संस्थानकालीन जमीन रचना💐💐💐💐 करवीर संस्थानात जमिनीचा ताबा तीन वर्गात विभागला जातो.
💐💐💐 संस्थानकालीन जमीन रचना💐💐💐💐
करवीर संस्थानात जमिनीचा ताबा तीन वर्गात विभागला जातो.
प्रथम वर्ग देवस्थान व धर्मादाय जमिनी यावर कोणताही आकार घेतला जात नसे.
द्वितीय वर्ग अर्जी इनाम, दये खातर किंवा बक्षीस दिलेल्या जमिनी, रान्डरोटी लढाईत धारातीर्थी ती पडलेल्या शिपाई कुटुंबांना दिलेल्या जमिनी चोळी बांगडी साठी विधवा स्त्रियांना जमिनी दिला जात, गुळकरी जमीन ही सरकारी सेवेसाठी थोडा आकार घेऊन दिली जात असे.
तृतीय वर्ग सरंजाम जमिनी फौजेसाठी, इनाम जमिनी बक्षीस म्हणून, हुजूर सनदी व गाव सनदी जमिनी अधिकाऱ्यांना सेवेसाठी तसेच बलुतेदार, ग्रामीण चाकरी व महारकी साठी जमिनी सुद्धा दिल्या जात.
छत्रपतींच्या राज्यात सेवा करणाऱ्या सेवक वर्गात जमिनी दिला जात त्यांना हुद्दे मिळत असत त्यामध्ये मिराशी, रयतावा, उपरी रयतावा व वतनी रयतावा हे प्रमुख प्रकार असत.
इचलकुंड, कायम करा र, जमिनीचा आकार भरणारे, मुक्ती खंड, वार्षिक करार, इस्तावा(बदलणाऱ्या आकाराच्या जमिनी), भाग जमीन, उत्पन्नाचा वाटा देणाऱ्या जमिनी, सनदीचा नावावरील कुरडावा जमिनी अशा प्रकारच्या जमिनी असत यांचा ताबा पूर्ण नसून कसणाऱ्यास व सरकारास उत्पन्न मिळत असे.
याशिवाय सरकारकडून देवस्थान, धर्मादाय, बाबतेदार, हुजूर हकदार, महल हकदार, सनदी कुरी व गाव खत इत्यादी प्रकारच्या जमिनी वाटल्या जात असत.
राजाराम महाराजांच्या काळात सरंजामशाही महाराष्ट्रात पुन्हा सुरू झाली सरंजामदार वंशपरंपरेने आपल्या नावे जमिनी करून ठेवू लागले. जमिनीची मालकी व उपयोग हे त्या काळातील महत्त्वाचे साधन होते.
अशा प्रकारे जमिनीबद्दल माहिती विविध पुस्तकातून मिळते.
संकलन नाना सावंत साळुंखे शिवगर्जना प्राचीन युध्दकला प्रशिक्षण संस्था कोल्हापूर.
Comments
Post a Comment