Posts

२१ सप्टेंबर १६६५"छत्रपती शिवराय" आणि मुघल सरदार "मिर्झाराजे जयसिंग" हे ऐतिहासिक पुरंदर तहाचे फर्मान देण्या-घेण्यासाठी किल्ले सिंहगडवर आले.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २१ सप्टेंबर १६६५ "छत्रपती शिवराय" आणि मुघल सरदार "मिर्झाराजे जयसिंग" हे ऐतिहासिक पुरंदर तहाचे फर्मान देण्या-घेण्यासाठी किल्ले सिंहगडवर आले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २१ सप्टेबर १६८४ औरंगजेबाने "छत्रपती शंभुराजांवर" पुन्हा स्वारी सुरु केली व आजच्या दिवशी "शियाबुद्दीन खानास" किल्ले "रायगड" जिंकण्यास पाठवून दिले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २१ सप्टेंबर १६८७ औरंगजेबाने 'गोवळकोंड्याचा' वेढा सक्तिने चालवला असता एका फितुर अधिकार्याने २१ सप्टेबर रोजी मध्यरात्री गडाचे दरवाजे उघडून मोगलास आत घेतले. त्या फितुर अधिकार्याचे नाव अजुन ज्ञात नाही. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २१ सप्टेंबर १७४३ जयपूरचा राजा सवाई जयसिंगाचा मृत्यू  जयपूरचा एक कर्तबगार व विद्याप्रेमी राजा !  हा अंबेरच्या विष्णुसिंह कच्छवाहाचा मुलगा. १७०० मध्ये गादीवर येताच पूर्वापार चालत आलेले मोगलांबरोबरचे मैत्रीचे संबंध त्याने दृढ केले. बहादूरशाह व नंतरचा मुहम्मदशाह यांच्याशी त्याचे सलोख्याचे संबंध होते. त्यामुळे १७२०-१७२२ व १७३२ मध्ये त्यास माळव्...

१८ सप्टेंबर १६६७"छत्रपती शिवराय" स्वराज्याची पाहणी करण्यासाठी किल्ले राजगडाहून दक्षिण कोकणातील "कुडाळ" येथे आले.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १८ सप्टेंबर १६६७ "छत्रपती शिवराय" स्वराज्याची पाहणी करण्यासाठी किल्ले राजगडाहून दक्षिण कोकणातील "कुडाळ" येथे आले. पुढे जानेवारी १६६८ मध्ये शिवरायांनी गोव्यातील फिरंग्यांवर हल्ला चढविला. याचे अवलोकन केल्यावर ते कुडाळला नेमक्या कोणत्या कारणासाठी गेले असतील याचा अंदाज बांधता येतो. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १८ सप्टेंबर १८५८ वीर बाबुराव सेडमाकेंना अटक १८५३ मध्ये लाॕर्ड डलहौसीने 'दत्तकविधान नामंजूर' करुन नागपूर संस्थान खालसा केले. त्यामूळे या संस्थानाचा अंमल असलेला चांदा जिल्हा(सध्याचा चंद्रपूर व गडचिरोली जिल्हा) ब्रिटीशांच्या अधिपत्याखाली आला. मार्च १८५४ मध्ये आर. एस. एलिस चांदा जिल्ह्याचे पहिले जिल्हाधिकारी झाले. जिल्ह्यात अनेक जमीनदारी आणि उप-जमीनदारी राजगोंड कुटुंबियांच्या मालकीच्या होत्या. या सर्व जमीनदाऱ्या भोसले राजवटीच्या आधी म्हणजेच गोंड काळापासून अस्तित्वात होत्या. स्वाभाविकपणे, या साऱ्या जमीनदारांच्या जमिनी ताब्यात घेतल्यामूळे त्यांच्या मनात इंग्रजांबद्दल प्रचंड राग उफाळत होता. अशीच एक जमीनदारी मोलमपल...

श्रीमन्छत्रपति शिवाजी उर्फ शाहू व सरसेनापती खंडेराव दाभाडे यांचं दाभाड्यांच्या जुन्या राजवाड्यातील भिंतीचित्र जे आता अस्तित्वात नाही...

Image
श्रीमन्छत्रपति शिवाजी उर्फ शाहू व सरसेनापती खंडेराव दाभाडे यांचं दाभाड्यांच्या जुन्या राजवाड्यातील भिंतीचित्र जे आता अस्तित्वात नाही...

११ सप्टेंबर १७५१सिंहगड किल्ल्याच्या दारूगोळ्याच्या कोठारावर ११ सप्टेंबर १७५१ रोजी वीज पडून गडावर मोठा स्फोट झाला होता. ज्यामुळे गडावरील अनेक इमारतींना हानी पोहोचली होती. ज्याच्या दुरुस्तीसाठी ८७०० रुपये खर्च पडल्याचीही नोंद आहे

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ११ सप्टेंबर १६५७ मुघल शाहजादा मोहंमद अकबर याचा जन्म सहावा मुघल बादशहा औरंगजेबाला एकुण पाच मुले होती. त्यातील चौथ्या क्रमांकाचा मुलगा मोहंमद अकबर हा त्याचा सर्वांत लाडका होता. याचे एक प्रमुख कारण म्हणजे म्हणजे ११ सप्टेंबर १६५७ या दिवशी अकबराच्या जन्मानंतर सुमारे एक महिन्यात त्याची आई दिलरासबानुचा मृत्यु झाला होता. तिच्यापासुन १६५३ मधे मोहंमद आझम हा सुद्धा पुत्र औरंगजेबाला होता. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ११ सप्टेंबर १६७९ दर्यासारंग दौलतखान कुमक घेउन इंग्रजांबरोबरच्या लढाईसाठी माईनाक भंडारीच्या मदतीला खांदेरी येथे पोचला. इंग्रजांची 'हंटर', 'रिवेंज' आणि इतर ३ लढाउ जहाजे खांदेरीला वेढा टाकून उभी होती. दौलतखानाने इंग्रज अधिकारी 'केग्विन'चा पाडाव केला, माईनाक भंडारीला रसद पोचती केली आणि 'नागाव'ला पुन्हा रसद घेण्यासाठी परत गेला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ११ सप्टेंबर १७४१ पोर्तुगीजांनी बार्देश घेतल्यावर सावंताच्या कुडाळ परगण्यावर चाल करण्याची योजना पोर्तुगीजांनी आखली होती. त्याचा सुगावा जयराम सावंत याला लागताच त्याने ...

२७ ऑगस्ट इ.स.१६५६*

*आजचे ऐतिहासिक शिवदिनविशेष* *२७ ऑगस्ट इ.स.१५३४* इस्माईल आदिलशहाचा मृत्यू छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या कामी महत्वाचा अडसर राहिला तो विजापूरच्याआदिलशाहीचा  आदिलशाहीत १४९० पासून १६८६ पर्यंत ९ सुलतान होऊन गेले. आदिलशाहीचा संस्थापक युसुफ शहानंतर १५१० मध्ये त्याचा वारस इस्माईल हा विजापूरचा सुलतान बनला. याने १५१० ते १५३४ अशी २४ वर्षे कारभार पहिला. याची बहुतांश कारकीर्द इतर सुलतानाशी लढायांत गेली. इस्माईल आदिलशहा मृत्यू पावला ती तारीख होती २७ ऑगस्ट १५३४. *२७ ऑगस्ट इ.स.१६५६* जावळी प्रांत जिंकून घेऊन महाराजांनी तेथील व्यवस्था लावून घेतली. जावळीहून पळालेला चंद्रराव मोरे रायरीवर जाऊन बसला होता. महाराजानी रायरीला वेढा दिला. एका महिन्याने शिळीमकरांच्या मध्यस्तीने रायरी उर्फ रायगड महाराजांच्या ताब्यात आला. महाराजानी मोरेचा घोडा,शिरपाव देऊन सन्मान केला व मोरेंच्याकडील पराक्रमी वीर म्हणजे मुरारबाजी देशपांडे व त्यांचे चार बंधू(त्रिंबकजी,शंकराजी,संभाजी व महादजी)यांना आपल्याकडे मागून घेतले. चंद्ररावना मात्र महाराजानी कैदेत ठेवले. महाराजांशी वरकरणी सख्य दाखवत चंद्ररावाने आपल्या सुटक...

⛳२५ आॅगस्ट १६७६"किल्ले जंजिरा" च्या तटबंदीला शिड्या लावलेल्या लायजी पाटलांचा छत्रपती शिवरायांनी सन्मान केला.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २५ आॅगस्ट १६७४ गोव्यातील "किल्ले फोंडा" वर मराठ्यांचा हल्ला. पण काही चुकीच्या धोरणामुळे हा प्रयत्न फसला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २५ आॅगस्ट १६७६ "किल्ले जंजिरा" च्या तटबंदीला शिड्या लावलेल्या लायजी पाटलांचा छत्रपती शिवरायांनी सन्मान केला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २५ ऑगस्ट १८०५ यशवंतराव होळकर इंग्रजांच्या लष्करी हालचालींच्या बातम्या काढीत होते. इंग्रजानाही भरतपूरच्या लढाईनंतर आपल्या फौजेची जुळवाजुळव करण्यास सवड हवी होती. पण त्यांना यशवंतरावांचा पिच्छा सोडावयाचा नव्हता. यशवंतराव त्यांचा सदर हेतू ओळखून होते. पंजाब हा त्यानी दौडीचा प्रदेश ठरवून पंजाबातील शीख व त्यांच्या पलिकडील अफगाण यांच्याशी त्यांचा पत्रव्यवहार सुरु होता. दिनांक २५ ऑगस्ट १८०५ रोजी यशवंतराव राजस्थानच्या बाजूस, दिल्लीच्या अलिकडे असलेल्या रेवाडी नांवाच्या गांवाहून निघाले. मीरखान तीन चार दिवस मागे राहिला होता. शिंद्यांना सामील करून घ्यावे या उद्देशाने तो रेवाडीहून हालला नाही. यशवंतरावानी शिखांशी संधान बांधून त्यांना अनुकूल करून घेतले होते. त्यांचे फ्रेंच व प...

२४ आॅगस्ट १६७७"दक्षिण दिग्विजय मोहीम"दक्षिण मोहीमेदरम्यान छत्रपती शिवरायांनी आज "उत्तर कर्नाटक" जिंकले.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २४ आॅगस्ट १६०८ ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीचा पहिला प्रतिनिधी सुरत येथे दाखल झाला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २४ आॅगस्ट १६५७ औरंगजेबने जर संपूर्ण आदिलशाही बुडवली तर तो अधिक प्रबळ बनेल व "शाहजहान" नंतर आपला प्रतिस्पर्धी म्हणून "दारा शुकोह"ने शाहजहानच्या संमतीने आदिलशहाशी तह केला. त्यात कल्याणी, परिंडा व त्याभोवतालचा भाग, निजामशाही कोकणातील किल्ले, वांगणी परगणा व खंडणीदाखल दीड कोटी रुपये द्यावेत अशा तहातील मुख्य अटी होत्या.  दिल्लीला बादशहा शहाजहान आजारी पडल्याची बातमी औरंगजेबास समजली म्हणून औरंगजेबाने आपली दक्षिणेकडील मोहीम आटोपती घेतली व त्याने सरळ दिल्लीची वाट धरली. इकडे बड्या साहेबिणीने विजापूर दरबार भरविला आणि त्यांत छत्रपती शिवाजीराजांच्या पारिपत्याचा विचार केला. छत्रपती शिवाजी राजांना शासन करावे हे दरबारांत ठरले व ही कामगिरी धिप्पाड अफगाण सरदार अफझलखान याजवर सोपविण्यात आली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २४ आॅगस्ट १६६१ छत्रपती शिवरायांच्या राणीसाहेब "सकवारबाई" यांना कमळाबाई नावाचे कन्यारत्न प्राप्त झाले. 🏇🚩🏇🚩🏇...