हिंदुस्थानवर मराठेशाहीची वचक निर्माण करणाऱ्या दिल्लिदिग्विजयविर महादजी महाराजांच्या पुण्य तिथी निमित्त विनम्र अभिवादन 🚩🚩(समाधी स्थळ व इतिहास...)

पानिपतच्या अपयशानंतर उत्तरेत मराठा सत्तेची पोकळी भरून काढणारे वकील-ए-मुतलक, आमिर-उल-उमरा, आलिजाबहाद्दर महादजी शिंदे सरकार यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन 💐💐

#पाटीलबुवा 
#द_ग्रेट_मराठा

👉महादजी शिंदे (सन .1730 - 12 फेब्रुवारी 1794) हे देखील महादजी सिंधिया हे मराठा राज्यकर्ते आणि मध्य भारतातील उज्जैनचे शासक राज्यकर्ते  होते.ते सिंधियाउर्फ शिंदे घराण्याचे संस्थापक राणोजी राव सिंधिया यांचे पाचवे आणि धाकटे पुत्र होते.


👉 महादजी शिंदे यांनी वयाच्या 10 व्या वर्षापासूनच युद्धांमध्ये सहभाग घेण्यास सुरुवात केली होती.




👉१७४० निजामाविरुद्धच्या लढाईत त्यांनी दत्ताजी,त्रिंबक किन्नड यांना साथ दिली होती.


👉१७४२ मध्ये बेळूरच्या लढाईत महादजी शिंदे यांनी भाग घेतला होता व या लढाईत मराठ्यांनी निझामाच्या सैन्याला परतावून लावले होते.

👉  १७४५ ते १७६१ दरम्यान जो मराठ्यांचा राज्य विस्तारातील सुवर्णकाळ मानला जातो त्या काळात महादजी शिंदे यांनी जवळपास ५० लढायांचे नेतृत्व केले होते.


👉मालव, राजपुताना, बुंदेलखंड, मारवाड व हिम्मत नगर ब्रिज, दोआब, रोहिलखंड, दिल्ली, कुंजपूर तसेच पानिपतच्या तिसऱ्या लढाईत हिरीरीने सहभाग घेतला होता.


 👉महादजींच्या महत्त्वाच्या लढाया म्हणजे चंद्रावती गंज १७४६ फतेहाबाद १७४६, बडी साद्री.

👉मल्हाराव होळकरांच्या साथीने शिंदे यांनी अनेक राजपूत संस्थाने मराठा साम्राज्याखाली आणली.

👉 रतन गढ, लालगढ, बिकानेर, लासवारी, लाखमगढ, कुंभेर, डीग ही मराठा साम्राज्याला जोडली गेली.

👉तसेच जोधपूर व जयपूर ह्या मोठ्या राजपूत राजांनी मराठा वर्चस्व मान्य करून टाकले.


👉मथुरा हे मुघल सत्तेखाली होते ते मराठा अखत्यारीत आणून त्यांनी तेथील काही हिंदू मंदिरांचा जीर्णोद्धार केला.

👉शिंद्यांचा अधिपत्याखाली मथुरेला संस्कृत शिक्षण केंद्र तयार झाले.

👉जानेवारी १७५८ मध्ये महादजी यांनी ग्वाल्हेर येथे शिंद्यांचे राज्य बनवले.

    👉   जयाप्पा शिंदे जे शिंदे घराण्याचे प्रमुख होते ते २५ जुलै १७५५ रोजी राजस्थानमधील नागौर येथील लढाईत मारले गेले, त्यानंतर दत्ताजी शिंदे व जनकोजी शिंदे यांच्याकडे शिंदे घराण्याची सूत्रे आली.


मराठ्यांच्या वाढत्या लष्करी वर्चस्वाला इस्लामी जिहादाचे उत्तर म्हणून लवकरच उत्तर भारतात अब्दाली विरुद्ध मराठे असा मोठा सामना झाला.

 बुरांडी घाटावरील लढाईत दत्ताजी शिंदेची नजीबाकडून क्रूरपणे हत्या झाली.परंतु त्यांच एक वाक्य इतिहासात अजरामर झाला आहे. बचेंगे तो और भी लढेंगे.

 शिंद्यांनी अब्दालिवीरुद्धच्या पानिपतच्या तिसऱ्या लढाईत सहभाग घेतला होता.

या लढाईत जनकोजी शिंदे मारले गेले, तसेच महादजी देखील लढता लढता घायाळ झाले होते. या लढाईत त्यांचा पाय दुखावला तो पुढील जन्मभर तसाच राहिला पानिपतच्या लढाईनंतर साहजिकच शिंदे घराण्याची सूत्रे महादजींकडे आली.

👉मराठे-अब्दाली युद्धातील पराभवानंतर मराठा साम्राज्याचे विकेंद्रीकरण झाले व शिंदे हे स्वतंत्र मराठा संस्थानिक बनले व ग्वाल्हेर ही शिंद्यांची राजधानी बनली. 

🚩महादजी शिंदे
👉राजवट
18 जानेवारी 1768 - 12 फेब्रुवारी 1794
👉राज्याभिषेक
१८ जानेवारी १७६८
👉पूर्ववर्ती
मानाजीराव शिंदे
👉उत्तराधिकारी
  दौलतराव शिंदे
👉जन्म:-3डिसेंबर 1730
👉 मृत्यू :-१२ फेब्रुवारी १७९४ (वय ६४)
 शिंदे छत्री समाधीस्थळ वानवडी, पुणे, मराठा साम्राज्य सध्याचा महाराष्ट्र, भारत.
9 बायका
1अन्नपूर्णाबाई (बीडच्या निंबाळकर घराण्यातील)
2भवानीबाई (घाटगे कुटुंबातील)
3पार्वतीबाई (नरसिंग घाटगे यांची बहीण)
4भवानीबाई (संगमनेरच्या म्हस्के-देशमुख घराण्यातील)
5गंगाबाई (पालवेकर घराण्यातील)
6राधाबाई (पद्मसिंह राऊल कुटुंबातील)
7भागीरथीबाई (करडेकर कुटुंबातील)
8यमुनाबाई (रामलिंग राऊळ कुटुंबातील)
9लक्ष्मीबाई (तुळजापूर, उस्मानाबाद येथील भोपे-कदम कुटुंबातील)
दौलतराव शिंदे (नातू)
👉वडील
राणोजीराव शिंदे

👉यांचे मूळ घराणे

👉सातारा जिल्ह्यातील कन्हेरखेड (तालुका कोरेगाव )या गावचे.



राणोजी व जया आप्पा यांच्या माळव्यातील व उत्तरेकडील इतर मोहीमातून महादजींना लष्करी शिक्षण मिळाले. प्रथम तळेगाव ,उमरीच्या निजामावर लढाईत पराक्रम करून नाव मिळवले.

👉दरबारी राजकारण करण्यापेक्षा त्यांचा जोर युद्ध गाजवण्यावरच होता. त्यांनी अनेक लढाया जिंकल्या आणि आपले कर्तृत्व सिद्ध केले.महादजी शिंदे यांनी पूर्ण उत्तर भारतच त्यांनी काबिज केला.


👉पानिपतच्या लढाईतील विनाशानंतर महत्त्वाचे होते की मराठ्यांचे उत्तर भारतावरील वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करणे, १७७० मध्ये महादजी शिंदे यांनी भरतपूरच्या जाट राजा नवल सिंग याचा पराभव केला व मराठ्यांचे वर्चस्व पुन्हा प्रस्थापित झाले.

👉 १७७७ मध्ये पेशव्यांचे कोल्हापूर संस्थानाशी खटके उडाले होते यात महादजीने निर्णायक कामगिरी केली.





👉1761 मध्ये पानिपतच्या तिसऱ्या लढाईनंतर उत्तर भारतात मराठा सत्तेचे पुनरुत्थान करण्यात महादजीची भूमिका होती आणि ते मराठा साम्राज्याचे नेते पेशव्याचे विश्वासू लेफ्टनंट बनले.

👉माधवराव पहिला आणि नाना फडणवीस यांच्यासोबत ते मराठा पुनरुत्थानाच्या तीन स्तंभांपैकी एक होते.

👉त्याच्या कारकिर्दीत, ग्वाल्हेर हे मराठा साम्राज्यातील आघाडीचे राज्य बनले आणि भारतातील एक प्रमुख लष्करी शक्ती बनले.

👉1771 मध्ये शाह आलम II सोबत दिल्लीला गेल्यानंतर, त्याने दिल्लीत मुघलांचा पुनर्स्थापना केला आणि वकील-उल-मुतलक (साम्राज्याचा रीजेंट) बनला'. महादजी शिंदे यांचे प्रमुख सल्लागार सर्व शेणवी होते. त्यात मथुरेतील जाटांची सत्ता नष्ट केली आणि 1772-73 दरम्यान रोहिलखंडमधील पश्तून रोहिल्ल्यांची सत्ता नष्ट केली आणि नजीबाबाद ताब्यात घेतला.


👉 पहिल्या इंग्रज-मराठा युद्धात त्यांची भूमिका मराठ्यांच्या बाजूने सर्वात मोठी होती कारण त्यांनी वडगावच्या लढाईत इंग्रजांचा पराभव केला ज्यामुळे वडगावचा तह झाला आणि नंतर पुन्हा मध्य भारतात, एकहाती, ज्याचा परिणाम हा तह झाला. 1782 मध्ये सालबाई, जिथे त्यांनी पेशवे आणि ब्रिटिश यांच्यात मध्यस्थी केली.



👉1782 मध्ये, महादजी शिंदे यांनी, शिखांकडून परत मिळवण्यासाठी लाहोरवर हल्ला करणाऱ्या तैमूर शाह दुर्राणीशी लढा दिला आणि त्याचा पराभव केला.

👉 महादाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मराठा सैन्याने त्यांच्या अफगाण सैन्याचा सामना केला आणि झपाट्याने पराभूत केले आणि नंतर त्यांचा पराभव केला.

 अफगाणांचा पराभव केल्यानंतर, महादजी शिंदे आणि मराठ्यांनी लाहोरमध्ये साठवलेल्या सोमनाथ मंदिरातून घेतलेले तीन चांदीचे दरवाजे यशस्वीरित्या परत आणले. त्यांनी त्यांना सोमनाथला परत आणले पण गुजरातच्या पुजाऱ्यांनी त्यांना स्वीकारण्यास आणि सोमनाथ मंदिरात परत ठेवण्यास नकार दिला म्हणून त्यांनी ठरवले की हे चांदीचे दरवाजे त्याऐवजी उज्जैनच्या मंदिरात ठेवावेत. आज ते मध्य प्रदेशातील महाकालेश्वर ज्योतिर्लिंग आणि उज्जैनचे गोपाल मंदिर या दोन मंदिरांमध्ये पाहता येतात.


 👉1787 मध्ये, महादजीनि राजपुतानावर स्वारी करण्याचा प्रयत्न केला परंतु लालसोट येथे राजपूत सैन्याने त्याला परतवून लावले. 1790 मध्ये पाटण आणि मेर्टाच्या युद्धात त्याने जोधपूर आणि जयपूरच्या राजपूत राज्यांचा यशस्वी पराभव केला.

👉1707 मध्ये औरंगजेबच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्याला उतरती कळा लागली होती. या काळात अनेक मुघल बादशाह झाले पण त्यांचा प्रभाव कमीकमी होत गेला. इतका कमी झाला की शाह आलम द्वितीय याला इंग्रजांनी अलाहाबादेत नजरकैदेत ठेवले.


सहा वर्षं इंग्रजांकडे राहिल्यावर 1772 मध्ये महादजींनी त्याला सोडवून आणले आणि पुन्हा दिल्लीच्या तख्तावर बसवले. त्यानंतर मुघल बादशाह हा केवळ नामधारी बादशाह राहिला. त्याच्या वतीने सर्व कारभार महादजी शिंदेच करत.

👉औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्याचा दरारा पूर्वीसारखा राहिला नव्हता.


👉महादजी शिंदे सर्व कारभार ग्वाल्हेरमधून पाहत असत. शाह आलम द्वितीयला महादजी शिंदेंचा पाठिंबा असला तरी त्याच्याविरोधात कटकारस्थान करणाऱ्यांची कमी नव्हती.




1788 मध्ये गुलाम कादिर या रोहिला सरदारासोबत मिळून महमूद शाह बहादूरने शाह आलमला हटवले आणि स्वतःलाच दिल्लीचा बादशाह घोषित केले.


👉महादजी शिंदेना कळताच त्यांनी दिल्ली गाठले. रोहिल्यांचे बंड मोडून काढले आणि पुन्हा शाह आलमला दिल्लीच्या तख्तावर बसवले.

👉 तेव्हापासून मराठा साम्राज्याला आव्हान देणारा भारतात कुणीच उरला नाही.


👉महादजी शिंदेंना 'वकील उल मुतलक' म्हणजेच बादशाहचे कारभारी ही पदवी देण्यात आली होती, त्यामुळे महादजी शिंदे हे त्यावेळचे भारतातील सर्वांत मोठ्या सरदारांपैकी एक म्हणून नावारूपाला आले.

👉उत्तरेत महादजींचा दबदबा होता पण त्यांना थेट आव्हान न देता स्वतःचे हित साधणाऱ्यांची देखील काही कमी नव्हती. अशा संस्थानिकांपैकी एक होता हैदराबादचा निजाम अली खान असफ जाह द्वितीय.

दक्षिणेत मुघलांच्या वतीने निजाम कारभार पाहत असे. निजामाचा प्रदेश मराठ्यांच्या प्रदेशाला लागून होता.

राज्यावर आक्रमण करू नये म्हणून मांडलिकाने उत्पन्नाचा एक चतुर्थांश भाग देणे बंधनकारक होते. त्याला चौथाई म्हटले जात असे.

👉बाजीराव पेशव्यांच्या काळापासून ते माधवराव पेशव्यांच्या निधनापर्यंत निजामाने कुरबूर न करता मराठ्यांना चौथाई दिली


👉1772 मध्ये माधवरावांचे निधन झाले. त्यानंतर मराठा साम्राज्यात अनेक स्थित्यंतरं झाली. मराठ्यांच्या अंतर्गत दुफळीचा आणि संघर्षाचा फायदा उचलण्याचा निजामाने प्रयत्न केला. त्यामुळेच 1774 ते 1782 या काळात निजामाने चौथाईच दिली नाही.

1782 मध्ये संधी झाली. तेव्हा काही वर्षं तणाव निवळलेला दिसला पण चौथाई देण्याचा विषय निजामाने पूर्णतः टाळला होता. मराठ्यांना दूर ठेवण्यासाठी निजाम इंग्रजांच्या जवळ जाऊ लागला होता.

👉महादजी शिंदे उत्तरेतून पुण्याला 1792 मध्ये आले.


👉 अनेक वर्षांनंतर ते पुण्यात आले होते. महादजी शिंदे आणि त्यांच्या फौजा पुण्यात दाखल झाल्यानंतर नाना फडणवीसांचा आत्मविश्वास वाढला.

👉निजामांकडून चौथाई वसूल करण्यासाठी पुन्हा जोर लावला.

महादजी शिंदेंची ताकद निजाम ओळखून होता. त्याने एक दोन वर्षं टाळाटाळ केली. तोपर्यंत ही रक्कम तीन कोटी रुपयांच्या वर गेली.

याच बरोबर बीड जिल्ह्याचा भागसुद्धा निजामाने मराठ्यांच्या हवाली करावा अशी मागणी नाना फडणवीसांनी केली. या भागाचं उत्पन्न 33 लाख रुपये इतकं होतं.

एक शेवटचा प्रयत्न म्हणून निजामाने इंग्रजांची मदत मागितली. हा तंटा इंग्रजांनी सोडवावा असं त्याला वाटत होतं. पण इंग्रजांना मराठ्यांची नाराजी परवडणारी नव्हती.

गव्हर्नर जनरल सर जॉन शोअर यांनी निजामाची मागणी अमान्य केली आणि तटस्थ राहण्याची भूमिका निवडली.




गोविंदराव काळे यांचे फडणवीसांस लिहिलेले पत्र ( 01/07/1792 )

" अटक नदीचे अलीकडे दक्षिण समुद्र पावेतो हिंदूंचे स्थान - तुरुकस्थान नव्हे - हे आपली हद्द पांडवांपासून विक्रमादित्यापर्यंत होती, त्यामागे राज्यकर्ते नादान निघाले, यवनांचे प्राबल्य आले. त्यानंतर कैलासवासी शिवाजी महाराज शककर्ते व धर्म राखते निघाले. हल्ली श्रीमंताचे पुण्यप्रतापेकरून राजश्री पाटील बावांचे ( महादजी शिंदे यांचे ) बुद्धी व तलवारीच्या पराक्रमेकडून सर्व (राज्य ) घरास आले. अगर मुसलमान कोणी असे केले , तरी मोठे मोठे तवारीखनामे ( जाहिरातबाजी )आले असते . यवनाच्या जातीत तिळाइतकी चांगली गोष्ट जाल्यास गगनाबरोबर (तुलना ) करून शोभवावी ; आमचे हिंदूत गगना इतकी झाली असता उच्चार न करावा हे चाल आहे. ( महादजी शिंदेमुळे ) अलभ्य गोष्टी घडल्या. उग्याच दौलती पुसत घरास आल्या. यवनांचे मनांत की काफरशाही जाली हे बोलतात. लेकिन ज्यांनी ज्यांनी उत्तर हिंदुस्थानात शिरे उचलली त्यांची त्यांची मस्तके पाटीलबाबानी फोडली, या उपरी हे जमाव व या फौजा 'लाहोरच्या' मैदानात असाव्यात , त्यांचे मनसुबे दौडावे , वेत्यास पडावे , तमाशे पहावे..."


The most diplomatic personality of eighteenth century in India...

कण्हेरखेडच्या शिंदे पाटलांनी राजपूत, जाट, मुघल, रोहिल्ले, अफगान सर्वाना नमविले...


       

  👉इंग्रजांकडून मानाने त्यांना *द् ग्रेट मराठा* असे म्हटले होते.


निपतच्या तिसऱ्या लढाईनंतर त्यांनी मराठा साम्राज्याला पुन्हा उभारी मिळवून देण्याचे काम केले. पहिल्या इंग्रज मराठा युद्धामध्ये त्यांनी इंग्रजाचा काही लढायांमध्ये निर्णायक पराभव केला व इंग्रजांना तह करण्यास भाग पाडले. त्यामुळे त्यांच्या निधनापर्यंत मराठा साम्राज्याला स्थैर्य लाभले.

            


      १७७७ मध्ये नाना फडणीस यांनी कलकत्ता कौन्सिल बरोबर केलेला कराराचा भंग करत फ्रेंचाना पश्चिम किनारपट्टीवर बंदर उभारायची परवानगी दिली. ब्रिटिशांनी प्रत्युतरादाखल मुंबईवरून सैन्य पाठवले. जानेवारी मध्ये ३,९०० ब्रिटिश सैन्य कर्नल एगर्टनच्या नेतृत्वाखाली पुण्यावर चालून गेले. वाटेत रघुनाथरावांचे सैन्यही येऊन मिळाले. मराठ्यांचे सैन्य महादजी शिंदे व तुकोजी होळकर यांच्या नेतृत्वाखाली होते. ब्रिटीश सैन्याच्या वाटेत असंख्य अडथळे आणून त्यांना हैराण केले. त्यांनी तळेगाव येथे तळ टाकला. महादजींनी वाटेतील सर्व रस्त्यामधील गावातील कुरणे जाळली विहीरी विषमय करून टाकल्या, तसेच मुंबईकडून येणारी रसदही पूर्णपणे तोडून टाकली. ब्रिटीश सैन्याचे अन्नपाण्यावाचून हाल होउ लागले. ब्रिटीशांनी माघार घेण्याचे ठरवले .१२ जानेवारी १७७९ रोजी मध्यरात्री मराठ्यांनी ब्रिटीशांवर आक्रमण केले व सर्व बाबतीत पराभव करून वडगाव येथे शेवटी ब्रिटीश सैन्य महादजींना शरण आले.



      १६ जानेवारी रोजी वडगावचा तह झाला. ईस्ट इंडिया कंपनीने १७७३ पासून मिळवलेला सर्व प्रांत परत करण्यात यावा असे ठरले. यात साष्टी, ठाणे व जवळपास सर्व गुजरात पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आला. महादजीने ब्रिटिशांकडून युद्धाचा खर्च म्हणून ४१,००० रुपये देखील वसूल केले. रघुनाथरावाला मराठ्यांच्या हाती देण्यात यावे असे ठरले.त्यानुसार १८ जानेवारी १७७९ रोजी रघुनाथराव व त्यांच्या सैनिकांना पकडण्यात आले. तसेच महादजीने सखाराम बापूचा पराभव करून त्यांची सिंहगडाच्या तुरुंगात रवानगी केली.



          

👉महादजी शिंदेंचा मृत्यू


दिल्लीवर मराठा साम्राज्याचा भगवा मोठ्या डौलाने फडकवत ठेवणारे, दिल्ली दरबारी नगारा, पालखी, चौघडा, हत्ती घोडे, व मानाची वस्त्रे असणारे, तसेच दिल्लीत वकील-ए-मुतालिक या पदाची वस्त्रे, फर्मान व अधिकार असणाऱ्या महान सेनानी व मुसद्दी महादजी शिंदे यांचे 12 जानेवारी 1794 रोजी पुण्यातील वानवडी येथे देवाज्ञा झाल.


जर महादजी शिंदेंचा फेब्रुवारी 1794 मध्ये मृत्यू झाला नसता तर कदाचित खर्ड्याची लढाई झाली नसती. कारण ती होण्याचं काही कारण देखील नव्हतं.


ते असते तर निजामाला मराठ्यांची चौथाई द्यावीच लागली असती पण महादजींच्या मृत्यूनंतर निजामाने वाटाघाटीच बंद केल्या आणि चौथाई देणारच नाही असं ठणकावलं.


👉नाना फडणवीस यांना हा अपमान जिव्हारी लागला. त्यांनी निजामाकडून थकबाकी वसूल केली जाईल असं सांगितलं.


निजामाचा दिवाण (पंतप्रधान) अझीम उल उमरा (मुशीर-उल-मुल्क) याने निजामाला म्हटले की इतकी खंडणी देण्यापेक्षा हा पैसा आपण आपल्या फौजांवर खर्च करू. जिंकलो तर आपल्याला पैसाही द्यावा लागणार नाही आणि वर जी लूट होईल ती देखील आपली राही

डिसेंबर 1794 पासून या लढाईची तयारी सुरू झाली. निजामाचं सैन्य कोणत्या वाटेनी येणार याची माहिती मराठ्यांनी गुप्तहेरांच्या मदतीने काढली.

पुढे निजामचा खर्याया लढाईमध्ये पराभव केला


महादजी शिंदे छत्री फातिमा नगर वानवडी, पुणे ही एक ऐतिहासिक वास्तू आहे जी महादजी शिंदे यांनी मराठा साम्राज्याचे सरसेनापती म्हणून बांधलेली आहे. 18 व्या शतकातील लष्करी नेते महादजी शिंदे ज्यांनी 1760 ते 1780 पर्यंत पेशव्यांच्या अंतर्गत मराठा सैन्याचे सरसेनापती म्हणून काम केले.


1794 मध्ये, स्मारकाच्या संकुलात फक्त एक मंदिर होते, जे भगवान शिवाला समर्पित होते, जे स्वतः महादजी शिंदे यांनी बांधले होते.


1965 मध्ये महादजी शिंदे यांच्या स्मरणार्थ शिवमंदिराच्या गाभाऱ्याबाहेर एक स्मारक बांधण्यात आले, जिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आता त्या वास्तूला शिंदे छत्री नावाने ओळखले जाते. पर्यटन स्थळ म्हणून ऐतिहासिक वारसा म्हणून अनेक अभ्यासक वानवडी येथील शिंदे छत्री ला भेट देतात.





महादजीबाबा महाराज शिंदे यांच्या चरणी मानाचा मुजरा.. 
धन्यवाद सिंधिया ट्रस्ट ग्वाल्हेर 🚩🙏

सन्माननीय ईतिहास अभ्यासकवअखिल भारतीय महाराजा महादजी शिंदे प्रतिष्ठान अध्यक्ष सुहास शिंदे,

लेखक इतिहास अभ्यासक श्रीमंत पवार प्रतिष्ठान मुख्य समन्वयक उमेश वैद्य ,

बारा मल्हार पैकी एक खंडोबा पाली देवस्थानचे मानकरी व राष्ट्रीय जन संसद सातारा जिल्हा क्रीडा अध्यक्ष रवींद्र पाटील,

कोळे नरसिंह गावचे वतनदार पाटील,युवा उद्योजक, मुत्सद्दी इतिहास अभ्यासक अमित सावंत पाटील.

हर्षवर्धन उद्योगसमूहाचे संस्थापक अध्यक्ष, राष्ट्रीय जन संसद पश्चिम महाराष्ट्र कृषी अध्यक्ष युवराज देसाई,

नेरले गावचे वतनदार पाटील इतिहास अभ्यासक समर्थ केसरी, राष्ट्रीय संसद क्रीडा अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र विभाग पै.संजय पाटील,

जतच्या डफळे सरकार राष्ट्रीय जन संसद महाराष्ट्र राज्य समन्वयक शाहूराजे डफळे,

युवा उद्योजक, ड्रॅगन फूड एस्पोर्ट शेतकरी निलेश जगदाळे, 

युवा उद्योजक संदीप दादा वाघचौरे,

 दुर्ग संवर्धक इतिहास अभ्यासक संदीप दादा गाढवे देशमुख

या मित्र मंडळीनी महाराजा महादजी शिंदे ऐतिहासिक समाधी व वानवडी पुणे येथील छत्री  परिसराला भेट दिली होती तेव्हाचे हे फोटो आहेत.


 


लेखन &माहिती संकलन :-नितीन घाडगे

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४