आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*३१ ऑगस्ट
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*३१ ऑगस्ट १२००*
महाराज जैतूगीदेव यांचे निधन
जैतूगीदेव हे महाराज चक्रवर्ती सिंघणदेव यांचे वडिल जैतूगीदेव होते. तर आजोबासाहेब भिल्लमदेव हे चालुक्यांचे सामंत होते. महाराज भिल्लमदेव यांनी ११८७ मध्ये स्वतःला स्वतंत्र घोषित करुन सेऊन साम्राज्याची स्थापना केली, त्यांनी ११८७ मध्ये देवगिरि येथे किल्ला बांधला आणि देवगिरिला आपली राजधानी बनवली, ११८८ मध्ये त्यांनी गझनीचा सुलतान घियथ अल-दीन मुहम्मदचा सेनापती महम्मद गोरी याला महाराष्ट्राच्या सीमेवरुन पिटाळून लावले होते. त्यांनी ११८७ - ११९१ पर्यंत महाराष्ट्रवर राज्य केले होते, ११८९ मध्ये त्यांनी सूरातूर येथे झालेल्या लढाईत होयसळ शासक बल्लालाचा पराभव केला होता, ११९१ मध्ये ते युद्धात बल्लाल सोबत लढता लढता विरगतित मरण पावले होते. त्यांच्या नंतर त्यांचे पुत्र महाराज जैतूगीदेव हे राजे झाले, त्यांनी ११९१-१२०० पर्यंत राज्य केले होते. तिथे दुसरी कडे उत्तर भारतात मोहम्मद गोरीने घियथ अल-दीन मुहम्मद याच्या साठी ११९२ मध्ये निर्णायकपणे अजमेरचे सम्राट पृथ्वीराज चौहान यांचा पराभव केला, मंग यानंतर त्याने कनैजचा राजा जयचंद याचा पराभव केला, असे करुन घुरीड वंशाचे वर्चस्व भारतात प्रस्थापित झाले, यानंतर ११९४ मध्ये गझनीचा सुलतान घियथ अल-दीन मुहम्मद याने मोहम्मद गोरीला महाराष्ट्राच्या स्वारीवर पाठवले, मोहम्मद गोरी याने माळवा आणि गुजरात हे दोन राज्य काबीज करत महाराष्ट्रावर आक्रमकण केले, तेव्हा महाराज जैतूगीदेव यांनी त्याला महाराष्ट्राच्या सीमेवरुन पिटाळून लावले.
यानंतर मोहम्मद गोरीने तीन वेळा महाराष्ट्रावर स्वारी केली, ११९५ मध्ये, ११९६ मध्ये आणि ११९७ मध्ये, त्याने जेव्हड्या वेळा महाराष्ट्रावर स्वारी केली तेव्हढ्याच वेळा महाराज जैतूगीदेव यांनी त्याला पिटाळून लावले होते. महाराज जैतूगीदेव वारंगळचा राजा महादेव याच्या सोबत युद्ध करण्यासाठी वारंगळला गेले, त्यांच्या सोबत युवराज सिंघणदेव सुध्दा गेले होते, तेव्हा ते १२ वर्षाचे होते, महाराज जैतूगीदेव यांनी वारंगळ येथे महादेव सोबत युद्ध केले, युद्धा मध्ये महाराज जैतूगीदेव सोबत युवराज सिंघणदेव शत्रूंशी धैर्याने लढत होते, या युद्धात महाराज जैतूगीदेव विजयी झाले, आंध्र हे राज्य आता सेऊन साम्राज्याच्या अधिपत्याखाली आले. यानंतर ३१ ऑगस्ट १२०० मध्ये वयाच्या पस्तीसाव्या वर्षी महाराज जैतूगीदेव यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर महाराज सिंघणदेव वयाच्या १५ व्या वर्षी सेऊन साम्राज्याचे चक्रवर्ती झाले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*३१ ऑगस्ट १५६९*
४ था मुघल सम्राट जहांगीर यांचा जन्म.
(मृत्यू : २८ ऑक्टोबर १६२७)
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*३१ ऑगस्ट १६६१*
सन १६६१ च्या मे महिन्यात मोगलांनी प्रथम कल्याण जिंकून घेतले. पुढे महाड शहरही जिंकून घेतले. ते पुढे ९ वर्षांपर्यंत त्यांच्याकडे राहिले. मुस्लिम सैन्याधिकारी बुलाखी याने पेण परिसरातील देइरीच्या (देईरी गड हा पेण तालुक्यातील एक डोंगरी किल्ला आह). किल्ल्याला वेढा घातला. परंतु त्या किल्ल्यांच्या सुटकेकरता कावजी, कोंढाळकरांच्या नेतृत्वाखाली आलेल्या मराठी सैन्याने बुलाखीला दूर पिटाळून लावले. बुलाखीच्या सैन्यातील पाचशे सैनिकांना ठार मारले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*३१ आॅगस्ट १६७६*
छत्रपती शिवरायांची कर्नाटकातील बेळगाव नजीक असलेल्या "अथनी" वर स्वारी.
विजापुरी सरदारांमध्ये चाललेल्या अंतर्गत कलहामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना अथणीवर करता येणारी स्वारीची संधी त्यांनी वाया घालवली नाही.
मराठ्यांनी या मोहिमेतून एकूण तीन लक्ष होन एवढी संपत्ती स्वराज्यात आणली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*३१ ऑगस्ट १७३०*
श्रीमंत रखमाबाईसाहेब पेशवे यांचा स्मृतीदिन
(श्रीमंत चिमाजीअप्पा पेशवे यांच्या पत्नी व श्रीमंत सदाशिराव भाऊ पेशवे यांच्या जन्मदात्या मातोश्री)
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*३१ ऑगस्ट १७४३*
पेशवे-रघूजी झुंज झाल्याचे ऐकून शाहू महाराजास दुःख झाले. त्यांनी ह्या दोन्ही मातबर सरदारांस आपल्यापाशी बोलावून घेतले. रघूजींना समजून चुकले की, मराठे सरदारांमध्ये पेशवे प्रमुख असून त्यांस विरोध केल्यास आपण एकाकी पडतो त्यामुळे शत्रूचे फावते. बंगालमध्ये आपल्या चढाईचा कार्यक्रम यशस्वी करावयाचा असेल तर शत्रूस बाहेरून येणारी कुमक बंद केली पाहिजे हे त्यास पक्के कळून चुकले. याकरिता मनातील तेढ सोडून रघूजींनी पेशव्यांचे वर्चस्व कबूल केले. तेव्हा वादाचा मुख्य मुद्दाच निकालात निघाला. महाराजांनी दोघास जवळ बोलावून त्यांची कार्यक्षेत्रे आखून दिली. वऱ्हाडपासून कटक प्रांतापर्यंतचा सर्व मुलुख, बंगाल, बिहार व लखनौ एवढ्या भागात पेशव्यानी ढवळाढवळ करू नये व अजमीर, आग्रा, प्रयाग व माळवा हे प्रांत पेशव्यांचे म्हणून तारीख ३१ ऑगस्ट १७४३ ला ठरवून दिले. याप्रमाणे रघूजीनी बंगाल्यातील आपल्या उद्योगास पेशव्यांची संमति मिळविली आणि पुढील आठ वर्षात अलिवर्दीखानाशी निकराने युद्ध चालवून बंगालवर आपले हक्क लागू केले.
छत्रपति शाहू महाराजांनी हा समेट घडवून आणला. दोघा मातबर सरदारांचा समेट झाल्याप्रीत्यर्थं शाहू महाराजांनी त्यांना खाना दिला. खान्याचे समारंभ दोन्ही बाजूंनी यथापूर्वक पार पडले. शाहू छत्रपतीसही ह्या दोघा उमरावांनी मेजवानी दिली. त्यावेळी शाहू महाराजांनी त्या दोघाकडून एकोप्याच्या आणि एकदिलाने वागण्याच्या शपथा आपल्या पायावर हात लावून घेवविल्या. गढा आणि मांडला ह्या परगण्यांबद्दलचा वादही दोघांमध्ये एकवाक्यता घडवून आणून तोडला. अशा रीतीने दोघेही सरदार आपआपल्या कार्यास उद्युक्त झाले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*३१ ऑगस्ट १७९१*
घाशीराम कोतवाल यास शासन झाले.
घाशीरामच्या कार्यकाळात रात्रीच्या वेळेस पुण्याच्या रस्त्यांवर जागता पहारा, शहरात येणार्या-जाणार्यांची कसून तपासणी, शहराची सुरक्षा, शहरातील फंदफितुरी शोधणे, चोर्या-जुगार रोखणे, शहराची स्वच्छता इत्यादी कामे बिनाकसूर केली जात होती. याबाबत पेशव्यांचा बखरकार म्हणतो, “ऐसी कोतवाली मागे कोणी केली नाही व पुढेही करणार नाही.” मात्र एका गोष्टीमुळे घाशीरामच्या या सर्व कृत्यांवर पाणी फेरले. पेशव्यांच्या बखरीत याबद्दल उल्लेख आढळतो. १७९१ च्या ऑगस्ट महिन्यात श्रावण संपल्यानंतर काही द्राविडी ब्राह्मण दक्षिणा घेऊन आपल्या प्रदेशात जाण्यास निघाले. ते घाशीरामच्या बागेत उतरले. तेथे त्यांनी माळ्याच्या परवानगी शिवाय काही कणसे तोडली. त्यावरून तंटा झाल्याने माळी घाशीरामकडे आला व त्याने सांगितले की, चोर व कोमटी यांनी बागेत दंगा केला. हे कळताच घाशीरामने शिपाई पाठवून, त्या तैलंगी ब्राह्मणांना पकडून स्वत:च्या (भवानी पेठेतील) वाड्यात एका भुयारात कोंडले. त्यामुळे त्यांतील काही ब्राह्मण मृत्यू पावले. कोठडीत लहानशी खिडकी होती. त्या खिडकीजवळ जे उभे होते, त्यांचा प्राण कसाबसा वाचला. ही घटना पेशव्यांचे सरदार मानाजी फाकडे याला समजली. त्याने कुलूप तोडून ब्राह्मणांना बाहेर काढले आणि झालेला प्रकार पेशवे सवाई माधवराव (१७७४–१७९५) यांच्या कानी घातला. पेशव्यांनी नाना फडणीस यांना सदर प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले. फडणीस यांनी घाशीरामास विचारले, तेव्हा ते कोमटी चोर होते असे उत्तर घाशीरामने दिले. त्यावरून नानांनी मुडदे जाळण्यास परवानगी दिली. परंतु मानाजीने मुडदे उचलू दिले नाहीत. दरम्यान अन्य तैलंगी ब्राह्मण नाना फडणीस यांच्या वाड्यापुढे येऊन दंगा करू लागले. त्यानंतर घाशीरामची चौकशी करून अखेर न्यायाधीश अय्याशास्त्री यांनी त्यास देहान्ताची शिक्षा दिली; शिवाय त्याची धिंड काढून त्याला दगडाने ठेचून मारल्याच्याही हकीकती आहेत. तत्कालीन ब्रिटिश अधिकारी चार्ल्स मॅलेट यानेही याबाबत लिहून ठेवले आहे.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*
*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩
Comments
Post a Comment