५ मार्च १६६६औरंगजेबाच्या भेटीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे राजगडाहून आग्र्याकडे प्रस्थान.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

५ मार्च १६५९
छत्रपती शिवरायांच्या तलवारीचा खरा इतिहास
छत्रपती शिवजी महाराजांच्या हातात जी तलवार होती तीच तलवार म्हणे छत्रपती शिवरायांना आई भवानी ने दिली ??
आई भवानीला जर इतकी रयतेची शिवराज्याची काळजी होती तर तलवार ऐवजी छत्रपती शिवरायांना आधुनिक बनावटीची बंदुकच का नाही दिली ??
कशी देनार ?? जीने तलवारच दिली नाही ती बंदुकतरी कशी देनार ??
छत्रपती शिवरायांना कोणी देवी बिवी प्रसन्न झाली, वरदान दिले या इतिहासात मारलेलेल निव्वळ थापा आहेत ...
छत्रपती शिवाजी महाराज एक नैसर्गिक रुपातच कर्ते पुरुष होते त्यांना असल्या वरदान बारदानाची अजिबात गरज नव्हती
म्हणुनच प्रबोधनकार ठाकरे म्हणतात, "छत्रपती शिवरायांचे नाव घेतलल्यावर हिंदूच्या ३३ कोटी देवांची पलटन बाद होते."
पण ज्यांनी इतिहासातुन थापा मारल्या आणि आम्ही गपगुमान पचविल्या..."
तलवारीचा खरा इतिहास असा......
दिनांक ५ मार्च १६५९ रोजी महाराज वाडीचे सावंत यांच्या सोबतीने कुडाळला आले होते , तेथे पोर्तुगाल मध्ये तयार करण्यात आलेली हि तलवार युरोपियन व्यापाऱ्याने विक्रीस ठेवली होती.
या तलवारीची खासियत छत्रपती शिवाजी महाराजांनी अचूकतेने जाणली. ती तलवार वजनाने हलकी पण किमतीने बरीच वजनदार होती. ती न गंजणाऱ्या विशेष धातूने बनविली होती. तिचे पाते पातळ असूनही विशेष अश्या न मोडणाऱ्या विशिष्ट पोलादाने बनविण्यात आले होते... अशी हि आधुनिक तलवार हिरेजडीत मुठ आणि सोन्याच्या धातूत तयार केली असल्यामुळे आणखीनच मौल्यवान होती. याशिवाय तलवारीची धार अफलातून होती. तलवारीच्या समोर येणारा क्षणातच आपला प्राण गमाविल अश्या धाटणीची.
महाराजांना गनिमांना संपवायचे होते येथे रयतेचे राज्य उभारायचे होते त्यासाठी महाराजांना अशी वजनाने हलकी, धारेने तेज आणि न मोडणारी सपसप वार करू शकेल अशा तलवारीची महाराजांनी खूप गरज होती. त्यावेळी महाराजांनी ती तलवार रोखीने ३०० होणांमध्ये खरेदी केली. (३००होन = त्यावेळचे एक हजार पन्नास रुपये)
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा कारभार करताना हिशोब ठेवण्यात अगदी चोख असत याचे उत्तम उदाहरण म्हणजे महाराजांनी ३०० होण मोजून विकत घेतलेली तलवार, तिची नोंद छत्रपती शिवाजी महाराजांच्या दफ्तर खाण्यात करण्यात आली असून कीर्द खाते (इन्कम अॅन्ड एक्स्पेंडीचर अकौंट) मध्ये खर्चाच्या कॉलममध्ये नोंद करून महाराजांनी या तलवारीबाबाद गोंधळ माजू नये, भाकड कथा रचल्या जाऊ नये यासाठी प्रबंध करून ठेवला आहे...
पण तरीही प्रतीक्रांतीवाद्यानी छत्रपती शिवरायांचे दैवीकरण केले बहुजन त्यास फसले भुलले...

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

५ मार्च १६५९
कोकणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची घोडदौड चालू असताना आदिलशहाने कुडाळ येथील देसाई लखम सावंत यांची बंडखोरी मोडून काढण्यासाठी रुस्तुमजमा नावाच्या सरदारास पाठवले. लखम सावंताने निकराचा प्रतिकार करून आपले रक्षण करण्याचा प्रयत्न केला परंतु रुस्तुमजमाने सर्वत्र नाकेबंदी करून लखम सावंताची परिस्थिती बिकट केली. या संकटाला तोंड देण्यासाठी आजच्या दिवशी महाराजांशी तह करून महाराजांचे मांडलिकत्व पत्करले व तहाप्रमाणे महाराजांनी लखम सावंताला मदत करून त्याचे संरक्षण केले.
छत्रपती शिवाजी महाराज आणि कुडाळकर सावंतांमधील तहनामा -
ता. ५ मार्च १६५९
श्री
सन १०६८ फसली
तहनामा राजश्री खेम सावंत व लखम सावंत देसाई बहादूर प्रांत कुडाळ यांजकडील पीतांबर शेणवई कारभारी येऊन ठराव करून दिला सुरु सन तिस्सा खमसैन अल्लफ
प्रांत मजकूरचे महाल वगैरे चालत आहेत. आकार होईल त्याचा ऐवज दरसाल निम्मे हुजूर पावता करावा, निम्मा आकार राहील त्यांत तीन हजार लोक पायदळ हेटकरी ठेवावे आणि ज्या वेळेस हुजूर चाकरीस बोलाविले जातील तेव्हां तीन हजार लोकांनिशी सेवा करावी. खांसा जातीने येण्याचे प्रयोजन पडेल तेव्हां बोलावणे होईल तेव्हां येत असावे. कलम १
किल्ले फोंडे प्रांत तालुका घेऊन हुजर ठेविला त्यास हरएक प्रसंगास कुमक राखीत जावी. बिदनूर वगैरे संस्थानच्या खंडण्या घेण्यास स्वारी होईल त्यांच्या कुमकेस जात असावे. कलम १
स्वराज्य साधनाच्या ठायी वकीलापाशी मध्ये राहून तुरुक लोकांचे साधन करावे. कलम १
प्रांतांतील जमाबंदीच्या चौकशीस हुजुरून कारकून व लोक राहतील ते ठेवून त्यांच्या नेमणूकीबद्दल हुजूर अमल पैकी पावते करावे. कलम १
प्रांत मजकूरची देशकत वतने तुमची व बहादूर किताब अजरा [ मऱ्हा ] मत चालेल. त्यांतील किल्ले, कोट व ठाणी तुमच्या स्वाधीन केली आहेत. तेथे दस्तान करून जतन करावी. तेथे हुजूरचे कारकून व लोक येतील ते ठेवावे. कलम १
शके १५८० विलंबीनामसंवत्सरे फाल्गुन वद्य ७. एकूण पांच कलमे करार करून तहनामा दिला असे " मोर्तब. "

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

५ मार्च १६६०
पन्हाळ्यात सिद्दी जौहरने वेढा घातला तेव्हा इंग्रज अधिकारी हेन्रीने आपल्या बरोबर सर्व इंग्रजांना घेऊन इंग्रजी मोठ्या तोफा जौहरच्या मदतीसाठी पन्हाळ्यास नेल्या होत्या स्वत: तो इंग्रजी झेंडे लावून आणि बँड वाजवीत पन्हाळ्यावर तोफा डागीत होता. नंतर यांचाच काटा काढण्यासाठी १८५२ च्या फाल्गुन वद्यात महाराजांनी राजापुरावर स्वारी करून ते लुटले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

५ मार्च १६६६
औरंगजेबाच्या भेटीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे राजगडाहून आग्र्याकडे प्रस्थान.त्यांच्या सोबत होते ९ वर्षाचे शंभूराजे, सर्जेराव जेधे, हीरोजी फर्जद, निराजीपंत, मदारी मेहतर.आऊसाहेबांची मनस्थिती आज काय असेल ? केवळ कल्पनाच केलेली बरी ! शिवाजी महाराज आज मृत्यूच्या दाढेत प्रवेश करायला निघत होते, ९ वर्षाच्या युवराजांसह !!!

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

५ मार्च १७०७
शहजादा आझमने स्वतःला बादशहा घोषित केले
औरंगजेबाला जराजर्जर अवस्था प्राप्त झाली आणि तो वैफल्याच्या वाटेने जाऊ लागला. मराठ्यांच्या समशेरींनी त्याची झोप उडविली. तब्बल २६ वर्षानंतर, २० फेब्रुवारी १७०७ रोजी औरंगजेब अहमदनगर जवळ भिंगार येथे मृत्यू पावला आणि स्वराज्यावरचा मुघली फास सुटला. आता औरंगजेबाच्या मुलांत यादवी युद्ध होणे अटळ होते. शहजादा आझम याने ५ मार्च १७०७ रोजी स्वतःला बादशहा म्हणून घोषित केले. येसूबाई, शाहू राजे व इतर कबिला बरोबर घेऊन तो दिल्लीला जाण्यास सिद्ध झाला. नर्मदा पार केल्यावर सिरोंचे येथे छावणीचा तळ पडला, झीनत बेगमेच्या मध्यस्थीने अखेर आझम शाहूस सशर्त सोडण्यास तयार झाला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

५ मार्च १७७८
कोल्हापूरकरांचा तह
फेब्रुवारीमध्ये सटवाजी भोसले यांनी ५०० घोडेस्वार घेऊन थेट महादजीच्याच चौकीवर हल्ला चढवला. त्याठिकाणी उदाजी पवारांचा नातू मल्हारराव पवार होता. सटवाजींच्या पट्ट्याच्या घावात मल्हाररावाच्या नाकाचा शेंडा उडाला. महादजीची सात माणसे जागीच ठार झाली. वेळ पाहून सटवाजी फौज घेऊन शहरात परतले. शेवटी ५ मार्च रोजी महांकाळी तोफ कराड येथे येऊन पोहोचल्याचे वर्तमान महादजीस समजले. गेले तीन महिने कोल्हापूरास वेढा पडला होता. अतोनात जिवीत व वित्तहानी झाली होती. इकडून हैदर अलीचीही फौज अजून आली नव्हती. त्यात महांकाळी तोफ कोल्हापूरात पोहोचल्यास तटबंदी टिकाव धरु शकणार नाही हे ओळखून सेनापती येसाजी शिंद्यांनी महादजीच्या अटीवर तह करण्याचे कबूल केले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

५ मार्च १८७९
१८७९ नंतर फडके यांच्या कार्याला सुरुवात झाली. त्यांनी दौलतराव नाईक यांच्या मदतीने लोणी जवळ धामरी गावावर पहिला दरोडा टाकला. यामध्ये त्यांना फक्त तीन हजार रुपये मिळाले. त्यानंतर फेब्रुवारी १८७९ मध्ये लोणी व खेडवर दरोडा टाकून लूटमार केली. ५ मार्च १८७९ रोजी जेजुरी जवळ वाल्हे गावावर दरोडा टाकला. या लुटीत त्यांना चार बंदुका, तीनशे रुपये व शंभर रु. चे कापड मिळाले. यानंतर त्यानी सरकारविरुद्ध सशस्त्र उठाव करण्याची तयारी सुरू केली. सुरुवातीला त्यांनी पुणे, मुंबई व इतर शहरातील सुशिक्षित व धनाढ्य भारतीयांकडे मदतीची मागणी केली परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,
सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.

"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री" 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...