*१५ जानेवारी १६६६*पन्हाळगड घेण्याच्या उद्देशाने छत्रपती शिवराय ५ हजार सैन्यानिशी गंधर्वगडाच्या परिसरातून पन्हाळयावर चाल करुन गेले.
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१५ जानेवारी १६५६*
छत्रपती शिवरायांनी छापा घालुन जावळी काबीज केली,
या लढाईत हणमंतराव मोरे ठार झाला.
मग्रुर चंद्रराव मोरे जावळीतुन रायरी उर्फ रायगडावर फरार झाला. महाराजांना जावळीच्या विजयासोबत मोर्यांच्या तुर्यातील एक अमुल्य रत्न मिळाले, त्या रत्नाचं नाव होतं "मुरारबाजी देशपांडे".
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१५ जानेवारी १६६०*
दौलोजीची कोकणावर चाल - खारेपाटण कोट जिंकला
जेव्हा छत्रपती शिवाजी राजे प्रतापगड - वाई - सातारा - कोल्हापूर भागातल्या आदिलशाही चौक्या जिंकत होते तेव्हा त्यांचा सरदार दौलोजी तळ कोकणातून थेट राजापूर पर्यंत गेला होता असे इंग्रज व वलंदेज (Dutch) साधनांमधून दिसते. राजापूरच्या इंग्रजांच्या वखारीतून त्यांच्या सुरतेच्या वखारीला ९ डिसेंबर १६५९ ला लिहीलेल्या पत्रात हा उल्लेख सापडतो.
अफजलवधाच्या धक्क्यातून सावरायला वेळ मिळायच्या आत झालेल्या ह्या अकस्मिक हल्ल्याने आदिलशाहीचे सगळे अधिकारी व सरदार हदरले. इंग्रजांच्या पत्रावरुन हे स्पष्ट आहे की १० डिसेंबर पर्यंत दौलोजी राजापूरला पोहोचला नव्हता. दाभोळच्या बंदरात अफजलखानची तीन जहाजे उभी होती. ह्याची माहिती छत्रपती शिवाजी राजाला होती व त्यांनी दौलोजीला ती जप्त करायला सांगितले होते. पण दौलोजी तिथे पोहोचायच्या आत महमूद शरीफने ती तेथून हलवली व राजापूरला पिटाळली.
राजापूरला आदिलशाही अधिकारी अब्दुल करीम ह्याला ही जहाजे सुपूर्त करण्यात आली. जेव्हा त्याला रुस्तुमेजमानच्या २८ डिसेंबर १६५९ च्या पराभवाबद्दल कळले तेव्हा त्याने राजापूरहून पळ काढला. १२ जानेवारी १६६० ला छत्रपती शिवरायांनी पाचशे मावळे राजापूरला व आणखी दोनशे जैतापूरला पोहोचले.
अब्दुल करीम, महमूद शरीफ व इतर काहींनी जहाजांनी वेंगुर्ल्याला पळ काढला. जैतापूरला काही इंग्रजांनी छत्रपती शिवरायांच्या लोकांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्यात फिलिप गिफ्फार्डला अटक झाली. १५ जानेवारी १६६० ला त्यांनी राजापूर सोडले व खारेपाटणला गेले. त्यांनी खारेपाटणच्या कोट घेतला व फिलिप गिफ्फार्डला त्यात बंदी बनविले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१५ जानेवारी १६६६*
पन्हाळगड घेण्याच्या उद्देशाने छत्रपती शिवराय ५ हजार सैन्यानिशी गंधर्वगडाच्या परिसरातून पन्हाळयावर चाल करुन गेले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१५ जानेवारी १६८५*
शहाबुद्दीन खान यास चाळीस हजार सैन्यासह बादशाहने रायगडाच्या पायथ्याशी धाडले. १५ जानेवारी १६८५ च्या सुमारास शहाबुद्दीने गडाच्या पायथ्याशी असलेल्या एका गावाला आग लावली व लुटालूट चालू केली. पण प्रत्यक्ष रायगडावर हल्ला न करता तो १६८५ च्या मार्चमध्ये परतला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१५ जानेवारी १७६१*
पानिपत युद्धाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे १५ जानेवारी १७६१ ला मोगल शाह आलम व इंग्रज यांच्यात पाटणा इथे झालेल्या लढाईत बादशहाचा पराभव झाला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१५ जानेवारी १७६८*
अलिजा बहाद्दूर महादजी शिंदेंना सरदारकी बहाल
पानिपतच्या तिसर्या लढाईत दत्ताजी शिंदे,जनकोजी शिंदे यांच्या मृत्युनंतर महादजी शिंदे यांना १५ जानेवारी १७६८ या दिवशी सरदारकी मिळाली, ते उज्जैनचे जहागीरदार बनले आणि त्यांना सरंजामी नेमणूकही मिळाली.
छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ केली आणि ज्यांनी तिच्यावर कळस चढवला ते महादजी शिंदे,ज्यांच्याबद्दल कसल्याहि प्रसंगी न डगमगणारा, शूर, मुत्सद्दी, राष्ट्रहित जाणणारा, काटकसरी, सुदृढ, मध्यम उंचीचा, काळासांवळा, साध्या रहाणीचा, कवि, परधर्मसहिष्णु, त्यावेळच्या मानानें सुशिक्षित व राज्यकारभार उत्तम ठेवणारा होते म्हटले जाते .
महादजी शिंदेचे नाव मराठ्यांच्या इतिहासात महान सेनानी म्हणून घेतले जाते. ग्वाल्हेरच्या या सिंहात असामान्य शौर्य, मुत्सद्दीपणा, धडाडी, राजकर्ता असे अनेक गुण होते. त्यांच्या कतुर्त्वामुळे इंग्रजांकडून मानाने यांना 'द ग्रेट मराठा' असे म्हटले जात. पानिपतची लढाई, वडगावची लढाई सालबादचा तह, बारभाई कारस्थान अशा अनेक घटनांमध्ये त्यांनी महत्त्वाची भुमिका बजावली. पानिपतच्या तिसर्या लढाईनंतर यांनी मराठा साम्राज्याला पुन्हा उभारी मिळवून देण्याचे काम केले. अस्थिर अशा मराठा साम्राज्याला महादजींमुळे स्थैर्य लाभले. मुघल, इंग्रज आणि आप्तस्वकीयांच्या विरुद्ध ते आजन्म लढले .
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१५ जानेवारी १९१९*
कोल्हापूरचे"राजर्षि शाहू महाराज" यांनी आदेश काढुन स्प्रुश्य-अस्प्रुश्य विद्यार्थ्यांना एकाच शाळेत शिक्षण देण्याची व्यवस्था करुन दिली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*
*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩
Comments
Post a Comment