१७ ऑगस्ट इ.स.१६६६(श्रावण वद्य द्वादशी, शके १५८८, संवत्सर पराभव, वार शुक्रवार)छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्राच्या कैदेतून सुटका करून घेतली!
⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳
📜 १७ ऑगस्ट इ.स.१६५३
चाकणचे सिद्धेश्वर भट ब्रम्हे यांना महाराजांनी वर्षासन नेमून दिले. चाकणचे सिद्धेश्वर भट ब्रम्हे हे दुसरे सत्पुरुष "त्यांच्या अनुष्ठानबळे आपण राज्यास आधिकारी झालो व सकल मनोरथ चिंतिले ते पावलो" अशी महाराजांची धारणा होती. महाराजांना औरंगजेब बादशहाचा कावा समजला आणि महाराजांनी भराभर पावले उचलायला सुरुवात केली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtube.com/shorts/uRoN9-0r0lY?feature=share
📜 १७ ऑगस्ट इ.स.१६६२
जेधे शकावलीतील नोंदीनुसार भाद्रपदशुक्ल द्वादशी शके १५८४ म्हणजे १७ ऑगस्ट १६६२ रोजी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी अण्णाजीपंतास सूरनिसी दिली. सुरनीस या फारसी शब्दाचा अर्थ “सुद सुद बार“ असा शेरा मारणारा . सनदा , हुकूमनामे , राजपत्र , महत्वाच्या निर्णयांची शासकीय कागदपत्रे तपासणे, त्यातील त्रुटि शोधून त्यातील चुकीचा मजकूर दुरुस्त करणे . महाल , परगणे यांचे हिशोब जमाखर्च तपासणारा कारकून . वित्त व लेखा अधिकारी . प्रसंगी युद्धात नेतृत्व करणे.
शेतजमिनीची व्यवस्था पाहण्याची जबाबदारी अण्णाजी दत्तो यांच्याकडे होती त्यामुळे महसुलाच्या व्यवस्थेवरही लक्ष ठेवावे लागे. जमनीची मोजणी , सारा वसुली यात त्यांचे योगदान आढळून येते. चिटणीस बखरीनुसार धारा निशित करण्याचा प्रयत्न अण्णाजी दत्तो यांनी केला. “ अण्णाजीपंतांचा धारा “ हा शब्द प्रयोग पेशवाईतहि रूढ होता. इ.स. १६७८ साली रोहीडेखोरे परगण्याच्या वतनदाराना कौलनामा दिला त्यावरून याविषयीची माहिती मिळते. अण्णाजी दत्तो यांनी नियम तयार केले त्यानुसार देशमुख ,देशपांडे , पाटील आणि गावातील चार प्रमुख व्यक्ती यांनी गाव फिरावे . अव्वल , दुव्वल , सीम अशी जमिनीची प्रतवारी करून पिकाचा अंदाज घ्यावा. खरीप आणि रब्बी पिकांची वर्गवारी करून सारा गोळा करावा. अण्णाजी दत्तो स्वतः गावांमध्ये जात असत आणि डोंगरकाठाची जमीन , खाचर तळ्याची जमीन, काळी जमीनिची पाहणी करून शेतसाऱ्याचा दर ठरवीत.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १७ ऑगस्ट इ.स.१६६६
(श्रावण वद्य द्वादशी, शके १५८८, संवत्सर पराभव, वार शुक्रवार)
छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्राच्या कैदेतून सुटका करून घेतली!
छत्रपती शिवाजी महाराज ९ वर्षांच्या युवराज शंभूराजांच्या चाणाक्ष बुद्धी आणि आई भवानीचे आशीर्वाद यामुळे आग्र्यातून पेटाऱ्यातून पसार झाले. आग्रा शहरात शुक्रवारची नमाज असल्याने बादशाही दरबाराला सुट्टी होती. या गोष्टीचा फायदा घेण्यासाठी शिवाजी महाराजांनी नियोजित योजनेनुसार मथुरेच्या ब्राह्मणांना आणि फकीराना मिठाईचे पेटारे पाठवण्याचे ठरवले होते. त्याप्रमाणे दुपारी चारच्या सुमारास पेटारे भरण्याचे काम सुरू झाले.याचवेळी महाराजांचे डोके दुखण्यास प्रारंभ झाला त्यामुळे त्यांच्या डेऱ्यात शंभूराजे,हिरोजी फर्जंद एवढेच मंडळी थांबली. डेऱ्यात शांतता राहावी म्हणूनइतर सहकारी आपआपल्या छावणीत परतले. सायंकाळी मिठाईचे पेटारे महाराजांच्या डे-यातून बाहेर पडले पहारेकर्यांनी एक-दोन पेटारे उघडून बघितले आणि जाऊ दिले. रामसिंहाने नेमलेले बलराम पुरोहित व त्याचे इतर सहकारी अधून मधुन डेऱ्यात डोकावून पाहत होते. पण शिवाजी महाराज मात्र औरंगजेबाच्या हातावर मिठाई ठेऊन केंव्हाच पसार झाले होते. जगाच्या इतिहासात शत्रूला मिठाई चारून आपली सुटका करून घेणारे एकमेव राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराज आग्रा कैदेतून निसटले.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇
📜 १७ ऑगष्ट इ.स.१६९६
खेम सावंताने कुडाळचा किल्ला घेतल्याचे व्हिसेरेइला कळले, तेव्हा त्याने दि. १७ ऑगष्ट १६९६ रोजी पत्र घालून त्याचे अभिनंदन केले. स. १६९६ साली खेम सावंताने मोगलांच्या ताब्यात असलेल्या धारगडच्या किल्ल्यावर हल्ला केला. त्याचा उल्लेख फोंड्याचा मोगल सुभेदार रफीखान याने गोव्याच्या व्हिसेरेइला पाठविलेल्या पत्रात आढळतो. रफीखानाने प्रस्तुतच्या पत्रात आपण सावंताविरुद्ध लष्करी मोहीम सुरु करणार असल्याचे म्हटले आहे व पोर्तुगीजानी दारूची पिंपे आणि तोफांचे गोळे पाठविल्याबद्दल आभार मानले आहेत. खेम सावंताने मोगलांच्या ताब्यात असलेले साखळी आणि डिचोली हे दोन किल्ले घेतले व फोंड्याच्या किल्ल्यास वेढा घातला. फोंड्याच्या नबाबाने पोर्तुगीजांकडे दारुगोळ्याची मदत मागितली व त्या मदतीबद्दल त्याना बार्देशच्या हद्दीवरील काही मुलुख देण्याचे कबूल केले. आपल्या राज्याच्या हद्दीला लागून असलेले सत्ताधारी आपल्याहून वरचढ होऊ द्यायचे नाहीत, हे पोर्तुगीजांचे धोरण असल्याने खेम सावंताविरुद्ध त्यानी फोंड्याच्या नबाबास दारू गोळ्याची मदत केली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १७ ऑगस्ट इ.स.१७११
चंद्रसेन जाधवरावांचे छत्रपती शाहू महाराज यांचे विरूद्ध बंड ,ताराराणी गटात सामील
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 १७ ऑगस्ट इ.स.१९०९
रोजी मदनलाल धिंग्रा यांना फासावर लटकवण्यात आले. हातात गीता आणि ओठात रामकृष्णाचे नाव घेऊन देशप्रेमाने भरलेला तो देशभक्त हसत हसत फाशी गेला.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
Comments
Post a Comment