हडपसर गावाची इतिहासातील सफर

#हडपसर गावाची इतिहासातील सफर
      काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता , होळकर आणि पेशवे यांचे युद्ध पुण्यात झाले त्यावेळी मृत झालेल्या सैनिकांच्या शरीराची विल्हेवाट ही पुण्याबाहेर ज्या ठिकाणी मुंडके टाकली ते जागा मुंढवा गाव आणि जिथे हाडे टाकली ती जागा हडपसर असाच काहीसा ते बोलणाराचा विषय होता पण यामधे काहीच तथ्ये नाही. 
      पुणे जिल्ह्यातील (असोत वा महाराष्ट्र मधील कोणतेही गाव) या गावांचा वारसा हा हजारो वर्षांपासून सुरू आहे ऐतिहासिक कागदपत्रे, शिलालेख ताम्रपट हाताळताना एक संदर्भ लक्षात येतो तो म्हणजे गावचा कारभार पाहणारा मुकादम/पाटील जे एकाच अर्थाचे शब्द आहेत. चालुक्य काळातील इतिहासाचे लेखन करणार्या लेखकांनी याबाबत माहिती दिली आहे चालुक्य यांनी राज्यव्यवस्थाची सोय ही गावपातळीपासून केली होती गावचा कारभार पाहणारा एक व्यक्ती नेमणूक केली होती जो कर देणे, न्यायनिवाडा, युद्ध वेळप्रसंगी सैन्य पुरवणे वैगेरे काम करत . 
    शाहू महाराज यांचे कागदपत्रे पाहताना शिवाजी महाराज यांचे एक पत्र उपलब्ध झाले यामधे हडपसर गावचे #मगर_पाटील आणि #सोनजी_तुपे यांच्या एका व्यवहार बाबत आहे जे शिवाजी महाराज यांनी पुणे परगना नारोबा मुतालिक देशमुख यांना पाठवले आहे 
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकाळाचा विचार केला तर १६४२पासून ते १६८० पर्यत च्या दरम्यान चे आहे .इथे छत्रपती उल्लेख केला आहे राज्याभिषेक सोहळा नंतर चे ही असू शकते. होळकर -पेशवे युद्ध १८००ला झाले म्हणजे १२५ वर्ष नंतरचा काळात.
       हडपसर हे गाव हाडे मुंडके टाकून जागेला पडलेल्या नावावरून वसले नाही तर ते पुर्वापार चे गाव आहे या गावातील वास्तू जरी नष्ट झाल्या असतील तरी ही काही वास्तू ह्या पुरातन काळापासून आहेत .तुपे पाटील यांच्या गावात ही अगदी चालुक्य कालीन ,यादवकालीन वास्तू वीरगळी दिसून येतात. ज्या आज शहराच्या डेव्हलपमेंट चा मारा सहन करत तग धरून आहेत
        इतिहास हा अंदाजावर नाहीं तर उपलब्ध कागदपत्रे यांचे आधारे मांडणी करावी लागते, हडपसर गावाचे भौगोलिक स्थान हे नाक्याप्रमाणे आहे दिवे घाटातून वाहून आलेल्या कसदार मातीवर वसलेले समृद्ध गाव आहे , भुलेश्वर डोंगर रांग व मुळा मुठा चा समांतर प्रवाह याचे पुण्याला जोडणारे महत्त्वाचे ठिकाणी म्हणजेच हडपसर गाव आहे आणि इथली पाटीलकी करणारे मगर पाटील ही तितकेच मातब्बर मंडळी आहेत .
शब्दांकन
राहुल दोरगे पाटील

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४