आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*३ ऑगस्ट

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*३ ऑगस्ट १३४७*
दिल्लीचा सुलतान मुहम्मद तुघलख याच्या कारकिर्दीत दक्षिणेत जाफरखान उर्फ अल्लाउद्दीन हसन याने बंड करून गुलबर्गा इथे ३ ऑगस्ट १३४७ ला बहामनी राज्याची स्थापना केली. या बहामनी राज्यात १३४७ ते १५३८ या काळात एकूण १८ सुलतान होऊन गेले. बहामनी राज्यातील १४ वा सुलतान शिहाबुद्दीन महमूद याच्या कारकिर्दीच्या दरम्यान बहामनी सत्तेचा कर्तबगार वजीर महंमद गवान याची हत्या झाल्यानंतर बहामनी सत्तेचे  वेगवेगळे सुभेदार जसे युसुफ आदिलखान (आदिलशाही), फतहुल्लाह इमाद (इमादशाही), कुत्ब उल्मुख (कुतुबशाही), अमीर कासीम बरीद (बरीदशाही) व मलिक अहमद बहिरी (निजामशाही) यांनी बहामनी सत्तेतून बाहेर पडत आपली स्वतंत्र राज्ये स्थापन केली. यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यस्थापनेच्या कामी महत्वाचा अडसर राहिला तो विजापूरच्या आदिलशाहीचा.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

*३ आगस्ट १६६४*
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा आरमाराच्या हेरांनी आणलेल्या माहितीवरून पोर्तुगीज व मोगली आरमाराचा समाचार घेण्यासाठी दहा दहा गलबतांचा ताफा रवाना झाला.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

*३ आॅगस्ट १६७७*
"दक्षिण दिग्विजय मोहीम"
दक्षिण मोहीमेदरम्यान छत्रपती शिवरायांचा "वृद्धाचलम" येथे मुक्काम.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*३ आॅगस्ट १९००*
क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती
स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, ’पत्री सरकार’चे (प्रति सरकार) संस्थापक आणि कम्युनिस्ट पक्षाचे खासदार (मृत्यू: ६ डिसेंबर १९७६)

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४