आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*१० ऑगस्ट १६००*

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१० ऑगस्ट १६००*
अकबर बादशहाने अहमदनगर जिंकले
अहमदनगर ही निजामशहाची राजधानी होती. इस १५९५ मधे बुर्हाण निजामशहा मरण पावला व निजामशाहीत गादीविषयी तंटे सुरु झाले. मात्र इथे एक गडबड अशी झाली की, वजीराने गुजरातचा अंमलदार शहजादा मुराद याच्याकडे मदत मागितली. हा मुराद अकबराचा मुलगा होता. इस १५५६ मधे मुघल बादशहा बनल्यानंतर अकबराने अनेक पराक्रम करून मुघल साम्राज्यात काश्मीर, काबुल, कंदाहार, सिंध असे अनेक प्रदेश जोडले. मात्र दख्खन मोहिमेमधे १५९५ सुमारास त्याचा पराभव झाला होता. आता यावेळी दख्खनमधे शिरकाव करण्याची हिच संधी आहे हे ओळखुन अकबराने मुरादला अहमदनगरला जायची परवानगी दिली. मीर्झाखान व मुरादच्या फौजेने येऊन अहमदनगरला वेढा घातला. मात्र गेली काही वर्षे स्वपराक्रमाने निजामशाही टिकवुन ठेवणारी चांदबिबी यावेळी कंबर कसुन उभी राहिली. ही चांदबिबी म्हणजे निधन पावलेल्या बुर्हाण निजामशहाची सख्खी बहीण होय. तिचा निकाह विजापुरचा पहिला आदिलशहा याच्याशी होऊन ती काही वर्षे विजापुरलाच होती. मात्र पुढे काही कारणाने ती परत तिच्या माहेरी निजामशाहीत आली होती. याही वेळी तिने मुघलांच्या नाकी नऊ आणले. मात्र दोन्हीकडच्या फौजा जेरीस आल्याने वर्हाड प्रांत चांदबिबीने मुघलांना तह करून दिला. मात्र प्रत्यक्षात त्याचा ताबा मुघलांना मिळाला नाही. त्यातच मीर्झाखान शत्रूला फितुर झाला आहे या संशयावरून अकबराने त्याला परत बोलावुन त्याचा नवरत्नांपैकी एक जिवलग अबुल फजलला नगरकडे धाडले. मात्र लवकरच शहजादा मुराद मोहिमेवर असतानाच अचानक मरण पावला. तेव्हा पुढे नेतृत्व चालु ठेवण्यासाठी व अहमदनगर काबीज होत नाहीये हे पाहुन अबुल फजलने अकबरालाच दख्खनमधे येण्याची विनंती केली. अकबर गेली १४ वर्षे सिंधू नदीच्या परिसरात रहात होता. तिथुन तो आग्र्याला येऊन नंतर प्रथमच नर्मदा नदी ओलांडून दख्खनमधे आला. तोपर्यंत दौलताबादचा (मुळचे देवगिरी) किल्ला मुघल सैन्याने जिंकुन घेतला होता. त्यात परत गडबड अशी झाली की, निजामशाहीतीलच काही शत्रूंनी व फितूरांनी पराक्रमी चांदबिबीचा दगाबाजीने जुलै १६०० मधे खून केला आणि मुघलांच्या मार्गातील मुख्य अडसर दूर झाला आणि १० ऑगस्ट १६०० रोजी शहजादा दानियाल व खान ई खानान यांनी निजामशाही राजधानी अहमदनगर जिंकले. मात्र तरीही संपूर्ण अहमदनगर अकबराला जिंकता आले नाही कारण आता चांदबिबीच्या जागी एक निजामशाहीतील पराक्रमी सरदार मलिक अंबर  मुघलांविरूद्ध लढायला उभा राहिला. लवकरच त्याने अहमदनगर व दौलताबाद पुन्हा मुघलांकडुन जिंकुन घेतले व पुढे बरेच वर्षे निजामशाहीत वजिरी केली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१० आॅगस्ट १६६०*
"छत्रपती शिवराय" किल्ले पन्हाळ्याच्या वेढ्यातून निसटल्यावर त्यांच्या पाठलागावर "सिद्दी जौहर" स्वराज्यात शिरला होता.
त्याला जशास तसे उत्तर देण्यासाठी महाराजांनी मावळ्यांना काही सूचना देऊन मावळ्यांची एक तुकडी सिद्दी जौहरचा सामना करण्यासाठी पाठवली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१० आॅगस्ट १६६६*
"छत्रपती शिवराय" आग्रा कैदेत असताना त्यांनी आजपासून आजारपणाचे सोंग घेतले. त्यांच्या या व्यूहरचनेची औरंगजेब बादशहाला कसलीही कल्पना नव्हती.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१० आगस्ट १६८०*
इंग्रजांच्या वखारीत दंगल ! 
सिद्दीच्या लोकांची दंडेली सुरूच होती. एका प्रकरणात सिद्दी यांना एका इंग्रज सराफाकडून १८ हजार अशरफ्या घ्यावयाच्या होत्या, त्यासाठी इंग्रजांच्या बरोबरच्या वादात वखारीत दंगल झाली. अखेर इंग्रजांनी तोफा डागल्या तेव्हा सिद्दीचे लोक पळून गेले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१० आॕगस्ट १७४९*
चावंड किल्ल्याचा हवालदार संताजी मोहिते याच्या सनदेत किल्ला मुघलांकडून घेतल्याचा उल्लेख आहे आणि सुटलेल्या जिनसाची मोठी यादी जोडली आहे. यात भांडी, घरगुती, वस्तू, हत्यारे, पाळीव प्राणी यांची नोंद आहे.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१० ऑगस्ट १७५५*
थोरल्या माधवरावाचा धाकटा भाऊ नारायणराव पेशव्यांचा जन्म. 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१० आॅगस्ट इ.स.१७६०*
सदाशिवराव भाऊसाहेबांनी दिल्ली काबीज करून दिनांक १० ऑगस्ट सन १७६० रोजी परागंदा झालेल्या बादशहाच्या पुत्र शहजादा जवानबख्त याला वलीअहद म्हणजे युवराज बनवले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१० आॅगस्ट १७६३*
१० आॅगस्ट १७६३ ला मराठे व निजाम यांच्यात लढाई झाली, त्यात निजामाचा दारूण पराभव झाला. लढाईत राघोबादादा आणि माधवराव सहभागी होते. 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४