Posts

२४ऑक्टोंबर १६५७ साली कल्याण भिवंडीच्या लढाईत छत्रपती शिवरायांचा विजय होऊण, मराठा आरमार बंधणीला सुरवात झाली.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २४ ऑक्टोबर १६२४ भातवडी येथे मोगलांचा सुभेदार लष्करखान व आदिलशाही मुल्ला महंमद ह्या दोघांच्या छावणीवर मलिक अंबरच्या सैन्याचा अचानक हल्ला झाला व मलिक अंबराने त्या दोघांच्या पाडाव केला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २४ ऑक्टोबर १६५७ शिवाजी महाराजांनी उत्तर कोकणात मुसंडी मारत कल्याण - भिवंडी - शहापुर हा मूघली-विजापुर भाग काबीज केला. औरंगजेब दख्खनेवरुन दिल्लीला परतलेला आणि विजापुरच्या आदिलशहाचा मृत्यू ह्या १६५७ च्या सुरवातीच्या दख्खनेमधल्या राजकीय परिस्थितीचा फायदा उचलत शिवरायांनी उत्तर कोकण काबीज केले. १६५६ च्या जानेवारी मध्येच जावळी ते रायरी हा भाग ताब्यात घेत विजापुरचा उत्तर कोकणाशी थेट संपर्क त्यांनी जवळ-जवळ तोडला होताच. २४ऑक्टोंबर १६५७ साली कल्याण भिवंडीच्या लढाईत शिवरायांचा विजय होऊण, मराठा आरमार बंधणीला सुरवात  झाली. सागरावर प्रभुत्व निर्माण करावयाचे आसेल तर बलशाली आरमार (Navy) ऊभारले पाहीजे ही बाब शिवरायांच्या लक्षात आली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २४ ऑक्टोबर १६६६ आग्राच्या सुटकेनंतर, शिवाजी सुटला आता प्रतिशिवाजी सुटू नये या विचाराने औरंगजेबान...

२५ आॅक्टोबर १२९६संत ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २५ आॅक्टोबर १२९६ संत ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २५ आॅक्टोबर १६४५ छत्रपती शिवाजी महाराज लालमहल येथे मुक्कामी 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २५ ऑक्टोबर १६७० मोरोपंत पिंगळे पेशवे पंतप्रधान यांनी शिवनेरी जिंकण्यासाठी शिकस्त केली पण त्यात त्यांना अपयश आले. पण त्यांनी पुढे घुसून नाशिकजवळील ब्रह्मगिरी जिंकला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २५ ऑक्टोंबेर १६७९ छत्रपती शिवाजी महाराजांचे पायदळ आणि घोडदळाप्रमाणे आरमार ही त्याच दर्जाचे होते, शिवरायांच्या आरमाराचे हालचाली इतक्या प्रभावी होत्या की त्यांचे उल्लेख पोर्तुगीज, डच आणि ब्रिटिश साधनात आढळतात त्याचेच एक उदाहरण - २५ ऑक्टोंबेर १६७९ ला सुरतवाले लिहतात की, शिवरायांच्या आरमाराला आम्ही फार वेळ टक्कर देऊ असे आम्हास वाटत नाही आरमार उभारणीच्या वेळी लाकडाचे महत्व मोठे होते, त्याकाळी जंगले दाट होती आणि लाकूड ही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची यासंबधी आज्ञा अशी होती याचा उल्लेख आज्ञापत्र साधनात येतो " स्वराज्यातील आंबे, फणस हेही लाकडे आरमाराच्या प्रयोजनाची परंतु त्या...

१७ ऑक्टोबर इ.स. १६७०** दाऊदखान व छत्रपती शिवराय यांच्यात फार मोठे युद्ध झाले व त्यात दाऊदखानाचा दणदणीत पराभव झाला.*

*१७ ऑक्टोबर इ.स. १६७०* * दाऊदखान व छत्रपती शिवराय यांच्यात फार मोठे युद्ध झाले व त्यात दाऊदखानाचा दणदणीत पराभव झाला.*

१६ ऑक्टोबर १६८०छत्रपती संभाजीराजे यांनी कोकणातील "चाफळ" येथील रामनवमी उत्सवासाठी वार्षिक इनाम चालवण्याचा हुकूम आजच्या दिवशी दिला.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १६ ऑक्टोबर १६७० युद्ध हे होणारच हे महाराजांना अचूक ठाऊक होते. प्रश्न एकच होता की सुरतेवरून आणलेला खजिना कसा राखायचा. खजिन्यासकट पळ काढणे हे शक्य नव्हते आणि काही लोकांना खजिना घेऊन पुढे जाण्यास सांगणे हे ही शक्य नव्हते कारण खजिना पुढे पाठवायचा म्हणजे घोडदळ सोबत द्यावे लागेल कारण पायदळ लवकर पुढे जाणार नाही. जर घोडदळ पुढे पाठवले तर दाऊदखानाचा सामना फक्त पायदळानिशी करणे ही सोपे नव्हते, आणि आपल्या सैनिकांना सुद्धा याची भनक लागू द्यायची नव्हती. शेवटी शिवराय ते शिवरायच, शेवटच्या क्षणाला कोणाच्या डोक्यात कधी येऊच शकणार नाही असे निर्णय घेण्याचे त्यांचे कौशल्य कामी आले. १६ ऑक्टोबरच्या मध्यरात्री त्यांना समजले की पहाटेच्या वेळी आपली व दाऊदखानाच्या सैन्याची गाठ पडणार. म्हणून रात्रीच्या वेळी खजिना वाहणारी घोडी व बैले पायदळासोबत सप्तशृंगी व वणीच्या मार्गाने पाठवली आणि मुख्य सैन्य दाऊदखानाच्या दिशेने पाठवले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १६ ऑक्टोबर १६७९ विजापूर जिंकून घेण्यासाठी दिलेरखानाने ऑगस्ट १६७९ ला कूच केले. त्यामुळे विजापूरचे रक्षण करण्यासाठी मस...

१२ आॅक्टोबर १६७३मराठा फौजेचा वाई जवळील "किल्ले पांडवगड" वर हल्ला.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १२ ऑक्टोबर १६५९ पंताजी गोपीनाथांची वकील म्हणून निवड अफजलखानाचा वकील आला मग रिवाजानुसार आपलाही वकील खानाकडे जायला हवा हे मनोमन ठरवून गोपीनाथपंथांची निवड केली. ही निवड केवळ वकील म्हणून साधीसुधी नव्हती तर खानाच्या गोटात शिरून खानाच्या छावनीचा संपूर्ण अंदाज बांधणे शत्रुपक्षाच्या मनीचे हेतू जाणता आले तर पाहावे या हेतूने ही निवड होती. आणि म्हणूनच पंताजी गोपीनाथ यांचे बरोबर काही हुषार हेर‌ हुजऱ्यांच्या रुपाने शिवरायांनी पाठवून आपले फासे टाकायला सुरुवात केली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १२ आॅक्टोबर १६७३ मराठा फौजेचा वाई जवळील "किल्ले पांडवगड" वर हल्ला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १२ ऑक्टोबर १६८० स्वराज्याचे पंतप्रधान मोरेश्वर त्रिंबक पिंगळे यांचे श्रीमान रायगडावर महानिर्वाण झाले. त्यांच्या ज्येष्ठ पुत्राचे सांत्वन करून छत्रपती शंभुराजांनी त्यांना पेशवेपद दिले. निळोपंत हे स्वराज्याचे पेशवे बनले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १२ ऑक्टोबर १६८१ छत्रपती संभाजी महाराज राज्यपदावर आल्यावर त्यांच्याविरोधात काही मंत्र्यानी कट केला होता. मंत्र्यानी या कटात सुलतान अ...

अक्कलकोट राज्याचे संस्थापक श्रीमंत फतेहसिंहराजे भोसले यांची समाधी, राजधानी रायगड १७३३ साली फतेहसिंह भोसले व पंतप्रतिनिधी यांच्या संयुक्त मोहिमे द्वारा स्वराज्यात शामिल झाला ..

Image
अक्कलकोट राज्याचे संस्थापक श्रीमंत फतेहसिंहराजे भोसले यांची समाधी, राजधानी रायगड १७३३ साली फतेहसिंह भोसले व पंतप्रतिनिधी यांच्या संयुक्त मोहिमे द्वारा स्वराज्यात शामिल झाला ..

११ आॅक्टोबर १६७३छत्रपती शिवरायांनी "बंकापूर" वर चढाई केली.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ११ आॅक्टोबर १६७३ छत्रपती शिवरायांनी "बंकापूर" वर चढाई केली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ११ ऑक्टोबर १६७९ खांदेरीच्या नाकेबंदिकारिता पाठविलेल्या सैन्यामुळे मुंबईतील सैन्य कमी झाले व मुंबईचा धोका वाढला. मराठे साष्टी (ठाणे) मधून मुंबई वर चालून येण्याचा प्रयत्न करीत आहेत असे इंग्रजांना कळले परंतु तेथील पोर्तुगीजांनी त्यांना अडवल्यामुळे मुंबईकर इंग्रजांच्या जीवात जीव आला व त्यांनी त्वरित ५० टोपाझ सैनिकांची भरती रक्षणार्थ केली. सुंदरजी प्रभू नामक छत्रपती शिवाजीराजांचा एक हेर मुंबईमध्ये गुपचूप माहिती जमा करीत असताना इंग्रजांच्या तावडीत सापडला. इंग्रजांनी त्याच्या कडून माहिती जमा करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यात अपयश येऊन इंग्रजांनी त्याला कैदेत टाकले. तसेच मुंबईतील काही गरीब रहिवाश्यांना चौलच्या आस-पास टेहळणी करिता पाठवले व त्यांना आदेश दिला कि त्यांनी दर ३-४ दिवसांनी मुंबईला मराठ्यांच्या हालचालीबद्दल खबर कळवावी. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ११ ऑक्टोबर १७८० दि. ११ ऑक्टोबर १७८० रोजी हालेचा मुक्काम उल्हास नदीकाठावर असलेल्या बदलापूरानजीक कुळगाव ...