२५ जुलै १६७८छत्रपती शिवरायांनी (आत्ताच्या नवी मुंबई जवळील) उलवे ताब्यात घेतले.
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
२५ जुलै १६२९
छत्रपती शिवरायांचे आजोबा आणि "राजमाता जिजाऊ" यांचे पिता "लखुजीराजे जाधवराव" यांचा मृत्यू.
निजामशहाच्या आदेशाने दौलताबादच्या किल्ल्यातील त्याच्याच दरबारात लखुजीराव, त्यांची मुले आणि त्यांच्या पुतण्यांचा विश्वासघाताने खून करण्यात आला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
२५ जुलै १६४८
विजापूरच्या आदिलशहाच्या आज्ञेने मुस्तफाखानाने "किल्ले जिंजी" जवळ शहाजीराजेंना कैद केले.
शहाजीराजांना कैद करून त्यांच्या हातापायात बेड्या ठोकल्या व राजांची रवानगी कैदी म्हणून विजापूरास झाली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
२५ जुलै १६६६
औरंगजेब बादशहाने छत्रपती शिवरायांसोबत आग्रा येथे आलेल्या मराठा फौजेचे परतीचे परवाने मंजूर करून शिवरायांकडे आजच्या दिवशी सुपूर्द केले.
या परवान्यानुसार शिवरायांना आपल्यासोबत आलेल्या मराठा फौजेला आग्र्याहून रजा देऊन महाराष्ट्रात पाठवता येणार होते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
२५ जुलै १६७८
छत्रपती शिवरायांनी (आत्ताच्या नवी मुंबई जवळील) उलवे ताब्यात घेतले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
२५ जुलै १७००
भुषनगड औरंगजेबाच्या ताब्यात
परळीहून औरंगजेब बादशहाने भूषणगडाकडे जाण्यासाठी भर पावसाळ्यात जून १७०० ला कूच केली. ज्या जनावरांवर सामानाची ओझी लावली होती ती जनावरे पटापट मरू लागली. कृष्णा नदीला पूर होता. त्यातून सैन्य मोठ्या मुष्किलीने पैलतीरी पोहोचले. शेकडो उपासमारीने मेले, पुढे हळूहळू मार्ग आक्रमत मोगली लष्कर २५ जुलै रोजी भूषणगडास पोहोचले व गडाचा ताबा मिळविला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
२५ जुलै १७५५
जयाप्पा शिंदे यांचा मृत्यू
राणोजी शिंद्यांच्या मृत्यूनंतर जयप्पानी ग्वाल्हेरची गादी सांभाळली. २५ जुलै १७५५ ला जोधपुरच्या महाराजा विजयसिंह राठौर यांच्या वारसदारांशी (बिजसिंह राठौर ) लढताना वयाच्या ३५ व्या वर्षी जयाप्पांना नागौर (राजस्थान) येथे घातपात करून मारण्यात आले. जयाप्पा शिंद्यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र जनकोजी शिंदे यांनी शिंदेशाहीची सूत्रे आपल्या हाती.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,
सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.
"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री" 🚩
Comments
Post a Comment