३१ जुलै १६७७"दक्षिण दिग्विजय मोहीम"छत्रपती शिवराय दक्षिणेतील "तुंदुमगुती"ला आले, तिथून त्यांनी "वृद्धाचलम"ला शिवशंकराचे दर्शन घेतले.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

३१ जुलै १६५७
दंडाराजपुरी मोहिम
दंडा-राजपुरीचा किल्ला हा अरबी समुद्रकिनाऱ्यावर आहे. किनाऱ्यालगतच दंडा व राजपुरी अशी दोन गावे आहेत. या किल्ल्याच्या जवळच खाडीमधे एका बेटावर जंजिरा किल्ला आहे. तो किल्ला वर्षानुवर्षे सिद्दीच्या ताब्यात होता व तो स्वराज्याला उपद्रव देत होता. तसेच, स्वराज्याच्या रक्षणासाठी समुद्रावरही सत्ता प्रस्थापित करणे आवश्यक होते. म्हणुन मग १६५७ मधे ऐन पावसाळ्यात शिवाजीराजांनी सिद्द्यावर मोहिम काढली व त्याप्रमाणे रघुनाथ बल्लाळ सबनीस यांना नियुक्त केले. रघुनाथराव दंडा राजपुरीवर चालुन गेले ती तिथी होती शके १५७९, श्रावण शुद्ध १, शुक्रवार दि. ३१ जुलै १६५७.
रघुनाथपंतांनी तळे-घोसाळे काबीज करून नंतर दंडा राजपुरीचा किल्ला सिद्द्याकडुन जिंकला व नंतर जंजिरा घेण्याचाही प्रयत्न केला मात्र ते शक्य झाले नाही. जंजिर्यावरची ही शिवाजीराजांची पहिलीच मोहीम. यापुढेही काही वेळा शिवाजीराजांनी व नंतर संभाजीराजांनीही जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला पण त्या प्रत्येक वेळी काही ना काही कारणाने शक्य झाले नाही. १६५७ च्या मोहिमेत सिद्दीला मात्र तात्पुरती जरब बसली व त्याने रघुनाथपंतांशी मैत्रीची (तात्पुरत्या) बोलणी लावून विषय संपवला.
जेव्हा पंतांना दंडा राजपुरी मोहिमेवर पाठवले त्याचवेळी स्वतः शिवाजीराजे दुसर्‍या एका महत्वाच्या मोहिमेवर निघाले. ती म्हणजे सिंहगड किल्ला जिंकण्याची!

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

३१ जुलै १६५७
मुघलांनी विजापूरच्या आदिलशहाच्या ताब्यात असलेला "कल्याणी किल्ला" जिंकून घेतला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

३१ जुलै १६७७
"दक्षिण दिग्विजय मोहीम"
छत्रपती शिवराय दक्षिणेतील "तुंदुमगुती"ला आले, तिथून त्यांनी "वृद्धाचलम"ला शिवशंकराचे दर्शन घेतले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

३१ जुलै १६८१
औरंगजेबाने अजमिरहून आजमशहास शहजादा अकबर याच्यावर रवाना केले.

🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

३१ जुलै १६८३
सुरतकर टोपीकर, मुबाईकरांना कळवितात, "छत्रपती संभाजीराजे व पोर्तुगीज यांचे वैर झाले आहे. आम्हाला समजले की, राजाने मोठ्या सैन्यानिशी चौलास वेढा घातला असून, तो ते घेण्याच्या बेतात आहेत."

🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

३१ जुलै १८५७
१८५७ च्या प्रथम स्वातंत्र्यलढ्यातील महाराष्ट्राचा सहभाग
कोल्हापूर:इथल्या २७ व्या नेटिव-देशी पायदळ तुकडीतील २०० सैनिकांनी ३१ जुलै १८५७ ला उठाव करून इंग्रज अधिकाऱ्यांच्या घरांवर हल्ले करून तिघा अधिकाऱ्यांना ठार मारले.नंतर स्थानिक जनता पण ह्या उठावात सामील झाली. ह्या उठावाचे नेते कोल्हापूर महाराजांचे धाकटे बंधू चिमासाहेब हे होते.

🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

३१ जुलै १८९७
द्वितीय छत्रपती राजाराम महाराज यांचा जन्मदिवस
लोकराजा ही पदवी मिळालेल्या कर्तुत्ववान पित्याचे हे पुत्र. म्हणजेचं राजर्षी शाहू महाराज यांचे ज्येष्ठ चिरंजीव छत्रपती राजाराम आज्याचेच, पंज्याचे नाव नातू पणतू यांना देण्याच्या परंपरेमुळे छत्रपती घराण्यातील या दुसऱ्या राजाराम महाराजांची दखल तशी जास्त कुणी घेतलीच नाही, कोल्हापूर मधली अत्ता शेवटच्या अवस्थेत असलेल्या पिढीचा जर अपवाद सोडला तर यांच्याविषयी जर समाजात माहिती असली तरच नवल समजाव.
वडिलांच्याच पावलावर पाउल टाकत समाज हिताची कामे करणारया या राजांनी अनेक मोठमोठी कार्य पार पाडली. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी जे राधानगरी धरणाचे बांधकाम सुरु केले होते, ते बांधकाम शाहूराजांच्या पश्चात पूर्णत्वास नेण्याचे मोठे काम राजाराम महाराजांनी केले. आजही सुजलाम सुफलाम असलेल्या कोल्हापूरची बीजे जणू शाहू राजांनी रोवली आणि त्यास वाढविण्याचे, राखण्याचे कार्य राजाराम महाराजांनी केले. 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

३१ जुलै १९४०
क्रांतिकारी उधमसिंग बलिदान दिन
लंडनमधल्या कोर्टात खटला चालून क्रांतिकारी उधमसिंगांना ३१ जुलै १९४० रोजी लंडनमधल्या पेंटॉनव्हिले तुरुंगातच फाशी झाली आणि त्यांचे प्रेतही तुरुंगाच्या आवारातच पुरले गेले. 
१३ मार्च १८४० रोजी लंडनमधल्या कॅक्स्टन हॉलमध्ये ब्रिगेडियर जनरल सर पर्सी साईक्सचं अफगाणिस्तानबद्दल भाषण चाललं होतं. भाषण संपल्यावर भारतमंत्री लॉर्ड झेटलंडने कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले. ह्या कार्यक्रमाला मुंबईचा पूर्वीचा गव्हर्नर लॉर्ड लॅमिंग्टन आणि पंजाबचा पूर्वीचा गव्हर्नर सर लुईस डेन हेही उपस्थित होते. ह्या कार्यक्रमाला अजून दोन लोक उपस्थित होते - ते म्हणजे पंजाबचा पूर्वीचा अजू एक गव्हर्नर सर मायकेल ओ’ड्वायर आणि ‘मोहम्मद सिंग आझाद’ हे नाव (नाव नीट वाचा म्हणजे गंमत कळेल!) घेऊन तिथे आलेला भारतीय क्रांतिकारी उधम सिंग!
कसेबसे पैसे जमा करून फक्त जालियनवाला हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी लंडनमध्ये आलेल्या उधम सिंगांनी इथे लंडनमध्ये चरितार्थ चालवण्यासाठी अनेक फुटकळ कामे केली. गाड्या दुरुस्त करणे, रंगारीकाम, सुतारकाम वगैरे. एक सहसा माहीत नसलेली गोष्ट म्हणजे त्यांना अभिनयाचेही अंग होते. त्यांनी लंडनमध्ये असताना ‘द फोर फेदर्स’ व ‘एलिफंट बॉय’ या दोन इंग्रजी चित्रपटांत कामही केले होते. (‘एलिफंट बॉय’ ची लिंक खाली देतोय.) पण हे सगळं वरवरचं होतं. त्यांचा लंडनला यायचा मूळ हेतू जालियनवाला हत्याकांडाचा बदला घेणे हाच होता आणि ते संधीची वाटच पहात होते. 
कॅक्स्टन हॉलच्या सभेचं आमंत्रण त्यांना मिळालं. मग त्यांनी तयारी सुरु केली. बोर्नमाऊथला जाऊन एका इंग्रज शिपायाकडून जाऊन एक जुनं पिस्तूल आणि गोळ्या विकत घेतल्या. एका पुस्तकात त्या पिस्तुलाच्या आकाराची पोकळी बनवून त्यात ते लपवलं. सोबत खिशात एक चाकूही घेतला.
१३ मार्च रोजीच्या सभेला उधमसिंगांनी मोहम्मद सिंग आझाद ह्या नावाने मस्त सूट - टाय - ट्रिल्बी हॅट वगैरे त्यावेळचा टिपिकल इंग्रजी पोशाख घालून हॉलमध्ये ऐटीत एंट्री केली. वर सांगितलेले साईक्सचे भाषण संपताच त्यांनी पुस्तकातून पिस्तुल काढून सहा गोळ्या झाडल्या. दोन गोळ्या ओ’ड्वायरला लागल्या आणि तो तिथेच गतप्राण झाला. दोन गोळ्या लॉर्ड झेटलंडला चाटून गेल्या. एक गोळी सर लुईस डेनच्या मनगटावर लागली तर एक गोळी लॉर्ड लॅमिंग्टनच्या हाताला लागली. दोन लोकांनी लगेच झडप मारून उधमसिंगांना पकडले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,
सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.

"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री" 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

महाराज शिवाजी राजे ऑफ तंजावर साहेबांचे आज पुण्यात स्वागत व सत्कार करण्याचे संधी मिळाली. विविध इतिहास अभ्यासकांना महाराज साहेबांनी आज मोलाचे मार्गदर्शन केले.

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...