वंशावळ म्हणजे काय ? वंशावळ कशी काढायची ?

Vanshavali: वंशावळ म्हणजे काय ? वंशावळ कशी काढायची ?


आज आपण पाहणार आहोत की आपल्याला वंशावळ म्हणजे काय वंशावळ कसे काढतात त्याचप्रमाणे याचा काय फायदा होतो याची पूर्ण माहिती आपण या लेखनात घेणार आहोत

वंशावळ म्हणजे काय ?
वंशावळ म्हणजे आपल्या जुन्या पिढीची संपूर्ण माहिती. यात आपले पूर्वज काय करत होते? त्यांचा काय व्यवसाय होता व ते कसे उदार निवार्ह करत होते ? व कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची संपूर्ण माहिती.  त्यामध्ये किती पुरुष व किती महिला किती बालके होते.  प्रत्येक पुरुषाचं कार्य काय होते, घरचा कर्ता पुरुष कोण होता, पूर्वीपासूनच आडनाव हेच आहे का वा मध्ये कुठे बदलले आहे का. पूर्वज उदरनिर्वाहासाठी कोणत्या मार्गाचा अवलंब करत होते शेती करत होते, नोकरी करत होते किंवा व्यवसाय करत होते इत्यादी संपूर्ण माहिती वंशावळ मध्ये मिळते.
थोडक्यात सांगायचे झाल्यास, वंशावळ म्हणजे आपल्या पूर्वजांचा इतिहास.

सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास वंशावळ म्हणजे आपल्या पूर्वजांचा इतिहास आणि आपल्या प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीची वंशावळ नमूद केलेली असते. आपल्या पिढीच्या पहिल्या व्यक्तीपासून तर आतापर्यंत अस्तित्वात असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे नाव क्रमवार उतरत्या स्वरूपात लिहिलेल्या कागदपत्रांना आपण वंशावळ म्हणत असतो.

पूर्ण कुटुंबाची वंशावळ कशी काढली जाते | Complete Family Tree how to draw in marathi

पूर्ण कुटुंबाची वंशावळ काढण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमच्या कुटुंबाची सुरुवात कोणत्या व्यक्ती पासून झाली त्या व्यक्तीचे नाव तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर आता सध्या अस्तित्वात असलेला तुमचा शेवटचा कुटुंबाचा व्यक्ती कोणता त्याचे नाव माहिती असणे आवश्यक आहे. या दोघी व्यक्तींची नावे व माहिती झाल्यानंतर या दोघी व्यक्तींच्या मध्ये किती पिढ्या तुमच्या गेल्या आहेत. त्या व्यक्तींचे नाव तुम्हाला उतरत्या क्रमाने लिहावी लागतात. जसे की, खापर पणजोबा > पणजोबा > आजोबा > वडील , काका > आपण स्वतः…..

कोणत्याही भावंडांना जन्माच्या क्रमाने डावीकडून (सर्वात जुने) उजवीकडे (सर्वात लहान) काढा. भावंडं चिन्हांच्या वरच्या आडव्या रेषेने जोडलेली असतात, उभ्या रेषा चिन्हांना आडव्या रेषेशी जोडतात. कोणतेही भागीदार आणि मुले जोडण्यासाठी जागा सोडा.


जातीचा दाखला काढण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट तर लागतेच परंतु, वंशावळ ही खूप महत्त्वाची कामगिरी जातीचा दाखला काढण्यासाठी बजावते. जातीचा दाखला काढण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला वंशावळ ही काढावीच लागत असते वंशावळ शिवाय जातीचा दाखला काढता येत नाही तर आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत जातीचा दाखला काढण्यासाठी वंशावळ कशी काढायची. (how to draw family tree for caste certificate)


जातीचा दाखला साठी वंशावळ काढत असताना एक गोष्ट खूप महत्त्वाची असते ती म्हणजे वंशावळ काढत असताना आपल्याला आपल्या कुटुंबातील आजोबा पणजोबा सारख्या व्यक्तींची माहिती द्यावी लागते. वंशावळ सोबतच कागदपत्रे सुद्धा खूप महत्त्वाचे असतात तर वंशावळ काढत असताना आपल्याकडे कोण कोणत्या व्यक्तींची कागदपत्रे आहेत त्याची आखणी आधी करून घेणे आवश्यक असते. ज्या व्यक्तीचे कागदपत्रे उपलब्ध नाहीत अशा व्यक्तीचे नाव वंशावळ मधून काढून टाकावे. तसेच काही व्यक्तींचे कागदपत्रे त्यांच्यावरील माहिती चुकीची असते आणि ती व्यक्तींची नावं वंशावळ मध्ये घेतल्यानंतर आपल्याला पुढे प्रॉब्लेम येऊ शकतो तर अशा परिस्थितीत अशा व्यक्तींचे कागदपत्रे असून सुद्धा त्या व्यक्तीचे नाव वंशावळ मधे घेऊ नये. तुमच्या कुटुंबात जास्त व्यक्ती राहिले तरीसुद्धा कमीत कमी व्यक्तींचे नाव वंशावळ मध्ये घेणे गरजेचे असते नाहीतर कागदपत्रात खोड निर्माण होण्याची शक्यता असते. खाली दिलेल्या वंशावळीचा नमुना वापरून तुम्ही तुमची वंशावळ काढू शकतात…

वंशावळ काढणे जबाबदारी कोणाची ?

ज्या व्यक्तीला जात प्रमाणपत्र काढावयाचे आहे यासाठी त्याने अर्ज केला आहे अशा अर्जदाराची हि जबाबदारी असते. त्याला स्वतः वंशावळ तयार करावी लागते, स्वतः सर्व नावे लिहून वंशावळ बनवावी लागते. वंशावळीचा कुठे हि अर्ज करण्याची पद्धत नाही.


वंशावळीनुसार कुणबी नोंद सापडल्यास इतरांना फायदा होतो का ?

जुन्या नोंदीमध्ये पूर्वजांच्या नावासमोर कुणबी नोंद आढळ्यास त्याच्या पुढील सर्व पिढ्याना त्या नोंदी आधारे किंवा त्या नोंदीचा दाखल देऊन कुणबी प्रमाणपत्र मिळू शकते.


Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४