Posts

Showing posts from July, 2021

सोलापुर, धाराशिव व मराठवाडा भागातली देशमुखी शिक्के असणारी व देशमुखी भूषवलेली घराणी.

मोहिते देशमुख -टणू.. माने-देशमुख - वेळापूर, अकलूज.. ताटे देशमुख- कासेगाव, पंढरपूर... काकडे देशमुख. बोरखेड. जिल्हा बीड.  कोकाटे देशमुख....यांचे दोन गावे आहेत १) आडस जि बीड २) बार्शी नागटिळक[शिंदे]देशमुख -धानोरे काळे देशमुख-काळेगाव गायकवाड देशमुख-मोहोळ साळुंके देशमुख काटी काळे -देशमुख-पानगाव जाधव-देशमुख-रातंजन  आवारे देशमुख-तडवळे[गढी वरचे] इर्ले-डुरे बहमनीत उमराव तसेच देशमुखी वेळापूर--माने देशमुख इंगवले देशमुख- सांगो   

रायबा मालुसरे यांची समाधी किल्ले पारगड

Image
रायबा मालुसरे यांची समाधी किल्ले पारगड

आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष

Image
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२८ जुलै १६०६* राजे मालोजीराजे व राजे विठोजीराजे यांच्या पत्रांत सरगुऱ्हों" असा उल्लेख ! धामधुमीचा काळ पराक्रमी पुरुषांस भाग्योदय करून घेण्यासाठी अत्यंत अनुकूल असतो. कारण यावेळी धडाडी दाखविल्यास त्वरित मोबदला मिळण्याची शक्यता असते. राजे मालोजीराजे यावेळी तरुण होते. स्वाभाविकपणेच त्यांच्या महत्वाकांक्षी तरुण मनाला ही राजकीय अस्थिरता भाग्योदयार्थ अनुकूल वाटली व त्यांनी शेती टाकून तरवार हाती धरली. राजे मालोजीराजे व राजे विठोजीराजे यांची जी पत्रे उपलब्ध आहेत. त्यांत या दोघा महापराक्रमी बंधूंना "सर" असे म्हटले आहे. सरगुन्हो हे सरगिरोह चे मराठी रुप आहे. गिरोह म्हणजे जमाव. त्यांचा प्रमुख म्हणजे सरगिरोह. उपरोक्त पत्रांमध्ये राजे "मालोजीराजे व राजे विठोजीराजे सरगुन्हो यासी गुन्होथलयास मुकासा दिधले असे असा उल्लेख करून काही गावे दिली आहेत. याचा अर्थ स्वतःचा जमाव किंवा सैन्य तुकडी घेऊन सरकार चाकरी करायची, व त्या मोबदल्यात सरकारकडून काही स्थळे खर्चासाठी मागून घ्यायची अशी पद्धत त्याकाळी रुढ होती. त्यानुसार राजे मालोजीर

raje Lakhuji Jadhav

Image

सरंजामदार उतेकर घराणे

Image
⛳⛳सरंजामदार उतेकर घराणे ⛳⛳ उतेकर घराणे हे शिवपुर्व काळापासून सरंजामदार घराणे असून,  जावळीच्या  चंद्रराव मोरे यांच्या मुतालिक घराणे होते हिदंवी स्वराज्याची कालखंडात  स्वराज्य सेवा करताना दिसत आहे  फोटो उतेकर घराण्यातील , शिक्का, व पत्र  

संगमेश्वर

Image
"संगमेश्वर" छत्रपती संभाजी महाराजांना कैद केले ते हे ठिकाण, एक दुर्दैवी घटना घडल्याचे इथले वाडे,मंदिरे साक्षीदार आहेत, विशाळगडावरून रायगडावर जातांना "छत्रपती संभाजी महाराज" संगमेश्वरला या वाड्यात मुक्कामाला होते औरंगजेबाचा सेनापती शेखनिजाम मुकर्रबखान हा कोल्हापुराहून सैन्य घेऊन संगमेश्वरला आला आणि बेसावध असलेल्या संभाजी महाराजांना त्याने कैद केले, महाराजांना पकडल्यानंतर त्याने इथले वाडे जाळले,मंदिरे फोडली,महाराजांच्या शेवटच्या आठवणीचे साक्षीदार म्हणजे कसब्यातील हे वाडे,मंदिरे त्यांच्याकडे बघत रहावं, आणि महाराजांचा इतिहास डोळ्यात साठवावा. 🚩🙏 छत्रपती संभाजी महाराज 🙏🚩

इंदौरचा होळकर राजवाडा येथील काही फोटोज

Image

दाभाडे घराणे

Image
दाभाड्यांचा मूळपुरुष येसाजी हा तळेगाव (दाभाडे) (तालुके मावळ जिल्हा पुणे) येथील रहिवासी व मुकदम होता.  दाभाडे क्षत्रिय असून यांचें गोत्र शांडिल्य व देवक कळंबाचें आहे.  येसाजी हा शिवाजीमहाराजांचा हुजर्‍या होता. महाराज आग्र्यास गेले असतां येसाजीनें इकडे राजकुटुंबाची सेवा केली. येसाजीचा थोरला मुलगा खंडेराव होय.  राजाराम छत्रपती हे जिंजीस जातांना येसाजीसह खंडेराव हा त्यांच्याबरोबर गेला होता. जिंजीस राजाराम यांनां संभाजी हा पुत्र झाला, तेव्हां त्यांनीं येसाजीस तळेगांव, इंदुरी, धामणें आणि उरसें हीं गांवें इनाम करून दिलीं.  राजाराम हे जिंजीहून परत येत असतां मागें जनान्याच्या बंदोबस्तास येसाजी यास ठेवलें होतें. त्यानें मोठ्या युक्तीनें जनानखाना किल्ल्यांतून काढून अनेक संकटांतून पन्हाळ्यास आल्यावर येसाजी मेला. राजाराम हे जिंजीस जात असतां मोंगल मागें लागला होता. तेव्हा (खंडेरावाचा धाकटा भाऊ) शिवाजीनें त्याला पाठीवर घेऊन दौड मारली असता त्याची छाती फुटून व रक्ताच्या गुळण्या होऊन तो मेला होता.  पन्हाळ्यास आल्यावर छत्रपतींनीं खंडेरावास सेनाधुरंधर हें पद देऊन गुजराथ व बागलाणकडे मुलुखगिरीवर पाठविलें आण

कोल्हापूर छत्रपति संस्थानच्या विशाळगड जहागीरदार पंतप्रतिनिधींचा हा वाडा!

Image
विशाळगड संस्थानच्या पंतप्रतिनिधींचापंतप्रतिनिधींचा हा वाडा! सातारा जिल्ह्यातील औंध संस्थानचे पंतप्रतिनिधी आणि हे विशाळगडाचे पंतप्रतिनिधी वेगळे बर का!   कृष्णराव भाऊसाहेब प्रतिनिधी यांनी १८९० मध्ये फोटोत दिलेला वाडा बांधला.  यालाच विशाळगड हाऊस अथवा मलकापूर बंगला असे म्हणतात.    उजव्याबाजूला समोर झाडांनी वेढलेला, बाजूला बांबूंच्या झाडांच्या विळख्यात असणारा हा वाडा नजरेस पडला. विशाळगड कंपाऊंड असे या भागाचे नाव असल्याने साहजिकच या भागात काही ऐतिहासिक आहे का, हे पाहण्यासाठी उत्सुक होतो आणि ते मिळालं. सध्या पंतप्रतिनिधींची वंशज इथे राहतात. त्यांच्या सासरचे आडनाव आता 'घण' असे आहे.   कोल्हापुर जिल्ह्यातील एकूण ५ जहागीरदारांचे संस्थान होती. ती सर्व कोल्हापूर छत्रपति च्या जहागिरी.  १. विशाळगड,  २. बावडा,  ३.कापशी,  ४.कागल,  ५. इचलकरंजी.   १८९२ मध्ये  आबाजीराव कृष्णराव उर्फ आबासाहेब विशाळगड संस्थानाचा कारभार पाहत होते.  विशाळगडाच्या पंतप्रतिनिधींचे आडनाव 'जयकर' आहे असे ऐकले होते, "ते चुकीचे लिहिले गेले आहे एका पुस्तकात माहिती देताना", असे 'उदयजी घण' यांनी सांगितल

शिंदे घराण्याचे संस्थापक राज्यकर्ते राणोजी शिंदे

Image
👉1737 ते 1880 मध्ये उज्जैनवर शिंदे घराण्याचे एकछत्र  अमल होता.  👉त्या काळात उज्जैनचा खुप विकास झाला.उज्जैन ही शिंदे राज्यकर्त्यांची राजधानी होती. 👉महाराष्ट्रात शिंदे घराने म्हणून आहे. शिन्दे घराणे अथवा हिन्दीमध्ये सिन्धीया हे मध्य भारतातील ग्वाल्हेर येथील राज्यकर्ते होत.  👉मराठेशाहीतील एक पराक्रमी घराणे व भूतपूर्व ग्वाल्हेर संस्थानचे संस्थापक राजघराणे. कण्हेरखेड (जि.सातारा) येथील पाटीलकी या घराण्याकडे होती.     👉शिंदे हे औरंगजेबाच्या पदरचे मनसबदार असल्यामुळे बादशहाने छत्रपती शाहूंशी त्यांची सोयरीक करून दिली होती. छ. शाहू औरंगजेबाच्या कैदेत असतानाच ही शिंद्यांची मुलगी मरण पावली. दत्ताजीचा मुलगा जनकोजी हा बाळाजी विश्वनाथ पेशव्यांच्या पदरी होता मात्र त्याविषयी फारशी माहिती ज्ञात नाही. ह्याचा मुलगा राणोजी होय. राणोजीपासूनच शिंदे घराणे पुढे आले. 👉राज्यकर्ते होण्याअगोदर मराठा साम्राज्याचे मुख्य सरदार घराणे होते.  👉मराठा साम्राज्याच्या विस्तारामध्ये यांनी मोठी कामगीरी बजावली होती. शिन्दे हे मुळचे सातारा जिल्ह्यातील नीरा नदीच्या काठावरील कण्हेरखेडे या गावचे पाटील होते. राणोज

इतिहासाचे भिष्माचार्य कै. वासुदेव सीताराम बेंद्रे*

Image
*१६ जुलै १९८६* *शिवरायांचे सत्य चित्र शोधणारे इतिहासाचे भिष्माचार्य कै. वासुदेव सीताराम बेंद्रे* वासुदेव सीताराम बेंद्रे (जन्म: पेण,रायगड जिल्हा-महाराष्ट्र, १३ फेब्रुवारी १८९६; मृत्यू १६ जुलै १९८६) हे महाराष्ट्रातील एक इतिहासकार होते. छत्रपती शिवाजी महाराज यांची आज सर्वमान्य असलेली जन्मतिथी-फाल्गुन वद्य तृतीया, शके १५५१, (१९ फेब्रुवारी, सन १६३०)- ही नक्की करण्याचे अभूतपूर्व काम वा.सी. बेंद्रे यांनी केले. त्यापूर्वीच्या असंख्य इतिहासकारांनी दिलेली तिथी-इ.स. १६२७, शके १५४९ प्रभव नाम संवत्सर, वैशाख शुक्ल तृतीया- ही आता महाराष्ट्रात तरी ग्राह्य धरली जात नाही.  जेव्हां लंडनमधील मराठ्यांच्या इतिहासाची साधने तपासण्याची आणि ती संकलित करण्याची श्री.बेंद्रे ह्यांना संधी मिळाली तेव्हां अशी साधने तपासतांना त्यांना मराठ्यांच्या इतिहासाच्या दृष्टीने किंबहुना महाराष्ट्राच्या दृष्टीने एकअतिशय बहुमोल असा ठेवा प्राप्त झाला. तो पर्यंत इब्राहीम खान नावाच्या एका परकीय व्यक्तीचे चित्र “ छत्रपती शिवाजी महाराजांचे” चित्र म्हणून महाराष्ट्राच्या इतिहास विषयक पुस्तकातून छापलेले होते. हे चित्र मनुची ह

बांदल सेना. रायाजी बांदल" -इतिहासातील निसटलेली पाने ...

Image
"बाजी बांदल", "रायाजी बांदल" -इतिहासातील निसटलेली पाने ... मरण मारुनी पुढे निघाले गर्व तयांचा कोण हरी ? रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी ? "सिद्दी जौहर" ने पन्हाळा गडाला घातलेल्या वेढ्यातून निसटून, १३ जुलै १६६० रोजी "छत्रपती शिवाजी महाराज" हे पन्हाळा गडावरून विशाळगडाकडे निघाले, तेव्हा वाटेत गजापूरच्या खिंडीत गानिमाने त्यांना गाठले. महाराज विशाळगडाकडे निघाले आणि खिंडीत गनिमाला रोखून धरण्यासाठी आपले काही मावळे पुढे सरसावले. त्या मावळ्यांचे नेतृत्व करत होते "कृष्णाजीराजे नाईक-बांदल" यांचे चिरंजीव "बाजी बांदल" व "रायाजी बांदल". हे दोघेही भोर तालुक्यातील "हिरडस मावळ" मधील "पिसावरे गावचे. त्यांना त्या भागातील ५३ गावची वतनदारी होती. या दोघा भावांनी आपल्या तलवारीच्या जोरावर गनिमाला खिंडीत रोखून धरलं. त्यांच्या सोबतीला होते त्यांचे दिवाण "बाजी प्रभू देशपांडे" जे "बांदल" यांच्याकडे "चिटणीस / कारकून" म्हणून काम करत होते. तसेच त्यांच्या बरोबर "गुंजन मावळ, हिरडस मावळ , वेळवं

ऐतिहासीक दिनविशेष*

Image
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१४ जुलै १६५९* सोनोपंत डबीर दिल्लीहुन स्वराज्यात परत त्यासुमारास स्वराज्यावर अफजलखानाचे संकट घोंघावत होते. महाराज नुकतेच जावळीला आले होते. इस १६५७ मधे शिवाजीराजांनी मुघलांच्या ताब्यातील जुन्नरवर अचानक हल्ला करून औरंगजेबाला धक्का दिला होता खरा मात्र, त्याविरुद्ध काही तोडगा काढण्याआधीच औरंगजेबाला सत्तासंघर्षासाठी दिल्लीच्या दिशेने जावे लागले.  भाऊ आणि इतर प्रतिस्पर्ध्यांचा काटा काढुन व बाप शहाजहानला कैदेत टाकुन निश्चिंत होऊन औरंगजेब ५ जून १६५९ रोजी थाटामाटात दिल्लीच्या गादीवर बसला. त्याप्रसंगी राजकारणाचा भाग म्हणून महाराजांतर्फे नजराणा घेऊन सोनोपंत दिल्ली दरबारात उपस्थित होते. त्यांनी तो औरंगजेबाला पेश केला त्याबदल्यात औरंगजेबानेही महाराजांना देण्यासाठी पोशाख व फर्मान सोनोपंतांना दिले. फर्मानात 'इकडील लोभ आपणावर पूर्ण आहे असे जाणून असावे' असे नमूद होते.  अफजलखानाचे प्रचंड संकट आले असताना किमान मुघलांच्या आघाडीवर शांतता होती हे तस बरच झाल मात्र, ही केवळ तात्पुरती व वरवरची गोडीगुलाबी होती हे पुढच्या काही महिन्यांतच सिद्ध

रामदरा.. ......पुणे

Image
रामदरा..  ......पुणे   पुणे -सोलापूर रस्त्यावर लोणी काळभोर गावाहून फक्त थोड्या अंतरावर असलेले रमणीय ठिकाण रामदरा. धुंदीबाबा उर्फ देवीपुरी महाराजांनी मोठ्या  परिश्रमाने हे सुंदर स्थळ साकारले. मुख्य मंदिरात दत्तमूर्ती, राम सीता लक्ष्मण यांच्या मूर्ती व शिवपिंडी आहे. समोरच सभामंडपात मोठा संगमरवरी नंदी .मुख्य मंदिराच्या चारी बाजूंना महाकाली, लक्ष्मी, गायत्री तसेच दुर्गादेवी यांच्या मूर्ती   मंदिरांमध्ये आहेत  पाण्याच्या वेढ्यात आणि वृक्षराजीत वसलेले मंदिर . उन्हाळयात पाणी नसते तलावात. जुनी झाडे खूप देखणी आहेत विविध पक्ष्यांच्या किलबिलाटाने आणि दर्शनाने मनाला भुरळ घालणारा शांत निसर्गरम्य परिसर .

सरखेल कान्होजा आंग्रे याचा इतिहास

Image
👉छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्मिताना आरमाराची मुहुर्तमेढ रोवली तर मराठा आरमाराचे प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या पराक्रमाने आरमारावर वचक ठेवली.                                                                      इंग्रज, पोर्तुगीज यांच्या कडून होणारी आक्रमणे कानोजी आंग्रे यांनी परतवून लावून छत्रपती शिवाजी महाराजांच्या उभारलेल्या मराठा समाजाचे रक्षण करण्यात योगदान दिल.  राजाराम महाराजांच्यापासूनच कान्होजी उत्तम कार्य बजावत होते.  👉  छत्रपतींच्या सुनबाई महाराणी ताराबाई यांच्या पासून कान्होजी आंग्रे यांच्या कार्याची सुरुवात झाली.  महाराणी ताराबाई यांनी कान्होजी आंग्रे यांना 'ध्वजवृंदाधिकारी' ही पदवी बहाल केली.  बाळाजी विश्वनाथ पेशवे यांनी कान्होजी आंग्रे यांचे महत्व ओळखून त्यांना छत्रपती शाहू यांच्याकडे वळविले होते.  सन १६९४ पासून कोकणात कान्होजी आंग्रे पराक्रमाने गर्जत होते. 👉कोकणची भूमि मोघलांच्या जुलूमापासून सुरक्षित राखण्यात कान्होजींनी यश संपादन केले होते.  👉सिद्धी, इंग्रज, पोर्तुगीज आणि डच यांची सत्ता प्रामुख्याने

पिलाजीराव जाधवराव याचा आज ३ जुलै रोजी स्मृतीदिवस. त्यानिमित्त विनम्र अभिवादन व कोटी कोटी नमन याचा अपरिच इतिहास थोडक्यात पाहू.

Image
👉पिलाजी जाधवराव त्यांच्या वडिलांचे नाव चांगोजी जाधवराव होते. चांगोजी जाधवराव हे शूर पराक्रमी लढवय्ये होते. यांच्याकडे वाघोली ची पाटील की परंपरागत चालत आलेली होती. 👉छत्रपती शाहू महाराजांच्या  नेतृत्वामध्ये, मराठे उत्तर हिंदुस्तान या मध्ये सक्रिय होते.  सरदार पिलाजीराव जाधवराव वजनदार सरदार छत्रपती शाहू महाराजांच्या कालखंडामध्ये मराठे उत्तर हिंदुस्तान या मध्ये सक्रिय होते.  उत्तरेमध्ये जर वर्षी पिलाजी जाधवराव मुलुख वखरणी प्राप्त करत. 👉उत्तर हिंदुस्तान या मधील राजकीय हालचाली मध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका असत. उत्तर हिंदुस्तान या मधील राजकीय हालचाली मध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका असत. अनेक रेफरन्स नुसार अनेक अनेक शहरांमध्ये त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण होती. इसवीसन 722 मध्ये पिलाजी जाधवराव उत्तरेत माळवे प्रांतांमध्ये गेल होते. पिलाजी जाधवराव व बाजीराव पेशवे यांनी बुंदेलखंड पर्यंत मजल मारली होती. थोरले बाजीराव पेशवे यांचे सिनिअर पिलाजी जाधवराव असल्यामुळे पिलाजी जाधवराव हे त्यांच्या गुरुस्थानी होते. 👉बहादूरशी युद्ध 17 26 मध्ये अनेक सरदारांच्या सह पिलाजी जाधवराव यांनी पराक्रम

थोर हिंदू सम्राट हरपाल यादव

Image
महान हिंदू सम्राट # महाराजा वीर मराठा # हरपाल देव यादव यांची अमर कथा  ----------------------------- हरपाल देव यादव, देवागिरी साम्राज्याचा शेवटचा राज्यकर्ता, भारताचा सर्वात महान हिंदू सम्राट, ज्याला मुस्लिम शासक खिलजीने जळत्या तेलात घातले, तरीही त्याने धर्म बदलला नाही.  ८६०-१३१७ या काळातील देवगिरी यादव घराण्याने तुंगभद्र ते नर्मदा पर्यंत राज्य केले, ज्यात सध्याच्या महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, मध्य प्रदेश आणि गुजरातचा काही भाग शिगेला आहे.  त्यांची राजधानी देवगिरी होती, त्याचे नाव बदलून दौलताबाद असे मुस्लिम हल्लेखोरांनी केले.  १३व्या शतकाचा शेवटचा टप्पा मुस्लिम आक्रमणकर्त्यांनी सहन केला.  याच काळात आक्रमक अल्लाउद्दीन खिलजीने आर्यवर्ताला लुबाडण्याच्या उद्देशाने भारत जिंकण्याची तयारी दर्शविली होती.  त्यावेळी देवगिरी यादव राज्य आर्यवर्तात सर्वात मोठी शक्ती होती.  १३०९  मध्ये, क्रूर खिलजीने जेव्हा देवगिरी जिंकण्याचा प्रयत्न केला, तेव्हा देवगिरी साम्राज्याचा सम्राट महाराजा रामचंद्र यादव होता.  देवगिरीवर चढण्यापूर्वी खिलजीने गुजरातच्या सूर्यवंशी वाघेला राजा करणसिंगचा पराभव केला होता आणि करण सिंग