Posts

३१ ऑक्टोबर १६८३छत्रपती संभाजीराजे गोव्यानजीक म्हणजेच "किल्ले फोंडा" सीमेवर दाखल झाले.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ३१ ऑक्टोबर १६२४ थोरले महाराज "शहाजीराजे" यांचे बंधू शरीफजीराजे हे भातवडीच्या लढाईदरम्यान धारातिर्थी पडले. इतिहासामध्ये ‘भातवडीचं युद्ध’ म्हणून एक लढाई प्रसिद्ध आहे. ३१ ऑक्टोबर १६२४ रोजी ही लढाई लढली गेल्याची नोंद आहे. अहमदनगरजवळील भातवडीच्या रणांगणात निजामशाही मुळापासून नष्ट करण्यासाठी भारतभरातील सर्व इतर सत्ता एकत्र आल्या होत्या. पण ते तितकेसे सोपे नव्हते, कारण निजामशाहीकडे शहाजी राजे आणि शरीफजी राजे हे भोसले घराण्यातील २ पराक्रमी योद्धे होते. तलवारी भिडल्या आणि निजामशाही वाचवण्यासाठी शहाजीराजे आणि शरीफजीराजे निजामाचा वजीर मलिक अंबरच्या साथीने भल्या मोठ्या शत्रू पक्षांच्या सेनेला कापत सुटले. अशक्य वाटणाऱ्या या युद्धात शहाजीराजांचा ऐतिहासिक विजय झाला, पण त्यांना आपले बंधू शरीफजी राजे यांना मात्र गमवावे लागले. जर शरीफजी राजे जास्त काळ जगले असते, तर मराठ्यांच्या इतिहासामध्ये अजून काही पराक्रमी गाथांची नोंद नक्की झाली असती !  🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ३१ ऑक्टोबर १६७९ छत्रपती संभाजी राजे व दिलेरखान यांची विजापूरला मोर्चे बांधणी

३० ऑक्टोबर १६७७"दक्षिण दिग्विजय मोहीम"छत्रपती शिवरायांनी "तिरुवनमलाई" येथील अरुणाचलेश्वर शिवमंदिराचा जिर्णोद्धार करून तिथे दीपोत्सव केला.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ३० ऑक्टोबर १६७७ "दक्षिण दिग्विजय मोहीम" छत्रपती शिवरायांनी "तिरुवनमलाई" येथील अरुणाचलेश्वर शिवमंदिराचा जिर्णोद्धार करून तिथे दीपोत्सव केला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ३० आॅक्टोबर १६८४ किल्ले रायगडच्या फितुरीचा कट करण्याच्या कारणास्तव छत्रपती संभाजीराजे यांनी "पंत राहुजी सोमनाथ", "गंगाधर पंत", "मानाजी मोरे", "वासुदेव पंत" यांना कैद करण्याचे आदेश दिले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ३० ऑक्टोबर १९२८ लाहोर येथे सायमन कमिशनचा निषेध करणार्‍या लाला लजपतराय यांच्यावर ब्रिटिश पोलिसांनी लाठीहल्ला केला.  त्यातच पुढे १७ नोव्हेंबर १९२८ रोजी त्यांचा अंत झाला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड, सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र. "जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री" 🚩

७ ऑक्टोबर १६७०दुसऱ्यांदा सुरत लुटीनंतर शिवराय परतीच्या मार्गावर निघाले.दुसरीकडे जबरदस्त धक्का बसलेल्या मुघल फौजेची लढाईसाठी हालचाल सुरू. शहजादा मुअज्जमने दाऊदखानाला मराठ्यांना बागलाण-नाशिक येथे अडवण्यास सांगितले.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ७ ऑक्टोबर १६५९ रुई द लैतांव व्हीएगश यांचे मुंबईस निवेदन ! "मी रुई द लैतांव जाहीर करतो की, मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे जहाजे बांधण्याच्या कामावर कल्याण येथे होतो. माझ्या हाताखाली काही काळे आणि गोरे लोक होते. शिवाजी महाराज यांनी पेण येथे आणि अन्यत्र २० युद्ध नौका बांधावयास घेतलेल्या होत्या. त्याचा उपयोग दांड्याच्या सिद्दिविरुध्द होणार असल्याचे छत्रपती शिवाजी महाराज यांनी जाहीर केले होते. या कामावर मी देखरेख करीत असता एके दिवशी वसईच्या कॅप्टनी माझ्या कडे जुआंव द सालाझार यांना पाठवुन मला कळविले की छत्रपती शिवाजी महाराज जे आरमार बांधित आहे. त्याचे काम जर तुम्ही बंद पडले तर तुमच्या हातुन तुमच्या देशाची आणि तुमच्या राजाची मोठीच सेवा घडेल मी माझ्या राजाचा इमानी प्रजाजन असल्याने त्यांच्या हितसंबंधांना बाधा येईल असे क्रुत्य माझ्या हातुन होणे इष्ट नाही असा विचार करून वसईच्या कॅप्टनचा आदेश पाळण्याचे मी ठरवले. माझ्या हाताखाली गोरे काळे आणि बायका मुले मिळुन ४०० लोक होते. त्यांच्या शिवाय बाटगे लोक होते ते वेगळे आम्ही सगळ्यांनी छ

६ आॅक्टोबर १६७४छत्रपती शिवराय कल्याणमार्गे "पाली" येथे दाखल झाले.आणि येथूनच रामनगरचा काही भाग जिंकून स्वराज्यात दाखल करून घेतला.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ६ आॅक्टोबर १६७४ छत्रपती शिवराय कल्याणमार्गे "पाली" येथे दाखल झाले. आणि येथूनच रामनगरचा काही भाग जिंकून स्वराज्यात दाखल करून घेतला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ६ आॅक्टोबर १६७६ "दक्षिण दिग्विजय मोहीम" "छत्रपती शिवराय" दक्षिणेतील मोहीमेसाठी आज किल्ले रायगडवरून निघाले. आजच्या दिवशी दसरा होता. राजाभिषेक सोहळ्यानंतर प्रथमच महाराजांनी एवढ्या मोठ्या मोहीमेसाठी सिमोल्लंघन केले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ६ ऑक्टोबर १६८६ सण १६८५ नंतर इंग्रजानी आपली दुटप्पी वागणूक बदलत छत्रपती शंभूराजेंशी  मैत्री ठेवण्याचे धोरण ठेवले होते. मुघलांशी बिघडलेल्या संबंधाच्या पार्श्वभूमीवर लंडनहून सुरतकर आणि मुंबईकर यांना शंभूराजेंशी मैत्री राखण्यास सांगण्यात आले होते तसेच त्यांना तोफखाना आणि दारुगोळाही पुरवण्यास कळवले होते. याच दरम्यान सिद्दीच्या हालचाली पूर्वीप्रमाणेच सुरू होत्या. १६८६ साली सिद्दीने केलेल्या लुटीने चेऊल प्रांतातील रहिवासी परागंदा झाले होते व मुलुख ओस पडला होता. त्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात सिद्दीने मराठ्यांचे काही किल्ले घेतले.

३० सप्टेंबर १६६५औरंगजेबने पाठवलेले आग्रा भेटीचे फर्मान छत्रपती शिवरायांनी स्विकारले.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ३० सप्टेंबर १६५९ स्वराज्यावर चालून आलेला आदीलशाही सरदार "अफझलखान" याने १२ मावळ मधील रोहीड खोरेचे वतनदार आणि स्वराज्याशी कायम एकनिष्ठ असणारे "कान्होजी जेधे" त्यांचे सुपुत्र व छत्रपती शिवरायांचे बालमित्र "बाजी जेधे" यांना स्वराज्यविरोधी जाण्यासाठी पत्र पाठविले. पण "बाजी जेधे" यांनी ते धुडकावून लावले आणि छत्रपती शिवाजी महाराजांसमोर मुजरा करावयास हजर झाले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ३० सप्टेंबर १६६४ १६६४-६५ वर्षाच्या मध्यान्हात औरंगजेबाचा अनेक वर्षाचा स्वराज्यावरील क्रोध चालून आला. हा क्रोध, कधीकाळचे जयपुरचे राजे मिर्झाराजे जयसिंग ह्या सरदाराच्या रूपाने चालून आला. धूर्त राजकारणी, चाणाक्ष मुत्सद्दी, महापराक्रमी आणि बुद्धिने तल्लख असलेल्या मिर्झाराजांचे हे गुणविशेष मात्र परकियांच्या पुढे झुकत होते, आणि हेच शल्य इतिहासात त्यांच्यावर दिसते. अर्थात त्यांना यात कसलाही कमीपणा वाटत नसे. तर असे हे मिर्झाराजे दख्खन मोहिमेकरीता ३० सप्टेंबर १६६४ रोजी मुक्रर झाले. दिल्ली दरबारातील मोठ्या-मोठ्या सरदारांसह दिलेरखा

२४ सप्टेंबर १६७४छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेकछत्रपती शिवाजी महाराज्यांचा राज्याभिषेक जेष्ठ शुक्ल त्रयोदशी अर्थात ६ जून १६७४ रोजी रायगडावर पूरोहित गागाभट्ट यांच्या मार्गदर्शनाने वैदीक पद्धतीने संपन्न झाला

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २४ सप्टेंबर १६५६ स्वराज्यात सुपे हा परगणा होता. हा शहाजीराजांच्या जहागिरीतच होता मात्र तो त्यांनी त्यांचे शालक (पत्नी तुकाबाईंचे सख्खे बंधू) संभाजी मोहिते यांच्या ताब्यात दिला होता. मोहिते तिथे गढीत रहात होते. या मोहित्यांची एक मुलगी अण्णुबाई हिचे लग्न व्यंकोजीराजांशी तर, मोहिते घराण्यातीलच (बहुधा संभाजी मोहित्यांचीच मुलगी) सोयराबाई यांचे लग्न शिवाजीराजांशी झाले होते. त्यामुळे मोहित्यांचे भोसले घराण्याशी मोठे नातेसंबंध होते. मात्र हे मोहितेमामा कारभार योग्य पद्धतीने करत नव्हते. लाच घेणे, दुसर्याचे वतन हिसकावून घेणे वगैरै प्रकार ते करत होते. शहाजीराजे व शिवााजीराजांनाही ते जुमानत नव्हते. एकदा शिवाजीराजांनी पत्र पाठवून त्यांना आज्ञा केली की, 'पागा  घेऊन पुणे मुक्कामी येणे!' मात्र मोहित्यांनी या पत्राचे उत्तर पाठवले नाही उलट, पत्र घेऊन आलेल्या जासूदाला उर्मटपणे म्हणाले, 'शहाजीराजे समक्ष असता हे मालक नाहीत... काही आपले पायाकडे पाहून करावे!' संभाजी मोहिते काही केल्या जुमानत नाहीत हे शिवाजीराजांना समजले. स्वराज्यात अ

२३ सप्टेंबर १६८०छत्रपती संभाजीराजांनी तुळजाभवानीस श्रुन्गारलेला हत्ती व २० सहस्त्र होणांचे दान म्हणून देऊ केले.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २३ सप्टेंबर १६३३ मुरार जगदेव हे विजापूर दरबारचे सरदार, या दिवशी सूर्यग्रहण होते, हा योग साधून त्यांनी आपले सोन्यारुपाने तुलादान केले. हे तुलादान पुण्यापासून १० कोसावर भीमा व इंद्रायणी नद्यांच्या संगमात वसलेला नांगरगावास झाले, तेथे संगमेश्वराचे मंदिर बांधले त्यामुळे या गावाचे नामकरण होऊन तुळापुर झाले. ३०० वर्षांपूर्वी यादवांचे राज्य बुडाल्यानंतर एवढा मोठा तुळादान विधी झाला नव्हता. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २३ सप्टेंबर १६४३ अदिलशहाने पोर्तुगीजांना पत्र पाठवले, त्यांच्या चौल किल्ल्याच्या परिसरात याकुतशहा व फत्तेखान हे २ बंडखोर आणि ज्याला ते मलिक म्हणतात असा १ मुलगा अशा तिघांना आश्रय दिला आहे, त्यांना पोर्तुगीजांनी आपल्या मुलखातून हाकलून द्यावे. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २३ सप्टेंबर १६७३ इ.स. १६६१ मध्ये शिवाजी महाराजांनी इंग्रजांची राजापूरची वखार लुटली होती, तिची भरपाई मिळावी अशा मागणीचा अनेकवेळा अयशस्वी प्रयत्न इंग्रजांनी केला. हे प्रलंबित प्रकरण मिटवण्याकरिता छत्रपती शिवाजीराजांशी बोलणीकरिता इंग्रजांनी 'नारायण शेणवी' यास २३ सप्टेंबर १