⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *३१ डिसेंबर १६००* ३१ डिसेंबर १६०० ला एलिझाबेथ राणीने ईस्ट इंडिया कंपनीला पंधरा वर्षांच्या कराराने अतिपूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याची सनद दिली. डचांच्या अतिपूर्वेकडील मसाल्याच्या फायदेशीर व्यापाराला शह देण्यासाठी सप्टेंबर १५९९ मध्ये लंडनमधील व्यापाऱ्यांनी एक संघटना स्थापन केली. देशातील भागधारकांकडून ३,००,००० पौंडांचे भांडवल जमवले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *३१ डिसेंबर १६६३* छत्रपती शिवराय सुरतवर छाप्यासाठी जाताना वाटेत ३१ डिसेंबर रोजी त्यांनी त्र्यंबकेश्वर येथे महापूजा व दानधर्म केला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *३१ डिसेंबर १६७९* जलदुर्ग खांदेरी आणि इंग्रजांची शरणागती.... सुरतकर इंग्रजांनी मात्र सतत तिकडून मुंबईकर इंग्रजांना सुनावणे सुरु केले. ३१ डिसेंबर ला शेवटी मुंबईकर इंग्रजांनी सुरतेला कळवले की, “खांदेरी प्रकरणी कंपनीला विनाकारण खूप खर्च झाला. आम्हाला काही यश आले नाही. मराठ्यांच्या चपळ होड्या सहज कुठेही जाऊ शकतात, कुठूनही हल्ला करू शकतात मात्र आमच्या युद्धनौका अगदीच निरुपयोगी ठरल्या आहेत. सध्या छत्रपती शिवाजी महाराजांशी तह करण्याची