चऱ्होलीकर सरदार दाभाडे घराणे पूर्वज सोमाजीराव दाभाडे हे मूळ पुरुष होय सोमाजी दाभाडे यांना दोन मुले होती थोरले कृष्णाजी व धाकटे बाबुराव होय कृष्णाजी दाभाडे यांचा अनेक ऐतिहासिक पत्रांमध्ये उल्लेख आढळतो.काही पत्रे मिळाली ती या ठिकाणी एकत्र करत आहे.
चऱ्होलीकर सरदार दाभाडे
बजाजी दाभाडे पाटील तळेगाव दाभाडे यांना दोन मुले होती पहिले येसाजीराव व दुसरे सोमाजीराव होय सोमाजी बिन बजाजी दाभाडे च-होली गावच्या वतनावर आले च-होली सरदार दाभाडे घराण्यातील सोमाजीराव दाभाडे हे मूळ पुरुष होय सोमाजी दाभाडे यांना दोन मुले होती थोरले कृष्णाजी व धाकटे बाबुराव होय कृष्णाजी दाभाडे यांचा अनेक ऐतिहासिक पत्रांमध्ये उल्लेख आढळतो.
राजवाडे यांच्या पत्र संग्रहामध्ये असणारी काही पत्रे. जशी जशी तशी मराठी अनुवादित पुढे देत आहे.
श्रीमोरया.
वंशावळ : दाभाडे मोकद्दम, मौजे तळेगाव, त॥ चाकण, प्र॥ जुन्नर, सुभे खुजस्तेबुनियाद, मोकद्दमी तक्षीम चवथी मौजे मजकूरची, यांचा मूळ पुरुष बजाजी पाटील दाभाडे. त्यास पुत्र दोन, (१) येस पाटील दाभाडे, (२) सोमाजी दाभाडे. वडील येस पाटिल दाभाडे हे मोकद्दमी करीत होते. यांणीं राजाराम महाराज यांची सेवा केली. चंदीचे मुक्कामीं महाराजास पुत्र झाला ते समयी महाराज यांणीं पुत्रोत्साहात इनामजमीन मौजे तळेगाव येथे पांच चावर दिल्ही. त्याचे पूर्वी देखाजी दाभाडे यांची वांटणी होऊन महाराजाचे दरबारी फारकत्या जाल्या होत्या. पाटिलकीशी वारसा देखोजी पाटील यांचा नाहीं. येसपाटील यांस पुत्र दोघे, वडील खंडेराव व धाकटे शिवराव दाभाडे. शिवरावास संतान नाहीं. ते महाराज छत्रपति यांणी वऱ्हाडांत मोहिमेस पाठविले होते तेथे युध्दप्रसंग होऊन देवलोकास गेले. वडील खंडेराव दाभाडे यांणी राजश्री राजाराम महाराज व संभाजी महाराज यांची सेवा निष्ठेने केली. ते समयी स्वामी कृपाळू होऊन पहिले अठरा कारखाने यांची हवालदारी दिल्ही. पुढेहि सेवा निष्ठेने करीत गेले. नंतर स्वामी कृपाळू सेनाखासखेल हें पद दिल्हें व इनाम वतनबाब सेवेप्रमाणें देत गेले. नंतर राजश्री शाहू महाराज स्वराज्यांत दिल्लीहून आले. त्यांचेही कारकीर्दीस सेवा निष्ठेनें करीत गेले. तेव्हा स्वामी कृपाळू होऊन स्वराज्यातील सेनापति व सेनाखासखेल ही दोन्ही पदें दिल्ही. जरीपटका, चौघडा, हत्ती, घोडा, पागा, शिकेकटार, पालखी, पांची वस्त्रे, शिरपेच, चौकडा, कठी, तुरा, कडी, बहुमानपुरस्सर दिल्हें, दोन्ही पदांचे कारकून नेमिले, बितपशील.
२ वसई सरसुभ्याचें काम वामनाजी हरी मराठे यांजकडून दूर करून बाजीराव गोविंद बरवे यांस दिलें. तें काम कांहीं दिवत खंडेराव रास्ते व आन्याबा अभ्यंकर करीत होते. पुढें बाजीराव बर्वे यांजकडून सरसुभा दूर करून खंडेराव रास्ते यांजकडे सांगितला. शिंदे हिंदुस्थानांत गेल्यावर सरजेराव घाडगे कागलास जाऊन माघारे पुण्यास येऊन कुंजर यांचे घरीं खर्चाकरतां धरणें दिलें. तेव्हां श्रीमंतांनीं लोक पाठवून कुंजर यासह सोडून घेऊन सरजेराव यांस पुण्यांतून काढून दिलें. ते दरकूच शिंदे याचे लष्करांत गेले.
३ श्रीमंताकडील बाळोजी कुंजर व शिंदे यांजकडील देशमुख व लिंबाजी भास्कर व बाबाजी पाटणकर एक विचारे कारभार करूं लागले. सदाशिव माणकेश्वर याजविषयीं खातरी श्रीमंताजवळ बाळोजी कुंजर यांनीं करून सरकारांतून जवाहीर अंगावर घालावयास देऊन भागानगरास वकिलीवर पाठविलें. त्यांचे कारभारी कृष्णाजी भवानी श्रीमंताजवळ राहिले.
४ जयवंतराव महार्णवर फत्तेसिंग बहादर यांजकडील सरंजामाची जप्ती सालमजकूरी केली छ. १० मोहरम.
५ कृष्णाजी दाभाडे यांजकडील सरंजामाची जप्ती सालमजकुरी केली छ. २२ मोहरम.
६ शिवाजी महाराज कोल्हापुरकर यांस पुत्र फाल्गुन व॥ ७ रविवारीं थोरले स्त्रीस झाले. त्याचें नांव आबासाहेब ठेविलें.
७ नारोपंत चक्रदेव कारभारांत होते तों पावेंतों तारिख तेच घालीतच होते व मामलती जिल्हेस कोणी पैका देणें व खर्च करणें त्याचे परवानगीनें तारिख होत असे. ते कैद झाल्यावर श्रीमंत तारिख घालों लागले. व चिंतोपंत देशमुख यांस माहीतगारीकरितां कामांत घेऊन मामलती जिल्हेस लावूं लागले. महाली मुलखी काम खुद्द पाहूं लागले. वरकड राजकारणी कामावर बाळोजीं कुंजर वगैरे होते. रसद सरकारी व आपली खाजगी असा ठराव करावयाचा सांप्रदाय नवा श्रीमंतांनीं सुरूं केला.
८ धोडोपंत गोडबोले यांस पलटणें तयार करावयासं सांगितलीं.
सरंमजामी फौजेचे सरदार, थोर लहान.
१ निळकंठ माहादेव पुरंधरे व त्रिंबकराव महिपत वगैरे पुरंधरे. २ नरसिंह खंडेराव विंचुरकर. ३ गोपाळराव त्रिंबक राजे बाहाद्दर. ४ खंडेराव त्रिंबक ऐढेकर, ५ पटवर्धन मंडळी परशराम रामचंद्र व रघुनाथराव निळकंट व चिंतामणराव पांडुरंग वगैरे. ७ पांडुरंग बाबूराव बारामतीकर, ८ रघुनाथराव बळवंत नायगांवकर.
सिद्धेश्वेर महिपत बिनिवाले; कृष्णराव बळवंत ऊर्फ अप्पा बळवंत; अनंत भिकाजी रास्ते; काशिराव गणपत रास्ते; गणपत अनंतराव मेंदळे उर्फ अन्याबा बापू; माधवराव रामचंद्र; गणपतराव विश्वनाथ व सखाराम येशवंत पानशे; त्रिंबकराव अमृतेश्वर पेठणे; परशराम पंडित प्रतिनिधी; पथला निसवत बाळाजी जनार्दन; पथला निसबत हरी बल्लाळ फडके; छत्रसिंग व भाऊसिंग टोके; विठ्ठलराव रामचंद्र व बळवंतराव अप्पाजीराव अबीकर; माहिपतराव वगैरे धुमाळ; कृष्णाजी रणदिवे; माहादाजी नाईक निंबाळकर; दवलतराव निंबाळकर हणमंतराव भोसले जितिकर; मल्हाराव सोमवंशी हासाजी व गिर्जाजी आठोळे; रामराव चितळकर; कृष्णराव साळुखे खंडेराव वगैरे सोमवंशी; हैबतराव सोमवंशी; हेंबतराव ढमढेरे; नारायणराव ढम: ढेरे; दादजी वगैरे शिताळे अवसरीकर; खंडेराव वगैरे शिताळे कुशेगांवकर; शिताळे नेहावकर; संभाजी व जोत्याजी जाधराव; जिवाजी आठोले; अनंतराव थोरात; अमसिंग जाधवराव; संभाजी राऊत; कृष्णाजी बाबूराव दाभाडे; रघोजी वगैरे भोसले साखरीकर; माणिकराव वगैरे धायगुडे; रायाजी जाधव, अंनतराव पोवार; हणमंतराव जाधव भुईजकर; सटवाजी व सुलतानजी धायभर; जानोजी व प्रीताजी शेकर; शेख महमद; कृष्णराव भगवंत; भोयटे मंडळी नसिराबादकर; खेत्रोजी भोयटे; सखोजी शिर्के; तुकोजी अनंतराव; बळवंतराव व विठलराव पवार; गोविंदराव व द्वारकोजी पवार; बाळजी व मालजी भोसलें; चंद्रराव पवार; राणोजी पवार विश्वासराव शिवराव धिराजी पवार; मल्हारजी पवार; तुकोजी व सदाशिव पवार मानाजी फुकडे;
१३१] श्री.
राजश्री चिमणाजीपंत व राजश्री धोंडोपंत व राजश्री बापूजीपंत गोसावी यांसी :-
अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य कृष्णाजी दाभाडे दंडवत विनंती उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लिहिलें पाहिजे. विशेष आपला प्रसंग आहे तो तुह्मांस लिहिला असतां महाराज श्री परमहंसस्वामीचे पत्रीं बहुत विषादें लिहिलें ऐसें उचित नाहीं. आह्मी स्वामीचे सेवक आहों. यथासामर्थे अंतराय न होय. तुह्मी कळेल ते सविस्तरें सांगणें. साता-यासी येतच आहों. दर्शन घेऊन भेटीनंतर सकल वृत्त विदित करून मग जे आज्ञा करितील ते प्रमाण असे. बहुत काय लिहिणें लोभ असो दीजे. हे विनंति.
[१३२] श्री.
श्रियासह चिरंजीव विजयीभव. मार्कंडीचे आयुष्य राजमान्य राजश्री बळवंतराव याशि प्रती बाजीराव यादव कृतानेक आशीर्वाद. उपरी येथील कुशल तागायत फाल्गुन वद्य त्रयोदशी पर्यंत यथास्थित जाणून स्वकीय लिहिणें विशेष. तुह्माकडील बहुत दिवस वृत्त नाहीं. तुह्मी पंचमीस येतों ह्मणून लिहिलें परंतु आलां नाहीं. तरी सविस्तर काय आहे, कधीं येणार तें लिहिणें. मल्हारी गायकवाड गेला तो अद्यापि आला नाहीं हेंही लिहिणें. तुह्माकरितां बहुत चिंता वाटते. येकवेळ भेटी घेऊन मग काय विचार करणें तो विचार करावा. हे विनंति. परंतु येकदा अगत्य येणें. बहुत काय लिहिणे. लोभ असो दीजे. हे आशीर्वाद.
भाद्रपदी यात्रेस श्रीदेव पुणियावरून मोरगांवास गेले नाहींत. मळीकडवणे याजवरून गेले आले असेत. १
भाद्रपद शुद्ध ४ रविवारी राजश्री कृष्णाजी दाभाडे तळेगांव तारले असेत. १
भाद्रपद शुद्ध १२ सोमवारीं राजश्री चिमाजीअप्पा वसईप्रांत फत्ते करून चिंचवडावरून पुणियास आले. राजश्री राऊ औंधापावेतों सामोरे गेले होते.
संभाजी पाटील शिरवळे यासी मोहपजी पा। शिरवळे वडीलधाकुटपणाचें भांडण भांडतो. त्यांणी राजश्री छत्रपतीचे व पेशव्याचे कागद बापूजीपंतास आणून गोत आठ गांऊ व कांहीं शिरवळदेवाचें गांउ नेमून घेतले. संभाजी वडील होता. परंतु मोहपजीनें हीमायतीनें आपले सोईचें गोत नेमून घेतलें असे. संभाजीचें घर वडील. दुसरा तिसरा मोहपजी, असें असतां, मोहपजी, कांहीं खर्चवेंच आपणांस पडिला असे, कसाला असाला पडिला, याजकरितां संभाजीच्या वडिलीं आपणास वडीलपण दिल्हें आहे, असें भांडतो. १
सुभानजी कदसुळा लोणकर यासी कुंबरपाटी सा रुके, पैकीं ती रुका सुभानजी, ती रुका कृष्णाजी कदमुळा ऐसे वाटतात. त्यास कृष्णाजी ह्मणतो सजणीही आपली ह्मणून सुभानजीशीं भांडतो. तकरीरा, राजीनामे, जामिन कतबे दिवाण घेतले. पांढर आणिली. मग गांवकरियांनी निकाल काहाडिला कीं, आह्मीं यास घेऊन गांवांस जातों, पांढरींत शोध करून विल्हेस जाऊन येऊन सांगों. ऐसें ह्मणून निरोप घेऊन गांवांस गेले. कृष्णाजी कदसुळास तान्हाजीपंत हवलदार याची हिमायत फारशी असे. १
राजश्री चिमाजी अप्पा. वसईहून भाद्रपद शुद्ध १२ सोमवारीं पुणियास आले. त्यास भेटीस सामोरे आउंधापाशीं देशमूख देशपांडिये गेले. समाईक वस्त्र उभयतां देशमूख व देशपांडे मिळोन नेले. गु॥ रामाजी मा। परांडकर पागोटें किंमत रुपये ६, सन ११४९.
भाद्रपद वद्य सप्तमीचा पक्ष पेशवियाचेथील जाला. सकट अर्धा रुपया आगांतुकास दक्षणा दिल्ही असे.
अष्टमीस राणोजी शिंदे व रामचंद्रबाबा आले. द्वादशीस राणबी आवंधास पित्रें घालावयास गेले होते. त्यांची रोख चिमाई, तेथें त्रयोदशीस कोनी निघाली. लेक जाली असे. १
लेखांक ३२
श्री.
१६५५ पौष शुध्द ७. श्रीराजाशाहूस्वामीचरणी तत्पर बाबूराव दाभाडे सेना खासखेल निरंतर.
आज्ञापत्र सेना-धुरंधर विश्र्वासनिधि राजमान्य राजश्री बाबूराऊ दाभाडे सेनाखासखेल ता|| मोकदम-
मौजे केळगांव, ता|| चाकण सु.|| अर्बा सलासीन मया व अलफ. मौजे मजकूर दरोबस्त मोकासा राजश्री पांडुरंगाश्रमबाबा, वास्तव्य अळंकापुरी, यांस वर्षासनांत दिल्हा आहे. तरी, मौजेमजकूरचा आकार होईल तो मोकासबाबेचा ऐवज यांजकडे पावीत जाणे. प्रतिवर्षी नूतन सनदेचा उजूर करीत * नव जाणे. जाणिजे. र|| छ ६ माहे साबान. (विलसति लेखनावधी मुद्रा.)
बार
लेखांक ३३.
श्री.
१६५५ पौष वद्य १२.
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ६० प्रमादी संवत्सरे पौष बहुल द्वादशी रविवासरे क्षत्रियकुलावतंस श्रीराजा शाहूछत्रपती स्वामी यांनी समस्त राजकार्यधुरंधर विश्र्वासनिधी राजमान्य राजश्री बाजीराऊ पंडित प्रधान यांसी आज्ञा केली ऐसी जे- श्रीपांडुरंगाश्रम परमहंस वास्तव्य मौजे आळंदी ता चाकण प्रा जुन्नर हे थोर महापुरुष, यांचे मठचा योगक्षेम चालविलिया श्रेयस्कर जाणून, मौजे केळगांव ता मजकूर हा गांव पेसजीच्या मुकसियाकडून दूर करून, हाली यास कुलबाब कुलकानू देखील हालीपट्टी व पेस्तरपट्टी खेरीज हकदार व इनामदार करून, नूतन इनाम दिल्हा असे. तरी तुम्ही मौजेमजकूर यांचे दुमाला करवून यांस व यांचे शिष्यपरंपरेने इनाम चालवणे. प्रतिवर्षी नवीन पत्राचा आक्षेप न करणे. या पत्राची प्रती लेहून घेऊन अस्सल पत्र भोगवटियास परतोन देणे. जाणिजे. बहुत काय लिहिणेॽ * तरी सूज्ञ असा.
लेखांक ६०.
श्री.
१६७३ कार्तिक वद्य ७.
अखंडित –लक्ष्मी-अलंकृत-राजमान्य राजश्री हरि दामोदर गोसावी यांसी-
सेवक बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार सु इसन्ने खमसैन मया व अलफ. मौजे केळगांव, ता. चाकण. प्रा. जुन्नर, हा गाव श्रीपांडुरंगाश्रम स्वामी यांस पहिल्यापासून आहे. त्यास, दाभाड्याची सरदेशमुखी व सरपाटीलकीचे रोखे तुम्ही मौजे मजकुरावर केले आहेत. म्हणोन हुजूर विदित जाहले. ऐशास, मौजेमजकूर स्वामीकडे पहिल्यापासून चालत आला आहे. तरी सरदेशमुखी व सरपाटीलकी मौजे मजकुरची तुम्ही जप्त केली आहे ती साल मजकूरपासून मोकळी केली असे. तरी मौजेमजकूरचा अंमल सुदामनप्रो स्वामीकडे देववणे. सरदेशमुखी व सरपाटीलकी सालाबादप्रो यांजकडे चालवणे. दाभाडियाचे अंमलात चालल्याप्रो पुढे चालवणे. त्यांत नोदिगर न करणे. जाणिजे. छ २० जिल्हेज. * बहुत काय लिहिणेॽ
(लेखनसीमा. बार)
लेखांक ६१.
श्री.
१६७४ भाद्रपद शुध्द ७. राजमान्य राजश्री गोपाळ भास्कर गोसावी यांसी-
सेवक बाळाजी बाजीराऊ प्रधान नमस्कार. सु सलास खमसैन मया व अलफ. मौजे केळगाऊ ता चाकण हा गाव स्वराज्य व मोगलाईतून इनाम श्रीपांडुरंगाश्रम परमहंस यांजकडे आहे. त्यास साल गुदस्ता वसूल यांस पावला नाही, म्हणोन हुजर विदित जाहले. त्यावरून हे पत्र सादर केले असे. तरी, तुम्ही मौजेमजकुरास ताकीद करून सालगुदस्तांचा वसूल राहिला आहे तो देववणे व पुढे तुम्ही मौजेमजकुरापासोन इनामाचा पैका सालाबादप्रमाणे वसूल करून श्रीकडे देत जाणे. छ ५ जिलकाद.
Comments
Post a Comment