३ सप्टेंबर इ.स.१६७५*महाराजांनी रामनगर पेठ वसविली! छत्रपती शिवाजी महाराजांनी पारमाची तर्फ शिवथर येथे रामनगर पेठ वसविली. राज्याभिषेका नंतर महाराजांनी इंग्रजांविरुद्ध मोहिम उघडली. महाडच्या उत्तरेस १५ कि.मि. अंतरावर असलेल्या पारमाची तर्फ शिवथर या खोऱ्यातील गावात महाराजांनी रामनगर पेठ वसविली.

*आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष*

*३ सप्टेंबर इ.स.१६७५*
महाराजांनी रामनगर पेठ वसविली!
           छत्रपती शिवाजी महाराजांनी पारमाची तर्फ शिवथर येथे रामनगर पेठ वसविली. राज्याभिषेका नंतर महाराजांनी इंग्रजांविरुद्ध मोहिम उघडली. महाडच्या उत्तरेस १५ कि.मि. अंतरावर असलेल्या पारमाची तर्फ शिवथर या खोऱ्यातील गावात महाराजांनी रामनगर पेठ वसविली.

*३ सप्टेंबर इ.स.१६७९*
खांदेरी किल्ल्याचे बांधकाम रोखण्यासाठी ह्युजेसच्या नेतृत्वाखाली इंग्रज आरमार मुंबईहुन रवाना झाले होते. जंजिरेकर सिद्दी आणि मुंबईकर इंग्रज यांची स्वेच्छेने नसली तरी नाईलाजास्तव मैत्री होती [कारण सिद्दीला मदत करून इंग्रज मुघलांकडून कोकणातील बराचसा महसूल माफ करून घेत असत.मुघलांचे स्वतंत्र असे आरमार अगदी कमकुवत असावे अथवा नगण्य होते कारण सिद्दीला त्याच्या आरमाराकरिता मुघलांनी आपले मांडलिक केले होते]. या मैत्रीच्या आधारे सिद्दीचे आरमार दर पावसाळ्यात मुंबईला माजगावच्या बंदरात नांगरले जात असे.याचे कारण असे की पावसाळ्यात दर्याला उधाण असते व भर समुद्रात जंजिऱ्या जवळ आरमार ठेवणे मोठे मुश्कील. तसेच जंजिऱ्याचा आसपासचा भूमीवरील प्रदेश हा बहुतांश काल मराठ्यांचा ताब्यात होता.१६७९ च्या पावसाळ्यात माजगावच्या बंदराचे काही काम सुरु असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने इंग्रजांनी सिद्दीला आरमार सुरतला नांगरण्यास सांगितले व सिद्दी आरमारासह सुरतेस गेला.शिवाजी महाराजांचे हेर या सर्व हालचालींकडे अत्यंत बारीक नजर ठेवून होते आणि या वेळेचा फायदा उठवायचा असे ठरवून महाराजांनी साहित्य, काही दारूगोळा व आपली माणसे चौलच्या ठाण्यात जमवली.२७ ऑगस्ट १६७९ रोजी इंग्रजांच्या पोर्तुगीज आणि काही हिंदू हेरांकडून ही माहिती इंग्रजांना कळली. हेरांनी स्पष्ट कळवले होते कि जर आज शिवाजीला रोखले नाही तर पुढे हे प्रकरण आवघड होईल त्यामुळे याचा लवकर बंदोबस्त करावा परंतु इंग्रजांनी हे प्रकरण फार मनावर घेतले नाही असे दिसते. कारण याच दिवशी इंग्रजांनी मुंबईच्या रक्षणार्थ तैनात असलेली ‘हंटर’ नामक फ्रिगेट मंगळूरच्या एका व्यापाऱ्याला भाडेतत्वावर दिली.दरम्यान पुढच्या ३-४ दिवसातच चौलला असणारा महाराजांचा ताफा सर्व रिसाल्यासह खांदेरीवर उतरला.या दर्यावर्दी मावळ्यांचा प्रमुख होता मायनाक भंडारी. मायनाक सोबत या वेळी सुमारे १५० माणसे व ४ लहान तोफा होत्या. हे कळताच इंग्रजांना घाम फुटला आणि त्यांनी सप्टें १६७९ सुरुवातीला ही हकीकत सुरतेला कळवली तसेच नारायण शेणवी नामक वकिलाला शिवाजीराजांच्या चौलच्या ठाणेदाराकडे निषेध नोंदवण्याकरिता रवाना केले. येथील अधिकारी कोण होता याची स्पष्ट नोंद नाही परंतु आधीच्या काही नोंदींनुसार हा अधिकारी बहुदा कृष्णाजी भास्कर असावा.चौलच्या अधिकाऱ्याने आपण सबंधित वृत्त शिवाजी महाराजांना कळवू आणि त्यांच्या हुकुमाची वाट पाहू असे सांगून नारायण शेणव्याच्या समाधाना करिता आपला माणूस रायगडावर पाठवला आणि हा निरोप घेऊन नारायण शेणवी मुंबईला परतला. दरम्यान २ सप्टें रोजी मुंबई येथे तातडीची बैठक घेवून इंग्रजांनी ‘एनसाईन ह्युजेस’ याच्या अधिपत्याखाली सैनिकांच्या ६ तुकड्या घेऊन, तोफा बसवून ३ शिबाडे खांदेरी व भूमी यांच्या दरम्यान गस्त घालण्याकरिता पाठीवली कारण बांधकाम सुरु झाल्यापासून थळच्या किनाऱ्यापासून खांदेरीला सामानाचा पुरवठा सुरु होता. इंग्रजांचे असे ठाम मत होते की हे बेट इंग्लंडच्या राजाचे आहे व यावर मराठ्यांनी हक्क सांगू नये. ह्युजेस याला ताकीद देण्यात आली की शिवाजीच्या माणसांना शांततेने सांगावे की हे बेट इंग्लंडच्या राजाचे असून मराठ्यांनी ताबडतोप निघून जावे.ह्युजेसला मराठ्यांवर थेट हल्ला करण्याची परवानगी नव्हती.त्याप्रमाणे ह्युजेस निघाला व ४ सप्टें रोजी तो खांदेरी आणि मुख्य भूमी दरम्यान गस्त घालीत ३ शिबडे घेऊन सज्ज झाला.ह्या वेळच्या पोर्तुगीज पत्रांवरून असे दिसते की पोर्तुगीज ह्या प्रकरणावर विशेष नजर ठेवून होते.पोर्तुगीजांच्या वसाहतींच्या उत्तर विभागातील किल्ल्यांचा प्रमुख Juaanv De’ Mello De Sampaeyu याला तर गवर्नरचा स्पष्ट सल्ला होता की इंग्रजांनी शिवाजीच्या विरोधात सामील होण्याकरिता विचारल्यास तटस्थ राहून – आमचा शिवाजीशी तह आहे असे सांगावे.

*३ सप्टेंबर इ.स.१६८०*
सुरतेचे मुंबईला पत्र
What you propose to us concerning sending up some person to Sambajee Rajah wee have well considered off and are come to this result, that if it be possible you endeavour by some plausible excuse to evade it for 3 or 4 months, in which time we are in great hopes to receive our overland advises from the Honble. Company for our full direction how to carry our selfes in this unhappy business of Hendry Kendry and likewise with the Sidey ; therefore faile not to lett us see your utmost endeavours in prudently overcoming this affaire till then, and it will be much to our satisfaction.
संभाजी राजाकडे कोणाला तरी पाठवून बोलणी करण्याबद्दलच्या तुमच्या विनंतीवर आम्ही विचार केला आहे. त्यावरून असे वाटते की तुरतास तुम्हाला शक्य असेल त्या कारणाखाली तीन ते चार महिन्यांसाठी ते टाळायचा प्रयास करा. तोवर आम्हाला कंपनीकडून हेन्ड्री केन्ड्री बद्दल व सिद्दीशी कसा व्यवहार ठेवायचा त्याची कल्पना मिळेल. त्यामुळे ह्या बाबतीत तुमचे सर्वतोपरी प्रयत्न आम्हाला दिसतील असेच काम करा, ज्यामुळे आमचे समाधान होईल.
सुरतेचे मुंबईला पत्र, ३ सप्टेंबर १६८०, ०३ सप्टेंबर १६८०
English Records on Shivaji, पृष्ट ३१६
ह्यावर मुंबईच्या वखारीकडून उत्तर पाठवले गेले की सुरतेकडून पुढील सूचना मिळेस्तोवर संभाजीशी भेटीचा प्रस्ताव शक्य तितका पुढे ढकलण्यात येईल.

*३ स्पटेंबर इ.स.१६८२*
बादशहा औरंगजेबाचा मुलगा शहजादा अकबर बापाशी संबंध बिघडल्याने दक्षिणेत संभाजीराजेंच्या आश्रयाला आला होता.13 नोव्हेंबर 1681 रोजी संभाजीराजे आणि शहजादा अकबर यांची सुधागड येथे पहिलीच भेट झाली. यानंतर पुन्हा 1682 च्या ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस पुन्हा एकदा त्यांची भेट झाली.या भेटीत संभाजीराजेंनी अकबराला आपल्या मुलाखातून समुद्रमार्गे अहमदाबादच्या बाजूने राठोडांच्या मुलखात पाठवायचे ठरवले.पण दुर्दैवाने ही बातमी औरंगजेबाला समजली. त्याने तातडीने आपल्या राहुल्लखानाला हुकूम दिला की त्याने अहमदाबाद,बडोद्याच्या सुभेदाराला कळवून अकबराची वाट अडवावी आणि त्याला कैद करावे. याबरोबरच अहमदाबाद, सुरत,बडोदे,थालनेर, नंदुरबार,रावेर,माळवा या ठिकाणच्या फौजदारांना अकबराला कैद करण्याचा हुकूम देण्यात आला.

*३ सप्टेंबर १७२०*
मंगळवार रोजी कॅप्टन ब्राऊन याच्या अधिपत्या खाली मुंबईकर इंग्रजांची लंडन, व्हिक्टोरिया आणि रिव्हेंज हि लढाऊ जहाजे घेरीयाच्या (विजयदुर्ग) स्वारीवर निघाली. मिस्त वॉल्टर ब्राऊनला स्रव फौजांच्या कमांडर-इन-चीफची पदवी देऊन त्याला ‍अ‍ॅडमिरलचा हुद्दा दिला.

*३ सप्टेंबर इ.स.१७४९*
चंदासाहेब, मुजफ्फरजंग व फ्रेंच सेनापती बुसी यांची कर्नाटकावर स्वारी.
कर्नाटकातील अंतर्गत राजकीय घडामोडींमुळे झाले. भारतातील इंग्रज व फ्रेंच अधिकाऱ्यांनी यूरोपातील तहाकडे दुर्लक्ष करून व स्थानिक नबाबांच्या भांडणांचा लाभ घेऊन आपापल्या सत्ता स्थापण्याचा प्रयत्न केला. कर्नाटकात त्रिचनापल्ली, तंजावर व म्हैसूर या तीन राज्यांत गादीसंबंधी तंटे चालू होते. तंजावरमध्ये शहाजी व प्रतापसिंह भोसले यांत भांडण चालू होते. इंग्रजांनी प्रतापसिंहास गादीवर बसवून त्याजकडून देवीकोटचा किल्ला मिळविला. सफदरअली हा कर्नाटकाचा नबाब असताना त्याचा मेहुणा चंदासाहेब बऱ्याच उलाढाली करीत असे. पण रघुजी व फत्तेसिंह भोसले यांनी कर्नाटकाच्या स्वारीत त्यास कैद करून साताऱ्यास पाठविले. नंतर सफदरअलीचा खून होताच निजामुल्मुल्कने अल्पवयीन नबाबास अर्काटच्या गादीवर बसविले. त्याचा कारभार पाहण्यासाठी त्याने अन्वरुद्दीनला अर्काट  येथे पाठविले. दरम्यान चंदासाहेब सुटला व मराठ्यांचा दंड देऊन या गादीवर हक्क सांगू लागला. त्याचे व फ्रेंचांचे संबंध चांगले होते. द्यूप्लेक्सने अन्वरुद्दीन व चंदासाहेब यांच्या भांडणात पडून मुलूख मिळविण्याचा प्रयत्न केला. हैदराबादच्या निजामुल्मुल्कच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा नासिरजंग व नातू मुजफ्फरजंग यांत गादीसंबंधी तंटा सुरू झाला. चंदासाहेबाने मुजफ्फरजंगास फ्रेंचांच्या मदतीचे आश्वासन दिले. इंग्रजांनी नासिरजंगाचा पक्ष घेतला. द्यूप्लेक्सने चंदासाहेबास अर्काटच्या गादीवर व मुजफ्फरजंगास हैदराबादच्या गादीवर बसविण्याचे कबूल करून त्याच्याशी तह केला. ३ सप्टेंबर १७४९ रोजी चंदासाहेब, मुजफ्फरजंग व फ्रेंच सेनापती बुसी यांनी कर्नाटकावर स्वारी केली. अंबूर येथे झालेल्या लढाईत अन्वरुद्दीन मारला गेला. त्याचा मुलगा मुहम्मद अली त्रिचनापल्लीला पळाल्याने फ्रेंचांनी ते ठिकाण घ्यावयाचे ठरविले. इंग्रजांना या गोष्टीचे परिणाम कळले असले, तरी त्यांच्यामध्ये द्यूप्लेक्सइतके सामर्थ्य नव्हते. इंग्रजांनी नासिरजंगाला फ्रेंचांचा पाडाव करण्याची विनंती केली. पण त्याचा उपयोग झाला नाही. पुढे द्यूप्लेक्सने मुजफ्फरजंगास दक्षिणेचा सुभेदार केले. बक्षिसादाखल त्याने द्यूप्लेक्सला कृष्णेच्या दक्षिणेकडच्या मोगली प्रदेशाचा गव्हर्नर केले व आपल्या दरबारी बुसीच्या नेतृत्वाखाली फ्रेंच सैन्य ठेवले.

*३ सप्टेंबर इ.स. १७६३*
३ सप्टेंबर १७६३ ला पेशव्यांनी औरंगाबादवर चाल केली. निजाम औरंगाबादेत कोंडला गेला. अखेरीस २५ सप्टेंबरला निजाम पेशव्यांना शरण आला आणि उदगीरचा तह कायम करून नवा २२ लक्षांचा करार झाला. या तहानुसार पूर्वीच्या उदगीरच्या लढाईतील साठ लाख आणि आताचा २२ लाख रुपये उत्पन्नाचा एकूण ८२ लाख रुपये वार्षिक उत्पन्नाचा मुलुख पेशव्यांना मिळाला. या लढाईनंतर माधवराव जिवंत असेपर्यंत निजामाने डोके जराही वर काढले नाही. यावरूनच या युद्धाची कल्पना येते. राक्षसभुवनहून जवळच असणाऱ्या पालखेड येथे पूर्वी बाजीराव पेशव्यांनी याच निजामाच्या बापाचा पराभव केला होता. आता इथेच बाजीरावांच्या नातवाने निजामाला मात दिली होती. या युद्धानंतर रघुनाथराव गोपिकाबाईंना लिहिलेल्या पत्रात म्हणतात, "चिरंजीव रायांनी यंदा मेहनतीत व शिपाईगिरीत कमी केले नाही... यांचा पुढे (होणाऱ्या) कर्तेपणाचा भरवसा आम्हास आला. सांप्रत कारभार चिरंजीवच करतात. (परंतु) आमचे मर्जीप्रमाणे वर्ततात..." यानंतर रघुनाथराव व माधवराव पुण्यात परतले.

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पानिपत आणि रहिमतपूरकर माने

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...