भोसले घराण्याचे कुलवृत्त-

भोसले घराण्याचे कुलवृत्त-

अल्लाउद्दीन खिलजीने स्वरूपसुंदर पद्मावतीच्या लोभाने इ.स. १३०३ मध्ये चित्तोडवर सवारी केली. त्यावेळी झालेल्या लढाईत चित्तोडचा राणा लक्ष्मणसिंह आपल्या सात पुत्रासह मारला गेला. त्या प्रलयातून त्याचा जिवंत राहिलेला अजय नावाचा मुलगा चित्तोडच्या गादीचा मालक झाला .त्याला सजनसिंह व क्षेमसिंह नावाचे दोन मुलगे होते. परंतु अजयसिंहाने आपला पुतण्या हमीर याला राज्याचा वारस ठरविले. त्यामुळे सजनसिंह व क्षेमसिंह हे बंधू देशत्याग करून दक्षिणेत आले.

भोसल्यांच्या पूर्वजाविषयी अधिक माहिती बहामनी सुलतानांनी दिलेल्या फर्मानावरून मिळते.

“दिल्‍लीच्या महमदशहा तुघलकाने दक्षिणेत सवारी केली. त्यावेळी तुघलक व हसन गंगू या दोघांमध्ये झालेल्या संग्रामात सजनसिंह व त्याचा मुलगा दिलीपसिंह यांनी मोठा पराक्रम केला. इ.स. १३४७ मध्ये बहामनी राज्याची स्थापना झाल्यानंतर हसनगंगूने सजनसिहांस देवगिरी प्रांतातील मिरजची जहागिरी बहाल केली.” (संदर्भ-हिंदवी स्वराज्याचे जनक)

विजयनगरच्या राजाबरोबर झालेल्या लढायात बजावलेल्या कामगिरीबदल सजनसिंहाचा मुलगा दिलीपसिंह याला हसनगंगू बहामनीने मीरजच्या जोडीला आणखी दहा गावे बक्षिस दिल्याचे फर्मान काढले ( इ.स.१३५२) त्यामध्ये दिलीपसिहांला “राणा" व "सरदार- ३ - खासखल" असे किताब दिले.

अल्लाउद्दीन अहमदशहा हा एकदा शिकारीस गेला असता विजयनगरच्या सैन्याच्या एका तुकडीने त्याला गराडा घातला. त्यावेळी वरील भोसाजीचा नातू उग्रसेन याने अल्लाउद्दीन अहमदशहाची मोठया शिताफीने सुटका केली, याबाबत उल्लेख ३ सप्टेंबर १४२४ च्या फर्मानात आहे.

उग्रसेनाला कर्णसिंह व शुभकृष्ण असे दोन मुलगे होते. महमंद गवानाने १४८९ मध्ये खेळणा किल्ल्यावर स्वारी केली, त्यावेळी त्याच्याबरोबर कर्णसिंह व आपला मुलगा भीमसिंह यासह गेला होता. कर्णसिंहाने घोरपड लावून किल्ला सर केला. परंतु तो लढाईत ठार झाला. महमंदशहा बहामनीने क्षेमसिहांस राजा घोरपडे बहाहर” हा किताब व मुधोळची जहागिर बक्षिस दिली. त्यावेळेपासून या भोसलेवंश शाखेस ''घोरपडे'' हे नाव प्राप्त झाले. “दक्षिणेत आलेल्या सजनसिंहाच्या या वंशात सात पिढ्या झाल्यानंतर भोसले व घोरपडे अशा दोन शाखा निर्माण झाल्या व त्यांचे वेल स्वतंत्रपणे वेगवेगळ्या ठिकाणी विस्तार पावले”

शहाजींचा समकालीन जयराम कविनेही राणा दिलीपाच्या कुळात मालोजीचा जन्म झाला असे त्याच्या काव्यात वर्णन केलेलं आहे.(संदर्भ-जयराम पिंड्येकृत राधामाधवविलासपंचू)

-त्र्यंबक रामराव लांडे पाटील, (शोधप्रबंध- शहाजी महाराज- एक चिकित्सक अभ्यास,२००२)

Repost- @maratha_riyasat 

पोस्ट - @sarsenapati_santaji_ghorpade

#घोरपडे_घराण्याचा_इतिहास
#santajighorpade 
#ghorpade

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४