१९ऑगस्ट इ. स. १६८०*संत तुकाराम महाराजांचे पुत्र महादेव महाराज यांना वर्षासन!छत्रपती संभाजी महाराजांनी पुणे प्रांताचे देशाधिकारी विनायक उमाजी यांना आजच्या दिवशी, एक खास पत्र लिहिले आणि या पत्रानुसार संत तुकाराम महाराजांचे पुत्र महादेव महाराज यांना वर्षासन इनाम करून दिले.
*आजचे ऐतिहासिक शिवदिनविशेष*
*१९ ऑगस्ट इ.स.१६००*
बु-हाण निजामशहाच्या मृत्युनंतर मुघल सम्राट अकबर याने अहमदनगर पर्यंत सैन्य पाठवून दहशत निर्माण केली त्यावेळी चांदबिबीने पराक्रमाची शर्थ करून अहमदनगरचा बचाव केला तरीपण तिच्या मृत्युनंतर मुघलांनी पुन्हा आक्रमण करून आजच्या दिवशी अहमदनगरचा ताबा मिळवला.
*१९ ऑगस्ट इ.स.१६६६*
शिवाजीराजे निसटल्याची बातमी संपूर्ण आग्रा शहरात!
"फौलादखानी" चौकशीत गुन्हेगाराचा साथीदार सापडला होता. पण शिवाजीराजे हजार शाही सैनिकांच्या डोळ्यादेखत काय हुन्नर करून निघून गेले हे गूढ मात्र औरंगजेब बादशहाला व त्यांच्या बुद्धिमान वजिरांना काही केल्या उलगडेना. महाराज निसटल्याची बातमी कळल्यापासून या रहस्याचाही शोध घेणे सुरुच होते. अखेर बरेच डोके खाजविल्यानंतर शाही आधिकारी अचूक निर्णयावर येऊन पोहोचले की, "शिवाजीराजेंच्या डेऱ्यातून जे मोठमोठे मिठाईचे पेटारे जात होते त्यातच बसूनच वार रविवार दि. १९ ऑगस्ट इ.स.१६६६ शिवाजीराजे पळून गेले. प्रत्येक जण आपापल्या परीने "काहीही बोलु लागले. होते. "नेतोजी पालकर यांना पकडण्याचे फर्मान निघाले.
*१९ ऑगस्ट १६७५*
शिवरायांनी "प्रभावळी" ची सुभेदारी "जिवाजी विनायक" यांना दिली.
*१९ऑगस्ट इ. स. १६८०*
संत तुकाराम महाराजांचे पुत्र महादेव महाराज यांना वर्षासन!
छत्रपती संभाजी महाराजांनी पुणे प्रांताचे देशाधिकारी विनायक उमाजी यांना आजच्या दिवशी, एक खास पत्र लिहिले आणि या पत्रानुसार संत तुकाराम महाराजांचे पुत्र महादेव महाराज यांना वर्षासन इनाम करून दिले.
*१९ ऑगस्ट इ.स.१६८९*
मराठ्यांच्या दक्षिणेतील जिंजी भागाच्या कारभाराची प्रमुख जबाबदारी शंभुराजेंचे मेहुणे आणि पराक्रमी सेनानी हरजीराजे महाडिक यांच्यावर होती. मुघल फौजा कर्नाटकात जाणार हे ओळखून संभाजीराजेनी हरजीराजेच्या मदतीसाठी आपले विश्वासू केसो त्रिमल पिंगळे यांना १२००० फौज देऊन हरजीराजेच्या मदतीला पाठवले होते. या दोन्ही सरदारांच्या फौजांनी अर्काट,कांजीवरम, चित्तापेठ व कावेरीपाक ही ठिकाणे काबीज केली. पण १६८९ च्या मार्च महिन्यात औरंगजेबाने शंभुराजेंची क्रूर हत्या केली,या घटनेने मराठेशाहीत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. ऑगस्ट महिन्याच्या सुमारास कर्नाटकात एक अफवा पसरली की सुभेदार हरजीराजे मुघलांना सामील होणार आहेत. पण ही अफवा खोटी होती कारण मुघलांच्या संभाव्य हल्ल्याला तोंड देता यावे म्हणून त्यांनी आपली ठाणी व किल्ले मजबुत करण्यास सुरुवात केली. एव्हढ्यानेच न थांबता मराठ्यांची आघाडी भक्कम व्हावी म्हणून आपल्या कैदेत असणाऱ्या केसो त्रिमल व त्यांच्या सहकाऱ्यांना मुक्त केले. पडत्या काळात मराठेशाहीची धुरा सांभाळनाऱ्या हरजीराजे महाडिक यांनी केसो त्रिमल यांना कैदेतुन मुक्त केले.
*१९ ऑगस्ट इ.स.१७५३*
नजीबखानाच्या आमंत्रणावरून अहमदशहा अब्दाली १७५१ च्या अखेरीस पंजाब पर्यंत आला,आणि पंजाब आणि सिंध हे दोन प्रांत त्याने बळकावले. तेवढ्यावर समाधान मानून उन्हाळा सुरू होण्यापूर्वी तो काबूलला परत गेला. अब्दालीशी मुकाबला करण्यासाठी मराठ्यांना घेऊन वजीर सफदरजंग दिल्लीला आला. पण अब्दाली परत गेल्याने मराठे परत दक्षिणेकडे फिरले. यानंतर दिल्ली दरबारात सफदरजंग व बादशहा यांच्यात तीव्र मतभेद सुरू झाले, युद्धजन्य परिस्थितीमुळे बादशहाने नानासाहेब पेशव्यांना पत्र पाठवून मराठ्यांची मदत मागितली. आणि त्या बदल्यात मराठ्यांना १ कोटी रुपये आणि अयोध्या व अलाहाबाद हे दोन प्रांत देण्याचे कबुल केले. त्यामुळे नानासाहेब पेशव्यांनी रघुनाथराव व शिंदे-होळकर या सरदारांना बादशहाच्या मदतीस पाठवले. रघुनाथराव पेशवे दिल्लीला रवाना झाले.
Comments
Post a Comment