होती. त्यांनी मथुरेत राहून कृष्णभक्तीच्या अनेक रासलीला लिहील्या होत्या. महादजींच्या देवघरात मन्सूर बाबांच्या पादुका, कृष्ण, पांडुरंग आणि दत्ताच्या मूर्ती होत्या. आज हे सगळं ग्वाल्हेरला आहे. तिथे मन्सूर बाबाचा उरूसही होतो."


महादजी शिंदेंची वानवडीमधली छत्री

पुण्याजवळच्या वानवडीमध्ये 12 फेब्रुवारी 1794 ला महादजींचं ज्वराने निधन झालं. महादजींच्या समाधीसाठी सवाई माधवरावांनी वानवडीमध्येच जमीन दिली. महादजींची छत्री आजही वानवडीत आहे. महादजींना अपत्य नसल्याने त्यांनी त्यांच्या भावाच्या नातवाची दौलतरावांची जहागिरीचा उत्तराधिकारी म्हणून निवड केली होती.






महादजींचा मृत्यू
दिल्लीतल्या वास्तव्यानंतर महादजी शिंदे 1792मध्ये पुण्याला परतले. वानवडीला भरलेलया दरबारात त्यांनी सवाई माधवराव पेशव्यांना मुतालिकी अर्पण केली. त्यानंतर सुमारे दोन वर्षं महादजी पुण्यातच वास्तव्याला होते.

महादजी शिंदेंची वानवडीमधली छत्री

पुण्याजवळच्या वानवडीमध्ये 12 फेब्रुवारी 1794 ला महादजींचं ज्वराने निधन झालं. महादजींच्या समाधीसाठी सवाई माधवरावांनी वानवडीमध्येच जमीन दिली. महादजींची छत्री आजही वानवडीत आहे. महादजींना अपत्य नसल्याने त्यांनी त्यांच्या भावाच्या नातवाची दौलतरावांची जहागिरीचा उत्तराधिकारी म्हणून निवड केली होती.


मुलकाचे मालक सिंदे बहादूर आहेत..


(भारत सरकारचा केंद्रीय दप्तरखाना.)





सदर्भ :-डॉ.पी एन शिंदे लिखित "अलिजाह बहाद्दर महादजी शिंदे" या ग्रंथात पहावयास मिळतील.

संदर्भ

  • महादजी शिंदे, मराठी विश्वकोश - https://vishwakosh.marathi.gov.in/33475/
  • शिंदे घराणे, मराठी विश्वकोश - https://vishwakosh.marathi.gov.in/33474/
  • ग्वाल्हेर संस्थान, मराठी विश्वकोश - https://vishwakosh.marathi.gov.in/22727/
  • पिंडारी, ब्रिटानिका एनसायक्लोपीडिया - https://www.britannica.com/topic/Pindari
  • पिंडारी वॉर, ब्रिटानिका एनसायक्लोपीडिया - https://www.britannica.com/topic/Pindari-War
  • English Record of Maratha History Vol - 1, Mahadaji Sindhia and North Indian Affairs - Author Jadunath Sarkar
  • https://www.indianculture.gov.in/ebooks/english-record-maratha-history-voli-mahadji-sindhia-and-north-indian-affairs-1785-1794
  • डॉ. गुंजन गरूड, पोस्ट डॉक्टरल फेलो, इतिहास विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
  • पांडुरंग बलकवडे, इतिहास अभ्यासक
  • प्रा. अनिरुद्ध देशपांडे, दिल्ली विद्यापीठ


Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४