जगन्नाथ_पुरी_मंदिर_आणि_मराठे
#जगन्नाथ_पुरी_मंदिर_आणि_मराठे
प्रत्यक्ष जिथे भगवान श्रीकृष्ण चे ह्दय आहे असे ठिकाण .मंदिरात कृष्ण ,बलराम ,सुभद्रा यांचे डोळे नाक तोंड इतकेच पुर्ण मुर्ती चे अवयव आहेत असे असुनही या मंदिरास जगन्नाथ चे मंदिर म्हणजे कृष्णाचे मंदिर आहे असे बोलले जाते आजचे मंदिराचे बांधकाम हे १२ वे शतकाचे आसपास कलिंगचा राजा चोडगंगा आणि अनंग भिमदेवाने केले असं सांगितलं जातं. पण मंदिरातील मुर्ती बाबत शेकडो वर्षांपासून ऐकत आलेल्या कथा सांगितल्या जातात.
मुघलांच्या ताब्यात असताना हे मंदिर ७/८ दशके बंद होते . शतकानुशतके चालत आलेले उत्सव रथयात्रा बंद होते . मंदिर तोडफोड करून नासधूस केली होती उरले होते ते फक्त भग्न अवशेष भकास ठिकाण केले गेले होते.
लाल महाल मधे मानहानीकारक पराभवानंतर स्वतः ची बोटे तोडून घेऊन जीव वाचवून दिल्ली ला गेलेला शाहिस्तेखान यांची भेट न घेता त्याला औरंगजेब ने बंगाल प्रांताच्या सुभ्यावर पाठवून दिले. सोबत आदेश होता हिंदू ची मंदिरे फोडा,हिंदू चे धर्मांतर करा अजुन ही बरच काही . मानहानीकारक कारक पराभवाने धुसफुसत असणार्या शाहिस्तेखान ने केले ही तसेच मंदिरे फोडली,गावे लुटली हाहाकार माजला यातच युगानुयुगे चालत आलेला जगन्नाथ पुरी रथ यात्रा खंडीत केली.मंदिर फोडले,पुजार्यांच्या कत्तली केल्या.(काही प्रमाणात मंदिर वाचवण्यात पुजार्यांना यश आले) येथील लोकांनी इतकी भिती घेतली की परत रथ उत्सवास प्रारंभ होण्याकरता ८० वर्षाचा प्रचंड मोठा कालावधी गेला. ही रथ यात्रा चालू करण्याचे श्रेय जाते ते सरसेनासाहेब सुभा राघोजीराजे भोसले यांना. "चार धाम यौवन मुक्त करा , सप्तसिंधू मुक्त करा कर्तव्यास चुकार होऊ नका" - शिवप्रभुंची ही इच्छा आणि आदेश शंभुपुत्र शाहू महाराज यांनी त्यांचे मराठा साम्राज्याचे सरसेनासाहेब सुभा राघोजीराजे भोसले यांना पाठवून यांचे करावी पुर्ण केले. छत्रपती शाहू महाराज यांचे मृत्यूनंतर जगन्नाथ पुरी मंदिर मुक्त केले (राघोजीराजे भोसले यांची राजधानी नागपूर पण त्यांचे मुळ गाव दौंड तालुक्यातील भिमतटी चे हिंगणी-बेर्डी पैकी हिंगणी गाव "हिंगणीकर राजेभोसले" अशी राजेभोसले यांची एक शाखा आहे बाबाजी राजे भोसले यांनी १५ वे शतक शेवटी जी पाटीलकी ची गावे विकत घेतली त्या पैकी एक गाव) नागपूरकर भोसले यांचे सोबत भिमथडीचे मातब्बर सरदार घराण्यातील सरदार होते , इतिहास अभ्यासक Shekhar Shinde , Rahul Bhoite यांनी केलेल्या संशोधनानुसार माळेगांव बुद्रूक , मोरगाव,आंबी चे तावरे सरदार होते.
मराठा साम्राज्याचा विस्तार देशभर करणारे #हिंदनृपती_शाहू_महाराज यांनी बंगाल प्रांत साम्राज्यात घेण्यासाठी राघोजी राजे भोसले यांना आदेश दिले.रघोजीराजे यांनी बंगाल प्रांत मुक्त केला त्यावेळी मुघलांच्या ताब्यात हा भाग १५० वर्ष होता राघोजीराजे बंगाल प्रांतात पोहचले तेव्हा तेथील लोक "मरहट्टे आ गये भागो" अशी आर्त आरोळी ठोकत पळून गेले. राघोजीराजे यांनी आपल्या सैन्याला सांगुन या मंदिराचे बाकी असलेले पुजारी गावातील लोक धरून आणले. मंदिराची पुन्हा डागडुजी करून घेतली पुजारी लोकांच्या नेमणुका केल्या नित्यनेमाने पुजा चालू केल्या, मंदिराच्या रथयात्रा उत्सवासाठी ,खर्चा साठी मोठा पैसा खर्च केला इतकेच नव्हे तर मंदिरासाठी हजारो एकर जमीन दान करून येणार्या उत्पन्नातून मंदिराचे खर्चाची,रथ यात्रा ची व्यवस्था लावली , हे सर्व करून ही तेथील स्थानिक लोक पुजारी अस्वस्थ होते याचे कारण विचारले असता राघोजीराजे यांना सांगितले की तुम्ही परत गेलात की पुन्हा सर्व बंद होईल मंदिराची तोडफोड होईल हत्याकांड चालू होईल मंदिरांचे उत्सव बंद केले जातील. यावर उपाय म्हणून राघोजीराजे भोसले यांनी मंदिर रक्षणासाठी १० हजार सैन्याची खडी फौज तिथे ठेवली आणि याच मंदिरा समोर मराठा साम्राज्याचे विजयाचे प्रतिक म्हणून विजयस्तंभ रोवला, (जो कोणार्क चे मंदिरा जवळचा अरूणस्तंभ आहे ) आजही तिथे कायम आहे जो मराठा साम्राज्याच्या पराक्रमाच्या गाथा सांगत उभा आहे . ओरिसा राज्यात असणारे हे मंदिर आणि ओरिसा वरील मराठा साम्राज्याचे वर्चस्व हे दुसरे राघोजीराजे भोसले यांच्या आणि इंग्रजांच्यात झालेल्या कराराने संपुष्टात आले, इंग्रजांनी सर्वप्रथम हे मंदिर लुटले आणि खजिना लुटून नेला पण रथयात्रा मात्र मराठ्यांनी मंदिराच्या लावलेल्या सोयीन मुळे चालू राहिल्या .
मराठा साम्राज्याचे सरसेनासाहेब सुभा राघोजीराजे भोसले यांनी जगन्नाथ पुरी मंदिराबाबत जर काही कार्य केले नसते रथ यात्रा चालू केली नसती प्रचंड प्रमाणात खर्च करून रथ यात्रा भरवली नसती तर आज दिसणारे चार धाम पैकी एक जगन्नाथ पुरी चे धाम इतर मंदिराप्रमाणे एक खंडर बनून राहीले असते (हंम्पी बदामी सारखे) इतके नक्की आणि काही बंगाली कवींच्या प्रमाणे मराठे हे लुटारू आहेत हे पण खरं ठरले असते , प्रत्यक्ष ते धर्म रक्षक ,संस्कृती रक्षक , हिंदू धर्म वाचवणारे आहेत हेच खरे ,देशातील सत्तातंरे सर्व घडवून आणले ते सातारा मधे बसून #छत्रपती_शाहू_महाराज यांनी .
#राजधानी_सातारा
आज ही नागपूरकर भोसले यांचे हातून नारळ फोडून रथयात्रा उत्सवास सुरुवात केली जाते
|| सह्याद्रीच्या कडेकपारी, नाद गुंजतो वारंवार ||
|| शौर्य गाजवून गेली, मर्द मराठ्यांची तलवार ||
शब्दांकन :
राहुल दोरगे पाटील 🚩🙏
Comments
Post a Comment