आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳#१५_ऑगस्ट_१९४७
आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳
#१५_ऑगस्ट_१९४७
#भारतीय_स्वातंत्र्य_दिन
१५० वर्षे गुलामगिरीच्या पारतंत्र्यात खितपत पडलेला भारत देश असंख्य क्रांतीकारकांच्या बलिदानामुळे आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानामुळे स्वतंत्र झाला.
देशाविषयी प्रेम, त्याच्या सन्मानाचे प्रतीक असणाऱ्या तिरंगी ध्वजाप्रती आदर व्यक्त करण्याचा राष्ट्रीय उत्सव म्हणजे
स्वातंत्र्य दिन!
अशा या स्वातंत्र्यदिनाच्या सर्व भारतीयांना मनःपूर्वक शुभेच्छा!
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#१५_ऑगस्ट_१६५६
शिवाजीराजांचा गायकवाड घराण्यातील कन्येशी विवाह ठरला ! शिवाजीराजांची ही सहावी सोयरीक.
या धर्मपत्नीचे नाव होते सकवारबाई, हा विवाह प्रत्यक्षात १० जानेवारी १६५७ रोजी झाला. शिवाजीराजांना सकवारबाईंपासुन कमलाबाई नावाची एक मुलगी होती.
महाराजांना त्यांच्या थोरल्या पत्नी सईबाईंपासुन एक मुलगी होती तिलाही सकवारबाई किंवा सखूबाई असे म्हणत.
गायकवाड घराण्यातील सकवारबाई या शिवाजीराजे व त्यांच्या इतर सात राण्यांच्या निधनानंतरही हयात होत्या.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
#१५_ऑगस्ट_१६६०
शाईस्तेखानाने चाकणचा संग्रामदुर्ग जिंकला सुमारे ५५ दिवसांच्या प्रखर संघर्षानंतर हाती आलेला संग्रामदुर्गाची पाहणी करण्यासाठी शाहिस्तेखान किल्ल्यावर आला.
संपूर्ण पाहणी करून त्याने या किल्ल्याचे नाव ठेवले "इस्लामगड".
या किल्ल्यासाठी मोगली फ़ौजेला मराठी सरदार फ़िरंगोजी नरसाळ्याशी प्रखर संघर्ष करवा लगला होता.
किल्ल्याचा बुरूज उडवून बालेकिल्ल्यात घुसलेल्या २०००० मोगली फ़ौजेपुढे ५००-७०० मराठे झुंजत होते.
फ़िरंगोजीच्या या शौर्यावर निहायत खूश होवून खानाने त्याला आपल्याला मिळण्याचे आवाहन केले पण फ़िरंगोजी बधला नाही तो राजांकडे राजगडावर निघून गेला.
५५ दिवस खान या एका भुईकोट किल्ल्याशी झुंजत होता प्रचंड फ़ौजेनिशी आणि मूठभर मावळ्यांविरोधात...
तरिही या लढाईत खानाचे २६८ हशम ठार तर सुमारे ६०० जखमी झाले होते यालाच म्हणतात मराठी रक्त.
किल्ला हातातून गेला तरी पराक्रमावर खुश होउन शिवाजी राजांनी फिरंगोजी नरसाळा यांना भूपाळगडाची किल्लेदारी, एक भरजरी दुशेला व एक मानाची तलवार भेट दिली.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#१५_आॅगस्ट_१६६६
छत्रपती शिवरायांनी आग्रा कैदेत असताना आपली मौलिक संपत्ती वस्तू, जडजवाहीर मुलुकचंद सराफामार्फत स्वराज्याकडे पाठवून दिली. आग्रा शहरात या घडामोडी घडत होत्या लवकरच आग्रा सोडून दक्खनेत निघण्याची गुप्त खलबते राजांच्या डोक्यात चालू होती.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#संदर्भ_सह्याद्रीचे_अग्निकुंड
#सहयाद्री_प्रतिष्ठान_महाराष्ट्र_राज्य
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
Comments
Post a Comment