वंशावळी(Family Tree) म्हणजे काय व ती कशी जुळवावी.*

*वंशावळी(Family Tree) म्हणजे काय व ती कशी जुळवावी.*
(वंशावळी#स्वतः वडील-आजोबा-पंजोबा-खापरपंजोबा-पन्तू-नातू-अन्तू-खातू-नातू)
-----------------------------------------------
आपण सर्वसाधारणपणे आपल्या पुर्वजांच्या वंशाची, कुळातील पूर्वजांच्या वंशावळी ही काही अपवादात्मक कारणांसाठीच जुळविण्याचा किंवा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. शाळा महाविद्यालयीन प्रवेशासाठी जातीचा दाखला काढण्यासाठी लागणा-या काही महत्वाच्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यामध्ये वंशावळी हा एक भाग आहे

परंतु हा वंशावळी जुळविण्याचा व शोधण्याचा मार्ग हा तात्पुरत्या कागदोपत्री तरतूदीसाठी सिमीत आहे. कारण जातीचा दाखला काढण्यासाठी केवळ अर्जदाराचे वडील व वडीलांचे वडील म्हणजे आजोबा इथपर्यंतच हा वंशावळीचा विषय मर्यादित होतो.
परंतु काही शहरात आजचा मुंबईस्थित तरूण वर्ग  व उत्साही चाकरमाणी  आपली वडीलोपार्जित मालकीची जागा, कुळाची जागा, वंशाची वंशावळी या पारंपरिक व महत्वाच्या गोष्टीचा शोध लावण्याचा व ते शोधून काढण्याचा प्रयत्न करत आहेत व बहुतेक लोकांना यात यशही आले आहे व येत आहे.

आपण आपल्या पुर्वजांच्या वंशाची *साधारणतः ९ पिढ्याच्या वंशाची वंशावळी* शोधू शकतो जुळवू शकतो. या सर्व प्रकारात महसुल  विभागाचा दस्तैवजांपैकी काही महत्वाचे दस्तैवज खालीलप्रमाणे-

१) *टिपनबुक नोंदवही-*
(जागेचे सर्व्हे, वर्णन नोंद व मुळ भोगवटाधारक सदर बुकात सापडतात. साधारण १८४० ते १८८० या कालावधीच्या नोंदी)

२) *सुडपत्रक-सुडाचा उतारा सन १८६४*-सुडाच्या मुळ उता-यास जमाबंदी पत्रक असेही म्हणतात.

३) *जंगलखर्डा नोंदवही पत्रक सन १८८६-* सदर नोंदवहीत आपल्या वंशातील ज्या व्यक्तीचा जन्म साधारणतः १८२० साली झाला होता त्यांचे व त्यांच्या वडिलांचे नाव म्हणजे ज्यांचा जन्म सन १७०० ते १७२० च्या आसपास झाला आहे त्या वंशातील मुळपुरुषाचे नाव नोंद असते. म्हणजे आपण ७ व ८ व ९ क्रमांकाची पुरुषाची वंशावळी या दस्तैवजावर नोंद असते

४) *बोटखत नोंदवही १८९५ व आकारफोड पत्रक १९५७*- या दस्तैवजावरून आपण साधारण ५ व ६ क्रमांकाच्या वंशावळीतील पुरुषाची वंशावळी जुळवू शकतो.

५) *फेरफार पत्रक नोंदवही व मेळाची फाईल,*- गावनमुना ६अ, तसेच गुणपत्रिका  या दस्तैवजावरून  वंशावळीतील ३ व ४ क्रमांकाच्या पुरुषाची वंशावळी जुळवू शकतो.

६) *विदयमान २०१८ चा ७/१२ उतारा* यावर आपले व आपल्या वडीलांचे नाव असते म्हणजे क्र.१ व २ क्रमांक  ची वंशावळी येथे जुळली जाते.

*यापैकी कोणते दस्तैवज कोठे अर्ज करावेत.*
१) टिपनबुक नोंदवही-भुमापन तथा भुमीअभिलेख विभाग तहसील
२) जंगलखर्डा नोंदवही पत्रक-तहसिल कार्यालय
3) बोटखत नोंदवही पत्रक-तहसिल कार्यालय
४) आकारफोड पत्रक-तलाठी/तहसील कार्यालय
५) मेळाची फाईल-तहसिल/तलाठी कार्यालय
६) फेरफार नोंदवही/गुणपत्रिका/गावनमुना ६अ, ७/१२ उतारा-तलाठी कार्यालय
७) मेळ साक्षीदार पुरावा-तहसिलदार/तलाठी कार्यालय/ 

वंशावळी(Family Tree) जुळणी करून *तहसिल क्षेत्रातील दुय्यम निबंधक तथा सक्षम महसुल प्रमाणक अधिकारी* मार्फत प्रमाणित करावी

 सदर प्रकरणातील टिपनबुक(सन १८४० ते सन १८८०), सुडाचा उतारा १८६४-सुडपत्रक, जंगलखर्डा नोंदवही १८८६ व बोटबुक नोंदवही-१८९५, ही मोडी लिपीमध्ये तहसिल कार्यालय/भुमापन तथा भुमीअभिलेख यांचे कार्यालयात उपलब्ध होते. त्याचे मराठीमध्ये *शासकीय मोडीलिपी तज्ञाकडुन प्रमाणीत*
हस्तांतर करून घ्यावे.

व सदर दस्तैवज हे अर्ज करून प्रत्येक दस्तैवज हा रुपये २/- ते जास्तीत जास्त रुपये ४०/-व पेक्षा कमी(प्रत्येक पृष्ठ)  किंमतीमध्ये उपलब्ध होतात.
-Forwarded

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...

पानिपत आणि रहिमतपूरकर माने