आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*३० आॅगस्ट १६१५*बाजीप्रभूंचा जन्म ३० आॅगस्ट

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*३० आॅगस्ट १६१५*
बाजीप्रभूंचा जन्म ३० आॅगस्ट १६१५ रोजी शिंद, ता. भोर, जि. पुणे येथे झाला. बाजीप्रभू देशपांडे पुणे जिल्ह्यातील हिरडस मावळातले पिढीजात देशकुलकर्णी होते. बांदलांचे बाजी सरनोबत होते. परंतु बाजींचे प्रशासकीय कौशल्य आणि शौर्य पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आपलेसे करून घेतले. बाजींनीही स्वराज्यासाठी आपली निष्ठा शिवाजीराजांना समर्पिली. दोन्ही हातांनी दोन समशेरी व दांडपट्टे चालविण्यात ते तरबेज होते. शिवरायांच्या सैन्यात हा अमोल सेनानी होता. शिवरायांवर त्यांची अलोट भक्ती होती.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*३० आॅगस्ट १६५८*
छत्रपती शिवरायांनी आपले वकील "सोनोपंत डबीर" यांना दिल्लीच्या औरंगजेब बादशहाकडे पत्र घेऊन पाठवले.
३० ऑगस्ट १६५८ ला सोनाजीपंत दिल्लीला जायला निघाले व तिथे पोहोचल्यावर औरंगजेबला शिवाजीराजेंच्याकडून अभिनंदन व शुभेच्छा दिल्या. ह्यावेळी शिवाजी राजेंनी  पाठवलेले पत्र आज उपलब्ध नाही पण त्यावर औरंगजेबचे उत्तर उपलब्ध आहे. शिवाजी राजेंनी त्याच्या पत्रात काही सवलती मागितल्या होत्या पण ते पत्र उपलब्ध नसल्याने नेमके काय मागितले होते ते कळत नाही. शिवाजी राजेंनीे मुघल साम्राज्याप्रती निष्ठा दाखवावी अशी औरंगजेबची मागणी होती. तसेच दख्खनचा मुघल सुभेदार शाहिस्तेखानच्या आदेशानुसार त्याला सहय्य करावे. ह्या पत्रात दारा शुकोहला भक्करच्या सीमेवर पकडण्यात आले याचा उल्लेखही आहे. हा सगळा पत्राचा खटाटोप उरकल्यावर सोनाजीपंत बरोबर औरंगजेबने शिवाजी महाराजांसाठी एक खास पोशाख पाठविला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*३० आॅगस्ट १६५९*
औरंगजेबचा मुलगा "नजरबेग" आणि त्याच्या साथीदारांनी दाराच्या तुरूंगाला भेट दिली. तिथे त्यांनी दाराच्या मुलाला दूर करून दाराचे जागच्या जागी तुकडे केले. अशा प्रकारे वारसहक्काच्या युद्धात औरंगजेबचा विजय झाला आणि तो बादशहा बनला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*३० ऑगस्ट १७५५*
समशेर बहाद्दर यांचे दुसरे नाव कृष्णसिंह होते. ऐतिहासिक कागदात समशेर बहाद्दर कृष्णसिंह असे उल्लेख आढळतात वयाच्या ६ व्या वर्षी मातृपितृविहीन झाल्यावर थोरल्या नानासाहेबानी प्रेमाने, आपुलकीने, योग्य इतमामानी यांचा सांभाळ केला बाजीराव मस्तानी हयात असताना जे वादळ उठले होते, त्याचे समशेर बहाद्दर यांच्या पालनपोषणाच्या बाबतीत थोडे देखील सावट पडले नाही हे विशेष आहे. सदाशिवराव भाऊसाहेबांचा यांच्या वर खूप प्रभाव होता. सदाशिवराव भाऊच्या हाताखाली वागून हे कारभारी व दरबारी, लष्करी कामात हुशार बनले होते. समशेर बहाद्दरानी मोठ्या लष्करी मोहिमेत भाग घेतल्याचा पहिला उल्लेख सन १७५३ मध्ये मिळतो. रघुनाथरावनबरोबर उत्तर भारताच्या मोहिमेत सहभागी होते. ३० ऑगस्ट सन १७५५ मधे कोकणात लष्करी मोहिमेत अडचणी निर्माण झाल्या मुळे समशेरबहाद्दराना उत्तरेकडची मोहीम इतरांवर सोपवून महाराष्ट्रात परत यावे लागले. या नंतर त्यांना दिनकर महादेव बरोबर कोकणच्या लष्करी मोहिमेवर रत्नागिरी जिल्ह्यात रवाना व्हावे लागले. तुळाजी आंग्र्यांविरुद्धच्या या मोहिमेत त्यांनी सन १७५६ ला रत्नागिरीचा किल्ला सर केला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*३० आॅगस्ट १७७३*
सुमेर गार्दी याने नारायणराव पेशवे यांची शनिवारवाड्यात हत्या केली. (जन्म: १० ऑगस्ट १७५५)

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...