आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*७ आॅगस्ट १६४८*महाराज किल्ले पुरंदर पाहण्यासाठी गडाव

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*७ आॅगस्ट १६४८*
महाराज किल्ले पुरंदर पाहण्यासाठी गडावर ! 
किल्ले पुरंदराची अभेद्यता व भव्यता पाहून महाराज बहोत खूष झाले. भविष्यात हा गड फार उपयोगी व महत्वाचा आहे. हे जाणून महाराजांनी अनेक डागडुजी आणि शिबंदीसाठी योग्य ती व्यवस्था करण्यास सांगितले.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

*७ आॅगस्ट १६७५*
छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनी "कोल्हापूर" जिंकले.
आजच्या दिसशी कोल्हापुर स्वराज्यात दाखल झाले.
कोल्हापूर परिसरावर विजापूरच्या आदिलशहाची अनेक वर्षे सत्ता होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी मार्च १६७३ मध्ये पन्हाळा जिंकून स्वराज्यात आणला, तसेच १६७५ मध्ये कोल्हापूर परिसर खऱ्या अर्थाने जिंकून आपल्या अखत्यारीत आणला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*७ आॅगस्ट १६७९*
छत्रपती शिवरायांच्या सूचनेवरून "खांदेरी-उंदेरी" किल्ल्यावर गोड्या पाण्याचे झरे खोदून तिथे विहीरी बांधण्याचे काम चालू झाले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*७ आॅगस्ट १६८८*
स्वराज्य गिळंकृत करण्यासाठी औरंगजेब बादशहाने आपले मातब्बर मोहरे पाठविले. छत्रपती संभाजी महाराजांचा मुलुख जिंकण्यासाठी औरंगजेब बादशहाने मुल्तफतखान व त्याच्या बरोबर बरवा बलंदखान, मुल्तफखानाचा भाचा फजलुल्ला, व नागोजी ५ हजारी मनसबदार यांना पाठविले. नुकत्याच जिंकलेल्या सरसगड किल्ल्यावर सय्यद अब्दुल्लाखान याची नेमणूक करण्यात आली. मुल्तफखानाच्या फौजेत महादजी (महादजी निंबाळकर) यांचे ४०० स्वार तैनात करण्याचा हुकुम झाला.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

*७ ऑगस्ट १७९०*
पानिपतच्या लढाईनंतर उत्तरेत मराठ्यांचा जम बसवण्याची महत्वपूर्ण कामगिरी केली ती सरदार महादजी शिंदे यांनी. दिल्ली काबीज करण्याच्या उद्देशाने महादजींनी आपली फौज एकत्र करून दिल्लीवर आक्रमण केले. दिल्ली यावेळी अफगाण व रोहिल्यांच्या ताब्यात होती. महादजींनी दिल्ली ताब्यात घेतली व इंग्रजांच्या आश्रयाला गेलेल्या शहाआलमला परत आणून त्याला दिल्लीच्या गादीवर बसवले. पण महादजींचे हे वर्चस्व बादशहाचे काही सरदार व राजपुताना मानवले नाही, त्यांनी एकत्र येऊन २९ जुलैला लालसोटच्या लढाईत महादजींचा पराभव केला. यानंतर पानिपतचा सूत्रधार नजीबखानाचा नातू गुलाम कादिर आणि इस्माईल बेग यांनी बादशहा शहाआलम ला पदच्युत करून त्याचे डोळे काढले व त्याच्या जागी बिदर बख्तला गादीवर बसवले. महादजींनी हार न मानता पुन्हा सैन्य जमवून दिल्लीवर हल्ला करून दिल्ली ताब्यात घेतली आणि गुलाम कादरला कैद करून ठार मारले आणि पुन्हा अंध शहाआलमला गादीवर बसवले. शहाआलमने खुश होऊन संपूर्ण राज्यात गोवधबंदी जाहीर केली व मथुरा व वृंदावन ही पवित्र स्थळे महादजींना देण्यासंबंधीचे फर्मान काढले. या फर्मानाची तारीख होती ७ ऑगस्ट इ.स.१७९०

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४