आधुनिक महाराष्ट्राचेशिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचाआज स्मृती दिन




👉आज २५ नोहेंबर
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार 
यशवंतराव चव्हाण
यांचा
आज स्मृती दिन
एक सुसंस्कृत ,पुरोगामी राजकारणी, थोर विचारवंत, आदर्श लोकप्रतिनिधी,मनस्वी लेखक, सचोटी, नेकी आणि निष्ठेचा वसा देणारे यशवंतराव चव्हाण म्हणजे महाराष्ट्राला पडलेले एक सुंदर स्वप्नंच होत..


देवराष्ट्रे पूर्वीचा (सातारा जिल्हा) साध्या चा सांगली येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म झाला.
यांना राजकीय पार्श्वभूमी नसताना सुद्धा. शून्यातून विश्व निर्माण कस करतात हे यशवंत राव चव्हाण साहेबाच्या कारकिर्दी वरुन लक्षात येते.

प्राथमिक शिक्षण कराड येथे घेऊन उच्च शिक्षण कोल्हापूर व पुणे येथे घेतले आणि बी.ए., एल्‌एल्‌. बी. पदवी घेऊन चागल्या मार्कांनी पास झाले.


१९३० साली महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग चळवळ सुरू केली,तेव्हा यशवंतराव चव्हाणांनी त्याठिकाणी सहभाग घेत देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी प्रयत्न चालू केले

👉 १९३२ साली त्यांना पहिला तुरुंगवास घडला.

 देशाला स्वातंत्र्य मिळवून देत असताना चळवळीच्या माध्यमातून यशवंतराव कार्य करत असताना त्यांना पहिल्यांदा तुरुंगवासाची शिक्षा झाली.

 या कारावासात मार्क्सवादाशी आणि मानवेंद्रनाथ रॉय यांच्या विचारांशी त्यांचा परिचय झाला आणि त्यामुळे काँग्रेसमधील रॉयपंथीय गटाशी त्यांचे संबंध वाढले. या संबंधातून पुढे राजकीय प्रवास सुरू झाला.

 दुसरे महायुद्ध सुरू होण्याच्या वेळी रॉय यांनी घेतलेली युद्धविषयक भूमिका त्यांना अमान्य झाली व ते काँग्रेसमध्येच राहिले.

व १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात ते सामील झाले.

 सातारा जिल्ह्यातील भूमिगत चळवळीत त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. यातून पुढे प्रतिसरकार स्थापन झाले, पण त्यावेळी ते तुरुंगात होते त्यामुळे प्रतिसरकारशी त्यांचा तसा  संबंध कमी झाला असावा.

 १९४६ साली तेव्हाच्या मुंबई प्रांताच्या विधिमंडळाची निवडणूक होऊन यशवंतराव दक्षिण सातारा मतदार संघातून निवडले गेले आणि पहिल्यांदा ते संसदीय चिटणीस झाले.

 १९४८ साली त्यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या चिटणीसपदावर नियुक्ती झाली. पुढे १९५२ च्या निवडणुकीनंतर ते स्थानिक स्वराज्य व पुरवठा खात्याचे मंत्री होते.

 द्वैभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी १ नोव्हेंबर १९५६ रोजी सूत्रे हाती घेतली.

👉१९६० साली महाराष्ट्र राज्य स्थापन झाले व त्याचे ते पहिले मुख्यमंत्री निवडले गेले.


त्यांनी १ मे १९५८ रोजी धुम्या गडावर जाऊन तिथे पांडुरंगाची मूर्ती स्थापन केली व व राष्ट्रसंत भगवानबाबांच्या च्या समोर धूम्या गडास भगवानगड नाव दिले. ते प्रागतिक विचारसरणीचे होते. उत्कृष्ट संसदपटू, उदारमतवादी व अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती आहे. ते रसिक व साहित्यिकही होते. “युगांतर”, “सह्याद्रीचे वारे”, “कृष्णाकाठ”, “ऋणानुबंध” ही त्यांची साहित्यसंपदा आहे.

👉 पानिपत विषयी यशवंतराव चव्हाण साहेबाचा भावनिक प्रसंग :-

 "यशवंतराव चव्हाण तेव्हा भारताचे संरक्षणमंत्री होते, त्यांच्या मोटारींचा ताफा पंजाबातून दिल्लीकडे येत होता. रस्त्यात एका मोठ्या गावात "पानिपत' नावाचा नामफलक त्यांना दिसला. आपला प्रवास खंडित करून जेथे पानिपताचा समरप्रसंग घडला, त्या "काला आम' नावाच्या ठिकाणी ते गेले. तेथे मराठी वीरांच्या काळ्या ओबडधोबड दगडी समाधीच्या समोरच त्यांनी शेतात अचानक बसकण मारली. त्या रानची पांढुरकी माती त्यांनी आपल्या दोन्ही मुठींमध्ये धरली व कविहृदयाचे यशवंतराव हमसून हमसून रडू लागले. त्यांची ही अवस्था पाहून सोबतचा स्टाफ आणि लष्करी अधिकारी यांची तारांबळ उडाली. भावनेचा पहिला पूर ओसरल्यावर आपल्या ओघळत्या अश्रूंना कसाबसा बांध घालत यशवंतराव उपस्थितांना सांगू लागले, ""दोस्तहो, हीच ती पवित्र माती. राष्ट्रसंकट उद्‌भवल्यावर त्याविरोधात लढावे कसे, शत्रूला भिडावे कसे, याचा धडाच लाख मराठा वीरांनी पानिपताच्या या परिसरात गिरवला आहे....


👉यशवंतराव चव्हाण हे समतोल विकासाचे पुरस्कर्ते होते. म्हणून विकास योजना आखताना अविकसित विभागांचा आधी विचार केला पाहिजे.

ग्रामीण औद्योगिकीकरणाबाबत ते म्हणतात की, ग्रामीण भागात उद्योग सुरु करून शेती आणि उद्योगांची सांगड घातली जावी. शहरी व ग्रामीण अर्थव्यवस्थेची सांगड घालून शहरांकडे धाव घेणारा श्रमिकांचा लोंढा थोपविता येईल. औद्योगिक विकासासाठी नियोजन महत्त्वपूर्ण आहे. देशाचा संतुलित आर्थिक विकास व्हावा यासाठी ते औद्योगिक विकासाच्या मास्टर प्लानची कल्पना मांडतात. अविकसित भागात विकासासाठी त्यांनी संयुक्त औद्योगिक क्षेत्राची कल्पना मांडली. याशिवाय, राष्ट्राच्या आर्थिक विकासासाठी ते सहकाराचा पुरस्कार करतात. भारतासारख्या कृषिप्रधान देशाच्या विकासासाठी सहकारी तत्वे फार उपयुक्त ठरतात

 👉यशवंतराव चव्हाण यांनी सुरू केलेल्या संस्था व उपक्रम :-

पंचायत राज या त्रिस्तरीय (जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत) व्यवस्थेची सुरुवात. (प्रशासकीय विकास)

- राज्य पंचवार्षिक योजनांचा प्रारंभ. (आर्थिक विकास)

- कोल्हापूर प्रकारच्या बंधाऱ्यांचा प्रचार. कोयना व उजनी ह्या प्रमुख प्रकल्पांच्या उभारणीला गती. (मूलभूत सोयी सुविधांचा विकास)

- १८ सहकारी साखर कारखान्यांची स्थापना. (सहकाराला चालना)

- मराठवाडा (आत्ताचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ) व कोल्हापूर विद्यापीठ यांची (शिवाजी विद्यापीठाची) स्थापना. (शैक्षणिक विकास)

- राज्यातील कृषी विद्यापीठांच्या स्थापनेतही संकल्पनात्मक सहभाग. (कृषिविकास)

- मराठी साहित्य संस्कृती महामंडळ व विश्र्वकोश मंडळाची स्थापना. (सांस्कृतिक विकास)

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींपासून ते ना.धों. महानोरांपर्यंतच्या विचारवंतांशी व साहित्यिकांशी त्यांचे चांगले संबंध होते. कृष्णाकाठ, ऋणानुबंध आदी पुस्तकांतून त्यांच्यातील लेखकही दिसतो.






👉युगपुरुष मा.ना.यशवंतराव चव्हाण साहेबांचा जीवनपट:-

१२ मार्च १९१३ - सातारा जिल्ह्यातील देवराष्ट्रे(सध्
या सांगली)
या गावी जन्म.

१९१८ - वडील बळवंतराव चव्हाण यांचे
प्लेगच्या साथीत निधन.

१९१९ - कराड येथे शिक्षणासाठी दाखल.

१९२७ - कराडच्या टिळक हायस्कूलमध्ये प्रवेश.

१९२९ - भगतसिंह यांनी असेम्ब्लीत बॉम
फेकला या घटनेमुळे राजकीय जीवनाकडे आकृष्ट आणि स्वातंत्र्य लढ्यातआयुष्य वाहून टाकण्याचा निर्धार.

१९३० - असहकाराच्या चळवळीत सहभाग १८ महिन्यासाठी
तुरुंगवास.

१९३४ - कराड मधून Matric उत्तीर्ण. कोल्हापूरच्या राजाराम
महाविद्यालयात प्रवेश.

१९३५ - महाराष्ट्रातील समाजवादी पक्षाचे संस्थापकीय सदस्य.

१९३८ - इतिहास व राजकारण हा विषय घेऊन मुंबई
विद्यापीठाची बी.ए.ची पदवी परीक्षा उत्तीर्ण
पुण्याच्या law कौलेज मध्ये प्रवेश.

१९४० - सातारा जिल्हा कॉंग्रेस कमिटी चे अध्यक्ष.

१९४१ - वकिलीस प्रारंभ.

२ जून १९४२ - कराड येथे वेणूताई यांच्याशी विवाहबद्ध(फलटणच्या
मोरे घराण्याची कन्या).

९ ऑगस्ट १९४२ - छोडो भारत चळवळीत अटक.

१९४६ - सातारा मतदारसंघातून विधानसभेवर निवड.

१४ एप्रिल १९४६ -
गृहखात्याच्या पार्लामेंटरी सेक्रेटरी म्हणून निवड.

१९४८ - महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस.

१९५२ - कराड मतदारसंघातून विधानसभेवर निवड.नागरी व पुरवठा
मंत्री म्हणून निवड.

१९५४ - मुंबई राज्य पंचायत संघाची स्थापना.

१ नोहेंबर १९५६ - द्विभाषिक मुंबई राज्याच्या बाजूने कौल आणि मुंबई राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

१ मे १९६० - संयुक्त महाराष्ट्राचा मंगलकलश घेऊन महाराष्ट्रात दाखल आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना

१५ मे १९६० - संयुक्त महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

१ मे १९६२ - पंचायत योजनेचा प्रारंभ केला.

१९६२ - सातारा येथे भरलेल्या अखिल भारतीय
मराठी साहित्य संमेलनाचे उट्घाटक.

२२ नोहेंबर १९६२ - पं.नेहरूंच्या आग्रहखातर भारताचे
संरक्षणमंत्री म्हणून निवड.

१९६३ - नाशिक जिल्ह्यातून लोकसभेवर निवड.

१९६३ - संरक्षणमंत्री अमेरिका व रशियाला भेट.

१८ ऑगस्ट १९६५ - आई विठामाता यांचे मुंबईत निधन.

जानेवारी १९६६ - ताश्कंद करारात पंतप्रधान लाल बहादूर
शास्त्री यांच्या सोबत उपस्थित, शात्रीजींचे निधन.

१९६५ - शात्रीजींच्या निधनानंतर भारताचे पंतप्रधान
होण्याची संधी सोडली.

१४ नोहेंबर १९६६ - केंद्रीय गृहमंत्री म्हणून नियुक्ती.

२६ जून १९७० - केंद्रीय अर्थमंत्री म्हणून निवड.

१९७४ - परराष्ट्रमंत्री म्हणून निवड.

१९७५ - अमेरिका,क्युबा,इजिप्त,पेरू,फ्रांस इ देशांचे दौरे.

१९७७ - लोकसभेत विरोधीपक्ष नेते म्हणून निवड.
(स्वातंत्र्या नंतर भारताचे प्रथम विरोधीपक्ष नेते)

१९७९ - श्री.चरणसिंग यांच्या संयुक्त मंत्री मंडळात
भारताचे उपपंतप्रधान म्हणून निवड.

१९८२ - इंदिरा कॉंग्रेस मध्ये प्रवेश.

१९८२ - आठव्या अर्थ आयोगाचे अध्यक्ष.

१ जून १९८३ - पत्नी सौ. वेणूताईनचे निधन.

७ फेब्रुवारी १९८४ - कृष्णाकाठ आत्मचरित्र प्रकाशित.

२५ नोहेंबर १९८४ - या महान युगपुरुषाचे सायंकाळी ७.४५
ला १,कोर्स रोड दिल्ली येथे निधन(युगान्त).

२७ नोहेंबर १९८४ - दुपारी ३.४० वाजता कराड येथे कृष्णा-
कोयनेच्या प्रीतिसंगमावर लाखोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार.
( यशवंत युगाचा अंत).

👉 यशवंतराव चव्हाण यांनी लिहिलेली पुस्तके(साहित्यसंपदा) :-

आपले नवे मुंबई राज्य (इ.स.१९५७)
ॠणानुबंध (ललित लेख) (१९७५)
कृष्णाकाठ (आत्मचरित्र १ला खंड) (१९८४) हे पुस्तक बोलके पुस्तक या स्वरूपातही आहे.
भूमिका (१९७९)
महाराष्ट्र राज्य निर्मिती विधेयक (१९६०)
विदेश दर्शन
सह्याद्रीचे वारे (१९६२) ‌- भाषण संग्रह
युगांतर (१९७०) स्‍वातंत्र्यपूर्व व स्‍वातंत्र्योत्‍तर हिंदुस्‍थानच्‍या प्रश्‍नांची चर्चा

👉 यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनावरील चित्रपट:-

यशवंतराव चव्हाण - बखर एका वादळाची. (मार्च २०१४) (दिग्दर्शक जब्बार पटेल)

👉 यशवंतराव चव्हाण यांच्या नावे असणाऱ्या संस्था व पुतळे :-

यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड (पुणे)
यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, मुंबई रिक्लेमेशन, मुंबई
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, जगन्‍नाथ भोसले रोड, मुंबई
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक
यशवंतराव चव्हाण मेमोरियल (म्युनिसिपल) हॉस्पिटल (YCM), पिंपरी(पुणे)
यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे
यशवंतराव चव्हाणांचे पुतळे - कऱ्हाड ३ (यशवंतराव चव्हाण स्मृती सदन समोर, यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स आणि सह्याद्री सहकारी साखर कारखाना, यशवंतनगर प्रांगणामध्ये), पिंपरी(पुणे), फलटण, सातारा, लातूर (महापालिका प्रवेशद्वार), संसद भवनाच्या लॉबीत(नवी दिल्ली)


  *यशवंतरावजी चव्हाण यांच्या  स्मृतीस विनम्र अभिवादन......*
💐💐💐💐💐💐💐💐💐

लेखन &माहिती संकलन
नितीन घाडगे 

.सदर्भ :-

धनाजी मासाळ आणि प्रा. विकास येलमार (मार्च २०१३). "यशवंतराव चव्हाण यांचे सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान". संशोधक. १: ३८.
 "यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई यशवंतराव चव्हाण समग्र संदर्भ साहित्य".
२. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई प्रस्तुत यशवंतराव चव्हाण समग्र संदर्भ साहित्य.

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४