कुळदेवीची ओटी कशी आणि वर्षातून किती वेळा भरावी-

कुळदेवीची ओटी कशी आणि वर्षातून किती वेळा भरावी
----------------+-+
 @
१ ) चैत्र पाडवा ( प्रतिपदा ) 
२ ) श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील मंगळवार किंवा शुक्रवार
३ ) नवरात्रामध्ये मंगळवार किंवा शुक्रवार
४ ) दिवाळीचा पाडवा ( प्रतिपदा ) 
५ ) २१ डिसेंबर
६ ) पौष शक्ल पक्षातील मंगळवार किंवा शुक्रवार

ओटी कशी भरावी
----------------

२१ डिसेंबरला उत्तरायण सुरू होत आहे. यादिवशी कुळदेवीची ओटी भरावी. 
कुलदेवीची ओटी भरताना सुहासिनीने ती अशा प्रकारे भरावयास हवी.
               सुहासिनीने प्रात:काळी न्हाऊन (डोक्यावरून अंघोळ) नंतर कुलदेवीची ओटी भरावी 
               कुलदेवतेची देवपूजा केल्यावर एका ताटामध्ये पातळ (साडी) किंवा खण अथवा काठपदर असलेला झंपर पिस ठेऊन त्यावर तिन ओंजळी गहू अथवा तांदुळ ठेवावेत. त्यावर हळदी-कुंकु व साखरेची छोटी पुडी ठेवावी. ज्या त्या सीझनमध्ये येणारे एक फळ ठेवावे. उजव्या बाजूला विड्याच्या दोन पानावर काही चिल्लर नाणे ठेऊन त्यावर सुपारी ठेवावी. शेजारी एक नारळ ठेवून नंतर प्रत्येक वस्तुला हळदी-कुंकवाला वाहुनी दिवा पेटवावा आणि नंतर कुळदेवीला खालील प्रमाणे प्रार्थना करावी.
                 आई कुलदेवी माझ्या कुळाला समृद्धीची जी दैवी उर्जा मिळते त्या उर्जेशी मी एकरूप होऊ ईच्छिते.
                  त्यानंतर दिवसभर ही ओटी देवापाशीच राहू द्यावी. संध्याकाळी चार ते सहा वाजण्याच्या दरम्यान देवीच्या देवळात जाऊन ओटी भरावी. आणि ओटी भरून झाल्यावर तेथून सरळ घरी यावे. 

शुभम् भवतु..
जय कुलदेवीमाता.
🙏🌹🙏🌹🙏

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४