३१ जुलै १६७७"दक्षिण दिग्विजय मोहीम"छत्रपती शिवराय दक्षिणेतील "तुंदुमगुती"ला आले, तिथून त्यांनी "वृद्धाचलम"ला शिवशंकराचे दर्शन घेतले.
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ३१ जुलै १६५७ दंडाराजपुरी मोहिम दंडा-राजपुरीचा किल्ला हा अरबी समुद्रकिनाऱ्यावर आहे. किनाऱ्यालगतच दंडा व राजपुरी अशी दोन गावे आहेत. या किल्ल्याच्या जवळच खाडीमधे एका बेटावर जंजिरा किल्ला आहे. तो किल्ला वर्षानुवर्षे सिद्दीच्या ताब्यात होता व तो स्वराज्याला उपद्रव देत होता. तसेच, स्वराज्याच्या रक्षणासाठी समुद्रावरही सत्ता प्रस्थापित करणे आवश्यक होते. म्हणुन मग १६५७ मधे ऐन पावसाळ्यात शिवाजीराजांनी सिद्द्यावर मोहिम काढली व त्याप्रमाणे रघुनाथ बल्लाळ सबनीस यांना नियुक्त केले. रघुनाथराव दंडा राजपुरीवर चालुन गेले ती तिथी होती शके १५७९, श्रावण शुद्ध १, शुक्रवार दि. ३१ जुलै १६५७. रघुनाथपंतांनी तळे-घोसाळे काबीज करून नंतर दंडा राजपुरीचा किल्ला सिद्द्याकडुन जिंकला व नंतर जंजिरा घेण्याचाही प्रयत्न केला मात्र ते शक्य झाले नाही. जंजिर्यावरची ही शिवाजीराजांची पहिलीच मोहीम. यापुढेही काही वेळा शिवाजीराजांनी व नंतर संभाजीराजांनीही जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला पण त्या प्रत्येक वेळी काही ना काही कारणाने शक्य झाले नाही. १६५७ च्या मोहिमेत सिद्दीला मा...