११ फेब्रुवारी १६५८छत्रपती शिवरायांनी आरमार उभारणीचा शुभारंभ केला.मराठा साम्राज्यामधे कल्याण आणि त्याच्या आसपासचा

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

११ फेब्रुवारी १६५८
छत्रपती शिवरायांनी आरमार उभारणीचा शुभारंभ केला.
मराठा साम्राज्यामधे कल्याण आणि त्याच्या आसपासचा संपूर्ण भाग होता, तेथेच १६५७ ते १६५८ साली जहाज बांधनीमधे कुशल आशा कारागिरांना काढुन जहजांची निर्मिति पहिल्यादा सुरु झाली, सीद्दी, पोर्तुगीज, इग्रज आणि डच यांच्या पासून स्वराज्याच रक्षण करण हे मराठा आरमाराच मुख्य काम, पण महाराजांची नजर होती अथांग आशा समुद्र साम्राज्यावर, आरमाराच काम सुरु असतानाच पद्मदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, सिंधुदुर्ग, आणि आणखिन बऱ्याच छोट्या मोठ्या सागरी किल्ल्याणची बांधनीही सुरु होती, अथांग आसा समुद्र आणि त्याच्या किनारी असणार हिंदवी स्वराज्य, मराठा साम्राज्यातील व्यापाऱ्याना समुद्रा मार्गे मुक्तपणे व्यापार करता यावा तसेच राज्याची भरभराट होण्यासाठी समुद्राच रक्षण अत्यंत गरजेच होत, त्यामुळे संपूर्ण कोकणामधे असणाऱ्या असंख्य खाडया जहाजांसाठी उत्कृष्ठ आसा आसारा होता. तर समुद्र किनारी आसणाऱ्या कठिण दगडाच्या जमिनी आरमाराच्या तळासाठी बलवान आशा होत्या.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

११ फेब्रुवारी १६६०
औरंगजेबाने मुख्तारखान याला दख्खनेची जबाबदारी देऊन औरंगाबाद येथे पाठवले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

११ फेब्रुवारी १६८१
किल्ले नळदुर्गजवळ मराठी सैन्य तैनात. नळदुर्ग किल्ल्यापासून ६ मैलांवर रणमस्तखानाशी मराठ्यांचा सामना. मराठ्यांनी "धरणगाव" लुटले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

११ फेब्रुवारी १७५६
तुळाजींची निष्ठा पेशव्यांपेक्षा साताऱ्याच्या छत्रपतींच्या गादीवर अधिक होती. त्यामुळे पहिले बाजीराव यांच्यानंतर सत्तेवर आलेल्या नानासाहेब पेशव्यांना आंग्रे आपल्या आधिपत्याखाली असावे असे वाटत होते. मुळात नानासाहेब पेशव्यांस सातारा छत्रपतींच्या गादीविषयी प्रचंड द्वेष होता. याच द्वेषातून नानासाहेब पेशव्यांनी मानाजी आणि तुळाजी या आंग्रे बंधूंमध्ये कलह घडविला. नानासाहेब पेशवे हे आंग्रे आणि तत्कालीन मराठा छत्रपतींचा एवढा द्वेष करू लागले की, पुढे नानासाहेब पेशव्यांनी इंग्रजांची मदत घेऊन मराठ्यांच्या बलाढ्य आरमाराचा कपटनितीने पराभव केला. इंग्रजांनी आंग्रेचा दिवाण रामजीपंतास फितूर करून पेशव्यांस आपल्या बाजूने वळविले होते. इंग्रजांची चाल नानासाहेब पेशव्यास कळाली नाही. सन १७५६साली पेशव्यांनी आणि इंग्रजांनी विजयदुर्गावर एकत्र हल्ला करून तुळाजींचा पराभव केला. तारीख ११ फेब्रुवारी १७५६ रोजी कर्नल क्लाइव्हने विजयदुर्गावर प्रवेश करून मराठ्यांचा आरमाराचा मोठा खजिना ताब्यात घेतला. या युध्दात तुळाजी आंग्रेच्या बाजुने लढणारे ५०० हून अधिक सैन्य मारले गेले. तुळाजी आंग्रे पेशव्यांच्या ताब्यात आले.त्यांना पेशव्यांनी वंदन किल्ल्यावर कैदेत ठेवले.सुमारे तीस वर्ष ते पेशव्यांच्या कैदेत होते. कैदेतच पर्वती, पुणे येथे त्यांचे निधन झाले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

११ फेब्रुवारी १७६० 
सन १७६० रोजी सदाशिवराव भाऊसाहेब यांच्या नेतृत्वाखालील मराठा सैन्याने उदगीर येथे मराठ्यांचा कट्टर शत्रू निजामाचा दारूण पराभव केला. दिनांक ११ फेब्रुवारी सन १७६० रोजी निजामाशी तह झाला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

११ फेब्रुवारी १८१८
छत्रपती प्रतापसिंह महाराजांना सातारच्या गादीवर
मराठेशाहीतील उत्कर्षाचा परमोच्च बिंदू-फर्मानबाडी.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जेधे शकावली प्रमाणे १९ फेब्रुवारी १६३० रोजी जन्म झाला. इथपासून मराठेशाहीचा उदय झाला. ह्या नंतर सुमारे १८७ वर्षांनी म्हणजे  १७ नोवेंबर १८१७ ला इंग्रजांनी  शनिवारवाड्यावर युनियन ज्याक फडकवला व ११ फेब्रुवारी १८१८ रोजी जाहीरनामा काढून छत्रपती प्रतापसिंह महाराजांना सातारा ह्या अत्यंत छोट्या राज्यावर बसविले.अशा प्रकारे मराठेशाहीचा अस्त झाला.
वर नमूद केलेल्या मराठ्यांच्या उदय आणि अस्ता दरम्यानच्या 187 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत मराठेशाहीच्या आयुष्यात अनेक चढ उतार,मान,अपमान,जय,पराजयाच्या घटना घडल्या.छत्रपती शिवाजी महाराजांनी ६ जून १६७४ ला स्वतःस हिंदू पद्पातशहा म्हणून राज्याभिषेक करून घेतला,दक्षिण दिग्विजय करून दक्षिणेकडे मराठी राज्याचा विस्तार केला.त्यानंतर पुण्यश्लोक शाहू महाराजांच्या कारकिर्दीत पेशव्यांनी मराठ्यांचा जरीपटका अटकेपार नेला,जवळपास निम्म्या भारतावर मराठ्यांचे प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष नियंत्र होते.मराठेशाहीत सगळ्याच काही गोष्टी सुखद घडल्या नाहीत.शिवरायांचा अकल्पित मृत्यू,त्यातून उद्भवलेले वारसा युद्ध,कट कारस्थाने,शंभू राजांची अत्यंत क्रूर तऱ्हेने हत्त्या,छ.राजाराम ,त्यांच्या नंतर ताराराणी व असंख्य मराठे सरदार,सैनिकांचा अपुऱ्या ताकदीनिशी सतत सव्वीस वर्षे मोगलांशी संघर्ष,व १७६१ मध्ये मराठे आजवर विसरू न शकलेली दुःखद घटना,पानिपत संग्राम  ह्या काही प्रमुख सुद्धा घडल्या.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

११ फेब्रुवारी १८१८
बाजीराव रघुनाथराव पेशवेंना बंडखोर ठरविण्यात आले
बाजीराव रघुनाथराव यांचा युध्दात पाडाव करता येत नाही हे लक्षात आल्यावर इंग्रजांनी अखेर बाजीराव रघुनाथराव यांच्या सैनिकांना बिथरविण्यासाठी ११ फेब्रुवारी सन १८१८ रोजी जाहीरनामा काढला. त्याचाही अपेक्षीत परिणाम न दिसल्याने १० एप्रिल सन १८१८ रोजी छत्रपतींना फर्मान काढावयास लावून बाजीराव रघुनाथराव यांना बंडखोर ठरविण्यात आले व तशी व्दाही फिरविण्यात आली. तरीही बाजीराव रघुनाथराव हातात येत नाहीत हे पाहून इंग्रजांनी अनेक मराठा सरदारांशी हातमिळवणी केली. अखेर ३ जून सन १८१८ रोजी बाजीराव रघुनाथराव यांनी ढोलकोठ येथे इंग्रजांसमोर शरणागती पत्करली. इंग्रजांनी ज्या बाजीराव रघुनाथराव यांची प्रतिमा "पळपुटा" अशी केली आहे त्याच बाजीराव रघुनाथराव यांनी दिलेल्या विस्मयकारक लढतीने इंग्रजांनी त्यांचा चांगलाच धसका घेतला आणि म्हणूनच महाराष्ट्रापासून दूर बिठूर येथे त्यांना हलविण्यात आले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,
सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.

"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री" 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४