२४ जुलै १६७१मुघलांविरूद्ध भर पावसात सुरू असलेल्या मोहीमेसाठी "सरसेनापती प्रतापराव गुजर" यांना छत्रपती शिवरायांनी आणखी मावळ्यांची तुकडी आणि १०,००० होनांची रसद पाठवली.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२४ जुलै १२०६
मोहम्मद घोरीचा गुलाम म्हणून प्रसिद्ध असलेला कुतुबुद्दीन ऐबकाने दिल्लीची सत्ता हस्तगत केली.
कुतुबुद्दीन ऐबक हा मूळचा मुसलमान असूनही त्याच्या घरावर मुसलमानांनी दरोडा घालून त्याला पळवून नेले होते. नंतर कुतुबुद्दीन मोहम्मद घोरीच्या घोडदळाचा एक प्रमुख म्हणून काम करत होता. शत्रू प्रांतावर दरोडे घालून लूटमार करण्याचे काम त्याच्याकडे होते. ११९१ साली तो त्याच्या सेनेसह भारतात शिरला. 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२४ जुलै १६६६
छत्रपती शिवाजीराजांबद्दल गौरवोद्गार
या घटनेची नेमकी तारीख उपलब्ध नाही मात्र ती २४ ते २७ जुलै १६६६ दरम्यानची आहे. शिवाजीराजे आग्र्याच्या कैदेतुन कसे सुटावे याचा विचार करत होते. २४ जुलै रोजी रामसिंग बादशहा औरंगजेबसोबत तीन दिवसांसाठी शिकारीला गेला. त्याच्या माघारी एक दिवस त्याचीच चार माणसे शिवाजीराजांबद्दल चर्चा करत होती. त्यांची नावे होती: महासिंग शेखावत, बल्लुशाह, तेजसिंग व रणसिंग
महासिंग म्हणाला 'शिवाजी खरोखरच खुप शहाणा व समंजस आहे. तो जे बोलतो ते उचितच बोलतो. त्यावर कोणी अधिक काही बोलण्याची आवश्यकताच पडत नाही. भला, सच्चा राजपुत आहे. जसे त्याच्याबद्दल पुर्वी ऐकले होते तसाच आहे. राजपुती बाण्याविषयी तो इतक्या गोष्टी सांगतो की, त्या जर आपण स्मरणात ठेवल्या तर एक दिवस निश्चीतच कामी येतील.'
मुळ राजस्थानी पत्रातील वाक्ये खालीलप्रमाणे आहेत
'सेवोजी स्याणो बहोत, जु बात कहे सू ठीकही कहो, जू फेर कहू का कबहा की हाजत नही। खरोही भलो राजपूत, जिसो सुणो थो तिसो ही देखो। असी राजपूतपणा की बात कहे थो सू याद रहे तो समयउपर काम आवे'*
एवढ बोलुन महासिंग तेजसिंगाकडे वळून म्हणाला 'इथे तर शिवाजीला त्याच्या दैवानेच आणले. पण तुझ्यासारखे चार शहाणे, उच्च दर्जाचे अधिकारी मिर्झाराजांजवळ असताना तुम्ही कसे त्याला इथे येऊ दिले? तुम्ही मिर्झाराजाला का समजावले नाही?'
त्यावर तेजसिंग म्हणाला 'मिर्झाराजे केवळ उदयराज मुन्शीचेच ऐकतात. दुसरा कोणी त्यांना काय सल्ला देणार? मोठ्यामोठ्या ठाकुरांचेही ते ऐकून घेत नाहीत!'
या वरच्या संभाषणावरून दिसुन येते की, परंपरेने जयपूरचे राजपुत राजे मुघलांशी एकनिष्ठ होते, शिवाजीराजांना मुख्यत्वे मिर्झाराजानेच आग्रयाला म्रुत्युच्या मगरमिठीत आणले, भले अजाणतेपणी का असेना. मात्र, या राजपूत लोकांचेच नोकर शिवाजीराजांचे कौतुक करत होते, त्यांच्याबद्दल हळहळ व्यक्त करत होते. 
हा शिवाजीराजांच्या व्यक्तिमत्वाचा, कर्तुत्वाचा प्रभाव होता असे वाटते.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२४ जुलै १६७१
मुघलांविरूद्ध भर पावसात सुरू असलेल्या मोहीमेसाठी "सरसेनापती प्रतापराव गुजर" यांना छत्रपती शिवरायांनी आणखी मावळ्यांची तुकडी आणि १०,००० होनांची रसद पाठवली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२४ जुलै १६७७
"दक्षिण दिग्विजय मोहीम"
दक्षिणेतील मोहीमेदरम्यान छत्रपती शिवरायांनी "विल्लुपुरमचा किल्ला (जिंजी)" जिंकून संपूर्ण "विल्लुपुरम" ताब्यात घेतले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२४ जुलै १६९५
छत्रपती राजाराम महाराजांनी राज श.२० वैशाख शुद्ध नवमीला(इ.१६९४ एप्रिल २३) काढलेले एक अभयपत्र व एक आज्ञापत्र आहे. त्यांवरून असे दिसते की, तांब्राचा(मुघलांचा) ज्या ज्या वेळी पंढरपुरास त्रास होई तेव्हा विठ्ठलाची मूर्ती पंढरपूरच्या जवळ देगावं या खेड्यात लपवून ठेवीत, पण या खेड्यास मराठा लष्कराच्या वर्दळीच्यामुळे वारंवार उपद्रव होई. तेथे मूर्ती ठेविल्या असतांना उपद्रव झाला तर देवाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बरे नव्हे म्हणून ही पत्रे आहेत. या पत्रांच्या अनुरोधाने सेनापती संताजीराव घोरपडे यांनी इ. १६९५ जुलै २४ रोजी वरील गावास कोणत्याही प्रकारे उपद्रव न देण्याबाबत आणि कोणी दिलाच तर त्याचे पारिपत्य करण्याची पागेस आज्ञा केलेली आहे.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,
सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.

"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री" 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...

पानिपत आणि रहिमतपूरकर माने