२७ जुलै १६७३भर पावसाळ्याच्या सुमारास "छत्रपती शिवाजी महाराजांनी" "सातारा प्रांत" जिंकला.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२७ जुलै १६७३
भर पावसाळ्याच्या सुमारास "छत्रपती शिवाजी महाराजांनी"  "सातारा प्रांत" जिंकला. अजिंक्यताऱ्याबरोबरच सज्जनगड पण बहुधा स्वराज्यात त्याचवेळी दाखल झाला असावा. 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२७ जुलै १६७७
कर्नाटक मोहिमेवर असता महाराजांनी आपला सावत्र भाऊ एकोजीराजे यांस पत्रे लिहिली.  तेव्हा महाराजांच्या भेटीस एकोजीराजे यांनी आपल्यातर्फे काही पोक्त लोक पाठविले. या मंडळीशी महाराजांनी व्यवहाराची योग्यतीच बोलणी केली. “कैलासवासी शहाजी महाराजांच्या कष्टाच्या धनदौलतीत जसा एकोजीराजांचा वाटा आहे तसाच आपलाही वाटा आहे. तेव्हा अर्धावाटा बऱ्या बोलाने द्या” असे महाराजांनी सांगून पाठविले. आणि हा निरोप त्यांनी एकोजीराजांची जी माणसे भेटावयास आली त्याज बरोबर एकोजीराजांच्या भेटीस आपलेकडील थोर माणसे, बाळंभट, कृष्ण ज्योतिषी व कृष्णाजी सखोजी अशी तिघेजण पाठविले. त्याजबरोबर महाराजांनी एकोजी राजांस पत्र दिले व त्यात लिहिले की शहाजी राजांच्या जहागिरीचा अर्धा वाटा एकोजी राजे यानी संभाजी (शिवरायांचे बंधू) पुत्र उमाजी यास द्यावयास हवा आणि त्यांना आपल्या भेटीस बोलाविले. शिवाजी महाराजांचा मुक्काम तिरूमल वाडी येथे जुलै १६७७ पासून होता.  तिथे एकोजी राजे दोन हजार स्वार घेऊन भेटण्याकरिता आले. मुकामावर आल्यानंतर भेटी जहाल्या. नित्य एकेताटी भोजन एकांती बसोन भाषण वाद जाले, आठवडा झाला. दिनांक २० जुलै ते २७ जुलै  तरी खुलासवार बोलणे काहीच न करता मनात कुढत राहिले व छत्रपती शिवाजी महाराज आपणास अटक करतील अशी भीती वाटून एके दिवशी रात्री गुप्तपणे कावेरी नदीत तराफ्यावर चढून पुरांतून पलीकडे तंजावरास निघून गेले.  शिवाजी महाराजांस ही बातमी समजतांच वाईट वाटले. एकोजी राजांचे कारभारी शामजी नाईक कान्हेरपंत व शिवाजी शंकर हे महाराजांचे छावणीत होते. त्यांस वस्त्रे भूषणे देऊन रवाना केले व एकोजीरावांस सांगून पाठविले की “तुम्ही व आम्ही वाटे करून घेऊन
परस्परे समाधाने राहू. ” पण यावर काही उपयोग झाला नाही. मात्र महाराजांचे एक सापत्न बंधू संताजीराजे भोसले हे महाराजांना येऊन मिळाले. महाराजांनी त्यांना हजार स्वाराची सरदारी देऊन फौजेत ठेविले. शिवाजी महाराजांनी दौलतीचा हिस्सा मागितल्यावर एकोजी राजे
यांनी प्रत्यक्ष भेटीत न बोलता आपला मनोदय आपल्या माणसांकरवी महाराजांस ऐकविला. वडील असता शिवाजी महाराजांनी बंडपणा पातशहापाशी केला. तमाम मुलूख घेतला, त्यामुळे वडिलांस कित्येक प्रकारे इजा झाली. आम्ही वडिलांजवळ तंत्र देऊन राहिलो, त्यामुळे बादशहाची दौलत रक्षिली गेली. वाटा देणे ही वतनदारी तरी नाहीच. वतन बाब असेल त्याचा वाटा घ्यावा. चाकरीची दौलत सर्व विजापूरचे शहाची, आम्ही शहाचे चाकर. त्यांचे हुकूमाचे मालक, यांत तुमचा संबंध नाही. अशा प्रकारे पत्र लिहिण्यास मदुरा व म्हैसूर नायकांनी व मुसलमान सल्लागारांनी एकोजीराजांस भाग पाडले. एकोजीराजे यांनी जे महाराजांस लिहिले त्याची प्रत विजापूर दरबारास त्याची संमती मिळण्यासाठी पाठविली. विजापूर दरबारने एकोजीस सबुरीचा सल्ला दिला. दरम्यान मुक्काम हालवून महाराजांची स्वारी वलिगुंडपुरमुला आली तिथून त्यांनी रघुनाथ पंतास मदुरेच्या नायकाबरोबर तह करण्यास रवाना केले. त्यांनी ६ लक्ष होनांचा करार करून महाराजांनी आपले सैन्य परत घ्यावे असे ठरले. तद्नंतर महाराजांनी मुक्काम हलवून वलिगड पुराहून तुंदम गुत्तीला (तोरगड) २७ जुलै १६७७ ला आले. तेथे महाराजांस असे समजले की एकोजीराजे मुसलमान लोकांच्या नादी लागून शिवाजी महाराजांशी झगड करावा या हेतूने महाराजांवर सैन्य पाठवीत आहे. हे ऐकताच महाराजांनी जनार्दन पंतास सैन्य देऊन एकोजीच्या सैन्याशी सामना देण्यास पाठविले. दोन्ही सैन्याचा थोर झगडा झाला. एकोजीराजांचे लोक पराजय पावले, कित्येक मारिले गेले, कित्येक पळून गेले. अशा रीतीने वलिगुंड पुरच्या लढाईत एकोजीराजेंच्या सैन्याची दाणादण उडाली. तरी देखील एकोजीराजे सलोख्यास तयार झाले नाहीत हे महाराजांच्या लक्षात आल्यावर महाराजांनी शहाजीराजांची बंगळूर, होसपेट, सिरे वगैरे ठाणी व त्याशेजारची राज्ये जिंकून घेतली. महाराजांचा हा पराक्रम पाहून एकोजीराजांस सुबुद्धी सुचली. त्यांनी शिवाजी महाराजांचे कर्नाटकातील मुख्य कारभारी रघुनाथ नारायण हणमंते यांच्या मार्फत महाराजांशी बोलणी लाविली. त्यास यश येऊन भावाभावांमध्ये समजुतीचा तह झाला.  महाराजांनी एकोजीराजांस त्याचा बहुतेक मुलूख व थोडा अधिकच त्याचेकडे लावून दिला आणि एकोजीराजांबरोबरचे भांडणे मिटविले. महाराजांनी कर्नाटक प्रांत जिंकल्यावर कर्नाटकांतील शहाजीराजांच्या जहागिरीपैकी दोन लाख उत्पन्नाचा प्रदेश भावजयीला चोळी बांगडीसाठी आणि जिंजीप्रातां पैकी सात लाख होनांचे महाल एकोजीराजांस दूधभातासाठी म्हणून लावून दिले. अशारीतीने घरगुतीसंबंध महाराजांनी सांभाळले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२७ जुलै १६८४
शहजादा अकबराचे कवी कलश यांना पत्र
तुम्ही पाठवलेले पत्र मिळाले, त्यात छत्रपती संभाजी महाराज पाचवा (पाचच) मुक्कामी पोहोचले आणि त्यांची तुमची भेट झाली असा मजकूर आहे. महंमद आझम (शहजादा) यांचा वकील येथे आला असे समजले. तो कशासाठी येथे आला आणि काय बोलणी झाली आहेत हे कळले नाही. तुम्हाला तह करणे योग्य वाटत असेल तर तह करा. पण माझ्याबद्दल म्हणावयाचे असेल तर मी तहाला अनुकूल नाही. पण पत्रव्यवहार करण्यास हरकत नाही. तुम्ही इकडे येणे आवश्यक आहे, ते सोईचे होईल. अनेक राजकारणे तडीस जातील. तुम्ही जाणावे की, राजकारणाच्या मसलतीसाठी पावसाळ्याचा मौसम अनुकूल असतो. तहाच्या गोष्टीवर अवलंबून बेखबर (गाफिल) राहु नका. कारण उभय पक्षांत खरा तह असा नाही. पावसाळ्यानंतर भीमगडचे प्रकरण समोर येईल, आपले पुढील हित कशात आहे हे तुमचे तुम्हाला चांगले समजेल.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२७ जुलै १७७२
"सांप्रत काळी उत्तर व दक्षिण दोन्ही कर्मे वडिलांचे पुण्यप्रतापे महदयश प्राप्त झाले" 
(एकाच वेळेस आपल्या दोन्ही (उत्तर व दक्षिण) फौजांनी मिळवलेले यश ऐकून हर्षोल्लासीत व तृप्त झाले श्रीमंत माधवराव पेशवे. जवळपास ३/४अंश भारतच्या भूभागावर पुन्हा सत्ता प्रस्थापित झाली.)
श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांनी २७ जुलै १७७२ रोजी सरदार विसाजी कृष्ण बिनीवाले यांना लिहिलेलं अभिनंदन व कौतुक करणारे हे पत्र.... 
पानिपत रणसंग्रामानंतर केवळ १० वर्षात, पुण्याहून सरदार रामचंद्र गणेश कानडे व विसाजी कृष्ण बिनीवाले यांच्या नेतृत्वाखाली रवाना केलेली 'हुजुरात' फौज व उत्तरेतील आपले सरदार तुकोजी होळकर व महादजी शिंदे यांच्या फौजांनी एकत्र येऊन पुन्हा दिल्लीवर मिळवलेला विजय, व त्यापुढे जाऊन, 'पानिपत' घडण्यास मूळ कारणीभूत असलेला 'नजीब खान' रोहिला ह्याचा पुत्र 'झाबेता खान' रोहिला ह्याचा 'पत्थरगड' ह्या त्याच्या राजधानीत दारुण पराभव केल्याचे वृत्त ऐकताच अत्यंत आनंदी व समाधानी होऊन शाबासकी देणारे हे पत्र आहे.....
त्यामध्ये माधवराव म्हणतात की, तुम्ही सर्वांनी एकदिल होऊन जीवाकडे न पाहता श्रम साहस करून रोहिल्याचे(शत्रूचे) पारिपत्य केले, धन्याचा नक्षा नामुष हिंदुस्थानात वृद्धिंगत केलात त्याबद्दल "शाब्बास" !! सरदार शिंदे-होळकर यांचे वडील ज्याप्रमाणे लढले त्याचप्रमाणे हेही लढतात व "दौलतीचे स्तंभ आहेत" !!

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,
सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.

"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट जय सह्याद्री" 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...

पानिपत आणि रहिमतपूरकर माने