Posts

२४ जून १६७०बारा मावळाची सुरुवात जिथून होते त्या रोहिडे खोर्‍यातील "रोहिडा किल्ला उर्फ विचित्रगड" मराठ्यांनी जिंकला.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २४ जून १५६४ गोंडवानाची महाराणी राणी दुर्गावतीचे बलिदान मोगल सम्राट अकबर संपूर्ण हिंदुस्थानात आपली सत्ता वाढवू पाहत होता. त्यावेळच्या सर्व राजा-महाराजांना त्याने, एकतर मोगल साम्राज्याचे सेवक व्हा किंवा युद्धाला तयार रहा असा प्रस्ताव पाठवला होता, ज्यामध्ये बरेच राजपूत मोगलांचा हा प्रस्ताव स्वीकारून मोगलांचे  मांडलिकत्व पत्करले होते. या प्रस्तावाला धुडकावून लावणारी मंडळी सुद्धा होती ज्यामध्ये आपणास महाराणा प्रताप ये नाव माहीतच आहे. परंतु या मध्ये एक महाराणी होती जिने त्याचा हा प्रस्ताव धुडकावून लावला आणि मोगलांशी लढली. या राणीचे नाव आहे "महाराणी दुर्गावती" !! १५४२ साली तिचे लग्न दलपत शाहशी झाला. दलपत शाह गोंड (गढ़मंडला) राजा संग्राम शाह यांचे ज्येष्ठ पुत्र होते. लग्ना नंतर फक्त चार वर्षातच दलपत शाह मरण पावला आणि राज्यकारभार दुर्गावती राणीकडे आला.  ती गोंड (गोंडवाना) राज्याची पहिली राणी झाली, अकबराच्या दबावाला बळी न पडता तीने लढा दिला आणि त्यात तीने स्वतचा जीव दिला. गोंडवाना राज्यावर मोगल सम्राट अकरबरा शिवाय बाज बहाद्दरन...

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* *१९ जून इ.स.१६२६*

*आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष*  *१९ जून इ.स.१६२६* बहामनी शासकाच्या वजीर निजाम मलिक अंबर याच्या काळात धोडप किल्ला नगरच्या निजामशहाकडे होता. निजामशाही नष्ट करण्यासाठी आलेल्या मुघलांच्या सरदार अलीवर्दीखानाने निजामच्या किल्लेदाराला १ लाख रुपयाच्या मनसबीची लालूच दाखवून १९ जून १६२६ मध्ये किल्ला ताब्यात घेतला आणि त्याने थोडी फार पुनर्बांधणी व डागडूजी करुन किल्ला भक्कम केला. किल्ल्यावर अलीवर्दीखानाने पर्शियन भाषेत कोरलेला शिलालेख वाचावयास किंवा पहायला मिळतो. *१९ जुन इ.स.१६३६* शहाजहान बादशहाचा गुलाम अलीवर्दीखान तुर्कमान याने १४ किल्ले ४ महिन्यात काबीज केले. इ.स.१६३५ शहाजहान बादशहाने दक्षिणेत स्वारी केली. त्याने बागलाण- नाशिककडील किल्ले घेण्यासाठी शाहिस्तेखानाच्या नेतृत्वाखाली अलावर्दीखान यांस नेमले. अलावर्दीखान याने त्या भागातील सर्व किल्ले राजे शहाजीराजे यांच्या लोकांकडून घेतले. त्यासंबंधीचा शिलालेख धोडप किल्ल्यात आहे. त्याचा सारांश पुढीलप्रमाणे:- शहाजहान बादशहाचा क्षुद्रतम गुलाम अलावर्दीखान तुर्कमान याने धोडपचा किल्ला व इतर १४ किल्ले अवघ्या ४ महिन्यांत काबीज केले. चांदवड, अंतराळ, (इंद...

१६ मे १६४८छत्रपती शिवरायांनी पहिली राजधानी राजगडबांधकामास सुरुवात केली.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇  १६ मे १६४० छत्रपती शिवाजी महाराजांचा फलटणच्या नाईक निंबाळकरांची लेक सईबाई यांच्याशी लालमहाल, पुणे येथे विवाह. सईबाईंना एकूण ४ संतती. ३ मुली म्हणजे सखुबाई, राणूबाई, अंबिकाबाई आणि १ मुलगा म्हणजेच छत्रपती शंभुराजे. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १६ मे १६४८ छत्रपती शिवरायांनी पहिली राजधानी राजगड बांधकामास सुरुवात केली. १६४७-४८ दरम्यान छत्रपती शिवरायांनी तोरण्याबरोबर हा किल्ला ताब्यात घेतला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १६ मे १६४९ शहाजीराजेंची सन्मानपूर्वक मुक्तता छत्रपती शिवाजी महाराजांनी फत्तेखानाचा व संभाजी राजांनी (छत्रपती शिवरायांचे मोठे बंधु) फर्रादखानाचा पराभव केला. छत्रपती शिवाजी राजांनी दिल्लीच्या मोगलांशी संधान साधून विजापूरकरांवर दबाव आणला. असे नाक दाबल्यावर, विजापूरकरांनी कैद केलेल्या शहाजी राजांना रिहा करण्याचा हुकूम सोडला व त्यांची सन्मानपूर्वक सशर्त सुटका केली. त्या बदल्यात छत्रपती शिवरायांना सिंहगड विजापुरला परत द्यावा लागला तर थोरले बंधू संभाजीराजेंना बेंगलोर. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇  १६ मे १६६५ मुरारबाजी देशपांडे यांना वीरमरण दिलेरखान...

४ मे १६७७दक्षिण दिग्विजय मोहिमेदरम्यान छत्रपती शिवरायांनी 'तिरुपती' येथे भेट दिली.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ४ मे १६४९ मोगलांविरोधात शस्त्र उचलणारा शूर राजपूत छत्रसाल बुंदेला याचा जन्म. औरंगजेबासारख्या कट्टर इस्लामी बादशहालाही शह या छत्रसालाने दिला. छत्रपती शिवाजी राजे आणि छत्रसालाची भेटही इतिहासात झाली होती. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 ४ मे १६७७ दक्षिण दिग्विजय मोहिमेदरम्यान छत्रपती शिवरायांनी 'तिरुपती' येथे भेट दिली. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 ४ मे १७३९ वसई किल्ला मराठ्यान्नी प्रचंड रणसंग्राम करून जिंकला होता. मराठ्यांतर्फे किल्ल्याचा पूर्ण ताबा 'सरसुभेदार शंकराजी केशव' यांनी पेशव्यांच्या आज्ञेवरुन घेतला. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 ४ मे १७५८ बाजीराव आणि चिमाजीने खरच मराठी सत्तेचा दबदबा दख्खन पासुन रुमशे पावतो पसरवला. मराठ्यांची विजयी घोडी नर्मदा ओलांडुन गेली. थोरले बाजीराव हे एकमेव अपराजित सेनापती होते. अटकेच्या मोहिमेत तुकोजी होळकर आणि त्यांच्या सोबत असणारे सरदार राणोजी शिंदे यांनी अप्रतिम पराक्रम केला होता, रघुनाथरावाने वयाच्या २३व्या वर्षी अटकेवर भगवा फडकवला. राघोबाचा राघो-भरारी झाला. याच काळातिल ४ मे रोजी र...

२८ एप्रिल १६६१छत्रपती शिवरायांनी कोकणातील आताच्या रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर जवळील “प्रचीतगड उर्फ उचीतगड” जिंकला.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २८ एप्रिल १६६१ छत्रपती शिवरायांनी कोकणातील आताच्या रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर जवळील “प्रचीतगड उर्फ उचीतगड” जिंकला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २८ एप्रिल १६७९ छत्रपती शिवाजी महाराजांचे दूरदृष्टीचे धोरण व त्या धोरणाची काटेकोर अंमलबजावणी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज माहीत आहेत ते गड, कोट  बांधणारे म्हणून.. पण स्वराज्याच्या अंतर्गत सुरक्षेसाठी देसाई, देशमुख यांना तटबंदी असलेले वाडे बांधून द्यायचे नाहीत हे छत्रपती शिवाजी महाराजांचे  धोरण होते. या धोरणाची स्वराज्यात किती काटेकोर अंमलबजावणी केली जात होती त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे बंकापूरचा देशाधिकारी बाबाजी शिवदेव याला धाडलेले खालील आज्ञापत्र. या आज्ञापत्रात "सांउसीचा कोट देखील  पाया पाडून टाकणे" असे फर्माविले आहे.  कर्नाटकातील तत्कालीन कुंदगोळ परगण्यात मौजे सांउशी हा गाव येत होता. हा गाव केंचणगौडा देसाई यास इनाम होता. महाराजांनी त्याचे इनाम चालू ठेवले मात्र गाव त्याच्या ताब्यात देण्याअगोदर सांउसी गावची तटबंदी पायासकट पाडावी अशी आज्ञा केली. सदर पत्राची आताच्या कालगणनेप्...

२७ एप्रिल १६८० छत्रपती संभाजीराजेंनी पन्हाळा किल्ल्यावरून राजकारभारास सुरूवात केली.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २७ एप्रिल १६४५ हिंदवी स्वराज स्थापनेचे संस्थापक छत्रपती शिवाजी यांनी वयाच्या १६व्या वर्षी म्हणजेच २७ एप्रिल १६४५ ला रायरेश्वर येथे स्वराज्याची शपथ घेतली. सह्याद्रीतील प्राचीन रायरेश्वर मंदिराला शिवाजी छत्रपतींमुळे अत्यंत महत्वाचा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. आपली स्वराज्याची संकल्पना त्याची दूरदृष्टी काही मोजक्या परंतु विश्वासू आणि जिवाची पर्वा न करता स्वराज्यासाठी स्वतःला झोकून देणाऱ्या कान्होजी जेधे, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, येसाजी कंक, सूर्याजी काकडे, बापूजी मुदगल, नरसप्रभू गुप्ते आणि सोनोपंत डबीर अशा बारा मावळातील सवंगडी यांच्या समोर मांडली. त्या दिवसापासून सुरुवात झाली इतिहासातील काही सोनोरी क्षणांना, पाच मुसलमानी पातशाहींच्या विरोधात एकजूट होऊन हिंदवी स्वराज्य स्थापनेला.  🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २७ एप्रिल १६८० राजापूरच्या इंग्रजांनी आपल्या आपल्या वरीष्ठास पत्रे लिहून कळवले कि, छत्रपती संभाजी महाराजांनी सर्व राज्यसूत्रे आपल्या हाती घेतली आहेत. ठीकठिकाणच्या सुभेदारास व हवालदारास त्याने आपल्यापाशी बोलावले आह...

२६ एप्रिल १६७५दस्तुरखुद्द छत्रपती शिवाजी महाराज यांनी "कारवार"वर स्वारी केली.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २६ एप्रिल १६७५ दस्तुरखुद्द छत्रपती शिवाजी महाराज यांनी "कारवार"वर स्वारी केली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २६ एप्रिल १६८४ छत्रपती संभाजीराजे व इंग्रज यांच्यातील तहाच्या अटी केग्विन हा सातत्याने चार्लस राजाला छत्रपती संभाजी महाराजांच्या शक्तीची व आक्रमक धोरणाची कल्पना यासाठी देत होता की, जेणे करुन छत्रपती संभाजी महाराजांशी तह करुन सलोखा निर्माण व्हावा. त्याप्रमाणे २६ एप्रिल १६८४ पूर्वी केग्विनने तहाच्या बोलणीसाठी कॅप्टन गॅरी, थाॅमस विल्किन्स , राम शेणवी यांना तहाच्या बोलणीसाठी छत्रपती संभाजी महाराजांच्याकडे पाठवले. त्यांनी बिरवाडी येथे राजांची भेट घेतली व गर्व्हनर केग्विनला पत्र पाठवून उभयंतामध्ये होणाऱ्या तहाच्या अटींना संमती दर्शवली होती. छत्रपती संभाजी राजांचे केग्विनला पत्र :- "वकिलाने तुमचा मनोदय सांगितला त्याच्या बरोबर आम्ही आमची मान्याता पाठवली. तुमचा मनोदय तुम्ही तपशीलवार लिहून पाठवला त्या तहाच्या अटींना आम्ही संमती पाठवली आहे ती मिळेलच. तरी तुम्ही या अटींचे परिपालन करावे. आम्हीही त्या पाळू आमच्या वचनावर विश्वास ...

२७ मार्च १७५२दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा !कनोज येथे होळकर-शिंदेंशी दिल्लीच्या तख्ताच्या रक्षणाचा करार केला.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २७ मार्च १६६३ शिवतेज दिन - शाईस्तेखानाचा बिमोड... दस्तुरखुदद आलमगीराचा 'मामा' व मुघल सेनेतील  मातब्बर सरदार असलेल्या शाईस्तेखानाची छत्रपती शिवरायांनी "गनिमी कावा" या रणनीतीने पुण्यातील लालमहाल येथे तळ ठोकुन बसलेल्या अंदाजे दिड लाखाच्या सैन्यात घुसुन रातोरात बोटे छाटली. या असल्या गनिमी छाप्याचे दुसरे उदाहरण जगात नाही. खान व त्याच्या कुटुंबाने महाराजांची जबर धास्ती घेतली. पुणे व परीसरातील लुट व गाईंच्या कत्तली सर्व बाहेर पडल्या. त्याची बेगम रात्रीचीच "शिवाजी आला शिवाजी आला" म्हणून ओरडत असे. पुढे औरंगजेबाने बोटे तुटलेल्या मामाला इराणला पाठवून दिले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २७ मार्च १६६६ औरंगजेबाचे राज्यरोहन १६६६ हे वर्ष औरंगजेबाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे होते. यापूर्वीच बादशहा औरंगजेब स्वतःला मुघल सम्राट म्हणून सारे बादशाही सोपस्कार केले होते पण बादशाह शहाजहान जिवंत असल्यामुळे लोकांच्या दृष्टीने औरंगजेबाची ही बंडखोरीच होती. आता बादशाह शहाजहानच्या मृत्यूमुळे सिंहासनावर बसण्याची व शाही सोपस्कार करवून घेण्या...

१८ मार्च १६७९छत्रपती शिवरायांनी विजापुरांकडून बहाद्दुर बांडा किल्ला जिंकला.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १८ मार्च १५९४ स्वराज्य संकल्पक महाराज साहेब शहाजीराजे भोसले यांचा वेरुळ (महाराष्ट्र) येथे जन्म (मृत्यू २३ जानेवारी १६६४) छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील व निजामशाही – आदिलशाहीतील एक मातब्बर सरदार. ऐतिहासिक कागदपत्रांत त्यांचा शाहजी किंवा स्याहजी असाही नामोल्लेख आढळतो. त्यांच्या जन्मतारखेविषयी एकमत नाही. बहुतेक तज्ज्ञ बिकानेर आणि जोधपूर येथील उपलब्ध जन्मपत्रिकांतील तारीख (१६ मार्च १५९४) ग्राह्य धरतात. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १८ मार्च १६७९ छत्रपती शिवरायांनी विजापुरांकडून बहाद्दुर बांडा किल्ला जिंकला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १८ मार्च १६८० आदिलशाहित सर्जाखानाला विजापुरी सैन्याचा मुख्य सेनापती केले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १८ मार्च १६८८ हरजीराजे महाडिक त्रिणामल्लीहून कंचीवर गेले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १८ मार्च १७६० चैत्री पाडाव्याच्या शुभ मुहूर्तावर राजमाता जिजाऊंचे माहेरघर सिंदखेदराजा येथून सदाशीव भाऊ यांनी आपल्या सहकार्यांसह उत्तरेकडे प्रयाण केले. त्यावेळी ५० हजारांची फौज सोबत होती. शिंदे-होळकर मार्गात मिळणार होते. अहमदशाह अब्दाली याच्या आक्रमणापा...

१५ मार्च १६७०छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण व भिवंडी मोगलांकडून जिंकून घेतली

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १५ मार्च १६६१ छत्रपती शिवाजी राजांनी राजापुरची इंग्रजांची वखार खणून काढून पन्हाळ्याचा सूड उगवला. राजापूरकर इंग्रजांनी सिद्दी जौहरला सहाय्य करून महाराज वेढ्यात आडकलेले असताना, निशाण लाऊन पन्हाळ्यावर तोफा डागल्या. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १५ मार्च १६६९ पैशाअभावी मुलीच्या लग्नाची टाळाटाळ करणाऱ्या विठोजी हैबतराव शिळीमकारास जिजाऊ साहेबांनी २५ होन रोख व ५०० माणसांचे सामान देवून त्याच्या मुलीचे लग्न गोमाजी नाईक यांच्या मुलासोबत झाले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १५ मार्च १६७० छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण व भिवंडी मोगलांकडून जिंकून घेतली. कल्याण व भिवंडीकरांनी आजचा दिवस सणासारखा साजरा करावा. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १५ मार्च १६७० माहुली गडावर मनोहरदासने छत्रपती शिवरायांचा छापा हेरून मराठ्यांवर हल्ला चढवला व ह्या लढाईत १ हजार मराठे कापले गेले. हि गोष्ट छत्रपती शिवरायांच्या जिव्हारी सलू लागली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १५ मार्च १६८० छत्रपती राजाराम महाराजांचे जानकीबाईंशी लग्न वीरगती लाभलेल्या सरनौबत प्रतापराव गुजरांची लेक जानकीबाई. छत्रपती शिवाजी महाराजांच्या च...

४ मार्च १६७७"दक्षिण दिग्विजय मोहीम"छत्रपती शिवराय "हैदराबाद" शहरातील "गोवळकोंडा" किल्ल्याजवळ दाखल.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ४ मार्च १६७७ "दक्षिण दिग्विजय मोहीम" छत्रपती शिवराय "हैदराबाद" शहरातील "गोवळकोंडा" किल्ल्याजवळ दाखल. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ४ मार्च १६८० राजपुतांचे बंड मोडून काढण्यासाठी औरंगजेबाने आपली तीन मुलं शहाआलम, आझमशाह आणि अकबर ह्यांना पाठविले. ४ मार्च १६८० रोजी अकबराला चितोडची बाजू सांभाळण्यासाठी पाठविण्यात आले. प्रत्येक ठिकाणी अकबराचा सारखा पराभवाचं होत होता. अकबराने राजपुतांविरोधात लढण्यात पाच महिने असेच फुकट घालविले. राजपुतांपुढे आता काही आपला निभाव लागत नाही असे पाहून अकबराने आपल्या बापास औरंगजेबास हे युद्ध बंद करण्याची विनंती केली. ह्या विनंतीने औरंगजेब भयंकर चिडला. आणि त्याने रागाने अकबराची चांगलीच कानउघडणी केले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ४ मार्च १७०६ छत्रपती शिवरायांचा संदेश, त्यांनी दिलेली स्पूर्ति, त्यानी तयार केलेली ही माणसं. एक मोठ नेता नाही, पण सामुदायीक नेतृत्व त्यांनी उभं केलं. त्याचाच परिणाम म्हणून मराठ्यांची घोडदौड जी अशी चालली की, ४ मार्च १७०६, रोजी धनाजी जाधवांने गुजराथचे द्वार मराठ्यांना मोकळं करू...

१७ फेब्रुवारी १६६३छत्रपती शिवरायांनी केळशी जिंकले.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १७ फेब्रुवारी १६६३ छत्रपती शिवरायांनी केळशी जिंकले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १७ फेब्रुवारी १६७९ सुरतचे मुंबई इंग्रजकरांना पत्र युवराज शंभुराजे दिलेरखानाच्या छावणीत... सुरतेचे इंग्रज अधिकारी मुंबईच्या इंग्रज अधिकाऱ्यांना कळवितात, "दख्खनमध्ये बादशाही सेनापतींनी छत्रपती शिवाजी महाराजांवर मोठा विजय मिळविला आहे. सर्वात छत्रपती शिवाजी महाराजांची मनःशांती अधिक ढवळणारी गोष्ट घडली ती म्हणजे त्यांचा ज्येष्ठ पुत्र युवराज शंभुराजे बादशाही सरदार दिलेरखान यांच्याकडे गेले." 'याची नोंद मल्हार रामराव चिटणीस, बुसातिनुस्सलातीन, विजापुरची अदिलशाही, इंग्रज, भीमसेन सक्सेना, जेधे शकावली, या सर्वांनी घेतली असली तरी महाराजांचा अभ्यास करताना असे निदर्शनास येते की, "युवराज शंभुराजे दिलेरखानाच्या गटात जाणे म्हणजे महाराजांचेच राजकारण होय". युवराज संभाजीराजे दिलेरखानापासी गेले. दिलेरखानाने त्यांसी ७,०००, हप्त (सप्त) सात हजारी मनसब दिली व सन्मान केला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १७ फेब्रुवारी १६८९ छत्रपती शंभूराजे व कवी कलश यांचे हालहाल करण्यास सुर...

११ जानेवारी १६८०रायगड जिल्ह्यामधील खांदेरी किल्ला बांधून पूर्ण.आज रोजी महाराजांकड़े ताब्यात आला.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ११ जानेवारी १६६६ मुघल सरदार दिलेरखानाने छत्रपती शिवरायांना जीवे मारण्याचा कट रचल्याची खबर छत्रपती शिवरायांना गुप्तहेरामार्फत मिळाली. छत्रपती शिवराय मिर्झाराजे जयसिंगाची छावणी सोडून पन्हाळ्याकडे रवाना. पन्हाळा घेण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला.  🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ११ जानेवारी १६८० रायगड जिल्ह्यामधील खांदेरी किल्ला बांधून पूर्ण. आज रोजी महाराजांकड़े ताब्यात आला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ११ जानेवारी १६८८ मातबरखानाने पट्टा गड जिंकला १६८८ साली मातबरखानाने बागलाणातील अनेक गड घेण्यास सुरवात केली होती. पट्टागडा संबंधी मातबरखान औरंगजेबाकडे अर्ज पाठवतो त्यात तो म्हणतो सेवकाने काही दिवसांपासून १००० कोळी, भिल्ल, व मावळे यांचे पथक सैन्यात घेतले आहे. मराठांच्या ताब्यात असलेले पट्टा व इतर किल्ल्यालगतच्या जमीनदारांना रकमा पुरवण्यात आल्या आहेत. ११ जानेवारी १६८८ ला खानाने काही पथके किल्ला घेण्याच्या मार्गावर धाडली. मध्यरात्रीच्या सुमारास किल्ल्याच्या तटाला दोर लावून किल्ला जिंकून घेतला. भगूरचा ठाणेदार गोविंदसिंग याची किल्ल्यावर नेमणूक करण्यात आली. मोगलांन...

८ जानेवारी १६५८कल्याणहून छत्रपती शिवाजी महाराज स्वत: माहुलीच्या किल्ल्यावर चालून निघाले माहुली - भंडारगड - पळसगड, छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूर बादशाहाकडून आज जिंकला.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ८ जानेवारी १०२६ गझनिच्या मेहमुदाचे सोमनाथ मंदिरावर आक्रमण महमूद गझनिच्या हिंदुस्तानवरील १७ हल्ल्यांपैकी १६ वा आणि सर्वात भयानक असा हल्ला म्हणजे सोमनाथ मंदिरवरील हल्ला होय. सोमनाथ मंदिर त्यावेळी त्याच्या संपत्तीसाठी प्रसिद्ध होते. सोमनाथाचे शिवलिंग अनेक पाचू, हिरे, माणके यानी सजवले होते. त्यामुळे ते शिवलिंग अक्षरशः लखलखत होते. डिसें.१०२५ च्या दरम्यान महमूद गझनी सोमनाथ मंदिराजवळ पोचला. ३ दिवसानी हिंदूंचा प्रतिकार मोडून काढण्यात मुस्लिम यशस्वी ठरले आणि त्यानी मंदिरात प्रवेश केला आणि काय???? मंदिरात होते ते फ़क्ति सोमनाथाच्या नावाने घंटानाद करणारे, कोणताही प्रतिकार करू न शकणारे असे हजारो निःशस्त्र हिन्दू....!!! मग काय?? मेहमुदाने त्या सर्वांची थंड डोक्याने कत्तल केली. यावेळी सुमारे ५०००० हिंदूंची कत्तल करण्यात आली होती. तसेच त्याने शिवलिंग उपटून काढले. वैभव संपन्न असे सोमनाथ मंदिर पूर्णपणे लुटले गेले. तसेच त्यावेळी केलेल्या लुटित जवळपास ६.५ टन सोन्याचा समावेश होता एवढे ते मंदिर वैभव संपन्न होते. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ८ जानेवारी १६५८ ...

२३ डिसेंबर इ.स.१६७०*छत्रपती शिवाजी महाराजांनी अहिवंतगड जिंकला.

*आजचे ऐतिहासिक शिवदिनविशेष* *२३ डिसेंबर इ.स.१५३४* बहादुरशहाबरोबर वाटाघाटी करुन २३ डिसेंबर १५३४ ला वसई पोर्तुगिजांकडे आली. तेथील स्थानिक जनतेने प्रथम त्यांचे स्वागत केले कारण मुघली सत्तेला ते वैतागले होते. पण पोर्तुगिजांनी सक्तीचे धर्मांतर, मंदिरे उध्वस्त करून, हिन्दु पूजा व उत्सवांना बंदी सुरु केल्यानंतर तेथील जनतेने पेशव्यांपुढे आपली कैफियत मंडली आणि त्यानंतर १७३७ साली पेशव्यांनी मोहिम सुरू केली. *२३ डिसेंबर इ.स.१६७०* छत्रपती शिवाजी महाराजांनी अहिवंतगड जिंकला.१६७० मध्ये मोगलांच्या बरोबर संघर्ष सुरू झाल्यावर शिवाजी राजांनी बागलाणातील किल्ले जिंकून घेण्याचा सपाटा सुरू केला. डिसेंबर १६७० मध्ये राजांनी अहिवंतचा किल्लाही जिंकून घेतला यावेळी खानदेशचा मोगल सुभेदार दाऊदखान कमालीचा अस्वस्थ झाला. 'मराठे बर्‍हाणपूरची पेठ लुटणार आहेत', अशी बातमी शिवाजी महाराजांच्या सहकार्‍यांनी हेतुपुरस्पर पसरवली होती त्याचा परिणाम म्हणजे दाऊदखान प्रचंड फौज घेऊन बर्‍हाणपूरच्या रोखाने निघाला परंतु अजिंठ्याच्या लेण्याजवळ आल्यानंतर त्याला कळले की मराठे अहिवंतच्या रोखाने गेले आहेत. दाऊदखानाने मोठ्या शीघ्र गती...

२० नोव्हेंबर १६७०छत्रपती शिवरायांची आरमारासह सुरतेकडे कूच.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २० नोव्हेंबर १६३५ शाहजहान त्याच्या दुसऱ्या दख्खन मोहिमेसाठी निघाला. निजामशाही संपवायची ह्या ध्येयाने तो निघाला होता. त्याने हांडियाजवळ ४ जानेवारी १६३६ ला नर्मदा ओलांडली. इथूनच ९ जानेवारीला आदिलशाहला पत्राने तंबी दिली की निजामशाहीमधल्या शाहजी राजा बरोबर असलेल्या सरदारांना पाठिंबा मिळता कामा नये. वर हे सुद्धा लिहीले की त्याने देय असलेली वार्षिक खंडणी १० मार्च १६३६ पर्यंत दौलताबादला पाठवावी. ह्यासाठी शाहजहानने सोलापूर, त्याच्या आसपासचा परिसर व वांगीचा भाग निजामशाहिकडील भाग आदिलशाहला देऊ केले. ह्या परिसरातून वर्षाला नऊ लक्ष होनाचे उत्पन्न येत होते. १९ जानेवारी १६३६ ला शेख दबीर व इतर काही आदिलशाही वकील शाहजहानला भेटले. त्यानंतर ५ फेब्रुवारीला शाहजहानने खानजमान, खानदौरान व शाहिस्ताखान यांना निजामशाहीचा परिसर जिंकण्यासाठी धाडले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २० नोव्हेंबर १६६६ ९ वर्षांचे बाल शंभूराजे आज रोजी आग्राहून सुटल्यानंतर सुखरूप "किल्ले राजगड" वर पोचले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २० नोव्हेंबर १६७० छत्रपती शिवरायांची आरमारासह सुरतेकडे कू...

१३ नोव्हेंबर १६५९छत्रपती शिवरायांनी मायणी, खटाव जिंकले.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १३ नोव्हेंबर १६५९ छत्रपती शिवरायांनी मायणी, खटाव जिंकले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १३ नोव्हेंबर १६६८ छत्रपती शिवरायांकडून गोव्यामध्ये सप्तकोटीश्वर मंदिर बांधण्यास सुरुवात. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १३ नोव्हेंबर १६७३ मुंबईकर सूरतकरांना १३ नोव्हेंबर १६७३ ला लिहितात: "सिद्दीने तक्रारी केल्या असताना सुभेदाराचे आमच्याबद्दल इतके मन आहे हे वाचून आनंद झाला. आता बंदरांत असलेल्या बादशहाच्या दोन गलबतांना आम्ही चांगले वागविले हे पाहून बादशाहाविषयी आमचे मनांत पूज्यबुध्दी आहे हे त्याला दिसून येईल ... फ्रेचांनी जर इतक्या तोफा आणि इतके शिसें ( गोळे ) राजापूरला पाठविले असतील, तर शिवाजीला सिद्दाविरुध्द चांगले आरमार सज्ज करणस बरे पडेल. कारण त्याने आमच्याकडे मागणी केली परंतु आमच्याजवळ पुष्कळ तोफा असूनही आम्ही तुमच्या सूरतेतील हितसंबंधाकडे लक्ष देऊन तोफा दिल्या नाहीत." सूरतकरांनी १३ नोव्हेंबर १६७४ ला उत्तर लिहिले जे:'  "शिवाजीच्या तोफांच्या मागणीबद्दल कळविण्यांत आले. त्यावर आमचे मत असे आहे की, अशा कृत्याने बादशहाला घुस्सा येईल.  फ्रेंचानी नुक...

१२ नोव्हेंबर १६५९छत्रपती शिवरायांनी "कराड" प्रांत जिंकला

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १२ नोव्हेंबर १६५९ छत्रपती शिवरायांनी "कराड" प्रांत जिंकला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १२ नोव्हेंबर १६६७ छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची सरहद्द पोर्तुगीज प्रदेशाला भिडली होती. त्यावेळचा पोर्तुगीज विजरई कोंदी दि सांव्हिसेंती हा फारच धर्मान्ध होता. त्याने बारदेश मधील चार हजार हिंदूंचे सक्तीने धर्मांतर केले होते. आणि इतर हिंदू लोकांना २ महिन्याच्या आत बारदेश व गोवा सोडून जाण्यास सांगितले. शिवाय पोर्तुगीजांच्या आश्रयाला गेलेले कोकणातील देसाई त्यांच्या मदतीने स्वराज्यातील प्रदेशावर धाडी घालत असत. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महाराजांनी बारदेशवर ५ हजार पायदळ व १ हजार घोडदळ घेऊन मोहीम काढली. १० नोव्हेंबर पासून सलग तीन दिवस महाराजांच्या सैन्याने या भागात धुमाकूळ घालत अनेक धर्मान्ध पोर्तुगीजाना ठार केले. या मोहिमेत महाराजांनी पोर्तुगीज व कोकणातील फितूर देसायांना कायमचा धडा शिकवला. महाराजानी या मोहिमेत १३०० कैदी पकडले. शिवाय त्यांना यातून १५० लक्ष होनांची लुटही मिळाली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १२ नोव्हेंबर १६८३ किल्ले फोंड्यावर प्रचंड...

११ नोव्हेंबर १६७५छत्रपती शिवरायांनी "सातारा" प्रांत जिंकला.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ११ नोव्हेंबर १६५७ औरंगजेबची पत्नी दिलरास बानूचे निधन औरंगजेबाने तख्त काबीज करण्याचा जणू चंगचं बांधला. तो बिदरहून उत्तरेकडे झेपावण्याकरिता संधी शोधत होता आणि त्याला ती मिळाली. ११ नोव्हेंबर, १६५७ रोजी त्याची पत्नी दिलरास बानू त्याच्या पाचव्या मुलास जन्म देताना मरण पावली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ११ नोव्हेंबर १६५९ छत्रपती शिवरायांनी अफझलखानाला ठार मारले आणि नंतर लगेच त्यांनी "वाई" सोडली. त्यांच्या घोड्यांच्या टापा वळाल्या त्या थेट कराडच्या दिशेने. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ११ नोव्हेंबर १६७५ छत्रपती शिवरायांनी "सातारा" प्रांत जिंकला. ११ नोव्हेंबर १६७५ रोजी सातारा काबीज झाला. महाराज साताऱ्यात गेले आणि गंभीर आजारी झाले. या आजराचे स्वरूप एवढे भयंकर होते की, त्यांच्या मृत्यूची अफवा झाली.  🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ११ नोव्हेंबर १६७५ विजापूरचा सरसेनापती बहलोलखान खवासखानाचे कोणतेच हुकुम पाळीत नव्हता. खावासखानाने अफगाण गटाचा बिमोड करण्यासाठी गुप्तपणे मोगलांचा दक्षिण सुभ्याचा सुभेदार बहादुरखान यास मदत मागितली. तसे बहादूरखान १९ ऑक्टोबर १६७५...

२४ऑक्टोंबर १६५७ साली कल्याण भिवंडीच्या लढाईत छत्रपती शिवरायांचा विजय होऊण, मराठा आरमार बंधणीला सुरवात झाली.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २४ ऑक्टोबर १६२४ भातवडी येथे मोगलांचा सुभेदार लष्करखान व आदिलशाही मुल्ला महंमद ह्या दोघांच्या छावणीवर मलिक अंबरच्या सैन्याचा अचानक हल्ला झाला व मलिक अंबराने त्या दोघांच्या पाडाव केला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २४ ऑक्टोबर १६५७ शिवाजी महाराजांनी उत्तर कोकणात मुसंडी मारत कल्याण - भिवंडी - शहापुर हा मूघली-विजापुर भाग काबीज केला. औरंगजेब दख्खनेवरुन दिल्लीला परतलेला आणि विजापुरच्या आदिलशहाचा मृत्यू ह्या १६५७ च्या सुरवातीच्या दख्खनेमधल्या राजकीय परिस्थितीचा फायदा उचलत शिवरायांनी उत्तर कोकण काबीज केले. १६५६ च्या जानेवारी मध्येच जावळी ते रायरी हा भाग ताब्यात घेत विजापुरचा उत्तर कोकणाशी थेट संपर्क त्यांनी जवळ-जवळ तोडला होताच. २४ऑक्टोंबर १६५७ साली कल्याण भिवंडीच्या लढाईत शिवरायांचा विजय होऊण, मराठा आरमार बंधणीला सुरवात  झाली. सागरावर प्रभुत्व निर्माण करावयाचे आसेल तर बलशाली आरमार (Navy) ऊभारले पाहीजे ही बाब शिवरायांच्या लक्षात आली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २४ ऑक्टोबर १६६६ आग्राच्या सुटकेनंतर, शिवाजी सुटला आता प्रतिशिवाजी सुटू नये या विचाराने औरंगजेबान...