आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२८ जुलै १६०६*
राजे मालोजीराजे व राजे विठोजीराजे यांच्या पत्रांत सरगुऱ्हों" असा उल्लेख !
धामधुमीचा काळ पराक्रमी पुरुषांस भाग्योदय करून घेण्यासाठी अत्यंत अनुकूल असतो. कारण यावेळी धडाडी दाखविल्यास त्वरित मोबदला मिळण्याची शक्यता असते. राजे मालोजीराजे यावेळी तरुण होते. स्वाभाविकपणेच त्यांच्या महत्वाकांक्षी तरुण मनाला ही राजकीय अस्थिरता भाग्योदयार्थ अनुकूल वाटली व त्यांनी शेती टाकून तरवार हाती धरली. राजे मालोजीराजे व राजे विठोजीराजे यांची जी पत्रे उपलब्ध आहेत. त्यांत या दोघा महापराक्रमी बंधूंना "सर" असे म्हटले आहे. सरगुन्हो हे सरगिरोह चे मराठी रुप आहे. गिरोह म्हणजे जमाव. त्यांचा प्रमुख म्हणजे सरगिरोह. उपरोक्त पत्रांमध्ये राजे "मालोजीराजे व राजे विठोजीराजे सरगुन्हो यासी गुन्होथलयास मुकासा दिधले असे असा उल्लेख करून काही गावे दिली आहेत. याचा अर्थ स्वतःचा जमाव किंवा सैन्य तुकडी घेऊन सरकार चाकरी करायची, व त्या मोबदल्यात सरकारकडून काही स्थळे खर्चासाठी मागून घ्यायची अशी पद्धत त्याकाळी रुढ होती. त्यानुसार राजे मालोजीराजे व राजे विठोजीराजे यांनी आपले स्वतंत्र जमाव उभे करून निजामशाहीत चाकरी केली हे स्पष्ट होते.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇



🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२८ जुलै १७८७*
लालसोटची लढाई
२८ जुलै ते ३० जुलै १७८७
महादजी शिंद्यांना इ.स.१७८४ मध्ये मोगल बादशाहने आपला वकील-इ-मुतालिक नेमले  व बादशाहीचे अतर्गत तसेच बाह्य शत्रूंपासून संरक्षण करण्याची जबाबदारी पण मराठ्यांवर आली. तसेच बादशहाचे वसुलीचे अधिकार पण मराठ्यांना मिळाले. राजपूत संस्थानिक मोगल बादशहाचे मांडलिक असल्याने ते त्याला खंडणी देत. त्याशिवाय मराठ्यांना चौथ व सरदेशमुखी पण ध्यावी लागायची. दिल्लीच्या बादशहाची स्थिती-खमक्या वा ढिला, सुस्त बघून राजपूत खंडणी देत किंवा थकवित असत. ज्या वेळी महाद्जीनची मुतालिक म्हणून नेमणूक झाली त्या वेळी स्वतः बादशाह व महादजी ह्या दोघांची आर्थिक स्थिती फारच गंभीर होती. एकादशीच्या घरी द्वादशी अशी दोघांची परिस्थिती होती. मग महाद्जीने आपला मोर्चा जुनी थकबाकी वसूल करण्यासाठी राजपुतांकडे वळविला.जयपूर संस्थांन चा राजा पृथ्वीसिंग १७७८ मध्ये मेला व त्याचा भाऊ प्रतापसिंग जो अत्यंत बेजबाबदार होता, राज्यपदी आला. पण त्यावेळी जयपूर दरबारचा मांडलिक असलेला राव राजा प्रतापसिंग जयपूरच्या राजकारणात महत्वपूर्ण स्थान मिळविण्यासाठी प्रयत्नशील होता. त्यासाठी त्याने पृथ्विसिग चा मुलगा मानसिंग ला जयपूरच्या गादीवर बसविण्यासाठी महाद्जींची मदत मागितली. त्यानुसार मराठी फौजा जयपूर राज्यात शिरून एकेक भाग काबीज करून मुलकी राज्यकारभार सुरु केला. तेव्हा प्रतापसिंग ने महाद्जींशी बोलणी सुरु केली. महादजींनी ३ कोटी ४० लाखाची मागणी केली, रावराजा प्रतापसिंग च्या मध्यस्थीने शेवटी ६३ लाखावर बोलणी संपली. त्यातील पहिला ११ लाखांचा हप्ता प्रतापसिंग ने कसाबसा दिला .पावसाला जवळ आल्याने महादजींनी आपल्या रायाजी पाटील ह्या सरदारास बाकी वसुलीसाठी  जयपूरला ठेवून दिल्लीकडे प्रस्थान केले.( जून १७८६) महादजी गेल्यानंतर जयपूर दरबारने जोधपुरच्या विजयसिंग व अन्य लहान मोठ्या राजपूत, जाट, शीख, रोहिले अशा सर्वाना एकत्र आणून मराठ्यांना उत्तरेतून घालवून देण्याचा घाट घातला. ह्याची खबर रायाजी पाटलाने महाद्जींस दिली व महादजी दिल्लीहून जयपूरकडे निघाले. ते मे १७८७ मध्ये लालसोट ( सध्या राजस्थानातील दौसा  ह्या गावाजवळ आहे.) पोहचले. महाद्जींच्या सैन्यात महाराष्ट्रातील सैनिकांपेक्षा उत्तरेकडील सैनिक मोठ्या प्रमाणावर होते. त्यांना मराठा  दौलातीविषयी काही ममत्व नव्हते. तसेच आधी म्हटल्या प्रमाणे महाद्जींची आर्थिक स्थिती ठीक नव्हती, त्यामुळे बराच काळ सैनिकांचे पगार झाले नव्हते. मोगल सरदार व आग्र्याच्या किल्ल्याचा किल्लेदार महाद्जींचा बाजूला होता, तो पण  ८० तोफा व बरीच मोठी फौज घेऊन ऐन वेळी राजपुताना जाऊन मिळाला. महाद्जीच्या सैन्यात मोठ्या प्रमाणावर फितुरी होऊन मराठी सैन्याला माघार घ्यावी लागली. राजपूत पण विजयोन्मदात पुन्हा आपल्या जागी परतले. मराठ्यांनी पण सगळीकडून कोंडी होत असल्याचे बघून परत फिरण्याचा निर्णय घेतला. काही जणांचे असे म्हणणे आहे कि जर राजपूत माघारी फिरले नसते व त्यांनी लढाई चालूच ठेवली असती तर कदाचित मराठा सैन्याची १७६१ मध्ये पानिपत संग्रामाच्या वेळी झाली तशी अतोनात हानी झाली असती, पण राजपूत व मराठे दोघांनी जास्त लावून धरले नाही म्हणून ती नामुष्की टळली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...