आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
१० फेब्रुवारी १६६५
शिवाजीराजांनी लहान वयातच स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्याप्रमाणे अंमलबजावणी करायला सुरूवात केली. सुरुवातीची बरीच वर्षे त्यांच्या ताब्यात जास्त करून आदिलशाहीचेच किल्ले आले. १६५७ साली त्यांचा प्रथमच मुघलांशी थेट संबंध आला कारण त्यांनी मुघलांच्या ताब्यातील सधन शहर जुन्नर लुटले. तसेच, १६३६च्या मुघल-आदिलशहा तहानुसार जे किल्ले मुघलांकडे असायला हवेत त्यातले बरेचसे शिवाजीराजांनी जिंकून घेतले होते.
पुढे १६६३ मधे शाहिस्तेखानावर हल्ला, १६६४मधे सुरतेची लुट, जसवंतसिंगाची फजिती या कारणांमुळे औरंगजेब चिडुन गेला व सप्टेंबर १६६४ मधे त्याने मिर्झाराजा जयसिंग या महापराक्रमी, मुत्सद्दी रजपुत मुघल मनसबदाराची स्वराज्यावरच्या मोहिमेवर नियुक्ती केली.
भलीमोठी फौज, तोफखाना तसेच, सरकारी व खाजगी खजिना बरोबर घेऊन मिर्झाराजा स्वराज्याकडे निघाला. सोबत दिलेरखान हा पराक्रमी मुघल मनसबदार व इतरही नावाजलेले मनसबदार होते. १० फेब्रुवारी रोजी हे मुघल सैन्य औरंगाबादला पोहोचले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
१० फेब्रुवारी १६७१
सिद्दी कसीम व सिद्दी खैरात यांनी दंडराजपुरी मराठ्यांकडुन जिंकली व या दिवशी होळी पोर्णिमा होती.
१६७१ च्या सुमारास महाराजांनी परत जंजिऱ्याची मोहीम हाती घेतली. जंजिरा फत्ते करणाऱ्यास त्यांनी एक मण सोन्याचे बक्षीस देण्याचे ठरवले होते. जंजिऱ्या हून तीन कोसांवर महाराजांचा तळ होता. त्याच रात्री दंड्याचा ठाण्यावरती छुपा हल्ला करण्यास सिद्दी कासीम तयारी करत होता (१० फेब्रुवारी १६७१) . हे ठाणे म्हणजे किनाऱ्या वरील किल्ला होता. मराठी फौज किल्ल्यात तैनात होती. सिद्दी कासीम समुद्रामार्गे तर सिद्दी खैर्यत जमिनी मार्गे असा दुतर्फा हल्ला करण्याची कासीम याची योजना होती. होळीचा सण असल्याने गस्तीच्या सैनिकां शिवाय किल्ल्यातली फौज बेसावध होती. कासिमच्या नावा किल्ल्याच्या तटाला लागताक्षणी खैर्यत ने किल्ल्यावर हल्ला चढवला. साहजिकच किल्ल्याची ताकद हा हमला थोपवण्या साठी गेली व त्यामुळे समुद्राच्या दिशेने होणाऱ्या हमल्या कडे दुर्लक्ष झाले. तटाला शिड्या लावून कासीमची फौज किल्ल्या वर आली आणि एकच कल्लोळ माजला. गस्तीच्या सैनिकांनी शिकस्त केली पण ताकद विभागली गेली होती. दरम्यान किल्ल्या वरील दारूगोळा कोठारात भयंकर स्फोट झाला. प्रचंड धूर उसळला. सगळे जणू ह्या स्फोटाच्या धक्क्याने स्तब्ध भारावले होते. ह्या अतीव शांततेत कासीमची ललकारी गुंजली. परत लढाईला तोंड फुटले, पण मराठ्यांच्या प्रत्युत्तरातली हवाच जणू निघून गेली होती. कासीम आणि खैर्यतची फौज भारी पडत होती, ह्या रणकंदनात मराठी फौजेचा धुव्वा उडाला आणि दंडा राजपुरी स्वराज्यातून परत सिद्दी कडे गेली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
१० फेब्रुवारी १७५६
१० फेब्रुवारी १७५६ रोजी वॉटसनला अशी खबर लागली की तुळाजी आंग्रे घेरिया किल्ल्याचा ताबा मराठ्यांकडे (म्हणजे नानासाहेबांकडे) देण्याच्या वाटाघाटी करण्यासाठी गेलेले आहेत. हे समजताच वॉटसनने आंग्र्यांना दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत किल्ला स्वाधीन करून शरण यायचा खलिता पाठवून दिला. त्याचे उत्तर न आल्याने दुसऱ्या दिवशी दुपारी ४ वाजता आरमाराच्या २ डिव्हिजन्स घेऊन वॉटसन घेरियाकडे गेला आणि त्याने हल्ला सुरु केला. किल्ल्यावर तोफगोळे डागणे सुरु झाले. असाच एक गोळा आंग्र्यांच्या ताब्यात असणाऱ्या मूळचे इंग्रजी जहाज 'रिस्टोरेशन' ह्याच्यावर पडला आणि आंग्र्यांचे सर्व आरमार जळून खाक झाले. (आंग्र्यांकडे इंग्रजांची पकडलेली शार्लोट, विलियम, स्वेर्न, रिस्टोरेशन, डार्बी, पायलट, ऑगस्टा इत्यादी जहाजे होती!)
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
१० फेब्रुवारी १७६१
पानिपत युद्धानंतर उत्तरेत मराठा साम्राज्य कोसळले असा आरोप केला जातो. पानिपतावर प्रत्यक्षात झालेल्या युध्दानंतर विजयी ठरलेल्या अहमदशाह अब्दालीने मराठ्यांचा किती धसका घेतला होता ते पहा..
तह करण्यास अहमदशाह अब्दाली आतुर होता. त्यासाठी अब्दालीने अवघ्या महिन्याच्या आत म्हणजेच नानासाहेबांस वकीला मार्फत पोषाख पाठवून दिला होता. सदरचे दिनांक १० फेब्रुवारी सन १७६१ रोजीचे पत्र छायाचित्रात दिले आहे.
आता यातूनच लक्षात येते की पानिपतावरील पराभावानंतरही मराठ्यांचा उत्तरेत किती प्रभाव होता ते... अनेकदा दिल्ली लुटणारा, बादशहास पळवणारा अब्दाली मराठ्यांच्या पहिल्याच तडाख्याने डगमगला हे निश्चितच.
सरदारक्या आणि जहागीरी वाचविण्यासाठी बायका - मुली देऊन स्वतःची सुटका करणारे मराठे नाहीत. उलट मराठे म्हणजे मरण समोर स्पष्ट दिसत असतानाही नरवीर दत्ताजींसारखे "बचेंगे तो और भी लडेंगे" म्हणून काळालाही जिंकणारे आहेत हे चाणाक्ष अब्दालीस चांगलेच उमजले यात शंकाच नाही आणि म्हणूनच त्याने तहासाठी तात्काळ हालचाल केली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
१० फेब्रुवारी १७७१
हा दिवस मराठ्यांच्या इतिहासातील सुवर्ण अक्षराने लिहण्यासारखा दिवस आहे या दिवशी महाराजाधिराज उमराव अलिजाबहाद्दर माधवराव सिंदे (महादजी शिंदे ) यांनी दिल्लीवर कब्जा मिळवला आणि छत्रपतींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल टाकले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
१० फेब्रुवारी १७८२
पुण्यामध्ये सवाई माधवरावांचा शाही विवाह असल्याने देशभरातील राजा-महाराजांसह अनेक नामांकित लोकांनी हजेरी लावली होती. पूर्वी विवाह हे ३०-४० दिवस चालायचे. शाही विवाहामध्ये तर नाच-गाणे, विविध खेळ, मनोरंजनाबरोबरच विविध बाजार भरायचे. नाच-गाण्याकरिता तर देशभरातील सुप्रसिद्ध नर्तकींनी आपली हजेरी लावली होती.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
१० फेब्रुवारी १८१८
अजिंक्यतारा इंग्रजांनी जिंकला
सन १८४४ साली तो छत्रपती प्रतापसिंह महाराजांचे ताब्यात आला. या गडावर पुरातनकालचे मंगळाई देवीचे व हनुमान मंदिर आहे. अजिंक्यताºयातील जो पडीक राजवाडा आहे तो कै. छत्रपती शाहू महाराज यांनी बांधलेला आहे. दिल्ली सुटकेनंतर त्यांनीच सातारला महत्व प्राप्त करून दिले.
या किल्लयावर दुधबावी, सागरी सुलतान पीर, मंगळाई, शिवसागर सप्तऋषी, कोठी व भवानी ही सात तळी होती. तसेच मंगळाई, नृसिंह, हनुमंत, महालक्ष्मी, रामेश्वर, सप्तश्री व विठोबा ही सात देवालये होती. शेख सल्ला व साकडा सुलतान हे दोन पीर येथे होते. याच किल्लयावर महाराणी येसूबाई, महाराणी ताराबाई व महाराणी आनंदीबाई ऊर्फ माईसाहेब यांचे वास्तव्य घडले. १० फेब्रुवारी १८१८ रोजी इंग्रजांनी मराठ्यांचा जरीफटका उतरवून येथे युनियन जॅक फडकाविले.
साताराचा किल्ला हुकेबहन, सप्तर्षीचा किल्ला, मंगळाईचा किल्ला, इस्मतआरा, शाहूगड, सतारे तसेच अजिमतारा या नावाचा हा किल्ला अजिंक्यतारा झाला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,
सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.
"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट जय सह्याद्री" 🚩
Comments
Post a Comment