३१ जानेवारी १६६१कारतलबखानाचा समाचार घेण्यासाठी महाराजांनी किल्ले राजगड सोडला...! महाराजांनी नेतोजींसह उंबराणीच्या खिंडीकडे कूच केली.
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ३१ जानेवारी १६६१ कारतलबखानाचा समाचार घेण्यासाठी महाराजांनी किल्ले राजगड सोडला...! महाराजांनी नेतोजींसह उंबराणीच्या खिंडीकडे कूच केली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ३१ जानेवारी १६६३ छत्रपती शिवरायांनी शामराज रांझेकर पंताना पत्र लिहिले. शामराज नीलकंठ रांझेकर हे पहिले प्रधान पेशवे असावेत. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ३१ जानेवारी १६६५ मिर्झाराजे जयसिंग औरंगाबादेस पोहोचले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ३१ जानेवारी १७२८ श्रीमंत बाजीराव पेशवे चोपड्यानजीक तापी उतरून १८ डिसेंबर १७२७ रोजी पौष वद्य प्रतिपदेला कुकरमुंड्याजवळ कुसुंबी प्रांतात आले. तेथून निजामाच्या डोळ्यात धूळफेक करण्याच्या हेतूने बुऱ्हाणपूर जाळण्याची हूल उठवून दिली. अकस्मात बाबापाऱ्याचा घाट उतरून राऊ भडोचवर गेले. अंदाजे ३१ जानेवारीच्या दरम्यान अलीमोहन गाठले. कोणासही स्वप्नातही वाटणार नाही, अशी घोडदौड करून निजामाला निष्प्रभ करून त्याच्या प्रांताची धूळधाण उडवली. गुजरातमध्ये शिरताच सुभेदार सरबुलंदखान याला (निजामाचे आणि याचे आपसात वैर होते) असे भासवले की, निजाम आणि बाजीरावाच्या संयुक्त फौजा गुजरातेत सरबुलंदख