Posts

भारतीय अमृतमहोत्सवी स्वतंत्रता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐☺️💐

Image
भारतीय अमृतमहोत्सवी स्वतंत्रता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐☺️💐

श्री शिवछत्रपतींचे सरदार पाटणकरांना लिहिलेले पत्र 🚩

Image
श्री शिवछत्रपतींचे सरदार पाटणकरांना लिहिलेले पत्र 🚩 सन १६५९ सालीच अफझलखान वधानंतर शिवाजी महाराजांनी वाई -प्रतापगडापासून कोल्हापूर-पन्हाळ्यापर्यंतचा प्रदेश हिंदवी स्वराज्यात सामील करून घेतला, त्यावेळीच पाटण खोरे व तेथील वतनदार पाटणकर देशमुख स्वराज्यात रुजू झाले असणार. तथापि आपणास या कालातील पाटणकरांची कागदपत्रे मिळत नाहीत. महाराजांचे पाटणकरांना लिहिलेले सन १६७८ सालचे एक पत्र उपलब्ध आहे. त्यावरून पाटणकर घराण्यातील यशवंतराव, बाळाजीराव व चांदजीराव पाटणकर अशा तीन पुरुषांची नावे आपणास ज्ञात होतात. पैकी यशवंतराव 'झगडियात' म्हणजे लढाईत मारला गेला, म्हणून महाराजांनी बाळाजीराव व चांदजीराव यांचे सांत्वन करण्यासाठी हे पत्र लिहिले आहे. ही लढाई केव्हा, कुठे किंवा कुणाशी झाली, हे समजून येत नाही. पण ज्या अर्थी महाराजांनी आस्थेने सांत्वनपर पत्र पाठवले आहे, त्या अर्थी ही लढाई स्वराज्य रक्षणासाठी अथवा कर्नाटक ( दक्षिणदिग्विजय ) मोहिमेतील स्वराज्यवृद्धीसाठी घडून आली असावी, असा तर्क करण्यास जागा आहे. ● छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्रातील शब्द  पत्रात महाराज म्हणतात, " ऐसीयास तुम्ही मानाचे धण

*रोड हिप्नोसिस* म्हणजे काय?

*आज सकाळी सकाळीच विनायक मेटेंचा अपघात झाला.* अतिशय दुःख झाले. मेटे साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली.               अपघात कशामुळे झाला हे माहीत नाही पण बऱ्याच वेळेला नेहमी जे घडतं त्याची माहिती असावी म्हणून ही माहिती.. *रोड हिप्नोसिस* म्हणजे काय?       *रोड संमोहन* ही एक शारीरिक स्थिती आहे ज्याची बहुतेक चालकांना माहिती नसते.  रस्त्यावर वाहन चालवतांना साधारण पणे २.५ तासांनी रोड हिप्नोसिस सुरू होते.  संमोहीत चालकाचे डोळे उघडे असतात, पण मेंदू क्रियाशील राहत नाही आणि डोळा काय पाहतो त्याचे विश्लेषण करत नाही, परिणाम *रोड हिप्नोसिस.*  तुमच्यासमोर उभ्या असलेल्या वाहनाला किंवा ट्रकला मागील बाजूस धडकून अपघात होण्याचे पहिले कारण आहे.        *रोड हिप्नोसिस* असलेल्या ड्रायव्हरला टक्कर होईपर्यंत शेवटच्या १५ मिनिटांत काहीही आठवत नाही. तो कोणत्या वेगाने जात आहे, किंवा समोरून येणाऱ्या गाडीच्या वेगाचे विश्लेषण करू शकत नाही,  सहसा टक्कर १४० किमी पेक्षा जास्त वेगाने असते.  रोड हिप्नोसिसपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी दर २.५ तासांनी चालकाने थांबावे, चहा किंवा कॉफी घ्यावी, थोडी विश्रांती घ्यावी, ५/६ मिनिटे चा

आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳#१५_ऑगस्ट_१९४७

आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳 #१५_ऑगस्ट_१९४७ #भारतीय_स्वातंत्र्य_दिन १५० वर्षे गुलामगिरीच्या पारतंत्र्यात खितपत पडलेला भारत देश असंख्य क्रांतीकारकांच्या बलिदानामुळे आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानामुळे स्वतंत्र झाला. देशाविषयी प्रेम, त्याच्या सन्मानाचे प्रतीक असणाऱ्या तिरंगी ध्वजाप्रती आदर व्यक्त करण्याचा राष्ट्रीय उत्सव म्हणजे स्वातंत्र्य दिन! अशा या स्वातंत्र्यदिनाच्या सर्व भारतीयांना मनःपूर्वक शुभेच्छा! 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१५_ऑगस्ट_१६५६ शिवाजीराजांचा गायकवाड घराण्यातील कन्येशी विवाह ठरला ! शिवाजीराजांची ही सहावी सोयरीक. या धर्मपत्नीचे नाव होते सकवारबाई, हा विवाह प्रत्यक्षात १० जानेवारी १६५७ रोजी झाला. शिवाजीराजांना सकवारबाईंपासुन कमलाबाई नावाची एक मुलगी होती. महाराजांना त्यांच्या थोरल्या पत्नी सईबाईंपासुन एक मुलगी होती तिलाही सकवारबाई किंवा सखूबाई असे म्हणत. गायकवाड घराण्यातील सकवारबाई या शिवाजीराजे व त्यांच्या इतर सात राण्यांच्या निधनानंतरही हयात होत्या. 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩 #१५_ऑगस्ट_१६६० शाईस्तेखानाने चाकणचा संग्रामदुर्ग जिंकला सुमारे ५५ दिवसां

संस्थानकालीन जमीन रचना💐💐💐💐 करवीर संस्थानात जमिनीचा ताबा तीन वर्गात विभागला जातो.

💐💐💐 संस्थानकालीन जमीन रचना💐💐💐💐            करवीर संस्थानात जमिनीचा ताबा तीन वर्गात विभागला जातो.             प्रथम वर्ग देवस्थान व धर्मादाय जमिनी यावर कोणताही आकार घेतला जात नसे.             द्वितीय वर्ग अर्जी इनाम, दये खातर किंवा बक्षीस दिलेल्या जमिनी, रान्डरोटी लढाईत धारातीर्थी ती पडलेल्या शिपाई कुटुंबांना दिलेल्या जमिनी चोळी बांगडी साठी विधवा स्त्रियांना जमिनी दिला जात, गुळकरी जमीन ही सरकारी सेवेसाठी थोडा आकार घेऊन दिली जात असे.             तृतीय वर्ग सरंजाम जमिनी फौजेसाठी, इनाम जमिनी बक्षीस म्हणून, हुजूर सनदी व गाव सनदी जमिनी अधिकाऱ्यांना सेवेसाठी तसेच बलुतेदार, ग्रामीण चाकरी व महारकी साठी जमिनी सुद्धा दिल्या जात.              छत्रपतींच्या राज्यात सेवा करणाऱ्या सेवक वर्गात जमिनी दिला जात त्यांना हुद्दे मिळत असत त्यामध्ये मिराशी, रयतावा, उपरी रयतावा व वतनी रयतावा हे प्रमुख प्रकार असत.               इचलकुंड, कायम करा र, जमिनीचा आकार भरणारे, मुक्ती खंड, वार्षिक करार, इस्तावा(बदलणाऱ्या आकाराच्या जमिनी), भाग जमीन, उत्पन्नाचा वाटा देणाऱ्या जमिनी, सनदीचा नावावरील कुरडावा जमिनी अशा प

वेल्लोर जिल्ह्यात एक वीरगळ नुकताच सापडला आहे.

Image
वेल्लोर जिल्ह्यात एक वीरगळ नुकताच सापडला आहे, वीरगळ अनेकांचे असतात व गावातील पशुधन रक्षण करताना जे "गावकरी" धारातीर्थी पडले त्यांच्या स्मरणार्थ असतात , ते गावगाड्यातील विविध जातींपैकी असत, अर्थात काही जण फक्त गोधन रक्षण वीरगळच असतात असे मानतात, वेल्लोर जिल्ह्यातील हा वीरगळ अनेक बाण लागून पडलेल्या वीराचा आहे, त्यावरील लेख स्पष्ट नोंदवितो की म्हशींचे रक्षण करण्यासाठी तो वीर धारातीर्थी पडला, तेव्हा श्री मावळी वनरायर याचं राज्य होते. म्हशी ह्या सिंधुजनांच्या संस्कृती मधील , सतत फक्त गोधन म्हणजे प्राचीन संस्कृती असे मांडताना या प्राण्यांचे भारतातील योगदान दुर्लक्षित राहते ,त्या दृष्टीने हा वीरगळ लेख महत्त्वाचा नीरज सर 

भोसले घराण्याचे कुलवृत्त-

भोसले घराण्याचे कुलवृत्त- अल्लाउद्दीन खिलजीने स्वरूपसुंदर पद्मावतीच्या लोभाने इ.स. १३०३ मध्ये चित्तोडवर सवारी केली. त्यावेळी झालेल्या लढाईत चित्तोडचा राणा लक्ष्मणसिंह आपल्या सात पुत्रासह मारला गेला. त्या प्रलयातून त्याचा जिवंत राहिलेला अजय नावाचा मुलगा चित्तोडच्या गादीचा मालक झाला .त्याला सजनसिंह व क्षेमसिंह नावाचे दोन मुलगे होते. परंतु अजयसिंहाने आपला पुतण्या हमीर याला राज्याचा वारस ठरविले. त्यामुळे सजनसिंह व क्षेमसिंह हे बंधू देशत्याग करून दक्षिणेत आले. भोसल्यांच्या पूर्वजाविषयी अधिक माहिती बहामनी सुलतानांनी दिलेल्या फर्मानावरून मिळते. “दिल्‍लीच्या महमदशहा तुघलकाने दक्षिणेत सवारी केली. त्यावेळी तुघलक व हसन गंगू या दोघांमध्ये झालेल्या संग्रामात सजनसिंह व त्याचा मुलगा दिलीपसिंह यांनी मोठा पराक्रम केला. इ.स. १३४७ मध्ये बहामनी राज्याची स्थापना झाल्यानंतर हसनगंगूने सजनसिहांस देवगिरी प्रांतातील मिरजची जहागिरी बहाल केली.” (संदर्भ-हिंदवी स्वराज्याचे जनक) विजयनगरच्या राजाबरोबर झालेल्या लढायात बजावलेल्या कामगिरीबदल सजनसिंहाचा मुलगा दिलीपसिंह याला हसनगंगू बहामनीने मीरजच्या जोडीला आणखी दहा गावे