३१ जानेवारी १६६१कारतलबखानाचा समाचार घेण्यासाठी महाराजांनी किल्ले राजगड सोडला...! महाराजांनी नेतोजींसह उंबराणीच्या खिंडीकडे कूच केली.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

३१ जानेवारी १६६१
कारतलबखानाचा समाचार घेण्यासाठी महाराजांनी किल्ले राजगड सोडला...! महाराजांनी नेतोजींसह उंबराणीच्या खिंडीकडे कूच केली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

३१ जानेवारी १६६३
छत्रपती शिवरायांनी शामराज रांझेकर पंताना पत्र लिहिले.
शामराज नीलकंठ रांझेकर हे पहिले प्रधान पेशवे असावेत.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

३१ जानेवारी १६६५
मिर्झाराजे जयसिंग औरंगाबादेस पोहोचले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

३१ जानेवारी १७२८
श्रीमंत बाजीराव पेशवे चोपड्यानजीक तापी उतरून १८ डिसेंबर १७२७ रोजी पौष वद्य प्रतिपदेला कुकरमुंड्याजवळ कुसुंबी प्रांतात आले. तेथून निजामाच्या डोळ्यात धूळफेक करण्याच्या हेतूने बुऱ्हाणपूर जाळण्याची हूल उठवून दिली. अकस्मात बाबापाऱ्याचा घाट उतरून राऊ भडोचवर गेले. अंदाजे ३१ जानेवारीच्या दरम्यान अलीमोहन गाठले. कोणासही स्वप्नातही वाटणार नाही, अशी घोडदौड करून निजामाला निष्प्रभ करून त्याच्या प्रांताची धूळधाण उडवली. गुजरातमध्ये शिरताच सुभेदार सरबुलंदखान याला (निजामाचे आणि याचे आपसात वैर होते) असे भासवले की, निजाम आणि बाजीरावाच्या संयुक्त फौजा गुजरातेत सरबुलंदखानावर चालून येत आहेत. गुजरातेत यथेच्छ लुटालूट, जाळपोळ करून मराठी सैन्याने उच्छाद मांडला. पण बदनामी मात्र निजामाच्या वाट्याला आली. राऊसाहेबांच्या या कृतीमुळे निजाम भयंकर चिडला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

३१ जानेवारी १७६०
यमुना नदीस महापूर आल्यामुळे मराठ्यांनी अंतर्वेदीतील
स्वारी तहकूब केली. पुढे भाऊसाहेबाने व वजीर गाझिउद्यीनखान, बळवंतराव मेहेंदळे, मल्हारराव होळकर आणि जनकोजी शिंदे यांना दिल्लीस रवाना केले. या मराठा फौजेने दिल्लीस जाऊन, हल्ला करून दिल्ली शहर घेतले पण किल्ला घ्यायचा राहिला, त्यास मोर्चे लाविले. किल्यात अबदालीने दि.३१ जानेवारी १७६० रोजी आपल्यावतीने नेमलेला दिल्लीचा सुभेदार वजीर शहावलीखान याचा चुलतभाऊ याकूबअलीखान हा आपल्या लोकासह होता. मराठ्यांनी मोर्चे कायम करून ते तोफांचा भडीमार सुरू केला त्यामुळे किल्यातील दिवाणी-इ-खास रंगमहाल, मोतीमहाल व शहाबुरुज या सुंदर इमारतींना तोफांच्या माऱ्यामुळे चिरा पडल्या. तेव्हा किल्यातील अबदालीचे लोक घाबरे होऊन कौल मागू लागले. सदाशिवराव भाऊ २९ जुलै रोजी दिल्लीस पोहोचले त्यानंतर २-३ रोज लढाई चालू होती. त्यात किल्लेदार याकूबचा निरुपाय होऊन त्याने मराठ्यांशी सुलुखाचे बोलणे सुरू केले. भाऊने त्याची शरणागती पत्करुन त्यास आपल्या मंडळीसह सुखरूप जाऊ दिले. तो यमुनेपलीकडील पटांगणावर अबदाली व नजीबखान यांच्या फौजेचा तळ पडला होता तेथे उतरुन गेला. दि. २ ऑगस्ट १७६० रोजी पातशाही किल्यात मराठ्यांचे ठाणे बसले. काही दिवसानी नारो शंकर यास भाऊने दिल्लीचा सुभेदार नेमले आणि बाळोजी पाळंदे यास सुभेदाराच्या हाताखाली किल्लेदार नेमले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

३१ जानेवारी १७९३
दि.३१ जानेवारी १७९३ रोजी श्रीमंत सवाई माधवराव पेशव्यांचे कुटुंब (पत्नी) रमाबाई या दीर्घ आजाराने मृत्यू पावल्या. त्यांना तीन-चार महिने ताप येत असताही कोणास निदान झाले नाही. यानंतर एक महिन्याच्या अवधीतच, दि. ३ मार्च १७९३ रोजी सवाई माधवरावांनी विजयदुर्गाच्या गोखल्यांची कन्या यशोदाबाई यांच्याशी लग्न केले. या लग्नसमारंभाच्या प्रित्यर्थ आणि दिल्लीच्या यशस्वी राजकारण्याच्या आनंदास्तव पर्वतीच्या डोंगरावर मोठी रोषणाई करण्यात आली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

३१ जानेवारी १८००
मल्हारराव होळकरांच्या मृत्यूनंतर यशवंतराव पुण्याहून निसटले व जेजुरीस आले. जेजुरीचा खंडोबा हे त्यांचे कुलदैवत व त्यांस नमस्कार करून भटकत भटकत नागपूर भोसल्यांकड ते आले. त्यांस दौलतरावाच्या सांगण्यावरून
भोसल्यानी कैदेत टाकले. ते भोसल्यांच्या कैदेतून दिनांक ३१ जानेवारी १८०० रोजी सुटून धारच्या आनंदराव पवारांपाशी ३०० स्वारानिशी चाकरीस राहिले. पवारांचा दिवाण रंगराव ओढेकर दौलतरावाचे पक्षात होता. त्याने यशवंतरावाचा जम बसू दिला नाही. म्हणून यशवंतराव पवाराकडून निसटले. आणि तापी नर्मदेकांठच्या निबिड अरण्यांत भटकत त्यांनी भिल्ल सैन्य जमा केले. ह्याच वेळी त्यांस अति विश्वासू असा लाला भवानी शंकर हा साथी मिळाला. यावेळी त्यानी मीरखान पठाण व जुने सरदार यांस सामील करून घेऊन माळव्यांत लुटालूट करण्यास सुरुवात केली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

३१ जानेवारी १८१९
वीर नोवसाजी मस्के नाईकांचे स्वातंत्र्य युद्धसमाप्ती -
हे नोवाहचे युध्द दिनांक ८ जानेवारी १८१९ ते ३१ जानेवारी १८१९ पर्यंत चालले.  "१९ तारखेच्या रात्री १० वाजता नोवसाजीच्या सैन्यातील २०० घोडेस्वार अचानक आले आणि त्यांनी लष्करी छावणीच्या मागील बाजूस असलेल्या रक्षकावर गोळीबार केला. ते हल्ला परतवत होते, लेफ्टनंट सुथरलैंड यांनी त्वरित काही स्वार जमवून छोटे दल तयार केले, आणि काही मैलांपर्यंत त्यांचा पाठलाग केला, परंतु रात्रीच्या अंधारात ते दिसेनासे झाले."
निजामाच्या ५,००० सैन्याविरुद्ध हाटकरानी निकराचा लढा दिला होता. या संपूर्ण युद्धात हटकरांकडील ५०० अरब, ८० पेक्षा जास्त अतिजखमी आणि ४०० योद्धे शहीद झाले. तसेच, हैद्रबाद सरकारकडचे १८० सैनिक जखमी आणि २४ मारले गेले. जखमींमध्ये ६ युरोपीय अधिकारी होते. या युद्धात हटकरांना पराभव स्वीकारावा लागला. काही काळानंतर सर्व हटकर नाईकांना पकडून फाशीवर देण्यात आले. नोवसाजी यांना दगा करून पकडण्यात आले. ब्रिटिशांच्या दृष्टीकोनातुन हे युध्द इतके महत्त्वपूर्ण होते कि नंतर रेजिमेंटमध्ये युद्धाच्या विजयानंतर पदक वाटली गेली. ३१ जानेवारी १८१९ ला हाटकरांचे हे युद्ध संपल्याची माहिती मिळते.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,
सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.

"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री" 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४