५)महादजी शिंदे सरकार यांचे मराठा साम्राज्या साठीचे योगदान

शिंदेशाही इतिहासाची साधने या पुस्तकाच्या सुरुवातीला देण्यात आलेलं महादजी शिंदेंच्या खासगी दरबाराचं चित्र

इंग्रजांकडून 'द ग्रेट मराठा' अशी उपाधी मिळालेल्या सरदार महादजी शिंदे यांनी दिल्लीपर्यंत मुसंडी मारून आपला दबदबा निर्माण केला होता.

महादजींनी 18व्या शतकाचा उत्तरार्ध गाजवला. त्यांच्या कारकीर्दीतली सर्वात महत्त्वाची समजली जाणारी ही दिल्ली मोहीम

महादजींच्या या दिल्ली मोहिमेविषयी बोलताना इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे सांगतात, "त्यावेळी राजस्थानमध्ये रजपूतांनी उठाव केला होता. मथुरा - भरतपूर भागात जाटांनी बंडखोरी केलेली होती. ती या सगळ्यांनी मोडून काढली. मग त्यांनी झाबेता खानवर (नजीबखान रोहिल्याचा मुलगा) हल्ला करायला दिल्लीकडे मोर्चा वळवला. दिल्लीचा बादशाह असणाऱ्या शाह आलम याने 1770च्या सुमारास दिल्लीतून पळ काढून बिहारमध्ये इंग्रजांचा आश्रय घेतला होता. रोहिल्ल्यांनी आपलं राज्य बळकावलं असून मराठ्यांनी आपल्याला मदत करावी, तख्तावर पुन्हा स्थापना करावी अशी विनंती बादशाह शाह आलमने मराठ्यांना केली होती. महादजींनी इंग्रजांवर मोठं दडपण आणलं आणि त्यांच्या ताब्यात असणाऱ्या शाह आलमला सोडवलं.

"मराठ्यांनी शाह आलमला सोबत घेऊन दिल्लीवर हल्ला केला. बिनीवाले आणि कानडेंच्या सोबतीने महादजींनी झाबेता खानला कैद केलं आणि दिल्लीचा ताबा घेतला. 10 फेब्रुवारीला महादजींनी दिल्लीचा लाल किल्ला जिंकून घेतला. तिथून बादशहाची मिरवणूक काढण्यात आली आणि त्यांनी त्याला सन्मानपूर्वक दिल्लीच्या बादशाहीवर बसवलं."

यानंतर नजीबखानाचा बदला घेण्यासाठी पानिपत, सोनपत, बागपत, शामली हा पूर्वी मराठ्यांच्या ताब्यात असणारा भाग पुन्हा जिंकण्यासाठी महादजी निघाले. रोहिले, पठाण, बंगश हे अफगाण एकेकाळी बादशहाचे सरदार होते. पण नंतर त्यांनी बंड केलं.

महादजी, तुकोजी होळकरांनी कुंजपुरा, पानिपत, शामली भाग जिंकला. हरिद्वार पार करून मराठे फत्तरगड, गोजगड करत नजीबखानाने वसवलेली राजधानी नजीबाबादपर्यंत पोहोचले. नजीबाबाद त्यांनी ताब्यात घेतलं. नजीबखानाची समाधी उखडून गंगेत मिसळत महादजींनी आपला बदला घेतल्याचं इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे सांगतात.

झाबेताखानने फत्तरगडाच्या खंदकात लपवलेली 30 लाखांची लूट मराठ्यांना मिळाल्याचंही इतिहासकार सांगतात.



मराठा साम्राज्याचा अभेद्य बुरुंज- श्रीमंत महादजी महाराज शिंदे

इंग्रजांशी झालेल्या संघर्षात त्यांना सळो की पळो करून सोडणाऱ्या शूर मराठयांची कहाणी सर्वज्ञात आहे. पण याच मराठयांचे नेतृत्व करणारे सेनानी महादजी शिंदे यांनी तळेगाव-उंबरीच्या लढाईत निजामाविरूध्द शौर्य गाजवून नावलौकिक मिळवला,छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेल्या स्वराज्यास सशक्त ठेवणारे अनेक मराठा सरदार होते. महादजी शिंदे हे त्यापैकीच एक प्रसिध्द मराठा सेनानी,

सुभेदार राणोजीराव शिंदे व चिमाबाई यांचे ते पाचवे सुपूत्र होते, त्यांचा जन्म साल १७३० मध्ये झाला. राणोजीरावांनी उत्तरेतील सर्व सत्ताधीशांना मराठा साम्राज्याचे मांडलिक बनवले होते महादजी बाबा राणोजीरावांच्या सोबत अनेक कामगिरीत सोबत असत ते लहानपणापासूनच विविध मोहिमांवर जात, त्यामुळे त्यांना युध्दशास्त्राचे शिक्षण तेव्हापासूनच मिळाले होते. त्याचप्रमाणे ते मुत्सद्दीही होते. पुढे ते ग्वाल्हेर राज्यात मराठा शासक म्हणून पुढे आले.

१७६१ मध्ये पानिपतच्या तिसऱ्या लढाईनंतर उत्तर भारतातील मराठा साम्राज्याला बळकटी देण्याचे श्रेय महादजींना जाते. उत्तरेत मराठ्यांची सत्ता प्रस्थापित करण्यात महादजी शिंदे यांनी महत्त्वपूर्ण संघर्ष केला,त्यामुळेच ग्वाल्हेर हे मराठयांचे एक महत्त्वाचे राज्य बनले होते व ते भारतातील अग्रगण्य सैन्य शक्तींपैकी एक होते.महादजींनी दिल्लीतील मुगल साम्राज्याचा पुनर्विकास करण्यास मदत केल्याने ते मराठयांच्या अंतर्गत होते. त्यावेळी महादजींनी रोहिलखंड, मथुरा व पख्तुन येथील रोहिले,राजपूत आणि जाटांना पराभूत केले होते.पण महादजींचा नावलौकिक तेव्हा झाला जेव्हा त्यांनी भारतात स्थिरावण्याच्या प्रयत्नात असलेल्या इंग्रजांना धारेवर धरले.

त्यावेळी मराठा सैनिकांनी इंग्रजांना चांगलेच त्रासून सोडले होते. १३ व १४ जानेवारी १७७९ ला झालेली पहिली इंग्रज-मराठा लढाई महादजींची कामगिरी शौर्याचा पराक्रम गाजविणारी ठरली व इंग्रज पराभूत झाले होते, त्या लढाईचे वर्णन नाना फडणवीस यांनी आपल्या पत्रामध्ये केले होते.ही एक उत्कृष्ट लढाई होती ज्यात महादजींच्या मराठा घोडेस्वारांनी इंग्रजांना चहूबाजूंनी घेरून त्यांच्या पुरवठा छावणीवर हल्ला चढविला होता.त्यामुळे नुकसानग्रस्त झालेल्या इंग्रजांनी महादजींसमोर आत्मसमर्पण केले होते. इंग्रजांशी झालेल्या लढाईंमध्ये त्यांच्याकडील कवायती पलटणींचा उपयोग पाहून महादजींनीही फ्रेंचांना आपल्याकडे चाकरीला ठेवले व त्यांच्याकडून तोफा ओतण्याचे व हत्यारे तयार करण्याचे कारखाने काढून कवायती पलटणींची उभारणी केली.

याच पलटणींच्या जोरावर त्यांनी दिल्लीच्या बादशहावरील मराठयांचे नाहीसे झालेले वर्चस्व पुन्हा प्रस्थापित केले होते व पुढील १० ते १२ वर्षे उत्तर हिंदुस्थानची सुत्रे त्यांनी आपल्या हाती ठेवली होती.त्यावेळी महादजींच्या मुत्सद्दीपणाने व शौर्याने सतलजपासून तुंगभद्रेपर्यंत संपूर्ण हिंदुस्थानवरच मराठयांचा साम्राज्यविस्तार झाला होता. पण कालांतराने महादजी, नाना फडणवीस व तुकोजी होळकर यांच्यात संघर्ष निर्माण झाला.दिल्लीच्या बादशाहीला हाताखाली ठेवण्याचे प्रयत्न शीख, इंग्रज करीत होते परंतु त्यात मराठेच अग्रस्थानी होते.महादजींनी उत्तर हिंदुस्थानावर मिळवलेल्या एकहाती अंमलामुळे मुघल व राजपूत हे एकमेकांना मिळाले व त्यांनी महादजीं विरोधात बंड पुकारले.त्यामुळे १७८६-८७ साली झालेल्या लासोटयाच्या लढाईत महादजींना माघार घ्यावी लागली व गुलाम कादरने दिल्ली, अलीगड ही शहरे ताब्यात घेतली.त्यामुळे महादजींच्या सत्ता साम्राज्यावरील वर्चस्वास धक्का बसला होता पण त्यांनी धीर न सोडता गेलेले प्रांत परत मिळविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.त्यांनी दिल्लीसह उर्वरीत प्रदेश पुन्हा ताब्यात घेतले आणि गुलाम कादरला देहांत शासन केले.

त्यावेळी बादशहाने महादजींना वकील-ए-मुलक हे पद व त्या पदाची नायबगिरी दिली होती. त्यानंतर बादशहाला दरमहा ६५ हजारांची पेन्शन देउन त्यांनी सारी सत्ता आपल्या हाती घेतली व मुघल साम्राज्य लुप्त होउन हिंदुस्थानावर मराठ्यांचे राज्य प्रस्थापित झाले होते.निजामांना दक्षिणेकडे मर्यादित ठेवण्यासाठीही ते कार्यरत होते. १७९२ मध्ये त्यांनी मैसूरच्या टिपूला अनेक युद्धात परास्त करून त्यास शांतता करार करण्यास भाग पाडले,

त्यानंतर इंग्रज व पेशवे यांच्यात सालाबाई करार झाला होता. कालांतराने महादजी पुण्याला आले. त्यानंतर १२ फेब्रुवारी १७९४ ला ज्वर झाल्यामुळे त्यांची पुण्याजवळील वानवडी येथे वयाच्या ६७ व्या वर्षी प्राणज्योत मावळली.

महादजींच्या ग्वाल्हेर येथील राजधानीत त्यांचे ३० हजार सैन्य, ५०० तोफा व १ लाख घोडदळ होते, त्यावरून त्यांच्या ताकदीची कल्पना येते.महादजी शिंदे यांच्या काळात चार आणे, अर्ध पैसा, अर्ध रूप्या आणि रूपी यांसारख्या विविध प्रकारांमध्ये जारी करण्यात आली होती. चांदी व तांब्याचा वापर करून ही नाणी तयार करण्यात आली होती. त्याबाबतची फारसी दंतकथा मोहम्मद शाह आलम यांनी मांडली.त्या नाण्यांवरील लेख हा मुगल काळातील फारसी दंतकथा दर्शवितो. त्यामुळे ती नाणी महादजींच्या कार्यकाळाची साक्ष देतात.
#द ग्रेट मराठा
#श्रीमंत महादजी महाराज
#स्मृतिदिन विनम्र अभिवादन...
चित्रकार- श्री राम देशमुख सर

महादजी शिंदेंची वानवडीमधली छत्री

पुण्याजवळच्या वानवडीमध्ये 12 फेब्रुवारी 1794 ला महादजींचं ज्वराने निधन झालं. महादजींच्या समाधीसाठी सवाई माधवरावांनी वानवडीमध्येच जमीन दिली. महादजींची छत्री आजही वानवडीत आहे. महादजींना अपत्य नसल्याने त्यांनी त्यांच्या भावाच्या नातवाची दौलतरावांची जहागिरीचा उत्तराधिकारी म्हणून निवड केली होती.






महादजींचा मृत्यू

दिल्लीतल्या वास्तव्यानंतर महादजी शिंदे 1792मध्ये पुण्याला परतले. वानवडीला भरलेलया दरबारात त्यांनी सवाई माधवराव पेशव्यांना मुतालिकी अर्पण केली. त्यानंतर सुमारे दोन वर्षं महादजी पुण्यातच वास्तव्याला होते.


महादजी शिंदेंची वानवडीमधली छत्री


पुण्याजवळच्या वानवडीमध्ये 12 फेब्रुवारी 1794 ला महादजींचं ज्वराने निधन झालं. महादजींच्या समाधीसाठी सवाई माधवरावांनी वानवडीमध्येच जमीन दिली. महादजींची छत्री आजही वानवडीत आहे. महादजींना अपत्य नसल्याने त्यांनी त्यांच्या भावाच्या नातवाची दौलतरावांची जहागिरीचा उत्तराधिकारी म्हणून निवड केली होती.

संदर्भ

  • महादजी शिंदे, मराठी विश्वकोश - https://vishwakosh.marathi.gov.in/33475/
  • शिंदे घराणे, मराठी विश्वकोश - https://vishwakosh.marathi.gov.in/33474/
  • ग्वाल्हेर संस्थान, मराठी विश्वकोश - https://vishwakosh.marathi.gov.in/22727/
  • पिंडारी, ब्रिटानिका एनसायक्लोपीडिया - https://www.britannica.com/topic/Pindari
  • पिंडारी वॉर, ब्रिटानिका एनसायक्लोपीडिया - https://www.britannica.com/topic/Pindari-War
  • English Record of Maratha History Vol - 1, Mahadaji Sindhia and North Indian Affairs - Author Jadunath Sarkar
  • https://www.indianculture.gov.in/ebooks/english-record-maratha-history-voli-mahadji-sindhia-and-north-indian-affairs-1785-1794
  • डॉ. गुंजन गरूड, पोस्ट डॉक्टरल फेलो, इतिहास विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
  • पांडुरंग बलकवडे, इतिहास अभ्यासक
  • प्रा. अनिरुद्ध देशपांडे, दिल्ली विद्यापीठ


Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...