Posts

Showing posts from November, 2021

एकादशींच्या नावावरून त्याचे वेगळेपण आणि महत्त्व विषद होत असते. कार्तिक महिन्याच्या वद्य पक्षातील उत्पत्ती एकादशीचे महत्त्व, मान्यता, पूजाविधी जाणून घेऊया...

Image
👉एकादशी व्रत सर्वाधिक महत्त्वाचे मानले गेले आहे. कार्तिक महिन्याच्या वद्य पक्षातील एकादशीला उत्पत्ती एकादशी म्हणून संबोधली जाते. 👉 कार्तिक महिन्याच्या वद्य पक्षातील उत्पत्ती एकादशीचे महत्त्व, मान्यता, पूजाविधी​​ जाणून घेऊया... धार्मिक शास्त्रांनुसार, सर्व व्रतांमध्ये एकादशी व्रत सर्वाधिक महत्त्वाचे मानले गेले आहे. एकादशी एक देवीचे स्वरुप मानले गेले असून, कार्तिक वद्य पक्षातील एकादशीला ती प्रकट झाली होती, असे मानले जाते. 👉 यामुळे कार्तिक महिन्याच्या वद्य पक्षातील एकादशीला उत्पत्ती एकादशी म्हणून संबोधली जाते. कार्तिक महिन्याच्या शुद्ध एकादशीला प्रबोधिनी एकादशी म्हटले जाते. या दिवशी चातुर्मासाची सांगता होते. प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध पक्षात आणि वद्य पक्षात एकादशी येते. या प्रत्येक एकादशीचे महत्त्व आणि मान्यता अगदी वेगवेगळ्या आहेत. तसेच या प्रत्येक एकादशीची नावेही अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या एकादशींच्या नावावरून त्याचे वेगळेपण आणि महत्त्व विषद होत असते. कार्तिक महिन्याच्या वद्य पक्षातील उत्पत्ती एकादशीचे महत्त्व, मान्यता, पूजाविधी जाणून घेऊया... 👉उत्पत्ती एकादशी व्र

संत तुकाराम

Image
संत तुकाराम महाराज १6व्या शतकातील मराठी कवी आणि हिंदू संत (संत) होते, जे महाराष्ट्रात तुका, तुकोबाराया, तुकोबा म्हणून प्रसिद्ध आहेत. अनेक ठिकाणी गावी गावी याची मदिरे पाहायला मिळातात.  ते महाराष्ट्र, भारतातील वारकरी संप्रदायाचे संत होते. ते समतावादी, वैयक्तिक वारकरी भक्तीपरंपरेचा भाग होते.  संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंग नावाच्या भक्ती काव्यासाठी आणि कीर्तन म्हणून ओळखल्या जाणार्‍या अध्यात्मिक गीतांसह समाजाभिमुख उपासनेसाठी प्रसिद्ध आहेत.त्यांची अभंग विठोबाला समर्पित आहे. 👉इतर नावे तुकोबा, तुका 👉जन्म :- तुकाराम बोल्होबा आंबिले  १५९८ किंवा १६०८ मतप्रवाह आहेत देहू, पुण्याजवळ महाराष्ट्र, भारत  वैकुंठ गंमन :- देहूमध्ये 1649 किंवा 1650 साठी प्रसिद्ध असलेले अभंग भक्ती कविता, भक्ती चळवळीतील मराठी कवी-संत

वंशावळी(Family Tree) म्हणजे काय व ती कशी जुळवावी.*

*वंशावळी(Family Tree) म्हणजे काय व ती कशी जुळवावी.* (वंशावळी#स्वतः वडील-आजोबा-पंजोबा-खापरपंजोबा-पन्तू-नातू-अन्तू-खातू-नातू) ----------------------------------------------- आपण सर्वसाधारणपणे आपल्या पुर्वजांच्या वंशाची, कुळातील पूर्वजांच्या वंशावळी ही काही अपवादात्मक कारणांसाठीच जुळविण्याचा किंवा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. शाळा महाविद्यालयीन प्रवेशासाठी जातीचा दाखला काढण्यासाठी लागणा-या काही महत्वाच्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यामध्ये वंशावळी हा एक भाग आहे परंतु हा वंशावळी जुळविण्याचा व शोधण्याचा मार्ग हा तात्पुरत्या कागदोपत्री तरतूदीसाठी सिमीत आहे. कारण जातीचा दाखला काढण्यासाठी केवळ अर्जदाराचे वडील व वडीलांचे वडील म्हणजे आजोबा इथपर्यंतच हा वंशावळीचा विषय मर्यादित होतो. परंतु काही शहरात आजचा मुंबईस्थित तरूण वर्ग  व उत्साही चाकरमाणी  आपली वडीलोपार्जित मालकीची जागा, कुळाची जागा, वंशाची वंशावळी या पारंपरिक व महत्वाच्या गोष्टीचा शोध लावण्याचा व ते शोधून काढण्याचा प्रयत्न करत आहेत व बहुतेक लोकांना यात यशही आले आहे व येत आहे. आपण आपल्या पुर्वजांच्या वंशाची *साधारणतः ९ पिढ्याच्या वंशाची वंशाव

क्रांतिसूर्य महात्मा_फुले यांनी समताधिष्ठित समाजाच्या निर्मिती सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, जातिविरोधी समाजसुधारक आणि लेखक होते. अस्पृश्यता आणि जातिव्यवस्थेचे निर्मूलन आणि महिला आणि अत्याचारित जातीच्या लोकांना शिक्षण देण्याच्या त्यांच्या प्रयत्नांसह त्यांचे कार्य अनेक क्षेत्रांमध्ये विस्तारले.

Image
👉ज्योतिराव गोविंदराव फुले हे महाराष्ट्रातील भारतीय सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, जातिविरोधी समाजसुधारक आणि लेखक होते.अस्पृश्यता आणि जातिव्यवस्थेचे निर्मूलन आणि महिला आणि अत्याचारित जातीच्या लोकांना शिक्षण देण्याच्या त्यांच्या प्रयत्नांसह त्यांचे कार्य अनेक क्षेत्रांमध्ये विस्तारले. 👉सामाजिक परिवर्तनाची व प्रबोधनाची प्रकाशवाट दाखवत क्रांतिसूर्य #महात्मा_फुले यांनी समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीत मोलाचे योगदान दिले. ते खऱ्याअर्थाने लोकशिक्षक होते. त्यांचे जीवनकार्य दिपस्तंभासारखे, समाजाला नेहमीच नवी दिशा देणारे आहे. 👉जन्म: 11 एप्रिल 1827, कटगुन ता. खटाव जि. सातारा. 👉मृत्यू: 28 नोव्हेंबर 1890, पुणे 👉जोडीदार: सावित्रीबाई फुले (म. 1840-1890)  19 वे शतक 👉मुख्य स्वारस्ये: नैतिकता, मानवतावाद, शिक्षण, सामाजिक सुधारणा 👉आई व वडील : गोविंदराव फुले., चिमणाबाई फुले 👉ज्योतिराव गोविंदराव फुले यांचा जन्म  १८२७ मध्ये माळी जातीतील एका कुटुंबात झाला. माळी लोक पारंपारिकपणे फळे आणि भाजीपाला उत्पादक म्हणून काम करत होते: जातीच्या पदानुक्रमाच्या चौपट वर्ण पद्धतीमध्ये, त्यांना शूद्र किंवा सर्वात खालच्या

पुरातन काळी वाटसुरुना अश्या प्रकारच्या पान पोया होत्या.

Image
शिरवळ येथील ऐतिहासिक पानपोई खालीलप्रमाणे दोन फोटो  पुरातन कालीन पाणपोई 1200 वर्षांपुर्वी  ह्या परिसरातून व ह्या घाटातून व्यापारी मार्ग होता.असं अभ्यासा अति लक्ष्यात येते.  हा मार्ग मोठा व वर्दळीचा असणार हे ह्या पाणपोईच्या मोठ्या आकारावरुन लक्षात येते. ही पाणपोई सध्या भग्नावस्थेकडे वाटचाल करीत आहे. स्थानिक नागरिक प्रशासन व इतिहासप्रेमींनी जतन करण्यासाठी प्रयत्न करायला हवे. पाणपोईचे बांधकाम हे दगड उत्तमरीत्या योग्य आकारात घासून  व दगडावर दगड रचून चुना, सीमेंट ना वापरता केलेले आहे व ते आजदेखील दिसुन येत आहे .आत दोन रांजण होते बहुतेक , त्या पैकी आत्ता एकच दिसतोय.  तसेच सगळीकडे कोणीतरी गुप्तधनाच्या आशेने उकरून ठेवले आहे.की काय असंच जाणवतय. तिथे पहारेकरी नाही अन आजुबाजूला दारूच्या रिकाम्या बाटल्या कचरा पडलेला आहे. पूर्वीच्या काळात या ठिकाणी व्यवस्था पाहण्यासाठी पहारेकरी असावेत असा अंदाज बांधता येईल. ही पाणपोई थोडीशी झाडीत लपलेली असल्याने पावसाळ्यात दिसत नाही. 👉पोईचा घाट ही वास्तु स्थानिक लोकांना देखील माहित नाही किंवा नसावी? 👉कसे जाल   पण पुणे - सासव

आधुनिक महाराष्ट्राचेशिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचाआज स्मृती दिन

Image
👉आज २५ नोहेंबर आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार  यशवंतराव चव्हाण यांचा आज स्मृती दिन एक सुसंस्कृत ,पुरोगामी राजकारणी, थोर विचारवंत, आदर्श लोकप्रतिनिधी,मनस्वी लेखक, सचोटी, नेकी आणि निष्ठेचा वसा देणारे यशवंतराव चव्हाण म्हणजे महाराष्ट्राला पडलेले एक सुंदर स्वप्नंच होत.. देवराष्ट्रे पूर्वीचा (सातारा जिल्हा) साध्या चा सांगली येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म झाला. यांना राजकीय पार्श्वभूमी नसताना सुद्धा. शून्यातून विश्व निर्माण कस करतात हे यशवंत राव चव्हाण साहेबाच्या कारकिर्दी वरुन लक्षात येते. प्राथमिक शिक्षण कराड येथे घेऊन उच्च शिक्षण कोल्हापूर व पुणे येथे घेतले आणि बी.ए., एल्‌एल्‌. बी. पदवी घेऊन चागल्या मार्कांनी पास झाले. १९३० साली महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग चळवळ सुरू केली,तेव्हा यशवंतराव चव्हाणांनी त्याठिकाणी सहभाग घेत देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी प्रयत्न चालू केले 👉 १९३२ साली त्यांना पहिला तुरुंगवास घडला.  देशाला स्वातंत्र्य मिळवून देत असताना चळवळीच्या माध्यमातून यशवंतराव कार्य करत असताना त्यांना पहिल्यांदा तुरुंगवासाची शिक्षा झाली.  या कारावासात मार्

शितोळें घराणे इतिहास

शितोळें घराण्याच्या कुलाचार माहितीसाठी शितोळे घराणे एक मराठा कुळ आहे जो महाराष्ट्र, कर्नाटक आणि भारताच्या जवळपासच्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळतो.   शितोळें घराण्याचे मूळ पाहू ?  शितोळे मराठा मूळ सिद्धांतांशी देखील संबंधित आहे जे मराठा पौराणिक कथांचा निष्कर्ष काढतात आणि त्यांना 96 कुली सूर्यवंशी मराठा कुळ मानले जाते.    ते उदयपूरमधील सिसोदिया राजपूत शाखेतील वंशज असल्याचा दावा करतात ज्यांनी 15 व्या शतकात तत्कालीन पुणे प्रांतात स्थलांतर लष्करी परंपरेने आणि देशमुख आणि पाटील यांच्या पदांचा उपभोग घेतला आहे.  इतिहास  दख्खनच्या सुलतानांच्या काळात, म्हणजे शिवाजीपूर्व काळात , शितोळे हे पुण्याजवळील शंभर गावांचे प्रशासक होते. ते मराठा इतिहासातील मराठ्यांचे महसूल गोळा करण्याचे अधिकार होते. शितोळे हे छत्रपती शिवाजी भोसले आणि त्यांचे वंशज यांचे विश्वासू म्हणूनही काम करत होते.   संभाजी, छत्रपती राजाराम, छत्रपती शाहू वगैरे.  मराठा इतिहासातील मध्य भारतातील युद्धांमध्येही शितोळे सक्रिय होते ते पेशव्यांच्या विश्वासू होते.  शितोळे हे पेशवे माधवरावांच्या अधिपत्याखाली परगणा मेहुणबारे, खानदेशातील परगणा राज

झाशीची राणी १९ व्या शतकातील वैधव्य प्राप्त झालेली स्त्री असूनही त्या सौदामिनीने आत्मविश्र्वासाने, स्वकर्तृत्वाने, चातुर्याने, पराक्रमाने, स्वाभिमानासह, स्वराज्यासाठी इंग्रजांशी असामान्य असा लढा दिला

Image
 तरीही पुरुषप्रधान संस्कृतीमुळे आजही आधुनिक स्त्रीला पूर्णपणे स्वातंत्र्य मिळालेले दिसत नाही.  आपल्या पराक्रमाचा ठसा पूर्ण जगताच्या इतिहासावर उमटविला. त्यांच्या शौर्याने त्यांना ‘क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता’ म्हणून जनमानसात अढळ स्थान प्राप्त झाले आहे. आपण त्याची पार्श्वभूमी पाहूया त्याचा जन्म कोणत्याही राज घरण्यात झाला नव्हता. लक्ष्मीबाईंचे मूळ नाव मनिकर्णिका होते.  त्यांचे वडील हे *मोरोपंत तांबे* हे पुण्याच्या पेशव्यांच्या आश्रयाला नोकरीस असावेत . तांबे कुटुंब मूळचे सातारा जिल्ह्यातील धावडशी गावचे होते.   जन्म भागीरथी बाई यांच्या पोटी उत्तर प्रदेशातील काशी येथे झाला होता. त्यांचा विवाह झाशी संस्थानाचे राजे गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला. तेव्हा त्यांचे नाव बदलून लक्ष्मी असे ठेवण्यात आले. लग्नानंतर झाशीच्या प्रजाजनांत राणीबद्दल विशेष प्रेम निर्माण झाले. दरबाराचे कामकाज राणीने पाहणे गंगाधररावांस पसंत नसल्याने मिळालेल्या वेळेचा उपयोग लक्ष्मीबाईंनी स्वत्व जपण्यासाठी केला. त्यांनी आपला रोजचा व्यायाम, कसरत, घोडेस्वारी, तलवारबाजी नियमित सुरू ठेवली. गंगाधरराव नेवाळकर व लक्ष्मी

सरसेनापती संताजी घोरपडे

Image
🚩सरसेनापती संताजी म्हाळोजी  घोरपडे, (१६४५-१६९६)🚩 👉 ज्यांना ‘संताजी’ किंवा सरसेनापती ‘संताजी घोरपडे’ म्हणून ओळखले जाते, ते महान योद्ध्यांपैकी एक होते.  👉आणि राजारामच्या राजवटीत मराठा साम्राज्याचे प्रमुख सेनापती होते. 👉संताजी धनाजी  त्यांचे नाव धनाजी जाधव यांच्या नावाशी अविभाज्य बनले ज्यांच्यासोबत त्यांनी 1689 ते 1696 पर्यंत सतत मुघल सैन्याविरुद्ध मोहिमा केल्या. 👉ते गनिमी कावा (गुरिल्ला युद्ध) चे सर्वात अग्रगण्य प्रवर्तक मानले जातात.  👉पार्श्वभूमी:- संताजी हे ऐतिहासिक घोरपडे घराण्यातील होते जे भोसले कुळातील एक शाखा आहे. घोरपडे यांना मूळचे भोसले होते. नंत्तर एका शाखेस घोरपडे 'किताब मिळाला तेव्हा पासून घोरपडे आडनाव रुजू झाले.  त्यांचे जन्मवर्ष माहीत नाही, तथापि, ते साधारण १६६० असावे असा अंदाज इतिहास कांरानीं मांडला आहे. 👉 संभाजी महाराजांचे सेनापती म्हाळोजी घोरपडे यांच्या तीन मुलांपैकी ते जेष्ठ होते.  त्यांना बहिर्जी आणि मालोजी नावाचे दोन लहान भाऊ होते. म्हालोजी हा बाजी घोरपडे यांचा मुलगा होता, ज्याला शिवाजी महाराज यांनी ने मारले होते, कारण काही सूत्रांच्

यशवंत हो जयवंत हो मंत्र देणारे माणदेशातील सिद्धेश्वर कुरोली गाव चे संत व महाराष्ट्र सह परराज्यातील भक्तांचे श्रद्धास्थान सद्गुरु परमहंस यशवंत बाबा महाराज

Image
 काम नाही तर राम नाही. सद्गुरुयशवंत बाबा महाराष्ट्र सर्व परराज्यातील भक्तांचे  श्रद्धा स्थान  परमहंस सद्गुरु यशवंत बाबा महाराज सिद्धेश्वर कुरोली.

देशमुख

देशमुख हे मराठी आडनाव आहे. ♦'देशमुख' हे छत्रपति शिवाजीच्या काळाच्या आधीपासूनच्या काळातले, एक वरच्या दर्जाचे परंपरागत वतनदार असून वंशपरंपरेने आपली कामे सांभाळीत. ते त्यांच्या महाल किंवा परगणा नावाच्या महसुली विभागाचे मुख्य अधिकारी असत.अधिकार क्षेत्र वा परगण्याचे क्षेत्रफळाची व्याप्ती नुसार देशमुख हि पदवी वा देशमुखी हे वतन युरोपिअन घराणे-शाही तील 'ड्युक' चे समकक्ष आहे. ♦'देशमुख' पदवी वा 'देशमुखी' हे वतन कोणत्याही एका विशिष्ट धर्म वा जाती चे संदर्भात नसून ,इतिहासकालीन हिंदू व मुस्लिम राजांनी , हिंदू मधील मराठा, ब्राह्मण यासह इतर जाती तसेच, मुस्लिम व जैन धर्मातील कुटुंबाना ' देशमुखी' बहाल केल्याचे दिसून येते. ♦'देशमुखी' म्हणजे लष्करी,फौजदारी,महसुली व न्यायालयीन अधिकारी होत.गावाचे संरक्षण जसे पाटील करी,तसे परगण्याचे संरक्षण देशमुख करी.लढाईच्या प्रसंगी पाटील व देशमुख यांनी,अमूक-एवढे सैन्य सरकारास पुरवावे, असे करार असत. गावात वसाहत करणे,शेती व उद्योगधंदे सुरू करणे आणि मध्यवर्ती सत्तेला विशिष्ट सारा गोळा करून देणे, ही देशमुखांची प्रमुख कामे असत.

सिद्धनाथ यात्रा निमसोड 2021

Image
सलग दुसऱ्या वर्षी सिद्धनाथ सर्व नियमानुसार यात्रा  साध्या पद्धतीमध्ये होणार 

हिंदुस्थानवर मराठेशाहीची वचक निर्माण करणाऱ्या दिल्लिदिग्विजयविर महादजी महाराजांच्या पुण्य तिथी निमित्त विनम्र अभिवादन 🚩🚩(समाधी स्थळ व इतिहास...)

Image
पानिपतच्या अपयशानंतर उत्तरेत मराठा सत्तेची पोकळी भरून काढणारे वकील-ए-मुतलक, आमिर-उल-उमरा, आलिजाबहाद्दर महादजी शिंदे सरकार यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन 💐💐 #पाटीलबुवा  #द_ग्रेट_मराठा 👉महादजी शिंदे (सन .1730 - 12 फेब्रुवारी 1794) हे देखील महादजी सिंधिया हे मराठा राज्यकर्ते आणि मध्य भारतातील उज्जैनचे शासक राज्यकर्ते  होते.ते सिंधियाउर्फ शिंदे घराण्याचे संस्थापक राणोजी राव सिंधिया यांचे पाचवे आणि धाकटे पुत्र होते. 👉 महादजी शिंदे यांनी वयाच्या 10 व्या वर्षापासूनच युद्धांमध्ये सहभाग घेण्यास सुरुवात केली होती. 👉१७४० निजामाविरुद्धच्या लढाईत त्यांनी दत्ताजी,त्रिंबक किन्नड यांना साथ दिली होती. 👉१७४२ मध्ये बेळूरच्या लढाईत महादजी शिंदे यांनी भाग घेतला होता व या लढाईत मराठ्यांनी निझामाच्या सैन्याला परतावून लावले होते. 👉  १७४५ ते १७६१ दरम्यान जो मराठ्यांचा राज्य विस्तारातील सुवर्णकाळ मानला जातो त्या काळात महादजी शिंदे यांनी जवळपास ५० लढायांचे नेतृत्व केले होते. 👉मालव, राजपुताना, बुंदेलखंड, मारवाड व हिम्मत नगर ब्रिज, दोआब, रोहिलखंड, दिल्ली, कुंजपूर तसेच पा