आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*१० ऑगस्ट १६००*
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१० ऑगस्ट १६००* अकबर बादशहाने अहमदनगर जिंकले अहमदनगर ही निजामशहाची राजधानी होती. इस १५९५ मधे बुर्हाण निजामशहा मरण पावला व निजामशाहीत गादीविषयी तंटे सुरु झाले. मात्र इथे एक गडबड अशी झाली की, वजीराने गुजरातचा अंमलदार शहजादा मुराद याच्याकडे मदत मागितली. हा मुराद अकबराचा मुलगा होता. इस १५५६ मधे मुघल बादशहा बनल्यानंतर अकबराने अनेक पराक्रम करून मुघल साम्राज्यात काश्मीर, काबुल, कंदाहार, सिंध असे अनेक प्रदेश जोडले. मात्र दख्खन मोहिमेमधे १५९५ सुमारास त्याचा पराभव झाला होता. आता यावेळी दख्खनमधे शिरकाव करण्याची हिच संधी आहे हे ओळखुन अकबराने मुरादला अहमदनगरला जायची परवानगी दिली. मीर्झाखान व मुरादच्या फौजेने येऊन अहमदनगरला वेढा घातला. मात्र गेली काही वर्षे स्वपराक्रमाने निजामशाही टिकवुन ठेवणारी चांदबिबी यावेळी कंबर कसुन उभी राहिली. ही चांदबिबी म्हणजे निधन पावलेल्या बुर्हाण निजामशहाची सख्खी बहीण होय. तिचा निकाह विजापुरचा पहिला आदिलशहा याच्याशी होऊन ती काही वर्षे विजापुरलाच होती. मात्र पुढे काही कारणाने ती परत तिच्या माहेरी निजामशाहीत आली