एकादशींच्या नावावरून त्याचे वेगळेपण आणि महत्त्व विषद होत असते. कार्तिक महिन्याच्या वद्य पक्षातील उत्पत्ती एकादशीचे महत्त्व, मान्यता, पूजाविधी जाणून घेऊया...

👉एकादशी व्रत सर्वाधिक महत्त्वाचे मानले गेले आहे. कार्तिक महिन्याच्या वद्य पक्षातील एकादशीला उत्पत्ती एकादशी म्हणून संबोधली जाते.

👉 कार्तिक महिन्याच्या वद्य पक्षातील उत्पत्ती एकादशीचे महत्त्व, मान्यता, पूजाविधी​​ जाणून घेऊया...
धार्मिक शास्त्रांनुसार, सर्व व्रतांमध्ये एकादशी व्रत सर्वाधिक महत्त्वाचे मानले गेले आहे. एकादशी एक देवीचे स्वरुप मानले गेले असून, कार्तिक वद्य पक्षातील एकादशीला ती प्रकट झाली होती, असे मानले जाते.

👉 यामुळे कार्तिक महिन्याच्या वद्य पक्षातील एकादशीला उत्पत्ती एकादशी म्हणून संबोधली जाते. कार्तिक महिन्याच्या शुद्ध एकादशीला प्रबोधिनी एकादशी म्हटले जाते. या दिवशी चातुर्मासाची सांगता होते. प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध पक्षात आणि वद्य पक्षात एकादशी येते. या प्रत्येक एकादशीचे महत्त्व आणि मान्यता अगदी वेगवेगळ्या आहेत. तसेच या प्रत्येक एकादशीची नावेही अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या एकादशींच्या नावावरून त्याचे वेगळेपण आणि महत्त्व विषद होत असते. कार्तिक महिन्याच्या वद्य पक्षातील उत्पत्ती एकादशीचे महत्त्व, मान्यता, पूजाविधी जाणून घेऊया...

👉उत्पत्ती एकादशी व्रताचे महत्व
उत्पत्ती एकादशी व्रत हे पूर्ण नियम, श्रद्धा व विश्वासाने केले जाते, या व्रताच्या प्रभावामुळे मोक्ष प्राप्ती होते.

👉 अश्वमेध यज्ञ, कठोर तप, तीर्थस्नान व दान या सर्वांपासून मिळणाऱ्या फळाहून अधिक पुण्य या व्रताने मिळते, अशी मान्यता आहे.

 एकादशी ही एक देवी असून, तिचा अवतार भगवान श्रीविष्णूंमुळे झाला होता. एकादशी देवी कार्तिक वद्य एकादशी दिवशी प्रकट झाली होती. यामुळे कार्तिक वद्य एकादशीचे नाव उत्पत्ती एकादशी असे पडले. या दिवसापासून एकादशीचे व्रत सुरु झाले, असे सांगितले जाते.

वर्षभरात येणाऱ्या सर्व एकादशी दिनी भगवान श्रीविष्णूंचे पूजन केले जाते. पद्मपुराणानुसार, उत्पत्ती एकादशीचे व्रताचरण करणाऱ्यांना पापमुक्ती मिळते, असे सांगितले जाते.

उत्पत्ती एकादशी मुहूर्त
उत्पत्ती एकादशी : मंगळवार, ३० नोव्हेंबर २०२१.

- कार्तिक वद्य एकादशी प्रारंभ : मंगळवार, ३० नोव्हेंबर २०२१ रोजी पहाटे ०४ वाजून १३ मिनिटे.

- कार्तिक वद्य एकादशी समाप्ती : बुधवार, १ डिसेंबर २०२१ रोजी रात्रौ ०२ वाजून १३ मिनिटे.


Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४