२४ आॅगस्ट १६७७*"दक्षिण दिग्विजय मोहीम"दक्षिण मोहीमेदरम्यान छत्रपती शिवरायांनी आज "उत्तर कर्नाटक" जिंकले.

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२४ आॅगस्ट १६०८*
ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीचा पहिला प्रतिनिधी सुरत येथे दाखल झाला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२४ आॅगस्ट १६५७*
औरंगजेबने जर संपूर्ण आदिलशाही बुडवली तर तो अधिक प्रबळ बनेल व "शाहजहान" नंतर आपला प्रतिस्पर्धी म्हणून "दारा शुकोह"ने शाहजहानच्या संमतीने आदिलशहाशी तह केला.
त्यात कल्याणी, परिंडा व त्याभोवतालचा भाग, निजामशाही कोकणातील किल्ले, वांगणी परगणा व खंडणीदाखल दीड कोटी रुपये द्यावेत अशा तहातील मुख्य अटी होत्या.  दिल्लीला बादशहा शहाजहान आजारी पडल्याची बातमी औरंगजेबास समजली म्हणून औरंगजेबाने आपली दक्षिणेकडील मोहीम आटोपती घेतली व त्याने सरळ दिल्लीची वाट धरली. इकडे बड्या साहेबिणीने विजापूर दरबार भरविला आणि त्यांत छत्रपती शिवाजीराजांच्या पारिपत्याचा विचार केला. छत्रपती शिवाजी राजांना शासन करावे हे दरबारांत ठरले व ही कामगिरी धिप्पाड अफगाण सरदार अफझलखान याजवर सोपविण्यात आली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२४ आॅगस्ट १६६१*
छत्रपती शिवरायांच्या राणीसाहेब "सकवारबाई" यांना कमळाबाई नावाचे कन्यारत्न प्राप्त झाले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२४ ऑगस्ट १६७५*
ऑस्टीनबरोबर महाराजांस व त्यांच्या मंत्र्यास देण्यासाठी म्हणून सातशे चाळीस रुपये किमतीच्या भेटी होत्या. दिनांक २४ ऑगस्ट १६७५ रोजी त्याने मुंबई सोडली व दिनांक ६ सप्टेंबर रोजी तो रायगडावर दाखल झाला. त्याची महाराजांशी मुलाखत १५ तारखेला रात्री प्रल्हाद निराजींच्या मध्यस्थीने झाली. ऑस्टीनला सांगण्यात आले की धरणगावबाबत तुम्ही सांगत असलेल्या हकीगतीपैकी कोणतीही हकीगत महाराजांच्या कानी आलेली नाही. तेव्हा जी नुकसानभरपाई मागत आहात ती निरर्थक आहे. त्यानंतर ऑस्टीनने कंपनीच्या वखारीसाठी कौल (अभय) मागितला. त्यावर फार चिकित्सा होऊन महाराजांनी तो देण्यासाठी हुकुम दिला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२४ आॅगस्ट १६७७*
"दक्षिण दिग्विजय मोहीम"
दक्षिण मोहीमेदरम्यान छत्रपती शिवरायांनी आज "उत्तर कर्नाटक" जिंकले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२४ ऑगस्ट १६८०*
संभाजीराजांचे दानपत्र!
तिथीने शके १६०२, भाद्रपद शुद्ध दशमी, सोमवार दि. २४ ऑगस्ट १६८० या दिवशी संभाजीराजांनी कुडाळ येथील रहिवासी बाकरेशास्त्री यांना प्रतिवर्षी दहा हजार होनांचे दानपत्र करून दिले. हे दानपत्र संस्कृतमधे असुन त्यातील अक्षर सुंदर आहे तसेच, सुरूवातीला शंकरादी देवांना वंदन करून पुढच्या दोन ओळी स्वतः संभाजीराजांच्या हस्ताक्षरातील आहेत त्या पुढीलप्रमाणे:
।। मतं मे श्रीशिवराजपुत्रस्य श्री शंभुराज।।
।।छत्रपते: यदत्रोपरिलेखितं।।

अर्थ: यापुढे मी जे लिहिले आहे ते शिवाजीराजांचा राजपुत्र असलेल्या मला (संभाजीराजांना) संमत आहे.

या वेळेपर्यंत अजुन संभाजीराजांचा राज्याभिषेक झाला नव्हता. तो त्यांनी पुढे पाच महिन्यांनी करवून घेतला. शिवाजीराजे साधुसंतांना इनाम करून देत असत त्याप्रमाणेच हे दानपत्र संभाजीराजांनी कुडाळच्या बाकरेशास्त्री या मांत्रिकाला दिले. हे दानपत्र खुप मोठे आहे. त्यात काही ठिकाणी संभाजीराजांनी काही लोकांचे उल्लेख केले आहेत ते महत्त्वाचे आहेत. ते पुढीलप्रमाणे-

*शिवाजीराजांच्या पराक्रमाचे केलेले वर्णन
*शिवाजीराजांनी अफजलखानाला मारताना बिचवा हे शस्त्र वापरले
*सोयराबाईंचे मन हे स्फटिकमण्याप्रमाणे स्वच्छ आहे मात्र प्रबळ व दुष्ट मंत्र्यांच्या सल्ल्यामुळे सोयराबाईंच्या मनात सापत्नभाव तयार झाला आहे आणि त्यामुळे शिवाजीराजेही त्यांच्या पित्रुकर्तव्याला चुकले आहेत.
*औरंगजेबाच्या सेनापतीने (दिलेरखान) भुपाळगड जिंकुन देण्यासाठी संभाजीराजांपुढे हात टेकले

हे वरील उल्लेखांबरोबरच संभाजीराजांनी स्वतःच्या व शिवाजीराजांचे पराक्रम, तसेच देवांची स्तुती अलंकारित भाषेत वर्णिली आहे.

या दानपत्रातुन संभाजीराजांच्या मनात स्वतः विषयी व शिवाजीराजे, सोयराबाई, मंत्रीगण, औरंगजेब व इतर शत्रूंबद्दलचे विचार व्यक्त होतात.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२४ ऑगस्ट १६८०*
शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतरच्या परिस्थितीचे वर्णन करणारे पत्र टोपीकर ब्रिटिशांच्या कागदपत्रात आढळतात. ब्रिटिशांच्या राजापूर वखारीतून सुरतच्या वखारीला पाठवलेले आहे तर दुसरा संदर्भ (२४ ऑगस्ट १६८०) कोलंबो मधल्या ब्रिटिशांच्या दस्तऐवजा मधील आहे.
इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे पत्रातून संभाजी महाराजांच्या स्वभावाच्या अनेक पैलूंचे वर्णन केले आहे - हे वर्णन समकालीन असल्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. 

२० जुलै १६८० संभाजी महाराजांचे मंचकारोहण झाले आणि त्यांनी 'राजा' झाल्याचे जाहीर केले .या संदर्भात डाग रजिस्टर मध्ये २४ ऑगस्ट १६८० ची नोंद आहे -
"जून-जुलै छत्रपती शिवाजी राजा मरून संभाजी राजाला त्याचे सिंहासन मिळाले असावे असे सर्वत्र बोलले जाते, आपल्या बापाच्या तत्त्वांप्रमाणे संभाजी वागणारा आहे असे लोक म्हणतात." परंतु त्याचा स्वभाव अधिक नरम असुन आपल्या कंपनीबाबत त्याच्या मनात तिटकारा नाही.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२४ ऑगस्ट १६९९*
औरंगजेबने बऱ्याच सरदारांना वेगवेगळ्या विभागाची जबाबदारी दिली व त्यांना निक्षून पुन्हा सांगितले की मराठ्यांना आपल्या हद्दीत राहू देऊ नये, तसेच त्यांना छावणी करू देऊ नये व २४ ऑगस्ट १६९९ रोजी औरंगजेबास समजले की सहा हजार मराठे स्वारांनी येरवळ व कंधार (नांदेड जिल्हा) येथे छावणी केली तेव्हा औरंगजेबने नांदेड सुभेदार व धारूर किल्लेदार यांना लिहून कळविले की त्यांचे पारिपत्य करणे. याचवेळी वऱ्हाडांत परसोजी भोसले मोगलांविरुद्ध हालचाली करत होता. आज्जमगड पुरंदर भागात मराठा सरदार परशुराम हा दोन हजार स्वार घेऊन दंगल करीत होता.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२४ आॅगस्ट १७१०*
स्वराज्याचे तिसरे छत्रपती "राजाराम महाराज" यांच्या पत्नी "महाराणी ताराराणी" यांनी सरसेनापती "धनाजीराव जाधव" यांचे पुत्र "चंद्रसेन जाधव" यांना मराठेशाहीच्या बचावार्थ केलेल्या पराक्रमाबद्दल विशेष "सन्मानपत्र" पाठवले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२४ आॅगस्ट १९०८*
क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी ‘राजगुरू’ यांची जयंती  (मृत्यू : २३ मार्च १९३१)

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४